स्वावलंबी जीवन
स्वावलंबी जीवन
स्वावलंबी जीवन जगुनच मनुष्याने आपली प्रगती साधली पाहिजे.स्वावलंबनाचा मार्ग जो साकारेल तोच मणुष्य दुसऱ्याचे दुख समजू शकेल.आणि त्यांची सर्व कार्य कुशलतेने सर्वांची ह्रदय जिंकुन आयुष्यात यश संपादन करु शकेल.स्वावलंबनाचा स्वीकार करणे म्हणजे स्वतः वर पूर्ण विश्वास ठेवणे.नशिबावर अवलंबून न रहाता आपली क्षमता ओळखून आपली प्रगती साधणे, आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे असे मला वाटते.
जगातले सर्वच महान पुरुष स्वावलंबी होते, आणि त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांना प्रेरणा देवून आपले मार्ग प्रशस्त केलेले होते. गुरु वशिष्ट ने माणस घडवली होती.ती माणस आपल्या कर्तृत्वाने देव झालीत. एकप्रकारे तेजस्वि स्रोत बनली. पण स्वावलंबन, परिश्रम आणि जिद्द ह्या गुणांमुळे ज्यांनी प्राविण्य मिळविले,ते अनेक कार्य करुन सिद्धिस गेले.म्हणून त्या मानवाना झिडकारले तरीही ते उच्च सिंहासनावर आरुढ झाले.ते सर्व स्वावलंबनाच्या,आत्मविश्वासाच्या जोरावर बनले गेले.
जीवनात दुसऱ्यांकडून प्रेरणा घेऊ शकता. पण जीवनात काय साध्य करायचे ते आपणच ठरवायचे असते. ते साध्य करण्यास आपलेच हात आपणास मदत करत असतात. कष्टाशिवाय फळ कधिच मिळत नाही. देगा देवा पलंगावरी ही म्हण माणसाला अपयशी करते. आजचे जग इतके वेगात धावत आहे की एका माणसाने करणे कठीण असते म्हणून महिलांना स्वावलंबी होण्याची गरज वाढलेली आहे.
बँकेचे व्यवहार करायचे भाजी मार्केटला जाणे ,किराणा आणणे,ही वृत्ती प्रत्येक महिलेमध्ये असली पाहिजे. स्वसंरक्षण करणे,यासाठी पूरुषांवर अवलंबून न राहता आपले रक्षण करणे, स्वसंरक्षणार्थ तयार व्हायला पाहिजे. शिक्षण घेण्याची वयाला अट नसते, योग्य शिक्षण घेत रहाणे,वाचन केल्याने बुद्धीला चालना मिळत असते. किती ही सुविधा असल्या तरी महिलांनी रिकाम न बसता जे कला-कौशल्य आपल्या जवळ आहे त्याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे.आपल्या मुलामुलींवर चांगले संस्कार करून त्यांना स्वावलंबी जीवन जगण्याची सवय लाविली पाहिजे.जीवनात कधी ही कोणती ही घटना घडू शकते,त्या सर्व गोष्टी लक्षात घेवुन स्वावलंबी जगायला पाहिजे.कुणावर आश्रित होण्यापेक्षा स्वता:समृद्ध व्हावे असं मला मनापासून वाटते. स्वावलंबी व्यक्ती कुठेच असफल होत नाही. जेंव्हा त्याच्या कार्याला तो सर्व काही मानतो. त्याचा फायदा म्हणजेच स्वावलंबनाची पुरचूंडी सांभाळली तर आपणास हमखास यश मिळवून देत असते.
परावलंबी पण आपल्याला पराजित करत असतं.कमीपणा आणत असतं. जो कुणाची मदत घेत नाही तोच खरा स्वावलंबी असतो. पण आजच्या युगात वेळप्रसंगी मदत ही घ्यावीच लागते.वावग म्हंटल तर कुणाच्या मागे मागे फिरुन कोड कौतूक करुन पुढे गेलेले ही समाजात दिसतात.पण टीकून राहु शकत नाही.किति दिवस करणार स्तुती समोरच्यांना जेंव्हा स्वभाव समजतो तेंव्हा खाडकन नजरेतून उतरतो.आणि तो विश्वास गमावून बसतो.
"वहं कौनसा उकदा है जो हो नही सकता"।।
"तेरा जी चाहे तो क्या हो नही सकता"।।