vinit Dhanawade

Horror Crime

3.5  

vinit Dhanawade

Horror Crime

" सूड… ( भाग दुसरा ) "

" सूड… ( भाग दुसरा ) "

35 mins
3.1K


     पुढचे चार दिवस तर inspector अभिषेकला "त्या" केसमध्ये लक्षच देता आले नाही. एका मंत्र्याच्या मुलाचे लग्न असल्याने त्याची डुटी तिथे लागली होती. तर महेशकडे दुसऱ्या केसेस होत्या. अभी वैतागला होता त्या लग्नाला. लग्न उरकल्यानंतर अभिने पुन्हा केसकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यादिवशी महेशला त्याने घरी बोलावून घेतलं. 


" हा बोल अभि…कसं झाले लग्न.…. ", महेश जरा मस्करीत बोलला. 

" गप्प रे… ते नको आता ….किती त्रास झालं ४ दिवसात, विषय काढू नकोस तो." अभि वैतागत बोलला. 

" ok… बाबा, कशाला बोलावलंसं ? ", 

" अरे… कोमल सावंत केसकडे लक्षच दिलं नाही चार दिवस.", 

" हो रे… मी पण दुसऱ्या केसेस वर होतो ना.… पुण्याला गेलो होतो ना.",

" नवीन केस ? ",

" हो, तिथे एक बेवारस प्रेत सापडलं ",

"मग ते पुणे पोलिसांचा काम आहे ना… ",

" हा… पण माझा मित्र आहे ना pune forensic expert… त्याने मला बोलावून घेतलं, माझी केस नाही ती. " ,

" ठीक आहे ते जाऊ दे… आपल्या केस मध्ये काही आहे का ? ",

" तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का?",

" कोणती ?",

" तू त्या सावंतला सांगितलं होतंस ना, मिडियामध्ये सांगायला… मग अजून मीडियात, news मध्ये काही आलंच नाही. पुन्हा ४ दिवसात त्याने call सुद्धा केला नाही." , अभिला पटलं ते. 

" मला वाटते त्यांनी मीडियात काही सांगितलंचं नसेल, कदाचित." ,

" may be… ठीक आहे, उद्या जाऊ त्यांच्या घरी. चल आता मी जातो माझ्या घरी. " म्हणत महेश घरी गेला. 


      सकाळीच त्या दोघांनी सावंतांचे घर गाठले, तर घरी फक्त मिसेस सावंत. अभिला जरा विचित्र वाटलं. " तुमची मुलगी गायब आहे ना.कोणालाच tension नाही का. " महेश मिस सावंतांना बोलला. " तसं नाही, पण ऑफिसला तर जावेच लागेल ना." महेश त्यावर काय बोलणार. " बरं… it's ok… मिस्टर सावंतांना मी हि गोष्ट मिडिया मध्ये कळवायला सांगितलं होते. मग अजून तशी news कशी नाही पेपर्स मध्ये. " त्यावर मिसेस सावंत गप्प झाल्या. अभि आणि महेश एकमेकांकडे पाहू लागले. काय समजायचे नक्की. इतक्यात राहुल आला. " Hi inspector …. काही समजलं का कोमलबद्दल ? ", एकदम tension free mind मध्ये होता राहुल. अभिच्या नजरेतून सुटलं नाही ते. " हा… ते शोधतो आम्ही. पण हि news अजून बाहेर कशी नाही. तुमचं लग्न म्हणजे मिडियासाठी मोठी event होती. आणि कोमल गायब आहे ते मिडियाला कसं माहित नाही अजून. " राहुल मिस सावंतकडे पाहू लागला. अभिला कळलं ते. " काय झालंय ? ", महेशने विचारलं. 


      राहुलने सगळी कहाणी सांगितली. मिडियामध्ये कोमल हरवली आहे हे सांगितलं तर बदनामी होईल. business shares वर परिणाम होईल. सगळीकडे गोष्ट पसरेल म्हणून काजलने सुचवलं कि कोमल काही दिवसांसाठी परदेशात गेली आहे असं सांगावं. आणि म्हणून मिडियामध्ये अशी काही गडबड नव्हती. अभिने डोक्याला हात लावला. काय माणसं आहेत हि… जवळच्या व्यक्तीपेक्षा business shares त्यांना जास्त महत्वाचे वाटतात. माणूसकी काय असते ते यांना माहित नसेल बहुदा.… अभि मनातल्या मनात बोलला. " Ok, then… मिस्टर सावंत आले कि मला भेटायला यायला सांगा." म्हणत दोघे बाहेर पडले. 


"काय यार… जरा विचित्र आहे. कोणालाच tension नाही. " अभि म्हणाला. 

" ऑफिस बरोबर आहे, बंद ठेवून चालत नाही.… तरीसुद्धा सावंत जरा विचित्र वागत आहे ना. सुरुवातीला काळजी वाटायची त्याला, आता काही नाही.… काय करायचे.",

"बघू… संध्याकाळी येतील ना ते. तेव्हा विचारू काय ते. ",

" चल, मी पुणेला चाललो आहे, तू भेट त्यांना. काय बोलले ते सांग.",

" पुण्याला कशाला …. ? ",

" अरे ती केस, बेवारस प्रेत… माझी केस नसली तरी, केस interesting आहे.",

"काय एवढं त्यात?", महेश खाली बसला सांगायला. 

" मी पुण्याला गेलेलो , काही काम होता म्हणून. तर माझा मित्र आहे ना… आनंद, तर त्याने मला बोलावलं होतं. एक प्रेत सापडलं होतं, अंगावर एकही कपडा नाही, त्याची ओळख कशी पटणार, चेहरा नीट होता म्हणून. परंतु तो पुण्यातला नाही हे स्पष्ट आहे. कारण त्या दिवसात कोणीच हरवल्याची तक्रार नाही. पूर्ण पुण्यातील पोलिस चौकीत त्याचा फोटो पाठवला होता. तरी त्याची काही ओळख नाही. शिवाय, काही दिवसाआधी एक गाडी देखील सापडली. तिचा नंबर सोलापूरचा आहे. कमाल आहे ना अगदी." 


" सोलापूर ? …. सोलापूरची गाडी पुण्याला… चोरून आणली असेल." ,

" असेल " महेश म्हणाला. 

" ठीक आहे, तू जाऊन ये पुण्याला." अभि म्हणाला. 

महेश निघाला आणि अभि पुन्हा " कोमल" च्या केस मध्ये डोकं घालू लागला. संध्याकाळी मिस्टर सावंत आणि काजल, पोलिस स्टेशनमध्ये आले. अभि त्यांचीच वाट बघत होता. 

" या… मिस्टर सावंत, खूप दिवसांनी आलात.",

"हो… जरा बिझी होतो ना ऑफिसच्या कामात. म्हणून जमलं नाही." , 

" आणि या काजल… या कुठे होत्या ?", अभि काजलकडे पाहत म्हणाला.

" मी… मी गोव्याच्या ऑफिसला होते." अभि संशयी नजरेने काजलकडे पाहू लागला. 

" तुम्हाला सांगितलं होता ना, केस संपेपर्यंत शहर सोडून जायचे नाही.",

" अहो… पण ऑफिसचं काम…. ",

"बर… बर, ठीक आहे." काजलच वाक्य मधेच तोडत अभी बोलला. 

" मी पण जरा दुसऱ्या कामात बिझी होतो, तर आता पुन्हा चौकशी सुरु करणार आहे.… ह्म्म्म… कोमल सावंत… ती हरवली नाही तर तिचे कोणीतरी अपहरण केलं आहे. हे तुम्हालाही कळलं असेल." दोघांनीही होकारार्थी मान हलवली.

" तर तुमचा कोणावर संशय आहे का ? किंवा तिचे कोणी शत्रू वगैरे…. कोणाबरोबर भांडण …आणि तुम्हाला कोणाचा फोन आलेला का… पैशांसाठी…", 

" नाही inspector … कोणताच फोन आला नाही…. तशी कोमल जरा short tempered होती. राग लवकर येतो तिला. हल्ली दोन भांडणे झाली तिची. " ,

" कोणाबरोबर… " ,

"एक ऑफिसमधला होता, दिपेश नावाचा. आणि दुसरा अमित, त्यांच्या ग्रुप मधला. दिपेशवर आम्ही केस केली होती. त्याला एक दिवस ठेवलं होतं पोलिस स्टेशनमध्ये. आणि अमित, तर असाच एकतर्फी प्रेम करायचा तिच्यावर, म्हणून भांडण झालं होते." अभिने दोघांचे पत्ते घेतले, सावंत आणि काजलला घरी जाण्यास सांगितले. 


     दिपेशचं घर जवळच होते, पहिला अभि तिथेच गेला. घराला कुलूप. शेजारी विचारपूस केली तेव्हा कळलं कि आई-वडिलांना दोन आठवड्याआधीच गावाला पाठवलं त्याने. शिवाय ५ दिवसापासून तोही गायब आहे. अभिला यात गडबड वाटली. त्याचा फोटो मिळवण्यासाठी तो ऑफिसमध्ये गेला. दिपेशची चौकशीही केली. सगळी माहिती गोळा करून तो आता अमितकडे निघाला.


" Hi, मी inspector अभिषेक… अमित इथेच राहतो ना. " अभिने दरवाजा उघडल्या उघडल्या प्रश्न विचारला. अमितची आई समोर होती.

" हो… अमित इथेच राहतो. any problem inspector ?," 

" मी आत येऊ का… जरा चौकशी करायची होती.",

" या आत…" अमितच्या आईने त्याला घरात घेतलं. 

" हा… बोला inspector, काय विचारायचे आहे. आणि कशाबद्दल… " ,

" अमित आहे का घरात ?",

" नाही… तो मुंबईत नाही, पण तो कशाला हवा आहे तुम्हाला. " अभि त्यांच्याकडे बघत राहिला. 

" तुमची family आणि सावंतांची family…. खूप close relation मध्ये आहात ना… " अभिने त्यांना विचारलं. 

" हो… अमितचे वडील आणि मिस्टर सावंत हे business friends आहेत ना म्हणून, मिसेस सावंत, त्यांच्या मुली, मिस्टर सावंत… याचे जेणे-जाणे असते आमच्याकडे.",

"मग तुम्हाला कोमल बाबत माहित असेल, खर कारण… " ,

" हो कळलं मला, पण तुम्हाला अमित का हवा आहे.,",

" चौकशी…. अमितचं भांडण झालं होतं ना, कोमल बरोबर.…. एकतर्फी प्रेम… माहित आहे ना तुम्हाला. " ते ऐकून त्यांची मान खाली झुकली.

" त्यासाठी आलो आहे मी, अमित कुठे आहे आता ? ",

"अमित मुंबईत नसतो तेव्हापासून… सोलापूरला आमचे एक ऑफिस आहे, तिथे असतो तो.",

"म्हणजे मुंबईत येतंच नाही का कधी." ,

" येतो पण कधी कधी… " ,

" शेवटचा कधी आला होता ? ", 

" एक महिना झाला असेल. ",म्हणजे कोमल हरवण्याच्या खूप आधीपासून अमित मुंबईत नाही. शिवाय कोमल सोलापूर स्टेशनला दिसली होती. अमितचे ऑफिस सोलापूरला आहे. दोघांचा काही संबंध आहे का… " अमित call तर करत असेल ना… ",

"नाही…फोनसुद्धा करत नाही.",

" Last call कधी आला होता…. ",

" तेव्हाच… एक महिन्यापूर्वी…. सोलापूरला पोहोचला तेव्हा call केला होता. नंतर नाही. " अभि चक्रावून गेला.

" म्हणजे तुम्हाला काहीच वाटत नाही, तो call करत नाही, इकडे नसतो त्याचं. " त्या गप्प झाल्या. थोड्यावेळाने बोलल्या. 

" तो आधीपासून असाच आहे. आमच्याबरोबर जास्त बोलत नाही तो. त्यात कोमलच प्रकरण झालं. अमित आधीपासून सोलापूरला जायचा. पण आठवड्याने मुंबईला यायचा. त्या भांडणानंतर तो मुंबईत नसतोच जवळपास…. आम्ही त्याला काही बोलत नाही, बिझनेसमध्ये लक्ष देतो तेच खूप आहे आमच्यासाठी." अभिने अमितचा फोटो घेतला, सोलापूरच्या ऑफिसचा पत्ता घेतला आणि तसाच घरी आला. 


       दोन दिवसांनी महेश मुंबईत परतला. थेट अभिषेकला भेटायला गेला." काय मग, inspector महेश, काय चाललंय ? " अभि जरा विचारात होता. महेशने ओळखलं,

" काय झालं रे ? ",

"काही नाही , जरा tension आले आहे या केसचे… ", 

" क्या हुआ ? ", अभिने सगळी जमलेली माहिती महेश समोर ठेवली. 

" हे बघ, कोमल हरवून म्हणजेच अपहरण होऊन एक आठवडा झाला आता. त्यांच्या घरी कोणालाच tension नाही. ते दोघे, बाप आणि त्याची पोरगी…. त्यांना सांगून सुद्धा मुंबई बाहेर गेले, ऑफिसच्या कामासाठी. तिथे अमित एका महिन्यापूर्वी सोलापूरला गेला आहे. तो काय करतो, याचं त्याच्या आई-वडिलांना काही नाही. राहुल तर विचारत सुद्धा नाही कोमलबाबत आणि कोमल……. ती कुठे आहे अजून त्याचा पत्ता नाही लागत अजून, डोकं फिरलं आहे माझं. " अभि डोक्याला हात लावून बसला होता. थोडयावेळाने तोच बोलला," तुझं सांग, काय झालं त्या केसचं…?",

" हा. ती केस ना, ती dead body भेटली होती ना, ओळख तर पटली नाही, पण त्याचा खून झालेला नक्की. गोळी लागली आहे त्याला. शिवाय एका महिन्यापूर्वीचे प्रेत आहे ते." ,

"म्हणजे कोणालाच कळले नाही एवढे दिवस.",

"अरे प्रेत जंगलात सापडलं… त्याच्या अंगावरचे कपडे कुठे गेले माहित नाही… चोराचे काम असेल कदाचित.",

"आणि ती कार भेटली होती ती. ",

"तिचे काही माहित नाही मला." तेव्हा अभिला काही आठवलं. 


"पाटील…. तुम्हाला काही काम सांगितलं होतं, केलंत का. ", अभिने आवाज दिला. 

" हो सर, त्यांना ११ वाजता बोलावलं आहे येतील इतक्यात.", महेश अभिकडे पाहू लागला,

" काय…?",

" कोमलचे bank statement चेक केला, दोन दिवसापूर्वीच तिच्या account मध्ये कोणीतरी ४००० जमा केले. आता ती तर ते account , use करत नाही किंवा तिची family सुद्धा नाही. म्हणून मी बँककडे चौकशी केली असता ते पैसे कोणीतरी बंगलोर मधून transfer केले आहेत.",

"Interesting !!!!! " ,

" तेव्हा पाटीलला सांगितलं होतं, तपास कर म्हणून." 

ते पैसे एका account मधून net banking ने direct transfer केले होते. त्यामुळे ज्या account मधून पैसे आले होते त्याची माहिती लगेच मिळाली. कोणी निलिमा नावाच्या स्त्रीचे ते account होते. त्यांना contact केला असता त्या बंगलोरला होत्या. तर त्यांना मुंबईत बोलावून घेतले अभिषेकने. 


बरोबर ११ वाजता मिस निलिमा आल्या ." Hello inspector, मी मिस निलिमा, sub inspector पाटील यांनी, तुम्ही भेटायला बोलावलं असं सांगितलं. म्हणून आले आहे मी.",

" हो… हो, please seat. " अभिने प्रथम साधी चौकशी सुरु केली. " तुम्ही मराठी छान बोलता, बंगलोरच्या वाटत नाही तुम्ही." , 

" मी मुंबईला राहते, बंगलोरला माझी आजी असते.",

"अस आहे तर…. बर मग, तुमची आणि कोमलची ओळख कशी ? ", direct प्रश्न… 

"कोमल कोण ? ",

"कोमल सावंत, तुम्ही ओळखता ना तिला… ", निलिमाने " नाही" म्हणून मान हलवली. 

" तुम्ही ओळखत नाही, मग तिच्या account मध्ये तुम्ही पैसे कसे deposit केले ? ", निलिमाच्या चेहऱ्यावर मोठ्ठ प्रश्नचिन्ह. सरते शेवटी, अभिने कोमलचं bank statement दाखवलं. आणि तेव्हा नीलिमाला click झालं. 


" या होय… ओळखलं मी…. हो मीच ४००० deposit केले.",

"प्रथम तर ओळखलं नाही तुम्ही कोमलला." ,

" हो, मी ओळखलंचं नाही तिला.",

"नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला. कोमल तुमच्या ओळखीची नाही,तरी तिच्या account मध्ये ४००० जमा केलेत, पैसे जास्त झालेत का ?",

"तसं नाही काही, तिने मला मदत केली होती म्हणून. ",

" जरा सविस्तर सांगा. आणि पाटील यांचे statement लिहून घ्या.… हम्म, बोला आता. " ,

"त्या दिवशी, माझी आजी खूप आजारी होती. त्यामुळे मला urgent जायचे होते तिला भेटायला. ऐनवेळी विमानाचे तिकीट मिळत नाही. तरी मी try केलं खूप. emergency ticket सुद्धा नव्हती. खूप विनवण्या केल्या मी, ticket counter वर. त्यांनी ऐकलाच नाही. त्यावेळेस कोमल माझ्या मागे उभी होती. तिने विचारलं मला, मी सांगितलं तसा तिने तिचे तिकीट मला दिले. तिच्या तिकिटावर मी बंगलोरला गेले. जाताना मी तिचा bank account number घेतला होता. तिकिटाचे पैसे परत देण्यासाठी." अभिने सगळं ऐकून घेतलं. म्हणजे कोमल बंगलोरला गेलीच नाही. तिच्या ऐवजी निलिमा गेली. त्यामुळे बंगलोर विमानतळाच्या passenger list मध्ये कोमलचच नाव आहे. एका ठिकाणाचा सुगावा तर लागला. तरी दोन ठिकाण बाकी आहेत अजून, अभि मनातल्या मनात विचार करत होता. 

" ठीक आहे. मिस निलिमा , thanks, तुम्ही आल्याबद्दल. तुमचा फोन नंबर आणि पत्ताही देऊन जा जाताना… " 


       संध्याकाळी महेश आला. त्याला अभिने सगळी माहिती दिली. " याचा अर्थ, कि कोमल definitely सोलापूरला गेली होती. आणि त्या रेल्वे पोलिसांच्या बोलण्यानुसार, ती तक्रार नोंदवून बंगलोरच्या दिशेने निघाली होती." महेश म्हणाला. 

" तरी गोव्याची mystery तशीच आहे अजून." अभि बोलला. 

" सुटेल रे ती पण हळूहळू.…. बरं , दिपेशचा काही पत्ता…. ",

"हो, लागेल पत्ता त्याचा. mobile track करायला सांगितला आहे , दोघांचा.… दिपेश आणि अमितचा. " ,

"अमित तर सोलापूरला आहे ना, मग त्याचा का. ",

" असंच , त्याच्यावर सुद्धा संशय आहे ना माझा. एका महिन्यापूर्वी त्याने त्याच्या घरी contact केला होता, त्या नंतर एकदाही मुंबईत आला नाही किंवा call केला नाही." ,

"interesting आहे ना अमित, बघू त्याचा फोटो, कसा दिसतो ते… " अमितचा फोटो पाहिल्यावर महेश उडालाच. " अरे… अभि, पुण्यात याचीच तर dead body सापडली आहे." ,

" काय… ? तू शुद्धीवर आहेस ना महेश." अभि म्हणाला. 

" हो रे, definitely हाच आहे तो. थांब. " म्हणत महेश त्याची bag आणायला गेला. Bag मधून त्याने पुण्याच्या केसचे पेपर्स आणि फोटोस काढले. अभिने ते फोटो लगेच ओळखले, अमित होता तो. अमितचा खून झाला आहे… या विचाराने अभिचे डोके चक्रावून गेले. 


" हा नक्की अमित आहे आणि तू म्हणतोस, एका महिन्यापूर्वी त्याचा खून झाला आहे. म्हणजे अमित मुंबईहून सोलापूर गेला तेव्हाच त्याचा खून झाला आणि त्यामुळेच अमित महिनाभर मुंबईत आला नाही कि call केला नाही. शिवाय त्याच्या घरीसुद्धा माहित नाही." अभि म्हणाला.

" त्याच्या घरी कळवूया का आता. ? " महेश.

" कळवायला तर हवे. पण एक गोष्ट कळत नाही, त्याची आई तर बोलली कि तो सोलापूरला गेला, मग… त्याची dead body पुण्यात कशी. ?" दोघांनाही प्रश्न पडला. अजून काही माहिती गोळा करून अभिने, अमितच्या घरी कळवलं. दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्यावर. एवढया मोठ्या मुलाचा खून झाला, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. पुण्याला जाऊन त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. अमितच होता तो. खरंच खूप वाईट झालं होतं. एव्हाना मिडियामध्ये हि news पसरली होती. 


" एक केस होती, त्यात आता दुसरी केस सुरु झाली." अभि वैतागून म्हणाला.

" पण तो पुण्याला गेला का… काहीच कळत नाही. बरं , त्याच्या शरीरातून जी गोळी काढली, त्याची काही माहिती, ज्या गनमधून गोळी झाडली ती गन भेटली का ?",

" नाही. त्याबाबत काही माहिती नाही. पण मला वाटते ती गाडी भेटली ना , तिचा काही संबंध असेल का… कारण ती गाडी सोलापूर मधली आहे. आणि अमितचं ऑफिस सोलापूरला आहे… बरोबर ना." ,

" yes… नक्कीच ती अमितची गाडी असेल. मला वाटते आपण पुण्यात चौकशी करू. कोणीतरी पाहिली असेलच ती कार… तिथून मग सोलापूरला जाऊ, चालेल ना." म्हणत अभिने पुण्याला जायची तयारी केली. पुण्यात पोहोचून त्यांना तशी काही माहिती नाही मिळाली, परंतु , सोलापूरला चौकशी केली तेव्हा वेगळीच माहिती समोर आली. 


" मला वाटते, मिसेस सावंतांना इकडेच बोलावून घेऊ. "महेशने विचार मांडला.

" नको… मुंबईत भेटू त्यांना." अभिने मुंबईत आल्या आल्या मिस्टर आणि मिसेस सावंत यांना बोलावून घेतले. 

" Hello inspector, काही माहिती मिळाली का , कोमलची. ",

" नाही, actually… मी मिसेस सावंतांना बोलावले होते, पण तुम्हाला सुद्धा कळावे म्हणून बोलावलं. " तेवढयात महेशसुद्धा आला 

" Direct विचारतो, अमितचा खून झाला हे माहित आहे ना तुम्हाला. ",

"हो… ",

" त्याचा खून एक महिन्यापूर्वी झाला, हे सुद्धा माहित असेल मग.",

" हो inspector ",

"मग ज्या दिवशी खून झाला, त्यादिवशी तुम्ही अमितला भेटायला का गेला होतात…. मिसेस सावंत… " या प्रश्नावर मिसेस सावंत अभिकडे पाहू लागल्या आणि मिस्टर सावंत त्यांच्याकडे.

" Inspector, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे, मी कधी गेलीच नाही सोलापूरला. " मिसेस सावंत अडखळत बोलल्या. अभि त्यांच्याकडे शांतपणे पाहत होता. 

" पण मी, तुम्ही सोलापूरला गेला होतात असं कुठे म्हणालो.… बरोबर ना मिसेस सावंत." आता त्यांच्याकडे काहीच नव्हते बोलण्यासारखं, त्या गप्प बसून राहिल्या.

 "बोला मिसेस सावंत, अमित त्याच्या ऑफिसमधून ज्या दिवशी शेवटचा गेला होता, त्या दिवशी तुम्हीच त्याच्या ऑफिसमध्ये गेला होतात ना, तुमचा फोटो ओळखला तिथल्या कर्मचाऱ्यांनी. शिवाय अमितच्या mobile वर शेवटाचा call तुमचाचं होता… कारण त्या दिवसानंतर अमितचा मोबाईल बंद आहे. म्हणजेच तुम्हीच त्याला भेटलेल्या शेवटच्या व्यक्ती आहात. तुम्ही खून केलात अमितचा… ",

" नाही. " इतका वेळ शांत असलेल्या मिसेस सावंत ओरडल्या. " मी नाही मारलं अमितला…. आणि मला माहित नाही कोणी मारलं ते. " 


मिस्टर सावंत तर नुसतेच ऐकत होते." तर मग तुम्ही त्याला का भेटायला गेला होता ? " ,

"कोमल विषयी बोलायला. ",

" पूर्ण गोष्ट सांगा. ",

"अमितचे प्रेम होते कोमलवर. पण कोमलचं लग्न ठरलं होतं. अमितला ते मान्य नव्हतं. शिवाय त्याचा राग होता दोघांवर, कोमल आणि राहुलवर. तो ते लग्न होऊ देणार नव्हता. हे त्याने मला सांगितलं होते एकदा. म्हणून तो letter's पाठवायचा अमित.",

"म्हणजे…तुला माहित होतं, अमित letter's पाठवायचा ते. " मिस्टर सावंत. 

" हो…. मी पाहिलं होतं एकदा अमितला तसं करताना, तसं त्याला मी सांगितलंही, कि हे बंद कर… पण तो ऐकायला तयार नव्हता.",

"म्हणून तुम्ही त्याचा खून केलात." महेश बोलला. 

"नाही … मी नाही खून केला त्याचा. जेव्हा त्याने मला फोन करून बोलावलं तेव्हा मी त्याला भेटायला गेले. त्याला काहीतरी सांगायचे होते मला म्हणून. ",

"काय सांगायचे होते.? ",

"माहित नाही. त्या दिवसा आधी, दोन दिवस आधी मला त्याचा फोन आला होता कि मला कोमलबद्दल काही माहिती मिळाली आहे, मला सोलापूरला भेटायला या. नाहीतर मी मिडियामध्ये "ती" बातमी देईन. असं म्हणाला तो. त्यासाठी मी त्याला भेटायला गेली होती. ",

"किती वाजता? ",

" सकाळी ११ वाजता. त्याला भेटले होते मी." ,

" आणि काय बोलणे झाले तुमचे.",

"जास्त नाही बोलला तो. काही सांगणार होता. पण एक urgent मीटिंग ठरली त्याची तसा तो निघून गेला. मुंबईत आलो कि बोलू असा म्हणाला. दोन दिवसांनी येणार होता तो मुंबईत. आलाच नाही. आणि आता ही news आली." अभिने सगळे ऐकून घेतलं. त्यांचे सगळे बोलणे रेकॉर्ड करून घेतलं महेशने. 


ते दोघे घरी गेले आणि इकडे अभि , महेशची चर्चा सुरु झाली. " मला वाटते , या सगळ्या Family मध्ये गडबड आहे, काजल सोडली तर.… ",

"तिला का सोडायचं… ",

"तिचं जरा बरी वाटते यांच्यात. कोणामध्ये कधी नसतेच ती. ",

" असो, आता काय",

"या सगळ्यावर आपल्याला आता नजर ठेवावी लागेल. कारण अमितला नक्कीच काहीतरी माहित होते, म्हणून त्याचा खून झाला." अभि . 

" तसं असेलही. पण मिसेस सावंतानी खून केला असा अर्थ होतं नाही ना." महेश बोलला. 

" एक गोष्ट मिस केलीस अभि, मिसेस सावंत सांगत होत्या, ते letter अमित पाठवायचा. अमितचा एक महिन्यापूर्वी खून झाला, कोमल kidnap होऊन २ आठवडे झाले. मधल्या २ आठवडयातसुद्धा कोमलला तशी अजून ३ letter's आली. जर अमितचा खून झाला होता तर नंतरची ३ letters कोणी पाठवली." अभिच्या लक्षात आली ती गोष्ट.

" means… ती पत्र कोणी वेगळीच व्यक्ती पाठवायची… असंच म्हणायचे आहे ना तुला." महेशने होकारार्थी मान हलवली. अभि विचार करू लागला. 

" मला वाटते, या सगळ्याची history काढावी लागेल. " मिस्टर सावंत मोठे businessman होते, त्यांची सगळी माहिती काढणे सोप्पे होते. अभिने काही जणांची टीम बनवली आणि ज्यांच्यावर संशय होता त्या सर्वांची माहिती गोळा करायला सांगितली. तो स्वतः बंगलोर ऑफिसला गेला. 


      अजून काही दिवस गेले, अभिने बरीच माहिती गोळा केली होती. पुढच्या चौकशीसाठी त्याने काजलला बोलावून घेतलं. काजल तशी उशीराच आली. 

" या बसा… ","Sorry हा… जरा उशीर झाला.",

"तुम्ही सगळीकडे वेळेच्या आधी पोहोचता ना, असं ऐकलं आहे मी." त्यावर काजल आश्चर्यचकित झाली. 

" means ? काय म्हणायचे आहे तुम्हाला… ",

"नाही… तुम्ही ऑफिसमध्ये किंवा कुठे मिटिंग असेल तर १० - १५ मिनिटे आधी पोहोचता ना म्हणून बोललो." त्यावर काजल जरा relax झाली. 

" तसं होय.…. हो, मला सवय आहे लवकर जायची… बरं, तुम्ही कशाला बोलावलं ? ",

"हा… कोमलबद्दल विचारपूस करायची होती. ",

"काय विचारायचे होते ?",

"कोमल बरोबर शेवटचं बोलणं झालं तेव्हा ती काही बोलली होती का तुम्हाला…. I mean, कोणी त्रास देते आहे वगैरे असा काही… ". काजल विचार करू लागली. खूप वेळाने बोलली ती." तसं काही बोलली नाही ती." अभिसुद्धा विचार करत होता. 

" मग तुम्हाला काय वाटते मिस काजल…. कोण असेल या kidnap च्या मागे.? ",

" ते मी कसं सांगू… ती तशी बिनधास्त रहायची नेहमी. कदाचित ट्रेनमध्ये कोणी तिच्या सामानावर नजर ठेवून हे सगळं केलं असेल. फक्त ती सुखरूप असू दे.",

"हं… thanks… मिस काजल. आम्ही कळवू काही सापडलं तर… तुम्ही येऊ शकता आता. " काजल निघून गेली. 


       आणखी ३ दिवस गेले. खूप काही माहिती मिळाली होती. खूप गोष्टी समोर आल्या. महेश सांगत होता ते अगदी बरोबर होते. मिस्टर सावंत यांच्यावर बंगलोरला केस चालू होती. परंतु त्यात त्यांच्या business partner ला पुराव्या अभावी सोडण्यात आलं होते. आणि तो business partner होता, राहुल.… होय, कोमलचा होणारा नवरा , राहुल…. त्याच्या विरोधात काही सापडलं नाही.पण त्याचा business पार बुडाला. इकडे दिपेशच्या mobile ची लास्ट लोकेशन गोवा हीच होती. साहजिकच त्याने नंबर बदलला असण्याची शक्यता होती. त्याचा तपास सुरु होता. आता गोवा ऑफिसला जाऊन काही मिळते का ते बघू म्हणून अभि, महेश सोबत गोव्याला गेला. काजलच्या flat वर पोहोचले, काजल अर्थात मुंबईला होती. flat एकदम शानदार होता. एका व्यक्तीसाठी तो खूपच मोठा होता. तिथे त्यांनी तपास सुरु केला. घरात २ गाड्या. 

" काजल madam इकडे एकटीच राहते ना." त्यांनी तिथे कामावर असलेल्या नोकराला विचारले. 

"हो साहेब, एकट्याच राहतात madam……. आणि कधी कधी त्यांचे एक मित्र येऊन राहतात." त्यावर अभिची नजर चमकली. 

" मित्र…. कोण ? ",

"अमित सर येऊन राहतात कधी कधी. ",

"अमित ? ", महेशने लगेच त्याला अमितचा फोटो दाखवला. 

" हेच का अमित सर …. " त्याने फोटो ओळखला. " हो… हेच येतात कधी कधी.",

"अजून कोण कोण येते इथे… ? " नोकर जरा गोंधळला. त्यावर ,महेशने bag मधून काही फोटो काढून दाखवले. त्यातले आणखी काही फोटो त्याने ओळखले. 



       अभि आणि महेशला खूप महत्त्वाची माहिती त्या नोकराने दिली. केस जवळपास solve होत होती. आता दिपेश हाती लागणं गरजेचे होते. दोघे बोलत बोलत flat च्या बाहेर आले. महेशची नजर तिथे उभ्या असलेल्या कारवर गेली. दोन कार… ह्म्म्म……. महेश काहीतरी विचार करू लागला." Watchman !! " महेशने हाक मारली. 

" जी साहेब. ",

"काजल madamच्या गाडया आहेत ना दोन्ही. ",

"हो… त्यांच्याच आहेत, त्याच वापरतात." ,

"आणि driver असेल ना… तो कुठे आहे आता. ",

" Driver होता साहेब… काजल madam बरोबर भांडण झाला म्हणून त्याला काढून टाकलं. ",

"ok… किती दिवस झाले ? ",

"दिवस नाही… ३ महिने झाले." अभि ते ऐकत होता. महेशने अभिकडे पाहिलं. महेशला काय म्हणायचे आहे ते कळलं अभिला. अजून काही विचारपूस करून दोघे निघाले. गोव्यालाच सावंतांचे कोणीतरी नातेवाईक राहतात अशी माहिती अभिकडे होती. त्यांना भेटायला ते गेले. 


" नमस्कार…. मी inspector अभिषेक आणि हा माझा मित्र Doctor महेश…. मी तुम्हाला call केलेला भेटण्यासाठी… ",

"हो… हो, आठवलं… या inspector, आत या." म्हणत आजींनी दोघांना घरात घेतलं. 

" काही माहिती हवी होती, सावंत कुटुंबाबद्दल.… तुम्हाला तर माहित असेल ना सध्या काय चालू आहे ते… कोमलबद्दल. " त्यावर आजी काही बोलल्या नाहीत. 

"तुमचं आणि त्यांचं काय नाते आहे, actually.",

" काजलची आजी आहे मी. सुगंधा ( मिसेस सावंत ) माझी मुलगी. ",

"ओहह… असं आहे तर. पण तुम्ही गोव्याच्या आणि सावंत मुंबईचे. मग ओळख कशी ? ",

" सावंत हे मूळचे गोव्याचेच. नंतर त्यांनी आपले सगळे मुंबईला हलवलं. आणि तिथे स्थायिक झाले." अभि आणि आजी गप्पा मारत होते, तर महेश सगळ्या घरात नजर फिरवत होता. घर तसं नेटकं होतं. एका कोपऱ्यात काही फोटोज होते. महेश ते पाहण्यासाठी म्हणून गेला. १०-१२ फोटो होते. 


थोडयावेळाने आजीही आल्या फोटो बघायला. " हे फोटोज… ?", महेशने प्रश्न विचारला. 

" काजलचा जन्म इकडचा… गोव्याचा. ती इथेच होती, दीड वर्षाची होईपर्यंत. " आजी खूप आनंदाने सांगत होत्या. महेशला प्रश्न पडला. 

" आजी… कोमल मोठी कि काजल… ? ",

"कोमल मोठी. ",

"मग तिच्या मित्रांनी सांगितलं कि ती काजलला ताई म्हणून हाक मारायची.".

"ती अशीच… मस्करी करायची. कोमल मोठी आहे ४ महिन्यांनी.",

" ४ वर्षांनी म्हणायचे आहे का तुम्हाला ?",

"नाही, ४ महिने. "…. ४ महिने…. कसं शक्य आहे…. अभि, महेश कडे पाहू लागला. महेशच बोलला मग,

" ठीक आहे आजी. ४ महिने ना ठीक आहे. तरी सुद्धा या सगळ्या फोटोजमध्ये फक्त एकचं लहान मुल आहे.",

" काजल आहे ती. " आजी बोलल्या.

" शिवाय, मघाशी तुम्ही स्वतःची ओळख करताना "काजलची आजी" असं म्हणालात. मग मला सांगा , कोमल का नाही या फोटो मध्ये ? ",

" कारण कोमल माझी नात नाही, काजलचं आहे. " कहानी में twist. 

" मग कोमल…. कोण आहे ? ",

"माहित नाही… सुगंधा (मिसेस सावंत ) एकदा कोमलला घेऊन आली अचानक, म्हणाली रस्त्यावर कोणीतरी सोडून दिले होते. तेव्हा कोमल असेल दीड वर्षाची. ",

"मग तुम्हाला कसं माहित. कि ती ४ महिन्यांनी मोठी आहे ते.",

"सुगंधाने सांगितलं. कोमल जशी आली , त्यानंतर ३-४ दिवसातच ते मुंबईला गेले, ते आजपर्यंत. त्यानंतर सुगंधा एकदाही आली नाही मला भेटायला गोव्याला. मीच जायचे कधी कधी मुंबईत. आता वय झालं तर जमत नाही प्रवास. फोनवरचं बोलणं होते. काजल येते कधी कधी, कोमल एकदाही आली नाही. म्हणून मला कोमल आवडत नाही, काजलचं नात माझी." अभि आणि महेश निघाले. बाहेर जाऊन चहा घेतला दोघांनी. 

" मला वाटते , अजून काही दिवस जर थांबलो ना इथे तर खूप काही मिळेल मला. तू जा मुंबईला. " आणि महेश मुंबईला आला. 


    पुढच्या दोन दिवसात दिपेशला सापळा लावून पकडण्यात आले. त्याकडून खूप मोठी माहिती मिळाली. महेश तर आधीच मुंबईला आला होता, केस संपल्यात जमा होती. सगळी माहिती गोळा करून अभि , दिपेश आणि त्याची टीम मुंबईला पोहोचले. आल्या आल्या महेशने अभिवर प्रश्नाचा भडीमार केला. 

" अरे… थांब थांब… किती प्रश्न… ",

"अरे साल्या… किती उस्तुकता लागून राहिली आहे मला… आणि कोमल भेटली का…. कोणी kidnap केलं तिला, दिपेशने ना…. कि कोणी दुसरा होता… ", अभिने हातानेच महेशला "थांब" अशी खूण केली. आणि मिस्टर सावंत यांना call केला. 

" Hello… मिस्टर सावंत… मला भेटायचे आहे तुम्हाला… ",

" कोमल भेटली का तुम्हाला ? ",

"भेटेल पण तुम्हाला भेटायचे आहे… ",

" कधी येऊ मी पोलिस स्टेशनमध्ये… ",

" नको… मी येतो तुमच्या घरी… मी काही नावे सांगतो, त्यांनाही उद्या बोलावून घ्या. काही प्रश्नांची उत्तरे अजून नाही मिळाली. ती जाणून घ्यायची आहे. ok… मग उद्या भेटू." 


     ठरल्याप्रमाणे, अभिने ज्यांना ज्यांना बोलावलं होते, ते सगळे हजर होते. अभि बरोबर बरेचशे police sub inspector, ladies constable आल्या होत्या. 

" हे सगळे कशाला आले आहेत inspector ? ",

"यांची गरज लागू शकते कदाचित म्हणून… " तसे जमलेले सगळे उभे राहिले. अभिला जरा हसू आलं. हसू आवरत त्याने सगळ्यांना बसायला सांगितले. सगळेच घाबरले होते. अभिने सगळ्यावर एकदा नजर फिरवली. अभिने बोलायला सुरुवात केली. 

" OK, इकडे जमलेले सगळे , हे business field मधील मोठी नावं आहेत, corporate मध्ये सगळेच फ़ेमस आहेत.…. " सगळ्यांनी ते मान्य केलं,"तर जेव्हा मी कोमलच्या केस मध्ये गुंतलो होतो तेव्हा खूप गोष्टी समोर आल्या, त्यातल्या काही गोष्टी अजून सुटल्या नाहीत माझ्याकडून, म्हणून तुम्हा सगळ्यांना बोलावलं आहे. " आता सगळे एकमेकांकडे पाहू लागले. 


    " पहिले सगळे relax व्हा, मग मी सुरु करतो. " अभिने पुन्हा सगळ्याकडे एक नजर फिरवली. " ok, पहिला प्रश्न विचारतो… आणि खरी उत्तरे मी अपेक्षित करतो. कारण मी खूप माहिती मिळवली आहे. फक्त ती तुमच्याकडून आली तर जास्त बरं होईल." अभिने त्याच्या हातातली काही कागदपत्र तिथे असलेल्या टेबलावर ठेवली. " या एका केसमुळे खूप धावपळ झाली, आम्हा सगळ्यांचीचं… जणू काही आमच्यामध्येच स्पर्धा लागली होती. धावण्याची…. " अभि हसत म्हणाला. " चला… आता आपण सुद्धा एक खेळ खेळूया." सगळे अभिकडे पाहू लागले. 

" Inspector…. तुम्ही इथे कशाला बोलावलं आहे आम्हाला ? काय असेल ते स्पष्ट सांगा. खेळ वैगरे काय …. What is this… ? ", अमितचे वडील रागात म्हणाले. 

"शांत व्हा… मिस्टर पंडित… शांत व्हा." अभि बोलला. " तर सगळे तयार आहात का… चला सुरु करू खेळ. " अभि त्या टेबलापाशी आला. " हे पेपर्स आहेत ना… ते साधे पेपर्स नाही आहेत. इथे जमलेल्या काही लोकांचे arrest warrant आहेत… " ते ऐकून सगळेच अवाक झाले. " arrest warrant… ?" काजल बोलली.

 " हो… मिस काजल…. इकडे असलेल्या काही लोकांनी , कधी ना कधी, कोणता ना कोणता crime केला आहे. पण त्या वेळेस काही भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांमुळे त्या केसेस तश्याच राहिल्या किंवा पुढे गेल्याच नाहीत. त्या केसेस मी पुन्हा open केल्या. आणि आता त्यांची arrest warrant आणली आहेत, संपूर्ण माहिती सहित." अभिने काजलकडे पाहिलं. 

" मिस काजल, तुम्हीच पहिलं arrest warrant कोणाचे आहे ते बघा. नावं मोठयाने वाचा प्लीज…" काजलने पुढे होईन एक पेपर उचलला. नाव बघून चेहरा पांढरा पडला. 

" आई… तुझं नाव आहे. " मिसेस सावंत लगबगीने पुढे आल्या आणि त्यांनी पेपर्स बघितले. त्यांचं नाव होते… 

" मी… मी काय केलं आहे… मला का अटक… ? " 


अभिने त्यांना इशारा करून खुर्चीवर बसायला सांगितला.

" बसा… पहिला नंबर तुमचाच लागला, बरं झालं.",

" पण मी काय केले आहे.?" अभि त्यांच्या समोर येऊन बसला. 

" तुम्हाला २६ वर्षापूर्वीची गोष्ट आठवते का… तुमची कार… रात्र… अपघात….आठवलं का काही… " ते ऐकून मिसेस सावंत चलबिचल झाल्या. काही न बोलता त्या असंच कूठे तरी पाहू लागल्या. 

" ठीक आहे… कोमल तुमची मुलगी नाही ना… कूठे सापडली ती तुम्हाला… ?",

"रस्त्यात कोणीतरी सोडून दिलं होतं तिला.",

"हम्म… मग तुम्हाला कसं माहित कि ती ४ महिन्यांनी मोठी आहे, काजलपेक्षा… " पुन्हा चलबिचल…,पुन्हा गप्प. 

" रस्त्यावर सापडलेली तर तिचं birth certificate कसं… बोला मिसेस सावंत, मी सुरुवातीला सांगितलं कि माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत. आता गप्प बसून काही होणार नाही. बोला." ladies constable त्यांच्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या. मिसेस सावंत रडू लागल्या. थोडयावेळाने रडू आवरून त्यांनी सांगायला सुरुवात केली.

"काजल तेव्हा १ वर्षाची होती. मी माझ्या आईकडे गोव्याला होते. काजलला आईकडे ठेवून मी जरा पाय मोकळे करायला बाहेर जायचे. त्यादिवशी असचं झालं, माझ्या मैत्रिणीकडे पार्टी होती. तिथून मी घरी परत येत असताना accident झाला होता. ",

"पण तू तर किती हळू चालवते कार आणि व्यवस्थित चालवतेस, तरीसुद्धा accident…. " मिस्टर सावंत मधेच बोलले. 

"Drink and Drive ची केस आहे मिस्टर सावंत… "अभिने माहिती पुरवली. काजल आता shock मध्ये होती. 

" तू ड्रिंक पण करतेस…. " मिसेस सावंत मान खाली करून बसल्या होत्या. 

" तेव्हा मी करायचे ड्रिंक… त्यादिवशी काजल एक वर्षाची झाली होती म्हणून मैत्रिणीनी जरा जास्त ड्रिंक दिलं मला. आणि रात्री घरी येताना, कंट्रोल गेला कारवरचा…. समोरून एक जोडपं जात होतं, त्यांना…. " आणि मिसेस सावंत थांबल्या बोलायच्या. 


सगळेच त्यांच्याकडे पाहत होते. अशीच घटना होती ती. " पण हि माहिती तुला कशी भेटली ? " महेशने विचारले. 

" तुला बोललो होतो ना, आणखी काही दिवस थांबलो तर खूप माहिती मिळेल. तू मुंबईला गेलास तेव्हा परत मी आजींकडे गेलो होतो. तिथेच मला कोमल आणि काजलची birth certificate मिळाली. त्यावरून मी कोमल ज्या हॉस्पिटल जन्माला आली तिथे गेलो. तिथे यांची माहिती मिळाली. यांनी कोमलला adopt केलं तेही तिथून कळलं. … मिसेस सावंत, अजून काही सांगता का… ? " त्यांनी बोलायला सुरुवात केली. 

" ते दोघेही खूप जखमी झाले होते. त्यांना तसंच गाडीत घेतलं आणि मीच admit केले. ते मिस्टर तेव्हाचं गेले होते. पण त्या बाई होत्या… त्यात कळलं कि त्या pregnant आहेत. लगेच operation केलं, मुलगी झाली होती पण त्या बाई वाचू शकल्या नाहीत. त्या मुलीला तसंच मग हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. माझ्यावर केस झाली…. Drink and Drive ची …. मनुष्य वधाची. कोमलला नंतर अनाथश्रमात पाठवलं, गोव्यात केस होती माझी. त्या inspector ला तेव्हा १० लाख दिले होते, केस close करायला. तरी तो तयार होत नव्हता. आणखी १० लाख देऊन त्याचं तोंड बंद केलं, कोमलला बरोबर घेतलं. आणि मुंबईला आले, त्यानंतर पुन्हा गोव्याला कधी गेले नाही.",

" आणि मी ती केस re-open केली. तो inspector तर आता रिटायर झाला. पुन्हा सगळी माहिती गोळा केली आणि arrest warrant आणलं. तुमची केस संपली मिसेस सावंत. " त्या उठून बाजूला गेल्या. 

" मिसेस सावंत… जाता जाता एक नावं काढा अजून." त्यांनी एक पेपर उचलला. " मिस्टर सावंत… ? " त्यांनी आश्चर्याने बघितलं. 

" छान… चला तुमचा नंबर आहे. या बसा… ",

" काय…. मी कोणता गुन्हा केला… माझं नावं का ? ". 


" या बसा … सांगतो तुम्हाला." मिस्टर सावंत बसले.

" Thanks to महेश, मला हे कळलं ते महेशमुळे. त्याने आपला मोर्च्या आता मिस्टर सावंतकडे वळवला. 

" तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये खूप बिझी असता ना… नुकसान होऊ नये म्हणून… ", त्यांनी 'हो' म्हटलं.

" तर कोमल आता बंगलोर ऑफिसला जात नाही.मग तुम्ही का गेला नाहीत इतके दिवस, त्या ऑफिसला… आहे का उत्तर… ",

"प्लीज inspector… प्लीज. " मिस्टर सावंत विनवण्या करू लागले. 

अभिने नकारार्थी मान हलवली." २ वर्षापासून केस चालू आहे ना… smuggling ची…. बंगलोरमध्ये… बरोबर ना… ",

"हो… "

"त्यात अजून एक केस होती… मी सांगू कि तुम्ही सांगता…. " त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. 

" सांगा सावंत…. का खून केलात तुम्ही… तुमच्या manager चा…. का मारलं त्याला…",

"पप्पा !!! काय ऐकते आहे मी…" काजल बोलली. 

" हो… मी खून केला त्याचा…. कारण त्याच्याकडे खूप पुरावे होते माझ्या विरोधात…. तो मला black mail करत होता. आधीच त्याने माझ्याकडून २५ लाख घेतले होते.",

"म्हणून त्याचा खून केलात तुम्ही… आणि हि मर्डर केस दडपण्यासाठी त्या जजला पुन्हा २५ लाख दिलेत… किती बेशरेमीची गोष्ट आहे. पैशासाठी न्याय विकला जातो. लाज वाटते मला, आपण या न्याय व्यवस्थेचा भाग आहोत त्याचा." अभि उठून येरझाऱ्या घालू लागला. 

" मिस्टर सावंत…. त्या जजला तर मी अटक केली आहे. तुम्हाला… smuggling आणि मर्डर, अश्या दोन्हीसाठी अटक करावी लागेल मला." मिस्टर सावंत बाजूला जाऊ लागले. 

" तुम्हीही एक नाव काढा आता…" त्यांनी नावं वाचलं… "राहुल… ". राहुलकडे सगळे पाहू लागले. राहुलचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. 

" माझं नावं कसं… ? " राहुल पुढे येऊन म्हणाला. 


     अभिने स्वतः त्याला जबरदस्ती बसवलं खुर्चीवर. " तुझी सगळी history मी सांगतो.… राहुल…. हुशार मुलगा, स्वतः काहीतरी करून दाखवायचे होतं म्हणून बिझनेस सुरु केला, तो पैसे उसने घेऊन. त्यात नफा मिळाला पण साहेबांची स्वप्न मोठी… झटपट होण्यासाठी याने smuggling सुरु केलं. तेही मोठया व्यक्ती बरोबर… मिस्टर सावंत बरोबर… एका वर्षात खूप पैसे कमावले दोघांनी. पण जास्त काळ ते सुख अनुभवता आलं नाही. सावंत वर केस लागली त्या manager मुळे… याच्यावर सुद्धा केस होती. परंतु तेच लाच देणे… त्यामुळे राहुल सुटला. सावंत already मर्डर केससाठी पैसे देऊन बसले होते. ते अडकले यात. राहुल मोकळा… काय बरोबर ना राहुल… ".

"अगदी बरोबर inspector… मग आता का पकडलं आहे मला… तुमच्याकडे त्याबाबत कोणता पुरावा नाही आहे… मी निर्दोष आहे. " राहुल खुशीत बोलला. आणि उभा राहिला. 

" बस रे… अजून संपलं नाही माझं… पुन्हा राहुलने बिझनेस सुरु केला. तो एकटा तर सुरु करू शकत नाही , म्हणून वेगळा पार्टनर निवडला. I mean…. पार्टनर निवडली…. कोमल सावंत…. पुन्हा तेच डोक्यात smuggling …. यावेळी सगळं सुरक्षित वातावरणात…. कोकेनची smuggling…. " यावर राहुल गप्प झाला. " आम्ही खोलवर चौकशी केली… कोकेन सापडली आम्हाला… कोमल आणि राहुलच्या घरी तपास केला तिथे सापडली कोकेन… व्वा !!! राहुल सर …. खूप मोठ्ठ काम केलंत तुम्ही…. जा, बाजूला जाऊन उभा रहा. " अभि आता त्या टेबलाजवळ येऊन उभा राहिला. एकच arrest warrant राहिलं होतं आता, " चला… हे नावं मीच वाचतो आता… " अभिने नाव पाहिलं… " Mr. पंडित… " आता तर वेगळंच काहीतरी… 


" काहीतरी चुकते आहे तुमचे…. ",

"नाही सर… या बसा hot seat वर." अभिने त्यांच्या खांद्यावर हात टाकला आणि खुर्चीवर आणून बसवलं.

" पण मी कोणताच गुन्हा केला नाही… " मिस्टर पंडित म्हणाले. 

" ते मी सांगतो… तुम्ही tension घेऊ नका… " अभिने काही कागदपत्र काढली. 

" मी जेव्हा मिस्टर सावंतची केस study करत होतो तेव्हा असं कळलं कि राहुलने कोणाकडून तरी पैसे घेतले होते. आणि त्या बिझनेसमध्ये सुद्धा २५% ची भागीदारी होती. केसमध्ये सावंत पूर्ण अडकले होते. दुसरा पार्टनर राहुल , सुटला होता. त्यामुळे राहुलला पैसे देणारा कधी पुढे आलाच नाही. आता कळल सगळ्यांना , कोणी पैसे पुरवले ते." अभिने पंडित याच्या खांद्यावर हात ठेवला. ते घाबरेघुबरे झाले. " एका केसमधून अगदी सही सलामत बाहेर आल्यावर यांची हिंमत अजून वाढली. जेव्हा राहुलने नवीन smuggling सुरु केली तेव्हा सुद्धा यांनीच पैसे पुरवले, पण ५० % भागीदारीवर. तेही नाव पुढे न आणता… आता हि सगळी माहिती मला राहुलच्या ऑफिसमधून कळली…. तर सांगायचा मुद्द्दा असा कि तेव्हा सुटलात तुम्ही… आता केस माझ्याकडे आहेत… आता बघतो मी एकेकाला… " म्हणत तो स्वतः खुर्चीवर बसला. 


      शांतता… चार जणाविरुद्ध arrest warrant होतं. ते सगळे मान खाली घालून उभे होते. अभि सगळ्याकडे पाहत होता. काजल रडत होती. महेश अजूनही अभिकडे पाहत होता. " कसं ना…. सगळेच गुंतले आहेत crime मध्ये…. एखाद्या movie सारखं झालं… मी आता हल्लीच एक movie बघितला होता मी. त्यातसुद्धा असंच दाखवलं होतं, सर्व लोकांना एकत्र बोलावून सगळ्यासमोर आरोपीला आणायचे. मला असंच करायचे होते एकदा. तरी एवढया लवकर संधी येईल अस वाटलं नव्हतं मला.… मस्त एकदम. " अभि स्वतःच हसत होता. बराच वेळ महेश, अभिकडे पाहत होता. त्याने न राहवून अभिला विचारलं,

" अरे पण, आपली main केस राहिली ना… कोमल कूठे आहे… ",

"हो रे… ते विसरलो मी…. सांगतो. चल सगळ्यांनी बसून घ्या. आता एक नवीन movie सुरु होते आहे. " वातावरण गंभीर होतं. त्यात अभि काय काय बोलत होता. " ok…. sorry, जरा गंभीर होतो मी पण." आता सगळ्याचे लक्ष अभि काय बोलतो त्यावर होतं.


" कोमल कूठे असेल… तुम्हाला काय वाटते मिस काजल… " सगळे काजलकडे पाहू लागले. तशी काजल जरा दचकली. 

" म… मला कसं ठाऊक ते… ",

"Its ok… मिस काजल… relax… असंच विचारलं मी." अभि बोलत बोलत काजल जवळ आला. 

" मिसेस सावंत… तुम्ही म्हणता ना, कि काजलला गाडी चालवता येत नाही.",

"हो… म्हणून तिचा पास आहे ट्रेनचा. मुंबई ते गोवा… ", अभि पुन्हा काजलकडे आला,

" तुमचा driver आहे ना मिस काजल… गोव्याला… ",

"हो….",

" त्याला तर तुम्ही ३ महिन्यापूर्वी काढून टाकलं ना…. मग driving कोण करते… " काजल गप्प. थोड्यावेळाने बोलली ती,

" गाडी नाही use करत… अशीच जाते ऑफिसला " अभि स्वतः शीच हसला.


" गोव्याला flight ने का जात नाही तुम्ही…. ?",

"असंच… भीती वाटते मला म्हणून… ",

"ट्रेनचा पास बघू शकतो का मी… " काजलने पास दाखवला. 

"तीन मेल आहेत ना … मुंबई ते गोवा… तिन्ही ट्रेननी जाऊ शकता का… ",

"हो… पण मी दोनच use करते… तिसऱ्या ट्रेनने जास्त वेळ लागतो.",

"साधारण किती वेळ लागतो … मुबई ते गोवा…",

"१०.३० ते ११ तास लागतात.",

"बरोबर … आणि गोवा ते मुंबई…. त्याला किती वेळ लागतो.?",

"तेवढाच वेळ लागणार ना… inspector " अभि काजलच्या समोर येऊन बसला. 

" गोव्याला तुमच्या flat आहे, तिथे तसेच अजून ८ flats आहेत ना… तिथे प्रत्येक व्यक्तीचा in-out time नोंदवला जातो… बरोबर ना. ", आता काजल चुळबुळ करू लागली. " गेल्या ३ आठवडयात तुम्ही… एकूण ८ वेळा गोव्याला गेलात.… मुंबई ते गोवा…. तो time बरोबर match होतो… परंतु गोवा ते मुंबई… तो वेळ जरा गडबड आहे. " ,

"काय म्हणायचे आहे तुम्हाला inspector…. " मिस्टर सावंत. 

" ८ वेळा त्या ९ तासाच्या आत मुंबईत आल्या आहेत. even, तुमच्या मुंबईच्या सोसायटी मध्ये सुद्धा In-out time नोंदवला जातो…. गेल्यावेळी म्हणजेच ५ दिवसांपूर्वी तुम्ही गोव्यावरून सकाळी ७ वाजता निघालात. आणि मुंबईला ३ वाजता हजर होता. जर मेल कमीत कमी १०.३० तासात मुंबईला पोहोचते, तर तुम्ही ८ तासात कश्या आलात मुंबईला… " काजल घाबरली आता.

" बर… ते सगळं असू दे… तुम्हाला मी शेवटी जेव्हा भेटायला बोलावलं होतं, तेव्हा तुम्ही एक वाक्य बोलला होतात… आठवतंय काही…",

"कोणतं… ",

"तुम्ही म्हणाला होतात कि ट्रेनमध्ये तिच्या सामानावर नजर ठेवून कोणीतरी केलं असेल… ",

"हो … मी बोलले होते असं… ",

"छान… कोमल ट्रेनने बंगलोरला निघाली होती ते कोणी सांगितलं तुम्हाला… कोमलने शेवटचा call केला तेव्हा ती मुंबईत होती, म्हणजेच ८ वाजता केला होता… तोही तुम्हाला नाही. त्यावेळेस तुम्ही गोव्याला होता. शिवाय ही माहिती फक्त आमच्याकडे होती… आम्हीही तुम्हाला कोणाला सांगितलं नाही त्याबद्दल… तर प्रश्न असा आहे, कि तुम्हाला कसं माहित कि कोमल ट्रेनने प्रवास करत होती." काजल चलबिचल झाली. 

" मला जरा बरं वाटतं नाही… मी जाऊ शकते का ? "काजल डोक्याला हात लावत बोलली. 


" नाही… थांबा जरा, जाऊ सगळेच आरामात… " अभिने हाताने खुण करून ladies constable ला काजलजवळ बोलावलं. काजल उगाचच इकडे तिकडे पाहत होती. " मुद्यावर येऊ आता… कोमलला का kidnap केलंत तुम्ही… मिस काजल. " आता सगळेच…. तिथे जमलेले पोलिस, हवालदार, ladies constable, महेश …. सगळेच…. अभि आणि काजलकडे बघू लागले. 

" काय बोलत आहात तुम्ही… मी… मी का करीन तसं… " काजल मोठयाने बोलली. 

" ते तुम्हीच सांगा… " ,

"मला बर वाटत नाही… मी चालले. " काजल उठून जाऊ लागली. तसं मागे उभ्या असलेल्या ladies constable ने तिला जबरदस्ती खाली बसवलं. अभिने एका हवालदाराला बोलावलं. त्याला काही सांगितलं. तसा तो बाहेर गेला आणि गाडीतून दिपेशला घेऊन आला. त्याला पाहून काजल अजूनच घाबरली. 


" आता बोला मिस काजल, दिपेशने आधीच सगळं सांगितलं आहे. त्यामुळे आता खरं सांगावं लागेल तुम्हाला." काजल गप्पच… अभि काजलकडे पाहत होता . महेश पुढे आला. 

" अभि… काजल कशाला kidnap करेल तिला… दिपेश तसं बोलला का तुला… " अभिने नाही म्हटलं. 

" तुला कसं कळलं पण… काजलच आहे ते." ,

" सांगतो… " अभिने पुन्हा एकदा काजलकडे कटाक्ष टाकला. 

" पहिल्यादा आपण जेव्हा यांच्याकडे आलो होतो, तेव्हा काजल नुकतीच गोव्यावरून आली होती. तिने सांगितलं ट्रेनने आली. पण माझं लक्ष तिच्या सामनावर गेलं. तिच्या bag वर ते विमानतळावर check in आणि check out करताना, जी तपासणी होते, तेव्हाचे tag's तसेच होते. मला तेव्हाच संशय आला होता कि काजल खोटं बोलत आहे. त्यानंतर गोवा ते मुंबई time… ते तर फक्त Flight ने शक्य आहे. शिवाय गोव्याच्या flat वर काही तिकिटे मिळाली मला. त्यावरून हे सिद्ध होते कि काजल विमानाने travel करते. तिला driving येते हे सुद्धा गोव्याला कळलं. तिथल्या security guard ने सांगितलं. पुण्यात सापडलेली गाडी ही सोलापूरची होती. तिथून ती भाड्याने घेतली होती, काजलच्या नावाने… हिचा फोटो ओळखला त्या कार मालकाने, जिथून गाडी भाड्याने घेतली होती. याचा अर्थ, काजलला driving पण येते." अभि काजलकडे पाहू लागला. ती शांतपणे सगळं ऐकत होती. अभि उभा राहिला आणि चालत चालत मिसेस पंडित ( अमितची आई ) यांच्याकडे आला. " ती काही बोलत नाही… तर तुम्ही तरी सांगा… " राहुल "आ"वासून पाहत होता. 

" काय ? ", मिसेस पंडित. 

" हो… काजलच्या नोकराने सांगितलं आम्हाला… पहिला अमित असायचा तिथे… त्यानंतर दिपेश, मिसेस पंडित… या दोन व्यक्ती सुद्धा गोव्याला जायचे काजलला भेटायला. का ते आता काजल सांगेल." पुन्हा अभि काजलकडे आला. " बोला… मिस काजल, बोला… " अभि ओरडला , तशी काजल मोठयाने दचकली. 


"हो…हो, मीच kidnap केलं तिला… भेटलं उत्तर तुम्हाला. " काजल रडत रडत म्हणाली. सगळेच वेडे झाले ते ऐकून. मिस्टर सावंत तर धावत काजलकडे आले. 

" बेटा… खर सांग… तू केलंस हे… " काजलने हो म्हटलं,तशी एक जोरदार थोबाडीत बसली तिच्या. 

" का… का केलंस असं … तुझी बहिण होती ना ती. का केलंस असं… ? " दोन हवालदार पुढे आले आणि सावंतांना पकडून बाजूला नेलं. अभि हे सगळं शांतपणे पाहत होता. 

" सांगा मिस काजल, का kidnap केलंत तिला ? ",

"अमितच्या खुनाचा सूड घेण्यासाठी… ",

"काय… ? " यावेळी अभिला shock लागला. " काय बोलताय तुम्ही… कोमलने अमितचा खून केला आहे.… ?" ,

"हो… ",

"हे तुम्हाला कसं माहित… " काजलने डोळे पुसले. 

" कोमल आणि राहूलने नवीन बिझनेस सुरु केला होता. आमचा बिझनेस सांभाळून नवीन बिझनेस…. पण तो बिझनेस नसून smuggling आहे, हे मला फार उशिरा कळलं… आणि मलाच उशिरा कळलं ते… माझ्या या आईला , सख्या आईला ते आधीपासून माहित होतं. पण पैश्यासमोर नाती काय चीज आहेत… " अभिने मिसेस सावंतकडे पाहिलं. " अमितला हि गोष्ट कळली होती, म्हणूनच तो कोमलला ती letters पाठवायचा. राहूलला कळल कि अमित black- mail करतो आहे आणि पोलिसांना सगळं सांगणार होता. म्हणून कोमल, राहूल आणि माझी आई… या तिघांनी अमितला मारायचा प्लान केला. आई जेव्हा अमितला भेटायला सोलापूरला गेली होती, तेव्हाच राहूलने अमितला भेटायला बोलावलं. त्या मिटिंगमध्ये भांडणे झाली. कोमलचा आधीच राग होता अमितवर. त्यात हे सगळं. अमित मिटिंग मधून निघाला आणि कोमलने त्याला गोळी मारली." सांगता सांगता काजलला रडू आलं. तिथे अमितच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. " सगळ्या गोष्टी झटपट झाल्या. राहूलने ती गन लपवली, कोमल बंगलोरला गेली आणि आईने अमितची dead body पुण्यात, स्वतः drive करत आणून जंगलात टाकून दिली. त्या चोरांनी, त्याच्या अंगावरचे कपडे, अंगठया, चैन… काढून घेतलं. प्रेत उघड्यावर आणलं. त्यामुळेच ते पोलिसांना भेटलं."


सगळेच स्तब्ध झालेले ते ऐकून.… अरे बापरे !!! काय विचार केलेला आणि काय समोर आलं…. great… अभि मनातल्या मनात बोलला. महेशच डोकं चक्रावलं. तरीसुद्धा त्याला kidnap कसं केलं ते जाणून घ्यायचं होतं. " काजल तुला हे सगळं कस समजलं आणि kidnap … ते कसं केलंस… "काजल सांगायला लागली. 

" कोमलची एक गोष्ट आहे, माझ्या बरोबर सगळं share करते ती, अमितच्या खून कसा केला, कसं त्याला फसवून आणलं… सगळं सांगितलं मला तिने. खूप रडले होते तेव्हा. कोमल एवढी क्रूर कर्म करू शकते…. पण याचा सूड घ्यायचा हे मनात पक्क केलं. माझं नशीब चांगलं होतं. कारण त्याचं रात्री घरी येताना मला दिपेश भेटला. त्याला पैसे देऊन माझ्या बाजूने केलं. अमितच्या बाबतीत काय झालं ते मी त्याच्या आईला आधीच सांगितलं होतं. त्यांनाही खूप वाईट वाटलं, पण मला साथ द्यायचे कबूल केले. माझा प्लान तयार होता फक्त संधीची वाट पाहत होते. नशीब खूष होतं माझ्यावर. संधी चालून आली. दिपेश कोमलवर नजर ठेवून होता. त्यानेच मला call करून सांगितलं कि ती ट्रेनने निघाली आहे बंगलोरला. तेव्हाचं तिला kidnap करायचं ठरलं.त्यादिवशी योगायोगाने अमितच्या आई सोलापूरला होत्या. कोमलला सोलापूरला अडवायचं , हे त्यांनीच पक्क केलं. मी तेव्हा गोव्यावरून निघत होती. दिपेश त्याचं ट्रेनमध्ये होता. त्यानेच वेळ साधून तिची bag पळवली. कोमल सोलापूरला उतरली ती तक्रार नोंदवायला. दिपेशने call करून अमितच्या आईला ती स्टेशनवर आहे हे सांगितलं." अभिने हाताने "थांब" अशी खुण केली काजलला. 

" तुम्ही सांगा मिसेस पंडित… ",त्यांनी सांगायला सुरु केलं. 

"कोमलची ट्रेनसुद्धा सुटली होती तेव्हा. तिला मी स्टेशनवर बघितलं. आणि उगाचच तिच्या समोरून गेली. कोमलनेच हाक मारली मला. मग बोलता बोलता तिला मी हॉटेलमध्ये घेऊन गेले. खाण्यात गुंगीचे औषध मिसळले. तोपर्यत काजल आली होती गोव्यावरून सोलापूरला. कोमल बेशुद्ध झाली होती. तिला मी काजलकडे सोपवलं." 


"हम्म… पुढे मिस काजल… " अभिने काजलला सांगितलं. 

" कोमलला मी तसंच पुण्याला घेऊन जायचे ठरवलं होतं. पण विमानाने जाऊ शकत नव्हती. कारण उगाच चौकशी झाली असती विमानतळावर. मग सोलापूरला गाडी rent वर घेतली. गाडीने पुण्याला आली, आमची एक रूम आहे तिथे, तिथे कोमलला ठेवलं. तशीच सोलापूरला जाणार होते, तोपर्यंत गाडी 'no parking' मध्ये ठेवल्याने जप्त झाली होती. मग पुण्यालाच थांबले. दिपेशने कोमलच सामान गोव्याला flat वर जाऊन ठेवलं आणि अमितच्या आई मुंबईला आल्या.पप्पांचा call आला, तशी मी flight ने मुंबईला आली." काजलच बोलणं संपलं. अभिने सुरु केलं. 

" दिपेश सामान घेऊन गोव्याला गेला तेव्हा कोमलचा मोबाईल सुद्धा त्या सामानात होता. म्हणूनच कोमल गोव्याला गेली नव्हती, तिचा मोबाईल गोव्याला होता… आठवलं महेश… तिसरी लोकेशन. " महेशने मान हलवली. 

" By the way, कोमल इतके दिवस बाहेर कशी आली नाही मग… ",

"yes… मला वाटलेच होते कि तू विचारणार ते." अभि हसत म्हणाला. " तुला बोललो होतो ना, या सगळ्यांवर पाळत ठेवली पाहिजे.… आणि जेव्हा काजलच्या गोवा ते मुंबई या वेळेत गडबड वाटली तेव्हा दोघांना तिच्या मागावर ठेवलं. काजल गोव्यावरून पुण्याला यायची, कोमलची तब्येत बघायची, थोडावेळ थांबून मुंबईला यायची. ती रूमसुद्धा भेटली आम्हाला. कोमल लगेच सापडली. पण मुद्धाम मी काजलला अटक नाही केली, सगळी स्टोरी मला ऐकायची होती. " अभि, महेशजवळ आला. " आणि madam नी कसं ठेवलं होतं तिच्या बहिणीला माहित आहे… कोकेनच्या अमलाखाली… नशेमध्ये. शिवाय देखरेख करायला २ बायका पण होत्या. त्यांना काजलने बरोबर सांगून ठेवलं होतं, कोकेनचे injection किती वाजता देयाचे ते.… just a perfect plan……. ना. ",

"मग आता… ",

"आता कोमलला आम्ही हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे. काही दिवसात होईल ठीक ती. " 


        सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव होते. कोणीच काही बोलत नव्हतं. काजल शांत होती. अभि,महेश सगळ्यांकडे पाहत होते.… शांतता.… 

"एक प्रश्न विचारू… अमितचा खून कोमलने स्वतःला वाचवायला केला, मिसेस सावंतानी, कोमल अडकू नये म्हणून तिला मदत केली. तर तू कोमलला kidnap का केलंस ?. " काजल शांतपणे ऐकत होती. खूप वेळाने तिने चेहरा पुसला. डोळे पुसले. 

" कारण…. कारण अमितवर माझं प्रेम होतं. " पुन्हा कहानी में twist.… अभिषेक, महेश एकमेकांकडे पाहू लागले. 

" हो… माझं प्रेम होतं अमितवर… तो शाळेत असल्यापासून… फक्त त्याला कधी सांगू शकले नाही. मनापासून प्रेम केलं त्यांच्यावर. पण अमितचं कोमलवर प्रेम होतं. कोमलचं प्रकरण त्याने मलाच सांगितलं होतं पहिलं… कोमलने खूप मोठी चूक केली त्याचा खून करून…. खूप रडले होते मी." काजल मख्ख चेहऱ्याने सांगत होती. 

" कोमल माझी सख्खी बहिण नव्हती, हे मला माहित होतं. तिला त्याची कल्पना नव्हती. ती माझ्यापेक्षा मोठी होती, असं आईने सांगितलं होतं. पण ती प्रत्येक गोष्टीत माझ्या पुढेच असायची, प्रत्येक गोष्टीत मधे मधे करायची. त्याचा विशेष राग यायचा मला. मी कोणाशी बोलायचं , कूठे जायचे हे ती ठरवायची. अरे !!!… माझी life मला जगूच द्यायची नाही. अमित तिला आवडायचा नाही, मला सांगायची, बोलू नकोस त्याच्याशी. त्यात अमितला, कोमलने थोबाडीत मारली होती… त्याचा राग होता मनात माझ्या. पप्पा, आई… तिचीच प्रशंसा करायचे, तिचेच लाड करायचे. त्यामुळे तिच्याबद्दल राग वाढत गेला मनात.… आणि अमितला मारलं तिने. मग मी स्वतःला नाही थांबवू शकले.…. सूड घ्यायचा या सगळ्याचा.… ठरवलं…. मीही काही करू शकते हे तिला दाखवायचं होतं… बाकीच्या गोष्टीसाठी तिला माफ केलं असतं, पण… अमित… माझ्या प्रेमाच्या आड आली ती… प्रेम होतं त्याच्यावर…. त्यासाठी माफी नाही." 


      सगळेच मुकाटपणे ऐकत होते. काय बोलणार आता… अभि गप्प होता. महेश शांत होता. आता सगळचं कळलं होतं. थांबून राहण्यात काही अर्थ नव्हता. अभिने सगळ्यांवर नजर फिरवली. " माझ्याकडे actually काजलच्या विरोधात कोणताच पुरावा नव्हता. त्यामुळे तिने स्वतःच कबूल करणं गरजेचे होते.… मिस काजल, मी तुम्हाला kidnap आणि कोकेनचा एका व्यक्तीवर वापर करण्यासाठी अटक करतो." काजलच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. " घेऊन जा रे सगळ्यांना." एकेकाला गाडीत घेऊन जाऊ लागले. सगळ्यात शेवटी काजलला घेऊन जाऊ लागले. अभि कधीपासून तिच्याकडे पाहत होता.… ती गाडीत बसणार,तितक्यात अभिने तिला थांबवलं. 

" एक शेवटचा प्रश्न… कोमलवर एवढा राग होता तुमचा…. आधीपासूनच… त्यात अमितचा खून केला तिने… मग कोमलला तू सुद्धा मारू शकत होतीस ना… तसं न करता तिला पुण्यात डांबून ठेवलंस.… नशेमध्ये… मारलस का नाही… ? ". काजलने शांत नजरेने अभिकडे पाहिलं. 

" लहानपणापासून एकत्र होतो आम्ही. राहूल पेक्षाही माझ्यावर जास्त प्रेम होतं तिचं…. रक्ताचं नातं नसलं तरी…. शेवटी बहिण आहे माझी ती. " काजलने स्मित हास्य केलं आणि स्वतः गाडीत जाऊन बसली. 


      सगळ्या पोलिसांच्या गाड्या रवाना झाल्या. अभि आणि महेश, त्या बंगल्याबाहेर बसले होते. " congrats… अभिषेक… अजून एक केस solve केलीस. आता पुढे काय ?" महेश बोलला.

" आता… आता काय केसेस सुरु होतील कोर्टमध्ये. त्यात गुंतावे लागेल. दिपेशचा actually काही गुन्हा नाही. त्याने फक्त मदत केली. तो सुटू शकतो. बाकीच्या लोकांना, तर शिक्षा होईलच. कोमल पूर्ण ठीक झाल्यावर तिच्यावर गुन्हा दाखल होईल.… पण… ",

"पण काय अभि ? ",

"बघ ना… सगळे कसे एकमेकांत गुंतलेले होते, Mr. पंडित ज्या smuggling मध्ये ५० % चे पार्टनर होते, त्यासाठीच त्यांच्या मुलाचा खून झाला. कोमलने Mr. सावंतच्या पुढे काम केलं… शांत वाटणाऱ्या काजलने एवढं मोठं पाऊल उचललं. … मोठी माणसं आहेत, पैसेवाली… पैसे देऊन bail वर सुटतील. पण त्यांच्या नात्यावर ज्या जखमा झाल्या आहेत, त्या पैसे भरून सुद्धा भरणार नाहीत.… तश्याच राहतील, जन्मभर. " महेशने अभिच्या खांदयावर हात ठेवला. 

" चल निघूया. " महेश म्हणाला. "हो… या केसमध्ये खूप ठिकाणी पळायला लागलं नुसतं. आता मस्त घरी जातो. आणि आरामात एखादा movie बघत बसतो." अभि म्हणाला. " पुन्हा पोलिसांचा movie…. " महेश हसत म्हणाला. त्यावर अभि दिलखुलास हसला. हसत हसत, गप्पा मारत, चालतच ते दोघे निघाले.  



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror