स्त्री संघर्ष
स्त्री संघर्ष
एकटी स्त्री ठरवल तर काहीही करू शकते याच उत्तम उदाहरण.
सांगणारा बोलक लेख आपणापुढे सादर करत आहे....... नक्की वाचा आणि शेअर करा...
विषय असा आहे की माझी शाळा एका संघर्षातून निर्माण झाली आहे म्हणून मला माझ्या शाळे बद्दलची ओढ मला मुलगी म्हणून जास्त शिक्षण घेता आले नाही लहान वयातच माझे लग्न झाले वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी आणी मी कुमारी अनुराधा पासून सौ. अनुराधा खरगे झाले पण माझी जिद्द चिकाटी काही बदलली नाही लग्नानंतर मी शाळेवर नोकरी करायच ठरवल कारण मला लहान पणापासूनच एक चांगली शिक्षिका होण्याची आवड होती आणि मी जवळपास 15वर्ष दुसऱ्यांच्या शाळेवर अनूभव घेतला आणि टिव्हि सिरियलच्या प्रमाणे एखादा दुखद भाग यावा तसा माझ्या आयुष्याला सुखी संसाराला नजर लागावी तसा, माझ्यावर एक खुप मोठ संकट येवून कोसळल
माझ्या पतीची प्रकॄती बिघडली आणी ते देवाघरी गले... त्यानंतर जवळपास एक वर्ष मी या घटणेने दवाखान्यात ये जा केले.
पण म्हाणतात ना आपल्याला जिव लावणारी आपलीच माणस असतात तसेच माझी आई आणि भाऊ व बहिण यांनी मला धिर दिला, आणी दोन मुलांचा विचार कर त्यांच्यासाठी तरी स्वताला सांभाळ आणी या दुखातून बाहेर काढले. त्यानंतर मग मात्र मी ठरवल काहीही झाल तरी मला जगायच आणी माझी दोन मुलेच नव्हेतर अशा अनेक मुलांना मला घडवायच हे स्वप्न पूर्ण करायच आणी इथूनच माझ्या आयुष्यातल्या खडतर प्रवासाला आणी यशमय जिवनाला सुरवात झाली.
मी दुसऱ्या च्या शाळेवर अनुभव घेतलेल्या चा उपयोग मी माझी स्वतःची च शाळा संस्कार प्ले इंग्लिश स्कूल संस्कार या छोट्या मुलाच्या नावाने सुरवात केली. आता ही शाळा सुरू करताना मला अनेक अड़चनी आल्या मला आर्थीक अडचणी खुप मोठ्या प्रमाणात आल्या तरी मी न घाबरता त्या अडचणी वर मात करत पुढे गेले. सुरवातीला शाळेत 5 विद्यार्थ्यांपासून सुरवात झाली.
पैसा कमवण हा हेतू मुळीच नव्हता माझ्या दोन मुलांच आयुष्य घडाव व इतर ज्या मुलांना इग्रंजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणे शक्य होत नाही अशा मुलांना कमीत कमी फीस मध्येशिक्षण घेता याव हीच मनात इच्छा होती.
या शाळेत फक्त शिक्षणच नाहीतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविणे चालू केले ् महिलांना काम मिळाले आणि माझ्या या शाळेच्या माध्यमातून जगण्याला पंख फुटले पण पक्षांचे पंख छाटावे तसेच काही विरोधी लोक असतात अनेक प्रश्न करत पुरुषाची साथ नसताना ह्या ऐवढ पुढे जाउ कस शकतात अशा लोकांच्या प्रश्नचिन्हांना न घाबरता पुढे जाण्यासाठी मैत्रीणींची साथ मिळाली.
शाळेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित केले त्यापैकी एक अविस्मरणीय प्रसंग म्हणजे "
" महिला दिन" या दिवशी सर्व माता पालकांना आमंत्रित केले आणी संगीत खुर्ची, गेम वेशभूषा आशा अनेक गुणदर्शन च्या कार्यक्रमाची जोड त्याला दिली. अक्षरशहा स्वयंपाक घरात काम करणारी कधीच न बाहेर पडणारी स्त्री स्टेजवर जाउन बोलली, आज मी इथ उभराहून बोलत आहे ते केवळ तुमच्या मुळे मॅडम,... भरभरून शुभेच्छा दिल्या..
असे आनंदाचे क्षण जगत असताना कोरोना महामारी आली आणी कस दुखात बदलल कळलच नाही. शाळा बंद झाली खुप खडतर काळ होता तो माझ्यासाठी संघर्षाच्या काळ होता तरी पण न घाबरता मी माझ्या घरूनच डब्बे करण्याचे काम सुरू केले त्याने निदान घर चालने तेवढे सोपे झाले """ माणसाची वेळ वाईट असते माणुस नाही वेळ बदलते आणि वेळेनुसार माणसाचे विचारही "" अगदी तसीच वेळ बदलली पण अनेक वेळा रडाव लागल धडपडाव लागल अनेक विचारंआना सामोर जाव लागल पण मुलांकडे पाहून जणू ते अश्रु थांबवायची सवयच झाली होती तरी पण काही आर्थीक आडचणींना पुढे जाव लागल मग हळूहळू शाळा सुरू केली आणी जणू मी स्वताशीच बोलले........
"वाट मोकळी तुझ्यासाठी यशाची आहे पण मग भिती तुला कशाची आहे
ध्येय मोठे ठरवुन तु पाउल पुढे टाक प्रयत्न तुझे मेहनत तुझी तुझ्या सोबत आहे
का कशाला घाबरावे कुणाच्याही म्हणण्याला यशप्राप्ती होइल जेंव्हा तू कूलूप लावशील अडवणूक ीला
गरज तुला प्रयत्नांच्या नशेची आहे
आणी या काव्याप्रमाणे ठरवल ना भिती बाळगायची नाही प्रयत्न सोडायचे नाही आता फक्त समाजातील वाईट प् विचांराच्या लोकांशी लढायच.
गरूड जसा खाली येतो उंच झेप घेण्यासाठी माझ आयुष्य ही मला तेच शिकवत होत अडचणी आल्या समाजातील लोक कळण्यासाठी आता हीच वाईट वेळ कळ देईल उंच भरारी घेण्यासाठी.
आज माझी एक नव्हेतर दोन शाळा चालू आहेत प्ले ग्रुप ते पाचवी. भविष्यात दहावीचेही वर्ग सुरू होतील.
शाळेसोबतच वेदांत डॢमाडेसेस नावाच दुकान सुद्धा सुरू केले आहे, महिलांसाठी झुंबा क्लास, डान्स क्लास चालू केले.
यातूनच बचत गट अशी अनेक कामे हाती घेतली.
मला महीलांना ऐवढच सांगावस वाटत की जे पुरूष करू शकत नाहीत ते स्त्रि करू शकते मग स्त्रि अबल कशी होईल.
" एक मुली मी तुला सांगते पेटून उठ आता रडू नको घे भरारी उंच आकाशी पिंजऱ्यात च आता दडू नको.
महिलांनो प्रतिकार करायला शिका अन्याय सहण करू नका सरकार विविध सुविधा पुरवत आहे महिलांना त्या फायदा घ्या. अशी शिकवण ज्या जिजांउंनी दिले त्या मातेस त्रिवार वंदन.
हा लेख लिहिण्या मागचा उद्देश एकच ज्या स्त्रियांना वाटत मी एकटी काही करू शकत नाही अशा स्त्रियांनी यातून काही शिकाव, एक स्त्रि ठरवल तर काहिही करू शकते. प्रयत्न करत रहा यश तुमची वाट पहातय.
