शाळकरी रामूची गोष्ट.
शाळकरी रामूची गोष्ट.
जिल्हा परिषद शाळा मौजे काटाळवेडा....या शाळेत शिकणारा रामू गुणानी खुप हुशार अतिशय शिस्तबद्ध...नियमित शाळेत येणे.गुरूजींचा टेबल पुसने फोटो साफ करने व फुले गोळा करून फोटोंना सजवने हा त्यांचा नित्यक्रम असे.शाळेची बेल वाजली की शाळेचा प्रांगणात हजर रहायचा.
रामाची इतर वर्गमंडळी मस्त उशीरा शाळेत येणे,गुरूजींना उलट बोलने,अरेरावी करने, मस्ती करने यातच व्यस्त असायचे.इतरांच्या खोड्या काढण हा जणू त्यांचा छंद होता. रामू त्यांच्या सोबत रहायचा त्यांना बोलायचा त्यांच निरिक्षण करायचा आणि त्यांच्या चांगल्या सवयी आत्मसात करायचा.
एक दिवस रामूची आई रामूला विचारते,बाळ तुझी शाळा ९ ला भरते,मग तु एवढ्या लवकर शाळेत का जातो? इतर मुलांप्रमाणे खेळत नाहीस,एवढ्या खोडकर मुलांसोबत रहतो पण तू त्यांचा सारखं वागत नाही? असं कसं? रे रामू!
रामू च उत्तर ऐकून आई स्तब्ध झाली .असं काय बोलला असेल रामू....?
रामू म्हणाला आई स्वामी महाराज म्हणतात, इतरांच्या स्वभावातले चांगले तेवढेच गुण घ्यावेत...... बाकी सर्व सोडून द्यावे....आपण त्यांच्या काही चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्य व आपल्या संगतीने त्यांच्यात काही चांगले बदल घडवावे....राहीला प्रश्न मी शाळेत लवकर जाण्याचा...तर आई. मला माझी शाळा खुप आवडते, आपल्या गुरूंचा आपण आदर करावा............समजल माझी समजदार आई असं मनतो आणि हसतो......
आई रामूला लाडाने जवळ घेते व बोलते माझा गुणाचा बाळ ,आईच मन भरून येते.....
आणि हाच रामू पुढे चालून त्या गावचा संस्कार केंद्र चालक व जबाबदार नागरीक होतो......
