STORYMIRROR

Meera Bahadure

Inspirational

3  

Meera Bahadure

Inspirational

परिस्थितीतीचा नादच खुळा

परिस्थितीतीचा नादच खुळा

2 mins
130

 माझी एक सखी होती ती आठवड्यातले चार पाच दिवसतरी बाहेरचे जेवण मागवायची , का तर बाई आली नाही कामाचा व्याप आहे अशी कितीतरी कारणे तिच्याकडे असायची, मला एक दिवस म्हणाली तुला कंटाळा येत नाही का ग, कधीतरी बाहेरच खायची इच्छा होत नाही का, तेव्हा मी माझ्या परिस्थितीतीचा आढावा तिला सांगायची, ......

   तिला इतकं कौतुक वाटलं.. मग तिला म्हटलं , ही चांगली सवय मला परिस्थितीने लावली पण जेव्हा परिस्थिती सुधारली तेव्हा मी माझी चांगली सवय मोडली नाही.. पैसे आले म्हणुन पार्ट्या करणं,लेट नाइट कारण नसताना जागणं हे कधीही होवु दिलं नाही.. जेव्हा गरज असते तेव्हा या शिस्तीला ब्रेक ही द्यावा लागतो..

   लहानपणी मी नववीला असताना आमच्याकडे लाईट आले तोपर्यंत आम्ही रॉकेल च्या दिव्यावर जेवण , अभ्यास करायचो.. रेशनवर मिळणारं रॉकेल महिनाभर पुरवायचं असायचं त्यामुळे दिवे मालवुन आम्हाला सात वाजता झोपायला लागायचे.. दिवसभर शाळा , घरची कामं , सुट्टीच्या दिवशी शेतातील कामं करुन सगळे थकायचे त्यामुळे ७ वाजताही झोप लागायची आणि पहाटे उठुन भाकरी करणं असेल किवा राहिलेला अभ्यास असेल असे रुटीन असायचे त्यामुळे काय करु हा प्रश्न तेव्हाही पडला नाही आणि आताही पडत नाही.. रात्री झोपण्याआधी काहीतरी वाचायची सवय लागली.. संध्याकाळी व्यायाम करुन आल्यावर आंघोळ करायची सवय असेल.. रात्री ब्रश न करता झोपण्याची सवय असेल हे सगळं इतकं अंगवळणी पडलं की बेशीस्त वागणं पहावलच जात नाही.. दिवसभरात एकदाही व्यायाम न करता चार वेळा खाणं कधी रुचलच नाही.. प्रचंड अंगमेहनतीची सवय त्या परिस्थिती ने लावली त्यामुळेच आज अनेक वर्ष ५५ किलोच्या वर काटा कधीही गेला नाही..

    परिस्थितीला दोष देण्यापेक्षा त्याचा उपयोग आपल्या उध्दारासाठी केला तर जीवन उत्तम जगता येतं.. या जगात काहीच आणि कोणीही वाईट नाही हेही परिस्थितीनेच शिकवलं.. स्वतःची कामं स्वतः करायची सवय असल्याने स्वच्छतेचे महत्व कळलं आणि बाई नाही आली म्हणुन हवालदिल व्हायची वेळच आली नाही.. आयुष्यात गरीबी ज्याला अनुभवायला मिळाली तो खऱ्या अर्थाने जगला..

त्यामुळे आयुष्यात कधीही कितीही चढउतार आले , कमी पैसे असले तरीही निराश न होता हा एक धडा आहे असं समजून पुढे गेलं तर आयुष्य अधिक सुंदरच होइल.. 

    काल रात्री श्रीमद्भागवत वाचताना मी हाच विचार करत होते की ज्याकाळी हे ग्रंथ लिहीले त्यावेळी कसल्याही सुविधा नव्हत्या .. सावरकरानीही भिंतीवर कविता लिहील्या.. आणि आता आपल्याला इतकं सगळं सहज उपलब्ध आहे तरीही आपण मौल्यवान वेळ वाया घालवतो.. वाचन करत नाही..

सिंधुताईबद्दल मधे एकदा वाचलं होतं की त्यांच्याकडे पाटी नव्हती तर त्या जमीनीवर बोटाने लिहायच्या आणि लक्षात ठेवायच्या.. बहीणाबाइ तर शिकलेल्याच नाहीत तरिही त्या सुगरिणीच्या खोप्यामधुन त्यांनी आयुष्याचा अर्थ उलगडून सांगितला..डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना तर शाळेत प्रवेश शुदधा मिळाला नव्हता पण आज सार जग त्यांची राज्यघटना पह तय वाणतय आणी नियमानी पाळतात असी अनेक उत्तम उदाहरण आपल्या समोर आहेत त्यामुळे,,, परिस्थितीतीचा नादच खुळा म्हटल तर वावग ठरण र नाही. 

   पुन्हा एकदा नव्याने विचार करायला हरकत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational