STORYMIRROR

Meera Bahadure

Others

2  

Meera Bahadure

Others

प्रसंग प्रेरणा आणि बदल

प्रसंग प्रेरणा आणि बदल

3 mins
19

जन्म घेतला दिन दलितांचा उद्धार कराया 

चवदार तळ्याचे पाणी चाखाया 

झोपेत असलेल्या समाजास जगण्याचा अधिकार द्यावया शतशत नमन करते मी तुम्हास भिमराया

  प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक घटना घडतात काही चांगल्या तर काही वाईट असतात त्यांना आपण नाव ठेवत असतो पण ह्याची घटना हेच प्रसंग माणसाचं आयुष्य बदलण्यास मदत करतात फक्त ते घेणाऱ्याच्या हातात असतं की आपण ह्या प्रसंगातून नेमकं काय घ्यायचं अगदी तसेच महान व्यक्ती या उगाचच महान बनत नाहीत तर त्यांच्या जीवनाचा दुःखाचा ते खेद करत बसत नाहीत आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगातून खूप काही शिकत जातात आजच्या या लेखातून डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंग आणि त्यांच्या जीवनात घडलेल्या आमूलाग्र बदल मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे आपणही यातून काही शिकू यात आणि आपलं आयुष्य ही याप्रमाणे तेजोमय बनवू

   संस्कृत भाषेचे ज्ञान:-

         डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतंत्र भारताची नवीन राज्यघटना तयार करण्याबाबत घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष पदी नियुक्त केले गेले अनुसूचित भाषांची यादी तयार करण्याची वेळ आली तेव्हा बाबासाहेबांनी त्यातील सर्व भाषांची माता संस्कृत असे द्यायची फार इच्छा होती पण काही सदस्यांच्या विरोधामुळे हे शक्य झाले नाही पण त्या काळात श्री लाल बहादुर शास्त्री आणि आंबेडकर यांच्यात संस्कृत भाषे संदर्भात चर्चा झाली त्यावेळी विरोधकांच्या लक्षात आले की दोन महान व्यक्ती संस्कृत भाषेत संभाषण करीत आहे शास्त्रीजींना संस्कृत भाषेचे ज्ञान असणे अपेक्षित होते परंतु अशिक्षित दलित कुटुंबात जन्मलेल्या बाबासाहेबांचा संस्कृत भाषेवर प्रभुत्व असेल हे कोणालाही अपेक्षित नव्हते यामुळे ही माहिती लवकरच पसरली त्या दिवसापासून सर्व आंबेडकरांच्या ज्ञानावर विश्वास ठेवू लागले.

  दुसरी घटना शिपाई नाहीतर पाणी नाही: अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या महार जातीचे बाबासाहेब होते हेच कारण होते की त्यांना शाळेत विद्यार्थ्यांसह बसणे शक्य नव्हते आणि त्यांना वर्गाच्या बाहेरच बसून अभ्यास करावा लागायचा याशिवाय त्यांना त्या शाळेच्या कोणालाही स्पर्श करण्याची परवानगी नव्हती पण इतर विद्यार्थ्यांना असे कुठलेही बंधन नव्हते ते पाहिजे तेव्हा पाणी ठेवू शकत होते त्यांना पाणी तेव्हाच मिळू शकते ज्यावेळी तिथला शिपाई त्यांना नळ सुरू करून देत असत तो नसल्यावर अजून कोणतेही इतर विद्यार्थी त्यांना नळ सुरू करून देत नव्हते या परिस्थितीत बदल करून दलितांचे जीवन बदलून टाकायचे हा ठाम निश्चय त्यांनी या प्रसंगातून केला आणि करूनच दाखवला.

ग्रंथपाल आणि बाबासाहेब:- डॉक्टर आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यात खूप त्रास सहन केले पण त्याचा परिणाम त्यांनी कधीही आपल्या शिक्षणावर होऊ दिला नाही ते दररोज 14 ते 18 तास अभ्यास सहज करत असे बडोद्याचे शाहू महाराजांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले शिक्षण आणि कठोर परिश्रमाच्या त्या आग्रहाखातर बाबासाहेबांना पुस्तके वाचण्याची फार आवड होती असे यादीत आहे की त्यांची वैयक्तिक लायब्ररी जगातील सर्वात मोठी लायब्ररी होती आणि त्यात पुस्तकांची संख्या पन्नास हजारांपेक्षा देखील अधिक होती

लंडन येथे वास्तव्याच्या वेळी ते दररोज एका लायब्ररीत जात असत आणि तासन तास अभ्यास करत असेल एकदा ते दुपारच्या जेवणाच्या वेळी लायब्ररीत बसून भाकरी खात होते तेव्हा ग्रंथपालाने त्यांना बघितले आणि त्यांना चढवले आणि टोमणा दिला की ही कॅफेटेरिया जाण्याऐवजी तेथे लपून-छपून भोजन करत आहे ग्रंथपालाने त्यांना शिक्षा करण्याची व त्याचे सदस्यत्व संपवण्याची धमकी दिली ते एकूण बाबासाहेबांनी त्यांची माफी मागितली आणि स्वतःच्या आणि आपल्या समाजाच्या संघर्ष आणि इंग्लंडमध्ये येण्याचे कारण सांगितले तसेच दुपारच्या जेवणासाठी कॅफेटेरिया जाण्यासाठी आपल्याकडे पुरेशी पैसे नसल्याची प्रामाणिक कबुलीही त्यांनी दिली हे एकल्यावर ग्रंथ फार म्हणाला आज पासून आपण दुपारच्या जेवणाच्या वेळी येथे न बसता माझ्यासोबत कॅफेटेरियात येणारे आणि मी माझीच भोजन तुमच्याबरोबर वाटून खाणार

तर मित्रांनो आपल्या आयुष्यात येणारे प्रसंग वाचून आपल्याला काय शिकायचं हे आपण ठरवायचं असतं आणि महान व्यक्ती तोच होतो की त्या प्रसंगानुसार योग्य दिशा निवडतो त्या प्रसंगातून योग्य विचार निवडतो आणि त्या विचारांवर काम करतो तोच या जगात महान होतो आणि इतिहास रचतो.


Rate this content
Log in