End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Sunita madhukar patil

Inspirational


4.8  

Sunita madhukar patil

Inspirational


सरस्वती

सरस्वती

3 mins 251 3 mins 251

"अगं ये सरू!!! आवरलं का नाही तुझं, चल लवकर, आजपण उशीर झाला तर त्यो मुकादम आज परत कामाचं पैसं कापुन घील." धुरपा दारात उभी राहुन सरस्वती म्हणजेच सरू ला कामाला जाण्यासाठी बोलवत होती.

"कोण धूरपी हाय व्हय. जाऊया गं, आत ई, घोटभर च्या घिऊन जाऊया मग." सरूने धुरपाला आत बोलावलं.

"लवकर गेलु कामाला तर त्यो मुकादम काय सगळी हाजरी थोडीच देणार हाय.अगं त्यो मुकादम लै डाँबीस माणूस हाय. सरकारनं चारशे रुपये गड्या माणसाला आन तीनशे रुपये बाई माणसाला हाजरी ठरवलीया, बाई माणूस काय कमी काम करतीया व्हयं. गड्या परास दोन हात पुढचं असतिया बघ कामाला. बरं तीबी चल ठीक हाय, पण त्यो मुकादम आठवड्याचं पंधराशी रुपयचं टेकवतुया हातावर. आन वरनं त्याला जाब ईचारायची चोरी. परवा त्या म्हादयाला कसला चोपला. लगीच हातच उगारतुया.आगं!!! आपली हातावरची पोटं रोज कमवा आणि खावा. कसं हुयाचं आपलं. रक्ताचं पाणी हुस तर मर मर मरायचं आन त्या मुकादमाच घर भरायचं. आठवड्याच्या शेवटी हाता तोंडाची गाठ पडायची पंचाईत. आन आता पोरबी मोठी हुया लागल्याती. खर्चबी वाढलाय. काय तर कराया पाईजी बघ त्या मुकादमाच."

"आग आयं!!! त्यासाठी तुमास्नी शाळा शिकाय पाईजी. तुमी शाळतं गेला असता तर तुमास्नी हिशेब कराया जमलं असतं मग कुणी तुमाला फसवलं बी नसतं बघ. तुमी लोक शिकला नाही म्हणुन तुमास्नी वाचाया येतं नाही आन कोणत्या बी कागदावर अंगठा मारून येतायं, आन मग त्या मुकादमाच फावतयं." आतापर्यंत धुरपा आणि सरूचं बोलणं ऐकणारी सरूची दहा वर्षांची चौथीत शिकणारी लेक शितल त्या दोघीस्नी समजावत होती.


"तुला हे समदं कुणी सांगितलं गं!!! माझी गुणांची बाय ती. बरुबर बोलतीयास बघ तु, आम्हांसनी बी तुझावानी शाळा शिकाया भेटलं असत तर कुणी फसवलं नसत बघ. पण तु लय शाळा शिक बघ त्या मास्तरनी वाणी मास्तरीन हुं" सरू शितलीच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवते.

"अगं!!! कालच आमची शाळेतली बाई आम्हाला हे सगळं सांगत हुती बघ. आन तिनं हे बी सांगितलं की मोठ्या बाया बी आता शाळा शिकू शकतील, आमची बाई मोठ्या बायांसाठी रात्रीची शाळा उघडणार हाय. म्हंजी दिवसभर तुमच्या कामाचा खोळंबा पण हुणार नाय बघ. तु बी जा तिथं शाळतं, शाळा शिक म्हंजी तुमास्नी वाचया ईल आन त्यो मुकादम बी तुमास्नी फसवणार नाय बघ." शितलीचं बोलणं ऐकून सरू विचारात पडली. तिनं काहीतरी मनाशी पक्क केलं आणि शितलीच्या बाईंना भेटायचं ठरवलं.

"चलं धुरपे!!! आताच्या आता त्या शितलीच्या बाईसनी भेटुन आपण त्या रात्रीच्या शाळत आपलं नाव घालूया."

"आगं पण!!! आपण आता या वयात शाळत जायचं हुई." धुरपा आढेवेढे घेत होती.

"आगं नाय आन बिगं नाय चल गप्प गुमान आपण दोघीबी जाऊया आन वस्तीवरल्या बायास्नी पण हे सगळं समजावुन सांगुया म्हंजी त्या बी येतेल्या रात्रीच्या बायांच्या शाळतं."


शितली, धुरपा आणि सरूला त्यांच्या बाईंशी भेटवते. त्या सगळी माहीती त्या दोघींना देतात. शिक्षणाचं महत्व पटवुन सांगतात. सोबत त्या दोघींनी हा शाळा शिकण्याचा निर्णय घेतल्याबद्दल दोघींच कौतुक देखील करतात.

सरू वस्तीवरल्या बायकांना रात्र शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रवृत्त करेल असं वचन देखील बाईंना देते.

सरस्वतीला विद्येची देवता म्हणतात पण आज सारस्वतीलाच विद्येचं महत्व पटलं होतं.

शितलीला आज तिच्या आईचा खुप अभिमान वाटत होता, आणि तो तिच्या डोळ्यातून ओसंडत होता.

सरूनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतला आणि तो खुप कौतुकास्पद होता.

तर मैत्रिणींनो स्त्रीचं शारीरिक सबलीकरण, आर्थिक सबलीकरण, वैचारिक सशक्तीकरण व्ह्यायचं असेल तर तिनं शिक्षण घेणं खुप गरजेचं आहे. या सगळ्या पैलूंनी स्त्री जेव्हा सशक्त होते आणि त्याचा उपयोग सकारात्मक दृष्टीने समाजासाठी केला जातो तेव्हाच खर्‍या अर्थाने स्त्रीचं सशक्तीकरण, सक्षमीकरण झालं असं म्हणता येईल.

शाळेला चाललो आम्ही.


Rate this content
Log in

More marathi story from Sunita madhukar patil

Similar marathi story from Inspirational