सर्जनात्मक जीवन
सर्जनात्मक जीवन
"गाडगेबाबा जिथे जायचे "आपोआपच सभा सुरु व्हायची कीर्तन ऐकायला सर्वीकडून लोंक जमा व्हायची.त्या पंचक्रोशीतून अनेक प्रकारची साक्षर,निरक्षर यायची. गाडगेबाबा फक्त माणुसकीला महत्व देत असतं. आपल्याला लोकांनी आदर द्यावा म्हणुन त्यांना चांगले कपडे घालणे किवा सुटबुट घालण्याची त्यांना कधी गरच वाटली नाही.
"आदर मागून मिळत नाही आणि आदर देवून तर मुळीच नाही.स्वत:चे महात्म्य सांगून दुसऱ्याकडून अपेक्षा करणे हे त्यांना मुळीच आवडत नसे. समाज सुधारकाचे ढोंग हे जास्त काळ टिकत नाही. आपले आचरण आणि वर्तन योग्य असले तर आदर मागण्याची गरज पडत नाही. निर्मळ मन विचार घेवून गाडगेबाबाने माणुसकीच्या बागा फुलवल्या होत्या. गाडगेबाबाने स्वच्छता अभियान चालविले. त्यानी स्वत:च हातात खराटा घेतला होता.
ढोंगी विचारांना कधी थारा दिला नाही.
गाडगेबाबा होते स्वच्छतेचे जनक,मानवाला मानव धर्म शिकविला. गाडगेबाबा माणुसकीचे होते पुजारी त्यांनी अंधश्रद्धा,भ्रष्टाचाराचा नेहमीच तिरस्कार केला होता. शिक्षणाचे महत्त्व लोंकाना सांगून जनामनास नवी दिशा दाखविली होती. खरा धर्म कसा असावा.हे आपल्या किर्तनातून ते सांगत असत. आगळी वेगळी सेवा करुन त्यानी सामाजाला जाग केले.
रंजल्या गांजल्याची सेवा करावी. दया. माया.ह्रदयात असावी. सत्य कार्य करावे, अनाथांना जवळ करावे. "देव दगडात नसतो जीवनात असतो." दारू, हुंडा, पशुहत्या कां करता. ही सर्व अंधश्रद्धा आहे.हा संदेश नेहमी किर्तनात देत असत.
गाडगेबाबाची दूरदृष्टी अप्रतिम होती. भविष्यात लोकसंख्या इतकी वाढेल ,व जिकडे-तिकडे प्रदूषण होईल, मग जगात काय होणार , शुद्ध वायु कुठून मिळणार, कित्येक लोक गुदमरुन अस्वस्थ होतील, उद्याचा धोका काही प्रमाणात आपण दुर करावा, आणि समाजात त्या स्वच्छ अंकुराचे संगोपण करावे, अस गाडगेबाबाला वाटत असाव! आणि जिथेतिथे लोंकांना कचरा करण्याची सवय असल्यामुळे, त्यांना स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, म्हणून, त्यांनी ही व्यवस्था समजून घेतली. त्यांनी स्वहाताने स्वच्छतेला सुरवात केली असावी!
१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्यांना शिकविला
संत गाडगे बाबां एकदा रात्री कीर्तन करत होते. काही लोकं आले त्यांनी गाडगेबाबा यांना सांगितले तुमचा मुलगा मरण पावला.. बाबांचा हा एकुलता एक मुलगा होता, तरी गाडगे बाबांच्या डोळ्यातुन अश्रुंचा एक थेंब सुद्धा आला नाही व यावर ते म्हणतात, "ऐसे किती गेले कोट्याने, का रडु ऐकासाठी!. मेल्या माणसाची हाडे गंगेत टाकली तरी पुण्य नाही. आणि गटारात फेकली तरी पाप नाही. जीवंत असे पर्यंत आपल्या माय-बापाची सेवा करावे!
लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे. त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत असे
गाडगेबाबा हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते." तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्या हातात मडके असा त्यांचा वेश होता.