STORYMIRROR

शब्दसखी सुनिता

Tragedy

3  

शब्दसखी सुनिता

Tragedy

स्पप्नांची रांगोळी

स्पप्नांची रांगोळी

4 mins
274

       कोरोनामुळे अनेक लोकांचे रोजगार गेले. खुप हाल झाले. सिमा आणि दिपक हे जोडप दुसर्‍या गावातुन शहरात कंपनीत कामाला होते. कोरोनामुळे सगळे कंपनीत काळजी घेउन काम करायचे. सिमा ला दोनमुले होती. ते कामासाठी शहरात बर्‍याच वर्षांपासुन राहत होते. शहरात राहायच म्हटल्यावर पैसा तर लागतो म्हणून सिमानेही दीपकच्या कंपनीत जाॅब मिळवला. दोघेही वेगवेगळ्या विभागात कामाला जायचे. सगळ छान चालल होत. मुलेही शिकत होती. त्यांना मुलांना खुप शिकवायच होत आणि मोठ करायच होत. सिमा खुप काटकसरी आणि मेहनती होती. तिने आपल्या संसारासाठी 

जाॅब करण सुरू केल. घर आणि जाॅब  दोन्हीपण सिमा सांभाळत होती. सिमा वर्षातुन एकदाच आपल्या माहेरी जायची. पण या वर्षी कोरोनामुळे ती गावी गेलीच नाही. तिच्या माहेरचे आई बाबा खुप आठवण काढायचे तर सिमा त्यांना आणि बहीणींना फोनवरून बोलून घ्यायची. तिलाही दोन  शब्द आपल्या माणसांसोबत बोलल्याने  तिलाही मनाला आनंद वाटायचा.


    सिमा आणि दिपक आपील्या मुलांसोबत छान राहत होते. सगळ काही सुरूळीत चालू  होत. सिमाला कंपनीत खूप मैत्रीणी मिळाल्या होत्या. दिपकही तिच्यावर खुप प्रेम करायचा. तो तिच्या गावाकडचाच होता. मुलांसाठी तोही खुप कष्ट करायचा. रोज दोघे सोबत यायचे, जायचे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत पुन्हा कोरोना रूग्णसंख्या वाढल्याने सिमा राहते तो जिल्हा एक जिल्हाबंदी होती.  त्यात दोघांनाही कंपनीला महीनाभर सुट्टी मिळाली. रोजगार बंद पडला त्यामुळे त्यांना गावीही जाऊ शकत नव्हते. खेड्यात तर खुप भयानक परिस्थिती होती. मुलांना घेऊन जाण परत काही झाल तर उगाच रिस्क नको म्हणुन दोघांनी इथेच शहरात सुरक्षित राहण योग्य समजल. ते काही गावाला गेलेच नाही. सिमाला आणी दीपक आपल्या

मुलांसोबत त्यांनी सुट्ट्या घालवल्या. खुप एन्जाॅय केल. त्यांना कामामुळे कधीही सुट्टी भेटत नव्हती. मुलेही आपल्या आईबाबाला घरी बघुन खुप खुश होती. सिमाला आपल्या दोन्ही मुलांच खुप कौतुक होत. तिला मुली नव्हत्या. पण बहिणींचे मुलींचे खुप लाड  करायची. सर्वांची ती लहान आवडती लाडाची मावशी होती. सिमा मुलांना घरचच खाऊ 

पिऊ घालत होती. मुलेही आईला सुट्टी म्हटल्यावर तिच्याकडून लाड पुरवून घ्यायची. दोन्ही मुले लहान होती. समजदार होती.

त्यांना आपल्या आईबाबांच्या कष्टांची  जाण होती. सिमानेही त्यांना नवनवीन पदार्थ करवून खाऊ घालायची. शेजारी 

राहणार्‍या मैत्रीणीला ही नेऊन द्यायची. आजुबाजुवाल्यांशीही ती नेहमी चांगलच बोलायची. सगळेच तिच कौतुक करायचे.

लाॅकडाऊन संपणार उद्या कंपनी सुरू होणार म्हणुन सिमाला खुप आनंद झाला तिच्या मैत्रिणींचे ही तिला फोन आले. सगळ्यांनी एक महीन्यापासुन घरी असल्यामुळे कामाला पहील्याच दिवशी जायच ठरवल. सिमाने रोहीणीला फोन करून सांगितल तु ही ये म्हणून तिनेही लगेच होकार दिला. दोघांनाही काम सूरू होणार म्हणुन खुप आनंद झाला.

सिमाने आदल्याच दिवशी तयारी करून ठेवली. सकाळी लवकर निघाव लागे, घाई होऊ नये म्हणुन ती आदल्याच दिवशी तयारी करायची.


      दुसरा दिवस उजाडला. त्यादिवशी  सकाळी तिने देवपुजा केली. आपला स्वयंपाक आटोपला. नंतर तिच स्वतःच आवरायला  सूरूवात केली. पहिलाच दिवस होता कामाचा चांगली तयारी केली. कोरोनामुळे ती आणि दिपक खुप काळजी घ्यायचे. तिने आज नवीन साडी घातली होती. खुप खुश होती. दिपक म्हणत होता की , " आपण आज  पहीलाच दिवस आहे तर नको जायला " उद्या गेल तर जमायच नाही का ? सिमाने त्याला म्हटल, " उलट आज पहीला दिवस आहे तर गेल पाहीजे ना... आणि तसही आपण महीनाभर घरी होतो... " ती खुप हसत आणि सहज बोलुन गेली.

तिची पहील्या दिवसाची उत्सुकता, मैत्रीणींना भेटण्याची लगबग सगळच सिमाच्या चेहर्‍यावर दिपकला दिसल, तो ही तिला नाही म्हणू शकला नाही. दोघेही जण गाडिवर कंपनीत पोहचले. दिपक त्याच्या विभागात निघून गेला. सिमा ही तिच्या मैत्रिणींसोबत कामाला तिच्या विभागात पोहचली. पहिल्याच दिवशी सगळे एकमेकींना भेटुन बोलत होते. सगळ्या

मैत्रीणीच होत्या. कामासाठी दुरवरून आलेल्या या शहरात. एकमेकींना आधारच होत्या जणु. मिळून मिसळन एकमेकींना सांभाळून काम करायच्या. सगळ्यांच्या चेहर्‍यावर काम पुन्हा सुरू झाल्याचा आनंद दिसत होता. सिमाच सगळ्यांनी कौतुक केल. तिची साडी सर्वांना आवडली होती. सगळे काम करत होते, अचानक कंपनीला दुपारी आग लागली.

धुराचे लोटच्या लोट निघत हते, सर्वत्र गोंधळ आरडाओरड, जीव वाचवण्याची धडपड, पळापळ, सुरू होती. आग खुप भडकली  काही मिनिटांतच, भडका अडाला. लेडीच तिथेच अडकुन पडल्या, सगळे एकमेकांना आवाज देत होते. दुसर्‍या मजल्यावरची  माणसे पटापट जीव मुठीत धरून पळत होती.


अग्नीशमक दलाला काॅल गेला. पण इकडे आग वाढतच चालली होती, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. कोण बाहैर आल आणि कोण आत आहे काही कळत नव्हत. दिपकही सिमाला बघत होता. शोधत होता. इतक्यात ज्वलनशील पदार्थ आत असल्याने स्फोट झाला... दिपक आणि इतर माणस लेडीजला वाचवायला त्या डिपार्टमेंट कडे जाणार  तेवढ्यात स्फोट झाला मोठा, आगीने उग्र रूप धारण कैल होत, त्यात आत जाण मुश्किल होत. सगळे तिथेच थांबले

समोरच दृश्य बघुन तर सर्वांचा काळजाचा ठोकाच चुकला. त्यात बर्‍याचश्या लेडीच भाजुन निघाल्या. जागीच त्यांचा कोळसा

झालेला. ओळखुही येत नव्हते. भयानक दृश्य होत. त्यात दिपकने तर सिमाला स्वतःसमोर राख होताना पाहील. सगळ एका क्षणात होत्याच नव्हत झाल होत. आपल्या बायकोला अस पाहुन दिपकने हंबरडा फोडला. लोकांनी त्याला रोखल.

अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आल. आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू झाले. सगळे लोक जमा झाले.

सगळीकडे शोधाशोध सूरू झाली. कोण वाचलय ? कोण जिवंत काहिच कळत नव्हत. दोन तीन तासानंतर आग विझवण्यास

यश मिळाल. तेव्हा सगळेच मृत्युदेहांचा कोळसा झालेला होता. दिपकला तर काय कराव कळेना.

सगळ एका क्षणात होत्याच नव्हत झाल होत. रोज त्याच्याच सोबत काम करणारी त्याची बायको त्यात त्याच्या डोळ्यांदेखत मृत पावली. दिपक खुप रडत होता. त्याची पदोपदी साथी देणारी, त्याच्या सोबत असणारी त्याची अर्धांगिनी त्याला अर्ध्या वाटेत सोडून गेली होती... त्यांच्या पाहीलेल्या स्वप्नांची रांगोळी झालेली होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy