Vasudha Naik

Tragedy Others

3  

Vasudha Naik

Tragedy Others

संयमाची कसोटी भाग 3

संयमाची कसोटी भाग 3

2 mins
16


संयमाची कसोटी.. भाग 3


  वैभवच्या फुप्पूसाला मार लागला. दोन दिवस सहन करण्यात गेले. तिसरा दिवस शनिवार होता. मी शाळेतून घरी आले तर यांना खूप त्रास होत होता. यांची फुप्पुसाची डावी बाजू पूर्ण उडत होती. मला समजेना काय होतेय. मला हे बोलले " मला दवाखाण्यात घेऊन चल. "

   एक तर महिनाअखेर होती. दुसऱ्या बाईंकडून 500 /- रु. आणले होते घरखर्चाला. आता काय करावे समजेना.

   यांना घेऊन गेले दवाखान्यात. एक्सरे काढला. एक्सरे पाहून डॉ. बोलले "यांची मोठी सर्जरी करावी लागेल. एक लंग काम करत नाही " मला तर रडूच आले. मी यांना विचारले काय करू आता. हे म्हणाले "तू मला दीनानाथला घेऊन जा." त्या वेळी ते नवे होते.

   मी तशीच यांना घेऊन दीनानाथला गेले. हाती फक्त 500/- रु. होते. त्यातील एक्सरेला 300 /- गेले. माझ्याकडे 200/- राहिले.

   भाऊ बरोबर होता. तो आणि मी दीनानाथला पोहोचलो. रिक्षाचे 50/- रु. झाले. तिथे डॉ. मांजरेकर भेटले. पेशंट पाहून त्यांनी यांना घेतले. मी डॉ. ना म्हणाले "डॉ. माझ्याकडे फक्त 150/-रु. आहेत." डॉ. बोलले "पाहू नंतर आधी मला पेशंट पाहू दे." मला देवच भेटल्यासारखे वाटले.

   यांची पॉजिशन क्रिटिकल होती. शनिवार होता. डॉ. कमी होते. यांना अंडर ऑबसेर्व्हशन ठेवले. सोमवारी डॉ. हाड्रीकर यांनी तपासले. ताबडतोब ऑपेरेशन ठरले. पैसे जवळ नव्हते. तेथील incharge ने आम्हांला ससूनची वाट दाखवली होती. मी तशी शांत पण माझी आई खूप बोलली. पैसे उद्या भरतो आत्ता आमचा पेशंट पहा. कारण त्यांनी 3,00,000 /- भरायला लावले होते.

   यांना बजाजकडून चेक येणार होता मंगळवारी. तो मिळाला हुश्श झाले. यांचे ऑपेरेशन झाले. मोठे ऑपेरेशन होते. झाडाला पाणी घालतो तशा चार नळ्या यांच्या डाव्या बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी लावल्या होत्या. ते पाहूनच रडू येत होते.

  हे ही ऑपेरेशन सक्सेस झाले. बरे होण्यासाठी यांना चार महिने लागले. पण कंपनीने यांना व्ही.आर. एस. घ्यायला भाग पडले. तेंव्हापासून मी घर, मुले, शाळा सांभाळत आहे.

   यावेळी माझी शाळेची परीक्षा होती. फायनल एक्साम. सकाळी शाळा, दुपारी दवाखाना, रात्री डबा घेऊन परत दवाखाना व पहाटे घरी जाऊन मुलांना खायला करायचे असे चक्र तीन महिने चालू होते. फायनलचे पेपर दीनानाथला तपासले. डॉ. खूप कौतुक करायचे.

   पुढे 2009 ला यांना cp angle ब्रेन tumer झाला....


क्रमशः.. 🙏🏻



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy