Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

मानसिकता लहान मुलांची

मानसिकता लहान मुलांची

3 mins
29


   वयाच्या तिसऱ्या वर्षी लहान मुलाचे पाऊल पडते समाजामध्ये,प्रथम पडते ते शाळेमध्ये.

  भेदरलेले मुल आपल्या आईच्या हाताला धरून शाळेमध्ये येते. आई त्याला वर्गात सोडते. मुल आईच्या पदराला घट्ट धरून बसलेले असते. तिचा पदर काही तो सोडत नाही. मग बाई किंवा सेविका त्याचा हात धरतात त्याला आत म्हणून बसवतात. मुलाचे रडणे चालूच असते,आई,आई म्हणणे चालूच असते.

   बिचारी आई बाहेर बाकावर बसलेली असते. आपले मूल रडताय का? बाईंना त्रास देत आहे का हे पाहत असते. मूल शांत झाले कि ती घरी जायला निघते.

   इथे मुल आपल्या मित्रांमध्ये रमायचा प्रयत्न करते. बाई गाणे,गोष्टी शिकवतात समजून सांगतात. काही खेळ खेळायला देतात.

   पण काही मुले अशी असतात की, त्यांना तुम्ही किती समजावा,रागवा,प्रेमाने घ्या तरीही मुलं ऐकतच नाहीत. एक सारखी रडत असतात. त्यांचे पाहून इतर मुले सुद्धा रडायला लागतात. बाईंना दररोज त्रास होतो. शेवटी मुलांच्या कलेने घेतले जाते.कधी घरी सोडलं जात,कधी रागवून,प्रेमाने समजून सांगून त्यांना वर्गात बसू दिलं जातं शिकवलं जातं.

   पहिलीतल्या मुलांची तर तऱ्हाच न्यारी असते. आता बाल वर्गातले हे मूल मोठे होऊन पहिलीला आले असते. अभ्यास वाढलेला असतो. काही मुलं खूप रडकी, तर काही मुलं आनंदाने शाळेत येणारी असतात. काही दहा मिनिटात शांत होतात, काही दिवसभर एकही दप्तरातली पुस्तक,वही न काढता नुसते बसून राहतात. इतरांचे निरीक्षण करतात. काही चित्र फळ्यावर काढले तर पटकन वही काढताना चित्र काढायला सुरुवात करतात. ते चित्र दहवेळा आणून दाखवतात. काही मुलं अभ्यास करतील पण फळ्यावरचे सगळे लिहून घेणार नाहीत दोन ओळी लिहितील, परत दोन ओळी लिहितील दाखवतील पूर्ण अभ्यास मात्र करणार नाहीत. तर काही मुलं बाईंचं फळ्यावरच झाल्या,झाल्या पटकन लिहून पटकन दाखवतील आणि वर्गात दंगामस्ती करत बसतील.

   एखादे मुल वर्गात सहा महिने रडत असतं, दुसऱ्या सत्रामध्ये ते शांत होतं आणि लिहून घेतलं जातं. ते अभ्यासाला लागते. कारण त्याची बौद्धिक क्षमता वाढलेली असते आणि वय पण वाढलेलं असतं.

   काही मुलं पहिल्या सहा महिने छान करतात दुसऱ्या सत्रामध्ये स्वतःच्या विश्वात हरवले जातात. एकटेच असतात, बसणार एकटेच, जेवणार एकटेच, कधी जेवतही नाहीत. मित्रांमध्ये मिसळणार नाहीत. मित्रांशी,बाईंशी सुसंवाद साधणार नाहीत. खेळणार नाहीत. त्यांची मानसिकता कुठे बिघडते हे मात्र समजत नाही.

  मग घरी या मुलांना काही प्रॉब्लेम आहे का? आई बाबांचे वाद होतात का? आजी आईचे वाद होतात का? की घरात पैसा कमी पडतोय? याची चर्चा त्या मुलाच्या समोर होती का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात डोकवायला सुरुवात होते. आणि मग शिक्षकांकडून त्याच्या पालकांना सल्ला दिला जातो.

  कालच माझ्या वर्गातली घडलेली एक घटना. प्रथम सत्रात छान असणारा मुलगा द्वितीय सत्रामध्ये एकदम शून्यात एक विचार करू लागायला लागला. शाळेत यायला नको म्हणायला लागला. त्याच्या आईने त्याच्या बाबांनी त्याला खूप समजावून सांगितले, पण तो काही केल्या ऐकायला तयार नाही. मी स्वतः त्याला वर्गात गेली चार दिवस झालं समजावून सांगत आहे. रागावून,प्रेमानं,नापास होशील, मित्र पुढे जातील या सर्व शब्दांचा वापर करून सांगितले. या सर्वाला होकार देत होता. मला तर समजेना मी चुकते का काय झाले आता?

  शेवटी पालकांना बोलवून घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला.

 पालकानी अगदी वेगळे सांगितले.

 बाई हा सकाळी उठतो, आवरतो, पण शाळेत यायला नको म्हणतो. मला मी समजून सांगितले लहान भाऊ आहे तू जातो कसा छान शाळेत जातो तीन तास शाळेत बसतो अभ्यास करतो. तो पुढे जाईल,तू मागे राहशील मग.. खुशाल म्हणतो जाऊ दे मी मागेच राहील. आम्ही म्हणतो पण नापास होशील, होऊ देत असा बोलतो. कचरा वेचावा लागेल असे म्हटलं तर म्हणतो वेचीन कचरा, हे सर्व ऐकलं त्याचे वडील तर म्हणतात मी याला शाळेत सोडायवाला जाणारच नाही.तुझं तू बघ तुझा मुलगा आणि तो बघ. बाई वैतागले याला. माराव म्हटलं तर सासू खूप प्रेम करते त्याच्यावरती,त्याला बाहेर येऊन जाते लगेचच. मी काय करू मला सूचेना...

  मी त्यांना डॉक्टरांना दाखवायला सांगितलेला आहे त्याच्या मनातला काय आहे हे काढून घ्यायला सांगितले आता बघू काय होतंय...

 अशा या मुलांच्या मानसिकतेचा खरच अभ्यास करणं खूप महत्वाचे आहे..


Rate this content
Log in