Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

शिक्षक

शिक्षक

3 mins
8


शि..शिस्तप्रिय 

  क्ष.. क्षमाशील 

  क.. कर्तव्य दक्ष 

शिक्षक हा शाळा रुपी बागेचा माळी आहे. शाळेत आलेली मुले ही मातीप्रमाणे निर्मळ, पवित्र असतात.तिला आकार नसतो. आपण जो आकार देऊ तो त्या मुलाला प्राप्त होतो.संस्कारांचे खतपाणी घालून समाजातील जबाबदार नागरिक बनवतो. स्वतःच्या ज्ञानाचा प्रकाश देऊन त्याला नावारूपाला आणण्याचा प्रयत्न करतो.

  तर सांगण्याचा उद्देश हा की गेली 35 वर्षे मी या क्षेत्रात आहे. मनोभावे मुलांना शिकवले. मुलांकडूनही बरेच शिकले.

  आज माझे विद्यार्थी मोठया पदावर आहेत. कोणी डॉ. झालेय, कोणी मोठा ऑफिसर झालेय. जे शिक्षणात कमी होते ते बिजनेस करत आहेत. खूप छान वाटते असे काही पहिले, ऐकले की.

  मी कायम इ. चौथीला शिकवत होते जवळजवळ 16 वर्ष तरी. त्यात स्कॉलरशिप व टी. म. वी. गणित, मराठी या बाह्य परीक्षेला मुलांना आम्ही बसवत असू. मुले जरा मध्यम वर्गातील असल्यामुळे स्कॉलरशिप मिळाली नाही पण सर्व मुले पास होत असायची.

  डिसेंबर ते फेब्रुवारी मुलांना मी माझ्या घरी अभ्यास करायला बोलवत असे. मुलांचा सराव घेत असे. आज ही मुले भेटली की त्या बद्दल भरभरून बोलतात."बाई, तुमच्या घरी येत असू, तुम्ही छान शिकवल्या मुळे आम्ही छान मार्क घेवू शकलो. " या वाक्यानी मन भरून येते. आनंद होतो. आजही मी मुलांच्या मनात आहे हे बघून मस्त वाटते.

  आज पहिल्या वर्गातील लहान मूल शिकवताना खूप समाधान मिळते. त्याच्या कोवळ्या मनावर संस्कार करताना मूल्यांची छान रुजवणूक होते. मुले बाईंना आई मानतात. आईसारखे वागतात. बाईंचा पदर धरून मागे मागे करतात. हे सर्व खूप छान वाटते.

  मूल वाईट वागले तर त्याला समजावून सांगून त्याच्या वागणुकीत बदल झाला की आंतरिक समाधान मिळते.

  मुलांच्या मनाप्रमाणे त्यांच्या म्हणण्यानुसार हल्ली या पिढीबरोबर वागावे लागते. त्यांच्या आवडीचा अभ्यास द्यावा लागतो. कधी शिस्तीत, तर कधी प्रेमात, तर कधी त्यांच्या कलेने घ्यावे लागते. तर ही पिढी आनंदाने शिकते.त्यांना समजून घेणे व शिकवणे हे अत्यंत कौशल्याचे काम आहे. या मुलांना विविध उपक्रम, प्रकल्प घेताना मजा येते.

  मुलांना मूड कधी काय असेल सांगता येत नाही, सरळ म्हणतात बाई गाणे लावा आम्हांला नाचायचं आहे. जी गाणी मला माहीतच नाहीत ती गाणी मुले स्वतः यूट्यूब वर सर्च करतात. माझा फोन वापरतात. गाणी शोधून लावतात. नाचतात. बिनधास्त मुले वागतात. त्यांना माहित आहे बाई आपल्यासाठी ब्लू टूथ लावून स्पीकर वर गाणी लावतात, कविता लावतात... त्या मुळे मुले आनंदी, बाई खूष असतात. नव्या तंत्र ज्ञानाचा वापर माझ्या ऐवजी माझी छोटी मुलेच जास्त करतात.

  अक्षर छान काढण्यासाठी मार्गदर्शन करताना ज्याचं अक्षर छान त्याला चॉकलेट जरी दिले तरी मूल खूष होतात. चॉकलेट मिळतेय म्हणून अक्षर छान काढतात. शेवटी सर्वांना चॉकलेट देते ती गोष्ट वेगळीच आहे.

  लहान लहान कृतीला पेन्सिल, रबर, पट्टी अशा गिफ्ट मधून मुले छान तयार होतात. आवडीने अभ्यास करतात.

   आता माझ्या सर्व्हिसला 35 वर्षे पूर्ण होताना गतकाळ खूप छान गेला. खूप मुले घडवली. आनंदाने आता सेवा निवृत्त होत आहे. खूप पालकांचे पर्सनल प्रॉब्लेम मी मिटवले त्याचेही सुख मिळाले. त्यांचे संसार वाचले.

  आता जून मधे सेवा निवृत्त होताना माणसे कमवली, विध्यार्थी घडवले. जीवापाड प्रेम करणाऱ्या मैत्रीणी मिळाल्या. अनेक उत्तम संधी मिळाल्या.

  शिक्षक म्हणून निवृत्त होते 

  आनंदाचा अनमोल ठेवा जपते

  सर्वांच्या मनात रहाते 

  समजिक कार्य करते...


Rate this content
Log in