Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

जीवनाचे रंग

जीवनाचे रंग

2 mins
23


जीवन म्हणजेच आपले आयुष्य. जन्मल्यापासून आपण मरेपर्यंत जो आपण जगामध्ये विविध अनुभव घेतो त्याचे नाव आहे जीवन.

  पूर्ण आयुष्यामध्ये, पूर्ण जीवनामध्ये आपण जी अनुभवाची शिदोरी बांधत असतो ही शिदोरी कधी दुःखाची असते,कधी सुखाची सुद्धा असते. सुखामध्ये आपण हुरळून जाऊ नये . दुःखामध्ये आपण विरून जाऊ नये.

  जीवन जगताना आपल्या वाट्याला बरेच असे आयुष्य येते की जीवनात चढ-उतार खूप होत असतात. हे चढ उतार कधी सुखाचे असतात तर कधी दुःखाचे असतात. सुख मानवाला आभाळात पोहोचवते, दुःख मानवाला जमिनीवर उतरवते. म्हणून सुखात कधीही हरवून जायचं नाही आणि दुःख आलं तर कधी त्यामध्ये विरून जायचं नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे.

  मानव ही देवाची अत्यंत सुंदर अप्रतिम अशी निर्मिती आहे. देवाच्या या निर्मितीला प्रचंड बुद्धिमत्तेने वेढलेले आहे. जगामध्ये मानव हा एकच प्राणी असा आहे की ज्याची बुद्धिमत्ता अफाट आहे. बुद्धीच्या जोरावर माणूस आज चंद्रावर गेलेला आहे. कृत्रिम उपग्रहांची निर्मिती केली आहे.कृत्रिम पावसाची निर्मिती केलेली आहे.कृत्रिम वाऱ्याच्या निर्मिती केलेली आहे. समुद्रात पूल बनवला आहे.अशा ह्या मानवाला जगामध्ये खूप महत्त्व प्राप्त झालेला आहे.

  पण मानव या बुद्धीचा वापर मात्र नीट करत नाही. योग्य ठिकाणी योग्य तो बुद्धिचा वापर न केल्याने माणसांमध्ये वाद होतात.माणसांमध्ये एकमेकांवर टीका केली जाते. माणूसपण हरवून गेलेले आहे. माणूस माणसाशी माणसाप्रमाणे वागत नाही हे समजते.

  आज आपण कसे पुढे जाऊ हेच फक्त पाहिले जाते. पण एकमेकांना घेऊन पुढे जाण्याची प्रवृत्ती मानवीय जीवन जगताना दिसत नाही.

   खूप त्रास झाला तर माणूस तो समोरच्या माणसावर राग काढतो. बऱ्याचदा तो एकमेकांना शिवीगाळ करतो, अगदी मारायला हातही उचलतो, कधी कधी त्याला जीवे मारूनही टाकतो .पण हे उचित आहे का?.

  थोड्याशा पैशासाठी, येणी वसूल होत नाही म्हणून जीवे मारणे कितपत योग्य आहे. पैसा आज आहे उद्या नाही. या पैशा अभावी माणसांमध्ये अनेकदा वाद झालेले मी स्वतः पाहिलेले आहे. घरातील वाद असतात त्यातही भाऊ- भाऊ, भाऊ - बहीण,सासू - सून, वडील - मुलगा यांच्या विचारांमध्ये भेदभाव दिसून येतात. अशावेळी समोपचाराने योग्य निर्णय घेऊन कामे करावीत.

   कधीतरी स्वतःलाही समजून घ्यावे. स्वतःचीच संवाद साधावा . लेखणी हातात घेऊन मन रिते करावे.मन शांत होते. मनाशी मनाचा वाद, संवाद होतो. चांगला, वाईट विचार होतो. लेखणीतून कागदावर उमटतो. काही मार्ग निघतो. मग पुढच्या व्यक्ती बरोबर कसे वागावे समजते. माणूस आहे जीवन जगताना चुका होतात पण त्या चुका समजून घेऊन त्या पुढे केल्या नाहीतर जीवन सुख कारक होईल.

   म्हणून मानवा वसुधा सांगते की जीवनी आलास तर आनंद दे अन घे... माणसाप्रमाणे वाग. माणुसकीने वाग. दुःखाचा निचरा कर. सुखात जीवन घालव.

 हे सर्व नियम मलाही लागू बरका!....

  आनंद या जीवनाचा 

  सुगंधापरी पसरावा 

  पाव्यातील मृदुगन्ध सारा 

   ओठातुनी पाघळावा.....

जगा हसतमुखे

 आनंदाने आणि सुखाने 

   नांदा सौख्यभरे मोदाने....


Rate this content
Log in