Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

झोपाळा

झोपाळा

2 mins
45


  झुई झुई झोका

  झाडावर टांगा

  झोक्यासाठी लावा

  भराभरा रांगा...

 इयत्ता चौथीतील ही कविता आपल्या सर्वांना आठवत असेल.

 झोपाळा, झोका हे शब्द आठवले तरी सुद्धा मनात तरंग उठायला सुरुवात होतात .

  अगदी जन्मल्या बाळापासून ते म्हातारपणापर्यंत आपल्याला झोपाळा प्रीय असतो. जन्मल्या बाळाला शांत करण्यासाठी अथवा त्याला झोप लागण्यासाठी आपण पाळणा वापरतो. बाळ शांत होते. झोपी जाते. अथवा त्याचा रडणे थांबते.

  बाळ मोठा होत जातो तसं त्याला झोका आणखीनच आवडायला लागतो. झोपाळा पहिला ती कधी झोक्यावर बसून आपण झोपाळा घेतो असे होते.

  मोठी माणसं पण काही कमी नसतात. त्यांनाही झोपाळा अती प्रीय असतो. झोपाळा पाहिला की लहान मुलाप्रमाणे लहान मुलं होतात व झोपाळ्याच्या दिशेने जातात आणि झोपाळा मस्त आनंदाने घेत झुलत बसतात.

   वयोवृद्ध लोकांना देखील झोपाळ्याचे खूप आकर्षण असते. चित्त शांत करण्यासाठी बऱ्याचदा झोपाळ्यावर झुला घेतला असता मन शांत होते. विचार चक्र कमी होतात. किंवा विचारांना चालना मिळते. आनंदाचे क्षण उपभोगता येतात.

  सर्वांच्या जिव्हाळ्याचा हा झोपाळा कोणाच्या घरात असतो, कोणाच्या बागेत असतो, कोणाच्या अंगणात असतो, कोणाच्या टेरेस मध्ये असतो, शेतावर असतो, झाडाला टांगलेला साधा दोरांचा सुद्धा झोपाळाच असतो... मनसोक्त झुलण्यासाठी, आनंदी क्षण वेचण्यासाठी....

  या झुल्यावर झुलताना ना, गतकालीन दिवस आठवतात.त्या दिवसात रमायला होतं. दिवसभर आलेला शिणवठा होता दूर होतो.

 झोपाळ्यावर बसून मस्त जुनी, कर्णमधुर गाणी ऐकणं हा तर छंद होऊन जातो.

  एक झोका, एक झोका

  चुके काळजाचा ठोका

   एक झोका....

 झाडावर बांधलेला झोका घेत असताना जसा तो उंच उंच जातो तसा आपल्या काळजा ठोका चुकत असतो. पण तो झोका घेताना जी मजा येते, पोटात गोळा येतो त्याचा अनुभव घेतल्याशिवाय समजणार नाही.

तर असा हा झोपाळा लहानथोरांना वेड लावतो हे मात्र निश्चित....

 झोपळयावर बसून चहाचे घोट घेण्याची मजा काही ओरच असते..

  हा झोपाळा जीवनाचा मनमुराद आनंद देऊन जातो. गतकाळात रमायला होतं. टेंशन रिलॅक्स होते.

  सुख दुःखाचा साथीदार हा झोपळा होवू शकतो.

झोपळ्यावर बसावे

 मनातील सांगावे

  आनंदी क्षण वेचावे

   जीवन हर्षात जगावे...


Rate this content
Log in