Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

मैत्रीण

मैत्रीण

1 min
10


पन्नाशी,साठ्ठीचीच स्त्री आता सर्वात तरुण असते. कारण तिच्या जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात. अनुभव संपन्न असते. जरा बोल्ड वागायला लागते. Who care असे बोलून मस्त जीवन जगण्याचा चंग बांधते.

   शारीरिक दुखणे मागे टाकते.

सहज दुखणी बाजूला सारून जीवन आनंद घेते. कारण पुढील कोणी पाहिलंय हा विचार करते. जे जीवन जगले नाही ते जगून घेते. साडी, पंजाबी सूट शिवाय काही वस्त्र न वापरलेली ललना मस्त मिडी, फ्रॉक, देखणा गाऊन घालून मिरवते. मस्त शोभेल असा faint मेकअप करते. लिपस्टिक मात्र जरा डार्क लावते. आवड पूर्ण करते. लहान मुलांबरोबर लहान होते.

मुलीचीही मैत्रीण होते. मुलाचीही मैत्रीण होते. सून आली तर स्वतः देखील पतीबरोबर मस्त हनिमूनला जाते. सर्वांच्यात राहून फुल्ल enjoy करते.


संसारात रमतेच पण तरीही स्वतःला हवे तसे वागते.

गाणी, गोष्टी, मूव्ही, नाटक हवे तेव्हा बघते.

  पन्नाशी, साठ्ठीची स्त्री सर्वात स्मार्ट आहे बर का.. हुशार आहे. संसार तर छान करते. जीवनात हर्षाच्या फुलझड्याही लावते.

   घराचा उंबरठा ओलांडताना आता परवानगी लागत नाही.

लोक काय म्हणतील, पती काय बोलेल, सासू रागवेल का? याची काळजी करत नाही.विचारही करत नाही.मनात येईल तसे जगते.

  मैत्रिणींबरोबर gocip करताना वेगळेच असते. सासू, साडी, नवरा, मुले सारे गळून पडलेले असते.

  पक्षी कसा गगनी उंच भरारी घेतो, तशी तिला आता उंच भरारी घ्यायची असते. उरलेले जीवन मस्तीत घालवायचे असते. जे जे जीवनी करायचे राहिले ते ते करण्याचा प्रयत्न करते.

  मनी म्हणते....

पंछी बनू, उडती फिरू, मस्त गगन मे...

आज नया चांद खिला दुनिया की चमन मे....


Rate this content
Log in