Janhavi Shrivardhankar

Classics

3.5  

Janhavi Shrivardhankar

Classics

संस्कार कसे घडवावे ?

संस्कार कसे घडवावे ?

5 mins
29


संस्कार कधीही करावे लागत नाही, तर ते आत्मसात करावे लागतात. काही जणांकडे ते उपजतच असतात. खरं पाहता संस्कार कळत-नककळतपणे आपोआपच घडत असतात. अगदी जन्मल्यापासून आपल्यावर संस्कार घडत असतात.तसा चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टी जास्त तीव्रपणे कुणाच्याही मनाचा ठाव घेऊ शकतात त्याचप्रमाणे काहीसं संस्कारांचा आहे. संस्कार म्हणजे सांगायचं झालं तर ते काही कुठल्या दुकानात विकत घेता येत नाही किंवा त्याची किंमत पैशात करू शकत नाही.


मुळात जे जे काही चांगलं आहे त्याचा सारासार विचार करून त्यावर मनन-चिंतन करून अगदी मनापासून जे हसत- हसत हृदयात उतरवलं जातं ते म्हणजे खरे संस्कार होय. मग ते एखाद्या लहान मुलांच्या कृतीतून दिसते. त्याचे दर्शन ठेवल्या व्यक्तींच्या कृतीतून होत असते. ते गरिबांच्या कष्टकऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमध्ये दिसण्यातून जाणवते. अर्थातच ते मोठं मन असलेल्या व्यक्तींच्या सारं काही सामावून घेण्याच्या भावनेतून सदैव एखाद्या मशालीच्या लख्ख प्रकाशातून दिसल्यावाचून राहत नाही कारण अशा व्यक्ती स्वतः सोबत इतरांच्या जीवनात देखील नव्या प्रकाशाच्या वाटा कळत नकळतपणे मोकळ्या करून देत असतात. ज्याला संस्कार या शब्दाचा खरा अर्थ कळतो तो समाजात संस्काराचा म्हणजे जणू उपजत असलेल्या कलेचाच अनमोल ठेवा समाजाला प्रदान करत असतो. प्रामाणिकपणे चांगल्या ध्येयासाठी झटणे म्हणजे संस्काराचं दुसरं रूपच जणू.


असं बोलता की शहाण्या मनुष्याचं पण बोलणं ऐकावं व मूर्ख मनुष्याचंही. कारण शहाण्या मनुष्याकडून समजते की कसे वागावे व मूर्ख मनुष्याकडून समजते की कसे वागू नये. त्याचप्रमाणे संस्कारी मनुष्य चांगले संस्कार वाईट मनुष्य चुकीचे संस्कार त्याच्या कृतीतून स्वतःच्या मनावर कळत-नकळतपणे बिंबवत असतो.असा असंस्कारी मनुष्य दुसरा तिसरा कोणी नसून एखादा विकृत असतो, तो कधी-कधी चांगुलपणाचा मुखवटा घालून, एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे वेश पांघरून ताठ मानेने वावरत असतो. त्याच्या या विकृतपणाला त्याच्यावर आलेली परिस्थिती काणीभूत असू शकते. परंतु जर का मनुष्य जेव्हा जेव्हा त्याच्यावर बिकट परिस्थिती येते तेव्हा तेव्हा कोणत्याही प्रकारच्या भावनेत भावूक न होता सारासार विचार करू शकतो, तेव्हा त्या व्यक्तीला त्याच्यासारखा उत्तम जीवन जगणारा त्याच्यासारखा उत्तम मनुष्य तोच असेल असं म्हणता येईल.


सर्वात सोप्पी गोष्ट ती म्हणजे अशी की कोणतीही परिस्थिती असली किंवा कोणी कसंही बोललं किंवा मनात कसलाही भलता सलता विचार आला तर फक्त एक महत्त्वाची गोष्ट जाणीवपूर्वक करायची. ती म्हणजे अशी की जेव्हा आपल्यासमोर एखादा कठीण प्रसंग येतो त्याक्षणी आपण त्यावर react न होणं. कारण या गोष्टीमुळे दोन फायदे होऊ शकतात. एक फायदा तुम्हाला व दुसरा फायदा दुसऱ्यांना किंवा इतरांना होऊ शकतो. तुम्हाला फायदा होईल तो असा की तुम्ही तुमच्या पाच इंद्रियांवरती ताबा मिळवण्यास सक्षम व्हाल, जेणेकरून तुम्हीच तुमच्यावर योग्य ते संस्कार करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करून, त्याचा तुमच्या जीवनावर योग्य प्रकारे प्रभाव पाडाल. दुसरा फायदा जो दुसऱ्यांना होईल तो असा की जेव्हा तुम्ही तुमच्या समोर आलेल्या प्रसंगावर काहीच react नाही होणार तेव्हा ती परिस्थिती जर तुमच्या वर समोरच्या व्यक्तीमुळे आली असेल तर तो समजून जाईल की समोरची व्यक्ती तुम्हाला कोणत्याही प्रकारची हानी करू शकणार नाही. कारण तुमचा तुमच्या पाच इंद्रियांवरती ताबा आहे. सोबतच तुमच्या आजूबाजूला जे कोणी लोक असतील जसं की तुमच्या कुटुंबातल्या, मित्र परिवारातल्या, नातेवाईकांमधल्या शेजार पाजारांमधल्या,आप्तसोयीस्करांमधल्या व्यक्ती इत्यादी इत्यादी, त्यांना सुद्धा फायदा होऊ शकतो, जर त्यांनी तुमच्या या कृतीचे अत्यंत बारकाईने निरक्षण केले, तुमचा त्यामागचा विचार समजून उमजून जाणून त्यांनीही तुमच्यासारखं योग्य संस्कार घेण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ केला तर. यासारखा चांगला सुकृत्य कार्य शोधून सापडणार नाही. याप्रसंगी तुम्ही तुमच्या मनाचा मोठेपणा दाखवून तुमचं रिऍक्ट न होण्यामागचं कारण योग्यवेळी संधी साधून मांडलात तर तुमच्यासाठी व अनेकांसाठी योग्य संदेश अथवा उपदेश ठरेल.


आजकाल असंही कानावर पडतं किंवा ऐकायला येतं की "तू मला काय शिकवतोयस, तू स्वतःकडे बघ!!" परंतु या गोष्टीचा तंतोतंत विचार केला तर योग्य वचन असं ठरतं, ते म्हणजे दुसऱ्यांच्या चुका शोधत बसण्यापेक्षा जरा स्वतः पाहिलं आणि स्वतःमधल्या चुका सुधारल्या तर दुसऱ्यांवर टीका करायला व त्या‌ चुकांवर gossip करायला वेळच मिळणार नाही. याबाबत 2023 ची फेमिना मिस वर्ल्ड ठरलेली नंदिनी गुप्ताहीने तिला एक प्रश्न विचारला असता "ती जगाला बदलण्यापेक्षा, तिला स्वतःमध्ये बदल करायला तिला जास्त आवडेल", असं म्हणाली होती. तिने या जगाची रीत जाणली आहे- "सर्वात मोठा रोग हा आहे की काय बोलतील लोक". तसंही आपणही सारासार विचार केला तर आपल्यालाही तिचं बोलणं पटेल कारण स्वतःला बदलणं खूप सोपं आहे. इतरांपेक्षा आपण स्वतःला खूप चांगल्या प्रकारे ओळखत असतो. त्यामुळे आपल्या आपल्याला आपल्या strength काय आहेत आणि weakness काय आहेत, हे माहीत असतात. आपण आपल्या strength वर अजून चांगल्या प्रकारे मेहनत करून त्यावर काम केलं तर त्यात आपण पारंगत होऊ शकतो आणि तसंच weakness वरही योग्य प्रकारे मेहनत घेऊन त्या कार्यातही आपण पारंगत होऊन जाऊ.


ओम शांती ओम पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे, "जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर मनापासून प्रेम करत असाल, तर संपूर्ण विश्व तुमच्यापर्यंत त्याला पोहोचवण्याचे काम करते." मग तुम्हीच विचार करा ना हे संपूर्ण विश्व जणू एक घरच आहे. सोबतच संपूर्ण ब्रम्हांडाने मानवाला एक अद्भुत शक्ती दिली आहे. ती ज्याला गवसली तर फक्त त्याजचं नाही तर त्याच्याशी निगडित लोकांचे जीवन स्वर्गासारखं होऊन जाईल. ही पावर म्हणजे, "change yourself, the world will change according to you". तुमचा सर्वांत चांगला competitor म्हणजे तुम्हीच आहात. या गोष्टीमुळे तुमच्या नजरेत तुमचा आदर वाढेल आणि तेव्हा "स्वाभिमान नावाचा श्रृंगार" तुम्हांला प्राप्त होईल. ह्या शृंगाराची किंमत कोणीही करू शकत नाही किंवा याला तुमच्यापासून कोणी हिरावूनही घेऊ शकणार नाही. उलट या श्रृंगाराची कोणी चोरी करायचं ठरवलं तर ही चोरी संपूर्ण जगात सर्वात "सुंदर चोरी" ठरेल.



'संस्कार' या शब्दाचा अर्थ आजकाल शब्दशः घेतला जातोय. उदाहरण द्यायचं झालं तर लग्न हा काय फक्त एक विधीच आहे असं नाही तर तो एक उत्तम असा संस्कार जरी असला तरी पण जर पालक त्यांच्या मुलांचे लग्न लावून देण्याला एक उत्तम संस्कार मानत असतील आणि त्यांना असं वाटत असेल की लग्न लावून देणे म्हणजे जणु काही गंगा नदीत अंघोळ घेऊन पवित्र होणं. पालकांनी त्यांच्या मुलांचं लग्न लावणं यालाच संस्कार असं मानत असतील तर याला काही खरे संस्कार म्हणता येणार नाही. कारण सज्ञान मुलं-मुली एकमेकांशी त्यांच्या मनाने लग्न करू शकतात. परंतु जर पालकांनी त्यांच्या मुलांना त्यांच्या पायावर उभं केलं तर त्या मुलांवर पालकांनी योग्य संस्कार केलेत असं आपण नक्कीच म्हणू शकतो. कारण ती एक कला आहे आणि आजच्या काळाची गरजदेखील आहे.


नाहीतर संस्कार या शब्दाला काळीमा फासू पाहणारी लोक संस्काराचा चुकीचा अर्थ घेऊन स्वतः तरी मुर्ख बनतील व इतरांनाही मुर्ख बनवतील. ते म्हणतात ना चांगल्या गोष्टी पेक्षा वाईट गोष्टी आजकाल जर जलदरीतीने घडतात. परंतु जीवनात कोणताही प्रसंग आला तर त्यावर रिऍक्ट न होता सुयोग्य विचाराने आपण योग्य रीतीने ब्रम्हांडाने दिलेल्या शक्तीचा योग्यप्रकारे उपयोग करून स्वतःचेच नाही तर समाजाचेही हित साधू शकतो. आपण जेव्हा समाजात राहतो तेव्हा समाजासाठी चांगल्या गोष्टी करणे हे आपले कर्तव्य असते. तेव्हा, हे सर्वात परम कर्तव्य ठरेल. या सर्व गोष्टींमुळे आपण परमेश्वराच्या निकट जाऊन आपला परमार्थ यथोचित रीत्या पार पडू शकतो.


हे सर्व सांगायचं तात्पर्य एवढेच आहे की कोणत्याही मानवाची व संपूर्ण विश्वाची भलाई व प्रगती ही काही दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात नसून स्वतःच्या चुका शोधून त्या गोष्टींवर सतत प्रयत्नशील राहून, त्यात मात करण्यात असते, असं म्हटलं तरी त्यात काही चुकीचं, वावगं ठरणार नाही.


या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यास तुम्ही कधीपासून प्रारंभ करताय? अहो विचार कसला करता तुम्ही? उद्या करायचं आहे ते आज करा, आज करायचं आहे ते आता करा, कयामत क्षणात येईल, नंतर कधी करणार?


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics