Janhavi Shrivardhankar

Classics

2  

Janhavi Shrivardhankar

Classics

जीवन

जीवन

7 mins
106


विश्वास म्हणजे समृद्ध जीवन. हा विश्वास स्वतःवर असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. निव्वळ स्वतःवर विश्वास ठेवून चालणार नाही प्रयत्नांची पराकाष्ठा ही तितकीच महत्त्वाची. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे कोणतेही कार्य करत असतो ते मनापासून पूर्ण श्रद्धेने केलं पाहिजे. त्यासोबत हवी प्रबळ इच्छाशक्ती आणि हवी स्फूर्ती. नुसती स्फूर्ती नाही बरं का! तर चांगली स्फूर्ती. या स्फूर्तीने सतत प्रेरित होत आपल्या ध्येय असावे झटायचं असतं. हे ध्येय उरी बाळगलेलं असताना हा विचार नंतरच असतो की हे मला जमेल की नाही? त्याआधी सर्वप्रथम हा विचार करायचा की हा विचार माझ्या मनात आलाय तर यामागे माझी एखादी आवडलेली आहे का? मला हे कार्य करण्यासाठी माझं मन स्वतः धडपडत असतं का? हे करायला मला आवडेल का? मला याने समाधान आणि आनंद लाभेल का? हे चार-पाच प्रश्न मला सर्वात आधी यायला पाहिजेत व पडलेच पाहिजेत तर आणि तरच आपण आपल्या उरी खऱ्या अर्थाने एखादं ध्येय बाळगून त्यासाठी प्रयत्नरत राहून एक दिवशी ते सत्यात उतरवू शकतो. या सर्वांमुळे आपण कोणत्याही संकटांवर म्हणजे आपण जे ध्येय ठरवलं असताना ते पूर्ण करताना जे काही संकटे येतील त्यावर हसत-हसत मात करण्याचे वेगळेच बळ मिळतं. हे बळ आपल्याला पुढे जाण्यास सहाय्यक ठरत असतं. हे ध्येय आपण आपल्या उरी बाळगून असतो ना ते अगदी सोन्यापेक्षा मौल्यवान असतं व जेव्हा ते आपण प्राप्त करतो तेव्हा आपलं जीवन कनकाप्रमाणे-कांचनाप्रमाणे तेजस्वी होईल.


अशा जीवनाच्या वाटे चालत असताना आपल्याला अनेक माणसे भेटतात. कधी ते आपल्याला सोबतची प्रवासी असतात तर कधी आपल्याला आपल्या ध्येयापासून परावृत्त करणारी माणसे भेटतात. कधी आपल्याला सहाय्य करणारी माणसे भेटतात. यात आपल्या परिवारातील स्नेहा मंडळी सखे आणि मार्गदर्शक यांचा समावेश असतो. काही असलं तरी काही माणसांची वृत्ती चांगली असते नाहीतर वाईट असते. यात वाईट माणसांचे विचार किंवा त्यांचं वाईट बोलणे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं असतं. तर चांगल्या माणसांचं बोलणं त्यांचे चांगल्या प्रकारचे उपदेश अमृत समजून प्राशन करायचं असतं. त्यांना न दुखवता, त्यांना न विसरता मनापासून धन्यवाद म्हणायचं असतं. जमलंच तर त्यांना देखील आपल्याकडून जमेल तेवढी मदत करायची असते. नेहमी लक्षात हेच ठेवायचं की अशी चांगली माणसे म्हणजेच देवाचे दुसरे रूपच जणू. म्हणून त्यांच्यावर देखील विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही.


मन जेव्हा डळमळीत होतो तेव्हा, ते म्हणतात ना"एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे जर तारे हे वस्त्र मानवा तुझी आयुष्याचे" हे मनी बिंबवायचं असतं, कारण हा जीवनाचा नियम आहे.


जर का आपल्या आयुष्यात चांगल्याच गोष्टी घडत राहिल्या तर आपल्याला त्यांची किंमत कळणार नाही. सुखाचा खरा अर्थ कळणार नाही, म्हणून तर सुख आहे तिकडे दुःखही आहे. अर्थात जिथे चांगुलपणा आहे तिकडे वाईटपणाही आहे.जिथे प्रकाशमय दिवस आहे तिथे ठराविक काळानंतर काळोखी रात्रही येते. नंतर निसर्गचक्राप्रमाणे प्रकाशमय असा दिवस येतोच. हे जसं निश्चित असतं तसं आपल्या जीवनातील कितीही दुखः आली तरी देखील कधी ना कधीतरी सुख ये येतेच, याचा पुरावा वरील सर्व उदाहरणे देतात, ते खऱ्या जीवनाची साक्ष देतात.


जीवनात कधीही स्वतःला एकटं समजू नका. निसर्गातील झाड हा देखील मानवाचा खरा मित्र आहे, हे आपण आचरणात घेतलंच पाहिजे व वृक्षारोपण करून त्यांची काळजी घेतली पाहिजे.


जीवनात आपण अनेक चांगली माणसे जोडली पाहिजेत. हे लक्षात ठेवा की चांगली माणसं जिथे असतात, तिथे वाईट माणसंही आलीच. काही झालं तरी आपण चांगल्या माणसांशी असलेलं आपलं चांगलं नातं टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा असतो.


जे काही आपण ठरेल असतं ते फक्त आपल्या स्वतःसाठीच असावं असं काही नाही आहे. आपण निस्वार्थी होऊन आपल्या सोबत आपल्या देशाचं व देशातील नागरिकांचही भलं करायचं. भलं केलंच पाहिजे असा माझा काही अट्टहास नाही, तर निदान आपल्या आजूबाजूला राहणाऱ्यांना आपला कोणत्याही प्रकारे त्रास तर होत नाही आहे ना याची आपण दक्षता घेतली पाहिजे.


आपल्याला मनुष्य देह लाभला हे आपले जणू भाग्यच आहे, परंतु मला मनुष्य जन्म मिळाला बरं झालं असं म्हणून आपल्या मानवी जीवनाचं कर्तव्य संपत नाही. तर या नरदेहात येऊन आपल्या मानवी जीवनाचे आपण सार्थक केलं पाहिजे.


असं म्हटलं जातं की आपण आपल्या जीवनात असं कार्य केलं पाहिजे की ज्याची कीर्ती सर्वत्र पसरली पाहिजे. मरणोत्तर देखील सर्वांनी आपण आपलं जीवन चांगल्या मानवासवे जगलो असं मनात आणलं पाहिजे, तरच आपलं जीवन सार्थक होईल व आपण पैलतीर गाठून मोक्ष प्राप्त करू शकतो.


परंतु आजच्या धावपळीच्या जीवनात हे तर तसं थोडं कठीण वाटत असलं तरीदेखील निदान जी माणसं आपल्याला ओळखतात त्यांच्यापर्यंत तरी आपलं कार्य पोहोचावं व त्यांनी "तु जे कार्य करतोस ते ऐकून मला खूप आनंद होतो" किंवा "तू खूप छान कार्य करतोयस" असे मायेचे व भूषणाचे शब्द आपल्या कानी पडावे तर आपल्याला समाधान लागून आपल्याला आपल्या जीवनाचे सार्थक झाले असं वाटल्याशिवाय राहणार नाही.


 एक गोष्ट लक्षात ठेवा आपली कीर्ती जरी पसरत असली तरी आपण हुरळून न जाता, गर्वाने फुग्यासवे फुगून जाता कामा नये. तर अजून आपल्याला काहीतरी चांगलं कार्य कसं करता येईल याचा विचार केला पाहिजे.सतत कार्यरत राहणे म्हणजे धो-धो वाहणाऱ्या जीवनाचा झरा असं म्हटलं जातं. जर आपल्याला आपलं जीवन सुमनासवे सुगंधी टवटवी ठेवायचा असेल तर मन प्रसन्न ठेवायला हवं चांगल्या गोष्टींचा विचार करायला हवा. कितीही दुःख आली तरी आपण वाईट विचार करू नये ज्याला "दुःखाच्या वेळी, क्षणी, प्रसंगी सुख शोधता आलं तोच मनुष्य जीवनात खरा सुखी होऊ शकतो",हा जीवनाचा खरा मंत्र आहे आणि तो आपणच जपला पाहिजे.


आपण आपल्या जीवनात सुखी असतो तेव्हा मधूनच काही माणसं होत्याचं नव्हतं करायला म्हणजेच जे काही चांगलं चाललंय ना त्या वेळेस मधूनच कुठलातरी वाईट प्रसंग सांगायला सुरुवात करतात किंवा त्यांची वृत्ती इतकी वाईट असते की ते काही ना काहीतरी निमित्त साधून आपलं मन कसं दुःखी होईल व आपल्या मनाला कशा यातना होतील असाच प्रयत्न करत असतात. तेव्हा काहीही झालं तरी आपण त्याचा काहीच जास्त विचार करायचा नसतो. अजिबात खचून जायचं नसतं यामुळे आनंदाचा भंग करणाऱ्याला स्वतःचीच लाज वाटू लागेल. यामुळे त्याने स्वतःची सद्सदविवेक बुद्धी गमावून बसलेला असेल. जो कधी माणूस म्हणून जीवन जगला नसेल असं समजून जायचं. त्याच्यासारखा तोच जीवनमूल्यांना मुकलेला मनुष्य असतो.


हो, चांगल्या सुखी जीवनाची तुलना जीवन मूल्यांशी होते कारण मनुष्य जीवनात झटत असतो ते "चांगल्या दिवसांसाठीच" अर्थात "सुख प्राप्त करण्यासाठीच" हे एका चांगल्या जीवनाचे लक्षण असतं म्हणून माझ्या मते हे जीवनमूल्यच आहे.


पण हे जीवनमूल्य जेव्हा आहे किंवा असेल तेव्हा आपल्या आनंदाने कोणीही दुखी होणार नाही याची दक्षता घ्यावी.यातच कोणाच्या जीवाची आग होत असेल म्हणजे जो दुसऱ्यांच्या आनंदामुळे त्याच्यावर जळत असेल, किंवा तो पाण्यात पाहणारा असेल व म्हणून तो दुःखी होत असेल तर त्याला दुखावणं नाही म्हणत. यात आनंदी माणसाची काहीच चूक नसते तर हा जळकुट्या मानवाचा दोष असतो व तो यामुळे स्वतःचंच नुकसान करून स्वतः मधल्या माणूसकीच्या चांगल्या गुणाला मुकलेला असतो.


असं देखील म्हटलं जातं की माणसाचं जीवन ना कसं संपन्न असायला हवं! मग लगेच मनात येतं की संपन्न म्हणजे काय तर खूप पैसा, स्वतःचा मोठा बंगला, घरात काम करायला नोकर 

-चाकर, परंतु संपन्नतेचा काही अर्थ पैसा-धन नाहीये तर "संपन्नता" म्हणजे जिथे समाधान लाभतं, जिथे एकजुटता असते, जिथे सदैव सकारात्मकता नांदते या सर्वांनी भरलेलं जीवन म्हणजे खरी संपन्नता, खरी समृद्धी आणि खरं ऐश्वर्य.


एक लक्षात ठेवा काही झालं तरी स्वतःचे जीवन संपवून टाकण्याचा विचार मनात कदापि चुकून सुद्धा आणायचं नाही. कारण ज्यायोगे आपल्याला हे जीवन लाभले त्यायोगे आपण आपल्या जीवनात कधीच हार मानू नये. कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. स्वतःला कधीच कमी लेखू नका जर या काळात अजूनही गरीब-श्रीमंत, काळा-गोरा, उच्च-नीज असे भेद होत असले तरीही हे सर्व मानवाने तयार केलेले आहेत. त्यामागे काही ना काही तरी स्वार्थ नक्कीच आहे. हे खरं आहे की मानवाची निर्मिती देखील देवानेच केली आहे त्यामुळे देवाच्या दारी सर्वजण समान आहेत.


कधी मनात विचार आला की माझी कुणालाच पर्व नाही, मी सर्वांना नकोच आहे तर असं अजिबात नाही. या भूतलावर जर का कोणीच आपली परवा करत नसेल तर देवाला नक्कीच आपली परवा असते.कितीही संकटे आली तरी देखील त्यात आशेचा किरण दाखवतो तो देव. कितीही दुःख नशीबी आलं तरी त्यातही आपली काळजी घेणारा, आपला दुःख हलकं व्हायला मदत करणारा तो देवच असतो. अशा प्रकारे देव कुठल्या ना कुठल्या तरी रूपात माणसाची मदतच करत असतो म्हणून त्या देवावर मनापासून श्रद्धा ठेवलीच पाहिजे.


देवाला भक्तांकडून केवळ खऱ्याखुऱ्या भक्तीभावाने मनापासून केलेली भक्ती श्रद्धाच हवी असते. देव फक्त याचाच भुकेला असतो. देव काही बोलत नाही देवळात या, माझ्या खूप आरत्या म्हणा, दानपेटीत पैसे टाका देव असं कधीच म्हणत नाही.

देवाची भक्ती अगदी एखाद्या चांगल्या व मनापासून केलेल्या कार्याद्वारेही होऊ शकते. यात दुसऱ्याला अन्न देणं, अभ्यास करणे अर्थात एखादं चांगलं कार्य निर्मळ मनाने करणे होय.


काहीजण मानतात की देव नसतो. परंतु त्यांना माहीतच असतं की हे विशाल विश्व,त्यातले उंच-उंच पर्वत, खळखळ वाहणाऱ्या नद्या, झरे,तलाव,धबधबे, समुद्र, सुंदर निसर्ग, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तिन्ही ऋतू नियमानुसार चालतात. या सर्वांचा अगदी योग्य मेळ चालू आहे. शिवाय दिवसातल्या 24 तासातले रोजचे बदल अगदी क्रमानुसार चालता, जेणेकरून हे सर्व अगदी योग्यरीत्या चालू आहे. म्हणजे यामागे नक्कीच एक अद्भुत शक्ती आहे. ही शक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणीही नसून दैवी शक्तीच आहे. अर्थात देव या सृष्टीतल्या चराचरात वास करत असतो

 या जगाची शिदोरी त्याच्यासाठी आहे व त्याच्या अनुसारच चालत असते.


मनुष्य जसा या निसर्गाशी वागत असतो, त्यानुसार त्याला त्याचं फळ मिळत असतं. वृक्षतोड,निसर्गाचा वाढत चाललेला असंतुलपणा हे माणसाचं वाईट कृत्य आहे, त्याचं फळ तो उपभोगतच आहे. यावरून मनुष्याने आपली सद्सदविवेक बुद्धी वापरून सारासार विचार करणे हे आजच्या घडीला अगदीच योग्य आहे आणि त्याची गरज देखील म्हणूनच

 "मानवता प्रेमींनों  जागे व्हा!! जागे व्हा!!"



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics