संघर्ष " मनोरुग्ण वार्ड क्र 2
संघर्ष " मनोरुग्ण वार्ड क्र 2
घरची परिस्थिती तशी बेताचीच ..लहानपणीच संघर्ष सोबतच जणूकाही तो माझा जिवलग सखा असल्यासारखा मात्र आयुष्य खूप चॅलेंजिंग होतं. प्रत्येक अडथळा पार करत दहावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाली . मी महेश लहानपणी वडिलांचे छत्र हरवल आम्ही चार भावंड सगळ्यांची जेमतेम शाळा झाली . घरातली गरिबी काहीही झाले तरी कमी होतं नव्हती . मोठा भाऊ हॉटेल मधे कामाला लागला . आई आणि बहीण दोघ शेतात मजुरी करत असत .अश्यातच वडिलांचे दारू पिण्याचे प्रमाण वाढत गेले .. त्यामुळे त्याचं लिव्हर खराब होऊन ते आम्हा सर्वाना सोडून देवाघरी निघून गेले . त्याचं असणं आम्हासाठी महत्वाच असलं तरी नियतीला जे मान्य होतं तेच झालं . मी लहान असल्याने मला जमेल तस शिक्षण द्यावं घरात एक व्यक्ती शिकला पाहिजे ह्या उदेशाने आईनं माझ शिक्षण सुरू ठेवल . बहीण मोठी होतं होती , म्हणजे निसर्ग नियमानुसार तिच लग्न करायला हवं ." परिस्थिती आणि गरिबी हुंडा देण्यासाठी पैशाची जुळवनुक कारणे सुरू झालेत याच काळात बरीच स्थळ येऊन गेलीत . शेवटी एक स्थळ निश्चित झालं ..आणि वडिलधाऱ्या मंडळींना सोबत घेऊन लग्न पार पडले . आणि बहीण सासरी नांदायला गेली . सासर तस अपेक्षेपेक्षा चांगल मिळालं त्यामुळे भविष्यात काळजी करण्याची गरज राहिली नाही . मी सुधा सातवीची परीक्षा पास झालो . सगळे आनंदी होते . मार्क्स चांगल्यापैकी मिळाल्याने आणि मुळातच मी हुशार असल्याने दाजीनी त्याच्या गावी पुढचे शिक्षण घेण्यासाठी ऑफर दिली . मग सगळ्यांना असं वाटलं कि तिकडेच शिकव या उद्देशाने मी जाण्याची तयारी केली . माझे नाशिक जाणे फिक्स झाले. दोनतीन दिवसात प्याकप् करून नाशिक ला आलो . ऍडमिशन करण्यात चार एक दिवस गेले . हीं शाळा आणि तेथील विद्यार्थी तसेच शिक्षक चांगल्या स्वभावाचे असल्यामुळे तेथील वातावरणात अड्जस्ट करायला फारसा त्रास जाणवला नाही .अधून मधून घरी आई सोबत बोलणे होतं राहायचे गावची आणि घरची आठवण त्रस्त करत असे. पण शिक्षण महत्वाचे असल्याने अभ्यासाकडे लक्ष द्यायचो तसेही आमच्या घरात कोणीही जास्त शिकले नाही . म्हणून मी विचार केला कि आपण शिकू काहीतरी नोकरीं करू …
बाहेर शिकायला पहिल्यांदाच आलो ..बाहेर कुठेही फिरलो नव्हतो त्यामुळे बाहेरच्या जागाचा फारसा अनुभव नव्हता . हळूहळू जगाशी नातं जोडू लागलो. अभ्यासात हुशार असल्यामुळे शिक्षक घरातील मानस कौतुक करायचे ..त्यामुळे एक उभारी एक नवीन ऊर्जा मिळायची आणि जोमाने अभ्यास करायचो...आठवी ला चांगले मार्क मिळाले नवविला सेमी इंग्लिश घेतले . सेमी इंग्लिश पहिल्यां सहामाही ला समजून घेतांना हवं तितकं यश पदरात पडले नाही ,तेव्हा निराश झालो . इतर मुलांना ट्युशन लावलेली होती . मला मात्र ते श्यक्य नव्हत. त्यामुळं अजून बरीच कसरत करावी लागनार हे मला माहित होतं . त्या दिशेने तयारी चालू केली . याच काळात एक ते दीड महिन्यात बहिणीला मुलगी झाली . सगळीकडे आनंदाच वातावरण होतं . मात्र माझ्या जबाबदारीत वाढ होतं गेली . घरातली बरीच काम , शाळा ,अभ्यास यात माझी दमछाक व्हायला लागली . तरीही पूर्ण जोर लावून प्रयत्न सुरू राहीले . अपेक्षा मात्र तरीही अपूर्ण राहीली . नववी पास झालो . सुट्टीत जेव्हा गावी आलो त्यावेळी माझ्या वागण्या बोलण्यात बरंच फारख जाणवत होता . त्यामुळं गावात मित्रांमध्ये हा कुतूहल पूर्ण विषय झाला . मलाही बर वाटलं .. नववीची स्कॉलरशिप परीक्षा पास झालो . त्या वेळी मात्र खूप मोठा आधार मिळाला . शाळेतून रोख पाच हजार रुपये आणि आदर्श विद्यार्थी पुरस्कार दिला गेला . आता दहावी बोर्ड काबीज करायचा बस कमीत कमी 90% मिळवायचा टार्गेट पक्का केला .पुन्हा एक नवि ऊर्जा अंगात संचारली .. फिलिंग खूपच बेटर होतं कारण आता दहावी ला होतो . दहावी चे वर्ग सुरू झाले होते .नियमित क्लास वैगरे सुरू असताना .. आईच्या निधननाची वाराता समजली आणि सगळं काही गमवल जीवनातली खूप मोठी पोकळी निर्माण झाली . एव्हडं मोठा दुःख पचवन खरोखर अवघड होतं . .. गाडी करून आम्ही गावी आलो . आईला अग्नी देऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत हजार प्रथम सतराची परीक्षा सुरू होणार होती . दुःखात जीवाशी कवटाळून परीक्षेला बसलो खरं .. पेपर देणे खूप अवघड होते . अचानक मनस्थिती ठीक नसल्याने हॉस्पीटल गाठाव लागलं … त्यानंतर आयुष्याला उतरती कळा लागली . तबेत खालावत गेली . आयुष्य उदास झालं . भाऊ ,बहीण त्याच्या परीने मदत करायचे मात्र तरीही एक उणीव एक कायम स्वरूपी पोकळी जाणवत राहिली . आई आणि वडिलांची छत्रछाया नाहीशी झाल्याने पोरकेपणा जाणवू लागला .
सारखा एकच भास आपण एकटे आहोत . काय करायच कस होणार...आयुष्य कसा जगायचं ...अश्या अनेक समस्या पाठीशी होत्या ..तबेतत साथ देत नव्हती . खूप वेळा आत्महत्या करायचा विचारत मनात येत राहत ..तस प्रयत्न हीं केला . त्यातही यश आले नाही .. त्यामुळं घरच्या लोकांनी सायकॉलोजीस्ट कडे माझी ट्रीटमेंट सुरू केली . सगळ्यात आधी मला नाशिक सिव्हिल हॉस्पिटल ला ऍडमिट केले . सुरवातीला तिथलं वातावरण समजन्या पलीकडे होते . कारण मी गेले दहा दिवस ट्रीटमेंट घेत होतो . बारा ते चौदा दिवसात नॉर्मल झाल्यावर .. प्रश्न पडला कि येड्या लोकांमध्ये मला का ठेवलाय ?? बावीस दिवसांनी नॉर्मल वार्ड मधे शिप्ट केल गेल. जवळ जवळ 42 दिवस मी हॉस्पिटल मधेच होतो . नंतर डिस्चार्ज मिळाला . आणि घरी आलो . दहावी बोर्ड हातातुन गेला होता . बोर्डाची परीक्षा संपली होती . त्यानंतर घरच्या लोकांनी सांगितलं हॉस्पिटल मध्ये माझी काय परिस्थिती होती . त्यावर माझाच विश्वास बसत नव्हता . दिवस आणि रात्र मिळून 24 तास मला झोपेचे इंजेकशन द्यावे लागत होते . शिवाय माझे हात पाय पलंगावर बांधून ठेवत .. असत . अर्थात मी एक मनोरुग्ण होतो . तीन एक महिने गेले . आता तबेतीमध्ये बऱ्याच प्रमाणात सुधारना झाली होती . बोर्डाचा निकाल लागला मी नापास झालो . आता पुढच्यावर्षी पुन्हा दहावी . "!
ह्यावेळी नशिबाने साथ दिली . आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यात परत परीक्षा देता येईल असा निर्णय शिक्षणमंत्र्यानी दिला . परीक्षा तर देऊ आपण अभ्यास कसा करायचा आणि तोही पूर्ण वर्ष्याचा .. ह्या वेळी मानाचा खंबीरपणा कामात आला . घरच्या लोकांनी, शिक्षकानी सहकार्य केल. पुन्हा परीक्षा देऊन 65 % नी दहावी बोर्ड पास केला . हे दिवस माझ्यासाठी खरोखर चॅलेंजिंग राहिले .
