Kavi Sagar raje

Tragedy

3  

Kavi Sagar raje

Tragedy

पत्र

पत्र

4 mins
700


प्रिय पतीस...

       i love u... मागील काही दिवसांपासून खूप त्रास झाला. त्यासाठी क्षमस्व, पण काय करू? यात माझीदेखील चूक नाहीये. खूप जास्त प्रेम करते मी म्हणून सहनच होत नाहीये. जे झाले त्यात तुमचाही पूर्ण दोष नाही. आकर्षण ही नैसर्गिक देणगी आहे. त्यातून प्रत्येकाला नाही सावरता येत. प्रेम तुम्हीपण माझ्यावर खूप सारे करता यात तीळमात्र शंका नाही. आता मात्र माझ्या मनात भीती दाटली आहे. तुमचा भूतकाळ अन् त्यातली पत्रे परत तुमच्या आयुष्यात आली तर माझे काय?


   खरे जगणे तर माझे तेव्हा चालू झाले जेव्हा माझ्या आयुष्यात तुम्ही आलात. तेही अनवधानाने..! आधी फक्त जिवंत होते. जगणे तुमच्यासोबत शिकले. खूप काही शिकले मी या तीन महिन्यांत. सर्वांत आधी तर जगायला शिकले आवडत्या व्यक्तीसाठी. एका ताटात जेवण, घास भरवणे, उष्ट्या ग्लासात पाणी प्यायला शिकले. तुम्हाला कदाचित विश्वास वाटणार नाही की हे सर्व मी पहिल्यांदा केले... सारं काही नवीन होतं माझ्यासाठी खूप कमी वेळात अन् जास्त गुंतले मी तुमच्यात! कदाचित लहानपणापासून कोणाचे प्रेम मिळाले नाही आणि तरुणपणी कोणाकडून अपेक्षा केली नाही.


तुम्हाला आपली भेट आठवते का? तेव्हा कधीच वाटले नव्हते की आपण एकमेकांवर एवढे प्रेम करू, किंवा आपल्यामध्ये प्रेम वगैरे असे काही होईल, सारं काही किती अचानक आणि वेगाने घडत गेलं. कधी प्रेम झाले कधी तुमच्यात गुंतत गेले कधी कळलंच नाही. वाटत होतं, जणू काही स्वप्नच आहे हे! या स्वप्नासाठी संपूर्ण आयुष्य झोपायला तयार आहे. फक्त ते सोनेरी गोड स्वप्न तुटायला नको. हो, नाही करताकरता तो दिवस उजाडला अखेर... "साखरपुडा"

      

या दिवशी माझी स्वप्ने सत्यात उतरण्याच्या तयारीत होती. अन् मी या दिवसाची अतिशय अधाशीपणे वाट पाहत होते. त्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्हाला पाहिले ना असे वाटत होते की येऊन तुम्हाला घट्ट मिठी मारावी अन् मी एक पाऊल पुढे आलेही होते. तुम्ही एकटे नव्हता. स्वतः ला सावरून घरात पळाले. दुपारी तुमच्यासोबत जेवताना सर्वांसमोर खूप लाज वाटत होती. पण तुमची इच्छा मोडता नाही आली. गार्डनमध्ये तुमच्या हातात हात घेऊन फिरताना खूप छान वाटलं. सगळे लोक आपल्याकडे बघत होते. रात्री सर्व पाहुणे गेले. मात्र तुम्ही मुक्कामी होता. अगदी माझ्या मनासारखं झालं. रात्री गप्पा मारता येतील. सोबत बसता येईल. पण नाईलाज...


माझ्या आईने नाही येऊ दिले. त्यानंतर सारं काही छान चाललं होत. तुम्ही बर्थडेला आलात. मला खूप आनंद झाला. सर्व कार्यक्रम आवरले. तुम्ही जाऊ नये अशी खूप इच्छा होती. पण कसं थांबवून घेऊ तेही कळत नव्हतं. तुम्हाला सोडायला आले तेव्हा मुद्दाम उशीर केला. फिरण्यातपण बहुतेक निसर्गालाही आपला दुरावा सहन झाला नसावा. अन् अचानक पाऊस आला. त्या पावसातले किसींग... मी कधीही विसरणार नाही. देवाने दिलेला एक चान्स... आपण जवळ येण्यासाठी... मग आपण पुन्हा घरी आलो तेव्हा... 10.30 झालेत... मम्मी तर खूप चिडली माझ्यावर. तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला राहायला भाग पाडले... तेव्हाही एकाच छताखाली... आपल्यामध्ये दुरावा होता. रात्री सर्वजण झोपले. कदाचित तुम्हीपण... मी मात्र तळमळत होते. तुमच्याजवळ येण्यासाठी. तेव्हाही माझी मर्यादा आडवी आली. मध्यरात्री... सर्व गाढ झोपले होते... सकाळी जेव्हा 04.00 चा अलार्म वाजला. तुम्हाला जाग आलेली जाणवली. तुम्ही अलार्म बंद केला. मी रात्रभर झोपले नाही. झोपच येत नव्हती. तुमच्या कुशीत येण्यासाठी तगमग चालू होती, माझी. तेव्हा तुमच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला जाणवला. खूप बर वाटलं मला आणि क्षणात तुम्ही मला ओढून घेतलं जवळ आणि माझ्या ओठावर तुमचे ओठ ठेवताच... मी रोमांचित झाले... तो किस मी कधीच विसरू शकत नाही... तो अलार्म नेहमीच चालू ठेवते मी. तो गजर. ऐकताच माझे हात तुम्हाला चाचपडत राहत...


अंधारात सारे काही खूप छान अन मस्त चालत होते. तुम्हाला भेटण्याची आतुरता काही केल्या कमी होत नव्हती. मी नेहमी अधीर असे. मम्मी भेटायला येऊ देत नाही म्हणून मी अक्षरशः तिला खोटं बोलून, ऑफिसचं नाव करून भेटायला यायचे. संपूर्ण दिवस जरी सोबत असलो तरी घरी जावंसं वाटत नसे. आता तुमचा सहवास हवाहवासा वाटत होता. वाटायचं दिवस संपू नये. रात्री थांबायला परवानगी नव्हती. त्या दिवशी आपण गार्डनमध्ये बसलो होतो. खूप मस्त मूड होता माझा. तुम्हाला कॉल आला. मी बघितल होते पिल्लू नावाने सेव्ह होता तो मी सुद्धा मस्करीत बोलले तुमच्या gf चा कॉल आहे. अन् ते खरं होते. जेव्हा मला समजलं... एकाएकी डोळ्यात पाणी आले. वाटलं सर्व संपलं... माझी स्वप्नंही तुटली... खूप अपराधी वाटत होतं. मी अडसर तर नाही ना तुम्हा दोघांच्या आयुष्यात... प्रयत्न केला स्वतःला सावरायचा पण नव्हतं शक्य. सगळं शांत झालं होत त्या एका कॉलनंतर... घरी आल्यावर ठरवलं सविस्तर बोलावं. तुम्ही तयारी दाखवली नाही. तरीही बोलून दाखवले तुम्हांला "पहिल्या प्रेमासाठी परत मागे फिरू शकता... तुम्ही नाही म्हणालात.


तसं बघितलं तर तो तुमचा पास्ट होता हे मान्य आहे. कदाचित त्यांच्या आधी मी आले असते किंवा दुसरी कोणी... किमान लग्न झाले असते तर हे घडलं नसतं. हे.. तुम्ही मोठया मनाने सांगितलं हे पुरेसं होत. सर्व विसरून नवीन सुरवात करणार होतात. मलाही नाही म्हणणे शक्य नव्हते. तरीही ते सर्व... पास्ट... सारखं अवतीभोवती फिरायचे माझ्या... खूप अस्वस्थ होत असे. ज्या हातांनी तुम्ही घास भरवला, तो आधीच उष्टा झालाय, ज्या कुशीत शिरण्यासाठी मी व्याकुळ होते. त्या कुशीत आधी दुसरी कोणी होती... ज्या बेडवर आपण जवळ आलो. तिथेही... खूप त्रासदायक अनुभव होता तो. मी नाही सहन करू शकत. एवढं जवळ येऊन मी.. दूर नाही जाऊ शकत. तुम्ही मला शाश्वती दिली हे जरी खरे असले तरी... तुमचा भूतकाळ जर समोर आला तर? काय? कुणी तुमच्यावर हक्क दाखवू लागले तर मी काय करू? माझे काय होईल? तुमच्यापासून वेगळे होऊन मी तर जगूच शकणार नाही!


म्हणून तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा. आधीचे आयुष्य निवडले तर त्यात मी नसणार. अन माझ्या सोबत राहायचे असेल तर तुमचा भूतकाळ व त्यातली पात्रे पुसून टाकावी लागतील. मी खूप खूप खूप जास्त प्रेम करते. शब्दात नाही सांगू शकत. मरेपर्यंत असेच प्रेम करील. सांगाल तसे वागेन. जसे ठेवाल तसे राहीन. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला एक संधी द्यायला हवी. स्वतःला बदलण्यासाठी! पण का देऊ मी? माझ्या जागी तुम्ही असता तर दिली असती का मला एक संधी?


कदाचित नाही!


असो. संधी दिली मी पण स्वतःला! पुढील पाच महिने आपण व्यवस्थित राहिलो तरच आपण आयुष्यात एकत्र राहू शकतो...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy