The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Kavi Sagar raje

Others

2.3  

Kavi Sagar raje

Others

एक संसार... नागमोडी वळनावर..

एक संसार... नागमोडी वळनावर..

8 mins
1.0K


भाग 1

   .. 

एक संसार... नागमोडी वळनावर..

सर्व साधारण कुटुंब.. दीड एकर शेती.. सोबतीला काही गुर.. 

महेश... कळायला लागल्या पासून शेतात काम करायच त्यामुळे आता.. पेरणी, कोळपनी, फवारणी, अश्या विविध कामात तरबेझ झाला. बियाणे निवड.. हवामान अंदाज घेऊन.. अचूक होत... बापाला जाऊन दहा ते बरा वर्ष होऊन गेले.. मोठा महेश.. सोबतीला सुरेश काम करू लागला.. तो देखील.. चांगली पीक घेण्याचा प्रयत्न करू लागला.. सर्व व्यवस्थित चाललंय असं वाटतच.. महेश च्या लग्नच बघायला पाहिजे असं आईला वाटू लागलं.. आणि एक दिवस अनेक दिवसात कधी न आलेला मामा अचानक गावी आला. 

संद्याकाळी दोघ भाऊ घरी आले.. मामाच्या आदरतीर्थ.. करण्यात कुठलीही कमी ठेवली नाही.. कोंबडी, दारू.. अस्या प्रकारे सर्व आटोपलं.. मामानं प्रसंग सावधान बघून विषय काढला.. कि महेश च लग्न करून टाक !!!घरात सून येईल तुलाही थोडं आराम मिळेल.. आईला ते सगळं ठीक वाटत होत. त्यामुळे तिनेही होकार देऊन टाकला. 

,, मामा आल्या पासून... घरात ठेवलेली कपाशी.. आणि शेतात असलेला भाजीपाला पाहून भरवला... त्याच्या मनात सुखाचं वार वाहू लागलं... ठर ल्या प्रमाणे.. मुलगी पाहण्यासाठी सर्वजण मालेगाव ला गेले.. मुलगी दिसायला सावली होती.. नाकी डोळे छान असल्यामुळे साडीत खूपच खुलून दिसायला लागली... महेश ला विचारून .. लग्नच पक्क करून टाकलं. मुलीच्या बापाने घर, शेती, बघून आणि मुलगा कष्टाळू आहे हे बघून स्थळ चांगल आहे.. आता लग्न कारायाला काही हरकत नाही.... 

दोघांच्या लग्न झालं... 


ते म्हणतात ना कि काही लोकांना कोणाचं चांगल झालेलं आवडतं नाही. मग काहीतरी कारण शोधून... नवरा बायको मध्ये भांडण लावली जातात... मग सुखी संसारात उतरती कळा सुरु होते... 

महेश च लग्न झालं रात्री नऊ ते दहा वाजता ... घरी आले.. दुसऱ्या दिवशी सत्यनारायण झाला... गल्लीत अनेक बायका नव्या नवरीला बघण्यासाठी येत... आणि तोंड भरून कौतुक देखील करत... काहीं बायका तिचा हेवा करू लागल्या... 

देव दर्शन वगैरे झालं... आणि मग हनिमून चा कार्यक्रम तेवढा बाकी होता. अनेक नवीन जोडपे त्याची आतुरतेने वाट पाहत असतात.. 

काहीं जानकर लोकांच्या मते ती रात्र म्हणजे.. खूप महत्वाची.. त्या रात्री जर तन आणि मन एकत्र येत,, आणि ज्या स्त्री पुरुषच.. एक होईल त्यांचा संसार पूर्णत्व प्राप्त करतो... असं जर नाही झालं तर त्यांचा संसार मोडतो. मग असं काय झालं कि महेशच्या संसारात अचानक ग्रहण लागलं.... झाडाची पा न गळ्.... होते... एक एक पान गळाव.,,, तसें सुखी संसारातले... प्रेमाच्या ओलावा.. असलेले क्षण.. अलगद.. निसटू लागले... खेडेगावात दारू पिन सामान्य आहे.. काही सुखाचं क्षण... दारू पिऊन साजरे होतात... महेश मित्रांसोबत पार्टी ला गेला... होता. इकडे घरात बरीच पै पाहुणे होती.. अगदी प्रसन्न वातावरण.. गोड धोड जेवणाची मेजवानी सुरु होती... दोन खोल्या असलेले घर अगदी तुडुंब भरलं होत..... महेश तसा खूप खुश होता. जेवणाची पंगत संपली आणि काही मंडळी अंगनात तर काही घरात.. सर्वांची व्यवस्थित पणे झोपण्याची सोय केली... 

तर बाजूलाच असलेले एक ओळखीचे घर.. नवीन जोडप्याला... वेगळं दिल होत... मीरा घरात महेश ची वाट पाहत बसली होती.. 

रात्रीचे 11.30 झाले. अंग जड झाल्यागत झालं..शरीर आणि "मन "थकल जमिनीवर अंग टाकावं असं वाटू लागलं पण... आजची रात्र खूप विशेष होती.. तिचा साजन अजूनही आला नव्हता.. त्याच्या आठवणीचा चंद्र चेहऱ्यावर लाजून.. मिलनाची प्रतीक्षा करत.. झुरत होता. हळूहळू रात्र वाढत चालली.. झोपावं कि जगावं काहीच कळत..नव्हत.. घरचा दरवाजा लोटत ती खिडकीकडे वळली... हळूच एक दार उघडल.. तशी थंडगार हवेची झुलूक.. 

येऊन अंगाला.. भिडली तशी ती मोहरली.. बाहेर भयंकर शांतता.. आणि कुत्रे भुंकन्याचा आवाज कानावर येताच तिने खिडकी बंद केली. नवरा आजून कसा येईना चिंते ने व्याकुळ होत ती गादिवर बसली.... 

तेव्हड्यात दार वाजलं... ती जरा सावरून बसली.महेश स्वतःला सावरत आत शिरला..त्याच्या तोंडातुन येणारा दारूचा दर्प तिच्या नाकात शीरताच तोंड साडीच्या पदरान दाबल. महेश कसबसा खाली बसला. मीरा....

  जेवली का तू.....? नवऱ्याच्या तोंडाने आपले नाव ऐकताच अंगावर काटा आला.. अंग शाहरुन रोमांचित झालं.. दारूचा दर्प कधीच आतर झाल्यागत भासला. लगबगीने जेवणाच ताट घेतल तांब्या ग्लास भरून समोर बसली. महेश खूप जास्त दारू प्याला त्याला जेवण करणे शक्य नाही असे दिसताच.. मीरा ला वाटलं आपण भरवाव.. पण हिंमत होत नव्हती.. महेश बोलू लागला.. मीरा मला माफ कर मी आज जास्त प्यायलो.. नव्हतो पिणार पण मित्रांचा आग्रह काय करू.. तीला हायस वाटलं.. महेश लक्ष जेवणार नव्हत. तो मीराच सजलेल रूप पाहून खुश होता... त्याच्या अस्या बघन्यामुळे मीरा.. लाजत अंग चोरून घ्याची. 

अनपेक्षित महेश ने मीराला घास भरवला.. असं एकमेकांना जेवण भरवत.... 

महेश ने मीराला आपल्या प्रियसी विषयी सांगितलं.. दुसऱ्या क्षणी महेश ने भरवलेला घास ... कडवट लागला.. 

प्रत्येक स्त्रीला वाटतं आपल्या नवऱ्याला आपल्या शिवाय कोणावर प्रेम नसावं. त्याच्यावर फक्त आपला हक्क आहे. 

त्याही पेक्षा तो माझा आहे.. हे वाटणं चुकीचं नाही. पण बऱ्याच लोकांची प्रेम प्रकरण असतात. काहींची लग्नच्या आधी तर काहींची लग्न झाल्यावर देखील चालू राहतात. आणि मग परिस्थिती वाद विकोपाला आणते.. संसारात द्वेष निर्माण होतो. 

शेवटी फक्त पच्छाताप... !!!!

इथं मात्र तस मुळीच नव्हत कारण महेश च प्रेम लग्नाच्या आधी होत. आणि आता तो फक्त मीराचा होता. 

मीराने सर्व ऐकून घेतलं... दोघान्ची जेवण संपली होती. मीरा उठली झाडून घेतलं ताट तांब्या ठेवला. आणि अंथरुणात आली. महेश ने शर्ट काढून बाजूला ठेवला होता तो तिने वर अडकवून त्याच्या शेजारी झोपली... सिनेमामध्ये दाखवतात तस काही सजवलं नव्हत घर पण गावाकडं आहे त्या रिवाजाप्रमाणे होत सर्व.. तशी मीराला हात लावायची हिंमत नव्हती त्याच्यात पण दारू पिल्याने हिम्मत केली. आणि तो तर प्रिय मित्रांचा सल्ला होता तो चुकीचा कसा असेल नाही का !!

आज सकाळ पासून तिला सारखी साडी सावरून ठेवावी लागत असल्यामुळे.. जड झाली. होती पण आता ड्रेस मागे पडला रोज साडीचं नेसावि लागणार.. 

अलगद साडी सावरून महेश च्या बाजूला झोपली पाठ महेश कडे होती... दारूचा अंमल चढत होता तसा संयम देखील सुटला. मीराला बाहूपाशात आवळल.. घाई गरबड करून तिचे मुके घेत.. साडी शरीरापासून विलग केली. महेश चा हात तिच्या सर्वांगावर फिरू लागला.. तशी मीरा रोमँटिक होत त्याला प्रतिसाद देऊ लागली.. घरात पूर्ण अंधार होता. त्यामुळे एकमेकांना शरीर दिसू शकत नव्हत. कोणच्याही अंगावर कपडा नव्हता. एकमेकांना प्रेमात झोकून देत होते. मीराच्या शरीराच संपूर्ण ताबा घेतला. थंडीमध्ये ही दोघ घामाने ओलेचिंब झाले .. काहीच वेळाने श्वासाची गती मंद झाली... मीरा महेशच्या सुखात न्हाऊन निघाली.. प्रेमाची तृप्ती सकाळी तिच्या चेहऱ्यावर जाणवत होती. 

खूप खुश होती ती आज दोघ जोडीनं शेतात फिरायला गेली. 

रस्त्यावर जाताना गावात लोक महेशला.. अश्याप्रकारे संसार सुरु झाला. 

आज सकाळी महेश लवकर उठला. कारण आज कपाशी व्यापारीकडे द्यायची होती. भाव तसा कमी मिळाला या वर्षी म्हणून थोडं नर्वस होता तो तरी बरा मिळालाय भाव म्हणून समाधानी देखील होता . मीराने चहा दिला .. चहा घेऊन मीराला मिठी मारली .. मीरा तुला आज नवीन साडी घेऊन येतो येताना.. साडी येणार म्हणून मीरा लाडात येत महेशच्या कुशीत विसावली.. 

काही वेळ मीराच्या ओठांवर टेकवले.. तोच आत सुरेश येतोय चाहूल लागली.. आणि मीराने महेशला दूर लोटले..

काहीच वेळात ट्रक दरात उभी झाली .. घरात माणसं कापशी काढन्यात मग्न होती. मीराला ही वाटल चला आपण काकू च्या घरी जाऊन बसू.. 

काकू बाजरी निवडत होती. काय ग कपाशी काढली वाटत विकायला हो ना.. बरेच दिवस घरात पडून होती. आणि उंदीर, घूस, धूम करायचे.. सात आठ किलो कापशीची सरकी ( कापशीच्या फुलाच आवरन त्यातील बी ) खाऊन गेले ते भाव पण सारखा कमी जास्त होत होता. 5500 मिळाला.. त्यामुळे काकूच तोंड वाकड झाल.. हा बाई तुम्हाला काय कमी.. चांगलय.. सगळं त्यानंतर काकूने मीराचे कान भरले.. मीरा ...त्या दिवसात मनात वेगळं असं काही येऊ लागलं..महेशच ज्या मुलीवर प्रेम होत. ती बऱ्याच वेळा मीराच्या शेतात कामाला येत असे. मग काकूंने सांगितलं त्या प्रमाणे खरच त्यांच्या त काही होत असेल.. कामाच बहाणा करून ते प्रेमाची भूख भागवत असतील आणि महेश च चांगलं आहे कि बाहेर ती आणि घरात मी पण काही झाले तरी त्यांना विचारलं पाहिजे . विचारलं तर ये सावध होतील. नाही.. नाही.. त्यापेक्षा मलाच पळत ठेवली पाहिजे म्हणजे खरं काय ते कळेल ती सटवी कशी नवऱ्याच्या नादाला लागते बघतेच मी ... दिवे लावणीची वेळ झाली.. सर्वत्र अंधार पडू लागला.. कामाला गेलेली माणसे घरी परत होती. मीराला मात्र याच भान राहील नाही.. ती वेगळ्याच विश्वात होती. 

सासू बाहेरून आवाज देत .. मध्ये आली . अग मीरा.. !मीरा.. !. अगदी जवळ येऊन थांबली तरी मीराला भान नव्हतं. मीरा.. तशी पटकन भान आले.. अअअअअ... बोला ना आत्या.. !अग काय विचार करते एवढा घरची आठवण येते का..? अअअअ नाही. 

मीरा विषय बदल करत बोलून गेली.. तुळशी ला दिवा लाव घरात इतका अंधार झाला .. लाईट नाही लावले.. लाईट लावायला प्रयत्न केला. तिला आज बटण देखील सापडत नव्हतं. 

राहूदे तू मीच लावते.. तू चहा ठेव.. 

मीराने चहा करायला घेतला.. हे आजून कसे आले नाहीत बर.. 

तीच मन शंका च्या विलक्षण प्रकरनात अडकल..महेशला यायला खूप उशीर झालं होत.. आणि तो आजही पिऊन आला. मात्र मीरासाठी तो साडी आणायला विसरला नाही. मीराच्या संसाराचा गुंता होण्यास सुरवात झाली ..आणि यापुढे गुंता आणखीच वाढत जाणार होता. मीराची मानसिक स्तिथी ठीक नव्हती त्यामुळे खूप चुका झाल्या. तरी ससूने सांभाळून घेतले. दुपारी मीराच आई सोबत फोनवर बोलणं झालं आणि दुसऱ्या दिवशी आई हजर झाली. 

अचानक आई आल्याने सासूने पाहुणचार केला.. महेशला ही बर वाटलं चला सासू आली मायलेकीची भेट होईल तिला ही करमत नाही. तीच घर सोडून ती या नव्या गावात नव्या घरी.. सवय होईल हळूहळू.. 

रात्री चिकनची भाजी वगैरे चा बेत झाला सर्वजण जेवले माय लेकी गपा मारत होत्या. म्हणून सासूबाई ने भांडी धुतली. अंथरुण टाकली मीराची आई मुरलेली होती. घर काबीज करायचे डावपेच शिकवून टाकले लेकीला. आणि लेकीने पाहिला डाव नवऱ्यावर टाकला. तबेत ठीक नाही, खूप मोठ्या संकटात आहे असेल दाखवलं.. महेश जवळ आला तिला जवळ घेतल तिच्यासाठी आणलेली साडी दिली. तिला आवडत असून भाव जाणवू दिले नाही . महेश जवळ आला कि ती दूर लोटत..अस बरंच वेळ चाललं तो वैतागला. काय झालं तुला आज.. मीरा त्याला प्रतिउत्तर देत.. तुम्हाला त्या शिवाय काही उमजत का?? मला काय हवयं हे विचारलं कधी.. काय गरज नाही का..? 

अंथरुणात आलं कि साडी सोडायची बैलगाडी हाकतो तस.. उरावर यायच काम झालं कि भीतीकडे तोंड करून झोपायचं.. 

महेश थोडं सुन्न झालं ही आज इतकी का चवताल ली काही कळेना त्या वाटलं मीच चुकलो.. म्हूणन त्यानं माफी मागितली पण मीरा काही ऐकेल.. सगळं निष्फळ त्या दिवशी महेश रागाने बाहेर निघून गेला. मंदिरात जाऊन झोपला.. सकाळी लोक जेव्हा विधीमार्ग ला निगत तेव्हा ते म्हणतं रात्री जास्त झाली असेल म्हणून झोपला जाऊदे.. 

पण खरं दुःख काय होत ते महेशला च माहित. 

सकाळी कोणाला कळलं नाही रात्री काय झालं ते बाहेर गेला असेल असं वाटल. 

सकाळी दोघ एक मेकांना बघत ही नव्हते. बोलने बंद झाले. 

आंघोळ उरकली महेश चपला घालून रागा रागात घराबाहेर पडला.. मीरा... बघत होती तीला काल रात्री जे काही झालं त्याबद्दल दुःख वाटलं पण आता काही करू शकली नाही..

दिवसभर महेश जेवला असेल का??.. काय करत असेल असे अनेक प्रश्न तिच्या मनात येऊन गेली. आई आणि सासूबाई ने तीला जेवायाला बोलावल पण ती आली नाही. आतून तुटली होती. घरात एकटीच रडत बसली. नवऱ्याने आनंदाणे साडी आणली.. आपण साधं प्रेमानं बोलायचं न ते सोडून भांडत बसलो. आता दिवसभर उपाशी असेन.. काळजी पोटी तिची भूख उडून गेली. महेश रात्री बऱ्याच उशिरा घरी आलं.. मीरा झोपून गेली होती. तीच धनी आलं तेव्हा चाहूल मात्र लागली .. तो अजूनही रागाने पाहत होता. अन ती झोपेचं नाटक करत किलकिले डोळे करून पाहत होती. 

नेहमी प्रमाणे शर्ट काढून बाजूला ठेवलं.. आणि अंथरुणात तिच्या बाजूला अंग टाकलं.. काय कराव ही का वागते माझ्याशी असं .. तिचे कोणी कान भरले असतील..?? कि आधीच्या प्रियकराची आठवण येत असेल काहीच समजत नव्हतं. त्याला शान्त डोळे मिटून पडला होता तो... अगदी निशब्द.. 

काहीच दिवसात एकमेकांत जीव मिसळून अग्नीच्या साक्षीने सात फेरे घेऊन.. वाचनबद्ध झालेले नवरा बायको आज एकाच अंथरुणात अगदी अनोळखी असल्या सारखे भासत होते. 

काही वेळाने मीराने कुस बदलली महेश मात्र केव्हाच झोपला होता.. काहीही झालं तरी हक्काचा नवरा होता तिचा .. तिच्याही नकळत तिचा हात त्याच्या छाथीशी कवट्ला.. महेश मात्र शांत झोपला होता. ती त्याच्या नकळत केव्हा जवळ आली काहीच कळलं नाही. 

त्याच्या पाठीला डोकं लावून.. रात्रभर अश्रू... वाहत तशीच झोपी गेली. 

सकाळी सकाळी पहाटे कोमबड्याची बांग ऐकून महेशला जाग आली तेव्हा ... त्याची प्राणप्रिया मिठीत होती... डोक्यावरून हात फिरवत जवळ घेतल..तिच्या नकळत त्याला समजलं ती जेवली नाही रात्री.. आपण न बोलता 

झोपी गेलो. खरखर तिच्यावर रागावलो होतो का मी नाही ना मग का..??? केला असलं तूसडेपना... 

त्याची नजर तिच्यावर चेहऱ्यावर खीलली.. किती सुंदर दिसते स ग... मीरा त्याच मन तिच्या सुंदरतेचि ग्वाही देऊन गेलं... रात्री वाहिली गंगा यमुना.. त्याला स्पष्ट दिसली .. चेहरा सुजून लालबुंद झालं आणि डोळे ही सुजले होते.

सकाळी पुन्हा तसेच झाले .. दोघही बोलले नाहीत. 

महेश शेतात निघून गेला .. सुरेश तूर घेऊन मार्केट मध्ये गेला. आई आणि सासूबाई च जेवण झालं.. धुनी, भांडी आवरून मीरा शेतात निघाली. सूर्य डोक्यावर आला होता .. उन्ह ही खूप तापलं.. एक वाजता आजान झाली.. पण नवरा आजून आला नाही. गेल्या दोन दिवस असलेला अबोला तिला स्वस्त बसू देत नव्हता. दोघांना बोलाव वाटत होत. पण सुरुवात कोणीही करेना. शेवटी मीराने धीर एकवट त सासूबाई ला विचारलं .. 

हे आजून जेवाय आले नाहीत..मला वाटतं शेतात जास्त काम असेल .. अन भूख पण लागली असेल त्यांना.. मी शेतावर जाऊ न येते... 

अग येईल तो.. एवढ्या उन्हात तू गेलीस तर लोक म्हणतील नव्या नवरीला उन्हात पाठवली शेतावर.. आता काय कराव मीराला काहीच कळेना.. तिच्या जीवाची तग मग पाहून आईने होकार भरलं.. सासूबाई हो म्हटली... 

आता तिच्या जीवात जीव आला. खूप आधीर झाली मीरा तिच्या साजणाला पाहायला.. 

भरलेला डबा घेऊन ती शेतावर निघाली. गावातील बायका तिच्याकडे पाहून कुजबुज करत होत्या. पण तिच कोणाकडेही लक्ष नव्हतं. 


ही कथा एका शेतकरी मित्राची खरी घटना आहे ...

  त्याच्या संसाराची झालेली विचम्बना.. सुखी संसार उध्वस्त होत गेला.. भरलेलं घर उजाड झालं मुलं अनाथ झाली.. आणि तो व्यसनी.. झाला. समाजाला काहीतरी बोध होईल एखाद्या संसार वाचेल या उद्देश ठेऊन.. मी लिहीत आहे. 


पुढचा भाग लवकरच.. मिळेल पण त्या आधी तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. 


Rate this content
Log in