प्रायव्हसी
प्रायव्हसी


सुधा... ये सुधा..
अचानक आलेल्या आवाजाने सुधा भानावर आली. हातात असलेल्या मोबाईल ला तसेच कॉटवर सोडून दरवाजाच्या दिशेने धावत गेली. अग आवरले का तुझे.. सासूने प्रश्न केला. अअअअ.. नाही आई थोडं थांबा आलेच मी आवरून.. तशी पुनः आत बेडरूम मध्ये गेली. अलोक अजून अंघोळ करत होता. साडी व्यवस्थित केली. कुंकू लावला भांगेमध्ये.. कुंकू लावताना मात्र तिचा हात काहीवेळ स्तिर झाला. कसा ते तिलाही कळलं नाही.. ज्याच्या नावाचं मी कुंकू लावते आहे. त्यालातर माझी किंमत नाही. जे काही झालं ते योग्य नाहीये. आणि मी अलोकला जाब विचारनार...निर्धार करून ती किचनमध्ये हजर झाली. आबा केव्हापासून नास्ता करण्यासाठी थांबले होते. म्हातारपण आणि त्यात आजार डायबेटीस, गुढगे दुःखी, त्यामुळं आबा त्रस्त असायचे डॉ.. सांगितल्या प्रमाणे सकाळी गोळया घेत असे. सुधा फक्त ऐकत होती. सासूच्या बोलण्याकडे तिचे लक्ष नव्हते. कांदापोहे बनून प्लेट रेडी केल्या. सोबत चहा चे कप ट्रे मध्ये ठेऊन ती डायनिंग टेबलच्या दिशेने निघाली.. तर पुन्हा आवाज.. सुधा... अलोक आवाज देत होता. दुर्लक्ष करून ती आबाच्या गोळया काढू लागली.. सुधा जा बाई त्याला काही काम असेल दे ती गोळयाची पाकीट इकडे.. सुधा जाण्यासाठी इच्छा दर्शवत नव्हती. मात्र आई ने सांगितल्या मुळे गेली. बेडरूमच दरवाजा बंद होता. सुधा काही वेळ तिथेच होती. न राहून तिने दरवाजा वाजवला. तसा अलोकने क्षनाचा ही विलंब न करता दरवाजा ओपन करून मागेच लपला. सुधा आत येऊन बघते. तर अलोक दिसला नाही. काही कळण्या अगोदर त्याने सुधाला मिठी मारली. मात्र सुधाचा रागाचा वाढला होता. झटक्यात अलोक ला वीलग करत मिठी सोडवली.
सुधा काय झालय तुला.. आई बाबा ची आठवण येते का?
ओह्ह्ह्ह मन लागत नाहीये ना तुझं.. सगळं नवीन आहे. थोडं वेळ लागेल. चल आपण आज मस्त फिरायला जाऊया ओके लाडूबाई...
अलोक च आवरून झालं होत . मला नास्ता देणार कि नाही तू... अग भूख लागलीय... सुधा तू कांदा पोहे छान बनवते... बर .. तूझ्या हातचे कांदा पोहे खाऊन तृप्त झाल्यासारखं वाटत मला... तुला माहिते.. माझे ऑफिसचे कलीग आपल्या घरी कांदापोहे खाऊन गेलेत ना... तेव्हापासून मला.. सारखे कांदापोहे मागत असतात.... अलोक बोलत होता. आणि सुधा गप्प होती...कांदा पोह्याची प्लेट देत. समोर बसली...
पहिला घास घेताच.. साहेबांची पुन्हा तारीफ सुरु झाली...
ती आज बोलायचं टाळत होती. हा विषय कसा काढावा. हाच विचार चालू होता.
पण आता ऑफिसला जाताना नकॊ उगीच.. भांडण त्यामुळे सोडून दिला..
अलोक ऑफिसला गेल्या नंतर सुधा.. बेडरूम एकटीच बसून विचार करीत होती... जे काही तिने अनुभवलं ते योग्य नव्हत. ठीक आहे तुझे जिवाभावाचे मित्र आहेत. मान्य आहे. पण माझं ही एक वेगळं असं स्थान आहे. तुझ्या आयुष्यात.. बायको बद्दल कोणी असं सांगत का...??? प्रायव्हसी आहे कि नाही. प्रत्येक विचार वेगळे असतात. अलोक ला इतका ही सेन्स असू नये. कि आपण काय बोलतोय.. कोणाविषयी बोलतोय.
i can't bilev अलोक.... !!! तू तूझ्या बायको विषयी असं सांगू शकतो. खरं तर माझा विश्वास बसत नाहीये....
.....सुधाचा फोन वाजत होता. तिचे मात्र लक्ष नव्हते. आता प्रयन्त अलोकचे तीन कॉल येऊन गेले. अलोक ला समजत नव्हते कि कॉल का घेत नाहीये. कदाचित झोपली असावी म्हणून त्याने पुन्हा कॉल केला. आणि सुधा ने कॉल रिसिव्ह केला.
हॅलो... सुधा.
.... ह्म्म्म बोल..
अग किती कॉल केले मी.. झोपली होतीस का..?
हो.. काम आवरून बसले.. डोळा लागला.
ओके... असुदे.
काय चालाय मॅडम.. तबियत ठीक आहे ना तुझी.. हो.. ओके बाय.. फोन कट झालं
पण.. सुधा ची मात्र बोलण्याची इच्छा नव्हती...
सर्वाना जेवण वाढून.. सुधा बेडरूम मध्ये आली. अलोक मात्र आता अस्वस्थ होता. सुधा नीट बोलत नाही. खूप विचलित झाल्यासारखी भासते. काय झाले असेल.
...अरे अलोक सुधा जेवली नाही. तबियत बरी नाही का..? बघ विचारून.. नसेल तर हॉस्पिटल मध्ये जाऊन या. काळजी घेत जा रे... विचारपूस करावी. बायकोला चांगल वाटत नवऱ्याने काळजी घेतली कि. साधं विचारलं तरी अर्ध दुःख पळून जात... आपल्या माणसाने कौतुक करावं, डोक्यावरून हात फिरवायला कि सगळं काही मिळवल्याची अनुभूती होते. हे संसारात खूप महत्वाचे असते. अलोक ला आई ने सांगितलं ते पटलं होत.
अलोक जेवण आटपून बेडरुमच्या दिशेने गेला. सुधा एका कुशीवर झोपली होती...
हळूच जाऊन आधी सुधाच्या डोक्यावर हात फिरवत.. सुधा काय ग जेवली नाहीस....,, तू बर वाटत नाहीये का..? काय झालं सांग तरी.. तुझ असं शांत राहणं नाही ग आवडत मला. आई बाबा ची आठवण येते का..? असेल तर जाऊन ये.
सुधा मात्र गप्प होती....
अलोक ने आग्रह केल्यावर तिने ठरवलं कि या विषयावर आता बोलायचं जे होईल ते होईल... आता परिणाम काही असो.
ओके अलोक मी बोलते पण आधी सांग तुझी ऐकून घ्यायची तयारी आहे का..?
हो मग का नाही.. पण तू असं का विचारते..?
कारण विषय खूप गम्भीर आहे. आणि ऐकून घेण्यासाठी सहनशक्ती असायला हवी ना. !"
अलोक थोडं.. बेचैन झाला.. सुधा त्याच्या चेहऱ्यावर उमटनारे भाव बघत होती. त्याला असं कोड्यात पडलेल पाहून तिला अंतरीक समाधान लाभल खरं.. असंही वाटून गेलं कि.. आपली बायको नक्कीच तिच्या बॉयफ्रेंड विषयी बोलणार आहे.हे मात्र त्याला ऋचण्यासारखं नव्हत.
जे ही असेल.. त्याची ऐकन्याची महत्वकांशा वाढली होती.
.....
अलोक मी तुला आवडते का रे...?
अलोक हसत.. अग हा काय प्रश्न झाला का तू आवडते म्हणून तर लग्न केलं ना मी.. शिवाय खूप प्रेम करतो ग मी तुझ्यावर...
किती... नाही सांगू शकत मी... पण खूप जास्त प्रेम आहे.
ओके.
मग बायकोला ला असं लोकांसमोर उघड करायला काहीच कस नाही वाटलं तुला..???
लोक..?
घरात चार माणसं तर आहोत आपण.. अन हो... मी जेव्हा मूडमध्ये असतो. तेव्हा.. तर दोघेच असतो बेडरुम मध्ये.
मग असं का?? वाटते तुला.
अलोक मी घराविषयी बोलत नाहीये """!
मग कश्या विषयी बोलते.. मला कळतं नाहीये सुधा.. तुला काय सांगायचं आहे ते.. मोकळ बोल म्हणजे मला कळेल.
अच्छा..
म्हणजे तुला काहीच कळलं नाही तर... ठीक आहे सांगते.
तुझा मोबाईल दे..
तसा अलोक पेच मध्ये अडकला.
सुधाने... मोबाईल ओपन करून व्हाट्सअप ग्रुपवर झालेले सर्व चाट दाखवले.. वाचून दाखव अलोक काय लिहलं आहेस तू
.........
तस अलोक ला घाम फुटला.. बापरे काय झालं मला वाटलं नव्हतं असं काही होईल...???
अलोक शांत होता.. काहीच बोलू शकला नाही तो.
जड जातंय ना वाचून दाखवयला..मी सांगते... ऐकणार...?
.....तुझे ते नालायक मित्र.. लग्नाला आले तेव्हा वहिनी वाहिनी करत मीरवत होते..
अन आता....शी... किळस येते मला त्याची... अन सर्वात जास्त.. तुझी... अलोक
काय गरज होती. तुला सांग...? मी तुझी बायको आहे !!वेश्या नाहीये मी.
आणि तू...
माझ्या ब्रा ची साईज, कलर, पॅंटी, चा कलर साईज
....एव्हडंच नाही तर किती कट काढले एका रतरीमध्ये.. सीलप्याक होते किती त्रास झालं... मी किती सेक्सी आहे... हे देखील सांगितलं... आणि तूझ्या मित्रांना तू एखाद्या भाजीची रेसिपी सांगतोय असं समजून आंनद घेतलास.
...
.....
हनिमून हा काही चर्चेचा विषय असतो का???
एका मुलीला मनामध्ये किती भीती असते.. माहित आहे तुला... नाही तुला कसे माहित असणार.. त्रास, यातना होतात... पण आपल्या भावी नवऱ्याला आपल सर्वस्व देते.. विश्वास ठेऊन..
आणि त्यात तुमचा पुरषोत्तम इगो... स्त्री म्हणजे भोगन्याचे साधन नाही...
कधी कळणार तुम्हाला...
मला ही विचारलं माझ्या मैत्रीनींनि... पण मी नाही सांगितलं असं काहीच...
मी सांगायला हवं का..??
तू रन आउट झालास.. कि मी.. चर्मसुखापर्यंत पोहचण्या आधी गळालास..
काय सांगू... तू सांग...
हनिमून च्या रात्री.. पासून मला कितीतरी मेसेज आले... सुधा कसे झाले हनिमून... खूप खेचल त्यांनी. पण मला माहिते..हा विषय असा चारचौघात घ्यायचा नसतो...
हा आयुष्यात येणारा एकमेव असं आनंद आहे... तो जपून ठेवायचा... आयुष्यभर..
सुधा बोलत होती...
अलोक ऐकत होता... त्याला काहीच कळतं नव्हतं काय करावं.
आणि त्याने न राहून
सुधाचे पाय धरले... सुधा माफ कर मला.. मी असं नाही वागणार... परत..
अलोक कितीतरी वेळ सुधाच्या पायावर अश्रू वाहत होता....
.....
कथा कशी वाटली नक्की कळावा.
टीप... आपण विज्ञानयुगात वावरत असल्यामुळे.. काही गोष्टीचे भान ठेवायला हवे.. आपल्या कुठल्याही पर्सनल गोष्टी अपरिचीत व्यक्ती सोबत शेअर करू नये. ज्यामुळे त्याचा भविष्यात आपल्याला त्रास होईल...
खास करून व्हाट्सअप, आणि फेसबुक मेसेंजर.. आणि इतर ठिकाणी.