Shraddha Vaze

Inspirational

2  

Shraddha Vaze

Inspirational

सीख...

सीख...

3 mins
9.4K


सीख....

"बैठीये मॅडम...बारीश में बाहर खडी मत रहो....जल्दी में करता हूं"....तोंडातल्या पानाची किंवा तंबाखूची पिचकारी माझ्यासमोर तरी न टाकता, तोंडातच गिळून, गर्द झालेले दात दाखवत तो मला म्हणाला.... दुकानातलं जरासं बरं स्टूल पुसून त्यानं मला बसायला दिलं आणि माझ्या दुचाकीच्या टायर चं पंक्चर काढायला घेतलं....मी बसले...कष्टानं हात काळे झालेला, मळकट कपडे घातलेला, गळ्यात गडद हिरवा मफलर गुंडाळलेला आणि कुठलंच वळण नसलेली डोक्यावरची जुल्फ उडवत बोलणारा समोर एक वल्लीच उभा होता.....पण त्याचं मन किती स्वच्छ होतं हे त्याच्या बडबडीतून कळत होतं....."बारीश के टाइम पे पंक्चर हुआ गाडी तो लेडीझ को तो बहोत तकलीफ होती हैं, मालूम हैं हमें, फाष्ट करता हूं मॅडम"....असं म्हणत त्यानं पटापट टायर काढायला घेतला...इतक्यात त्याचा पोऱ्या चाय घेऊन आला...."मॅडम को भी चाय दे बेटा"..."नहीं थँक यु"..."ले लो मॅडम, बारीश हैं"....मग हलकं स्माईल करत त्या बेटयानं आणलेली चाय मी 'घेतली'...त्यानं टायर पाण्याच्या टब मध्ये टाकला....पंक्चर मधून बुडबुडे बाहेर येत होते...

इतक्यात बाजूची शाळा सुटली...दोन-तीन मुलं धावत शेजारच्या जनरल स्टोअर मध्ये आली....एकानं दुकानवाल्याला विचारलं "अंकल ये कितने का?".."चालीस रुपया".."चालीस रुपया?"..."ए ××× हमें नही खिलाया अभी तक इतना महेंगा चॉकलेट और देख आज लडकीयोंको खिला रहा हैं"...दुसरा तिसऱ्याला म्हणाला..."ए मैं नही ले रहा वो वाला....×× की औकात हैं क्या इतना महेंगा चॉकेलेट खाने की, फेकता हूं मैं उनकी मूह पर ये पाच रुपये वाला चॉकलेट"....मागून तीन-चार मुलींचा घोळका येत होता...पहिला त्यांच्या कडे जात म्हणाला "हे घ्या आणि फुटा, फुकट खायला लाज वाटत नाही ना?"..."ए फुकटा होगा तेरा ××, माझ्या नाही तर तुझ्या ××× नाव आलं होतं पेपरात, पैसे खाल्ले म्हणून...आणि फुकट्या कोणाला म्हणतोस बे ×××, बेट कोणी लावली होती? तू का मी? मग तू हरलास तर द्यायलाच हवं चॉकलेट तू आम्हाला"....त्यातली एक त्याच्याच टोनिंग मध्ये म्हणाली...त्यावर बाकीच्या तिघी खिदळल्या.....त्यानं अजून दोन, चार शिव्या घालत त्यांना चॉकलेट दिलं...मग त्या मुलींनी पण त्या मुलांना तेवढ्याच शिव्या देत ते घेतलं..."बाय द वे आज का एक्साम कैसा रहा?"...तिनं त्याला विचारलं..."ए अभी फुटो ना....माहितीये मोठी ×××, आम्हाला झिरो मिळणार आहे..काही प्रॉब्लेम आहे का तुम्हा पोरींना"....."थँक्स फॉर चॉकलेट, बेट लावण्यापेक्षा ××× जरा अभ्यास करा"....असं म्हणत त्या वळल्या मग ही मुलं इकडून म्हणाली...." ××× घरीच जा आणि बुक्स फाडा घरी जाऊन".....

आजूबाजूचे दुकानदार, काही पालक किंवा माझ्यासारखे त्रयस्थ भोवती आहेत याची तमा न बाळगता ती मुलं-मुली एकमेकांशी हिडीस-फिडीस करत बोलत होती, तरीही एकमेकांकडे बघून निर्लज्जपणे हसत होती, खिदळत होती आणि जरावेळानं निघूनही गेली....ती मुलं सेकंडरी ची, आठवी-नववीची होती म्हणजे अवघ्या तेरा-चौदा वर्षांची असावीत....

त्यांची मिश्र शिवराळ भाषा, हालचाली, बिनधास्तपणा टिपताना मी अवाक झाले होते...माझ्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव एव्हाना त्या गॅरेजवाल्या फंटरनं टिपले होते....ते पाहून तो अत्यंत निर्विकारपणे म्हणाला..."रोज का हैं ये नजारा मॅडम...माँ-बाप इनको पढने के लिये भेजते है और ये देखो क्या सिखते हैं...इनसे तो हम अच्छे हैं मॅडम...अपनी माँ पढी-लिखी नहीं थी... और हम भी नही...लेकिन माँ ने इस दुनिया की खुली स्कूल में पढने की जो सीख दी ना उसका तो जवाब ही नहीं...इसी स्कूल में तमीज और इज्जत सें बात करना भी सिखें हम....हा इस धंदे मे गाली आती हैं मूह में लेकिन कस्टमर के सामने नही और लेडीज लोगोंके सामने तो कभी भी नही आती गाली मूह में"....खरंच होतं की ते...."ये लो मॅडम आपकी गाडी तैय्यार हैं... अभी प्रॉब्लेम नही आयेंगी....लेकिन अपने तेडेमेडे रास्तों की वजसें कुछ प्रॉब्लेम आ गयी तो अपने इस छोटेसे गॅरेज में ही लेके आना मॅडम..."...काहीच न बोलता नुसतं मानेनंच हो म्हणत पैसे देऊन मी उठले...त्या टीनेजर्सची भाषा, वागणं-बोलणं मला निःशब्द करून गेलं होतं..काहीतरी आठवलं म्हणून मी त्याच बाजूच्या जनरल स्टोअर मध्ये गेले....मेरी माँ ने मुझे बचपन में ही दी सीख मुझे याद आयी थी.... मी दुकानातून जिवतीचा कागद विकत घेतला...श्रावण सुरू होणार होता ना....


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational