Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Priya Satpute

Tragedy


3  

Priya Satpute

Tragedy


"सेकण्ड इंनिंग" भाग-१

"सेकण्ड इंनिंग" भाग-१

2 mins 1.0K 2 mins 1.0K

सकाळपासून सिगरेटच्या धुराने पूर्ण घर भरून गेल होत, तरीपण विक्रमला शुद्ध नव्हती, एका पाठोपाठ एक सिगरेटस...आणि साथ द्यायला बियरचे कॅन दिसतच होते...

मधेच तो शिव्या देत होता, मधेच रडत होता....संध्याकाळ होऊन काळोख पडला तरीपण त्याला शुद्ध नव्हती...दरवाज्यावर कोणीतरी ठोकत होत...पण तो काही उठून दरवाजा उघडण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हता...हळूहळू दारावरचे ठोके जोरात वाजू लागले, अस वाटत होत कि दरवाजा तोडला जात आहे,...जोरात आवाज झाला धाड.....चार-पाच लोक लगबगीने आत आले...एक २८ वर्षाचा तरुण पुढे येऊन विक्रमवर ओरडू लागला,"साल्या तुला काय कळत कि नाही...काय आहे हे"...

बाकीचे दोघे खिडक्या उघडतात, पंखा सुरु करतात, दिवे लावतात,...दोन मुली तशाच मगासपासून दारात उभ्या होत्या, तशी त्यातली एक पुढे येऊन विक्रम जवळ जाऊ लागली..."मुग्धा थांब नकोस त्याच्या जवळ, it's not safe to talk to him now"....

पण मुग्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती, ती विक्रमकडे जाऊ लागली...तसा विक्रम चेताळला,"जवळ येऊ नकोस तू, चालती हो, मला कोणाशीच काहीच बोलायचं नाही, निघा इथून.. मुग्धा त्याच्या समोर जाऊन बसली, तसा तो तोंड फिरवू लागला, उठण्याचा प्रयत्न करणार तोच...मुग्धाने त्याला मिठीत घेतलं...त्याच्या अंगाला दारू, सिगरेटचा वास येत आहे याची परवा न करता...विक्रम तिच्यावर ओरडू लागला..आणि क्षणात तो मुग्धाच्या मिठीत रडू लागला...छोटं मुल जसं आईच्या मिठीत जाऊन लपत आणि स्वतःला सुरक्षित करत अगदी तसच तो करू पाहत होता...मुग्धा त्याला समजावत होती...तसा त्याचा बांध  पूर्णपणे सुटला होता..तो ओक्साबोक्शी रडत होता...


खोलीत अजूनही सिगरेटचा वास येत होता...पण त्यात आता भर पडली होती ती विक्रमच्या अश्रूंची...पर्वतासारखा खंबीर, मनकवडा, प्रेमळ, शांत, तडफदार...अशा शब्दात त्याचे मित्र, मैत्रिणी त्याला ओळखायचे...आणि आज तोच पर्वत ढासळून गेला होता...स्मिता उर्फ त्याच आयुष्य..त्याची प्रिय बायको त्याला कायमची सोडून निघून गेली होती...स्मिताला जाऊन दोन आठवडे झाले होते, पण विक्रम टस कि मस झाला नव्हता, तो शांतपणे ऑफिसला जात होता, येत होता, कोणाशीच बोलत नव्हता, पण गेले दहा दिवस तो कुठेच फिरकला नाही, सगळे त्याला फोन करायचे तरी तो उचलत नव्हता, स्मिता गेल्याच दुख त्याने दाबून टाकण्याकरता सिगारेट आणि दारू पत्करली होती हे साफ दिसत होत, गेले दोन दिवस तो घराबाहेर आलाच नाही, फक्त धूर आणि एकांत यातच तो आयुष्य संपवायला निघाला होता.


रमेशने मुग्धाला घडलेला सारा प्रकार फोनवरून कळवला होता, मुग्धा आणि विक्रम जिवलग मित्र...स्मिता गेल्यावर ती येऊन गेली होती..पण विक्रम असा तुटेल असं तिला स्वप्नात पण वाटलं नव्हत....दिल्लीहून ती पुण्याला जशी पोहचली ते विक्रमच घर तिला आणखीच दूर वाटू लागल होत....तिच्या पोटात भीतीने गोळा आला होता..डोळे पाणावले होते...घराच दार तोडताना ती डोळे मिटून उभी होती...रमेश जाऊन जसा विक्रमवर ओरडला तसा तिच्यात धीर आला आणि तिने डोळे उघडले...समोर पडला होता तिचा मित्र कि प्रेत...त्याच ते रूप पाहून ती सुन्न झाली होती..हळू हळू पुढे जात ती त्याच्या समोर बसली ते एक आई म्हणून,...


Rate this content
Log in

More marathi story from Priya Satpute

Similar marathi story from Tragedy