Vilas Yadavrao kaklij

Tragedy Thriller

4.0  

Vilas Yadavrao kaklij

Tragedy Thriller

"सेकंड इनिगं" कथा 30

"सेकंड इनिगं" कथा 30

9 mins
449


कथा.क्र.30 


नेहमीप्रमाणे आज संजीव ड्यूटीवरुन घरी आला होता. मात्र येताना तासाभराने उशीर झाल्यामुळे संगीता त्याच्याकडे रागाने बघत होती. त्याने चहा मागितला चहा दिला . कारण विचारले नेहमीप्रमाणेच दोघांच्या वादंगाला ; भांडणाला सुरुवात झाली. तुम्ही येताना प्राथमिकशाळे कडे का जातात .व तेथे असलेल्या शिक्षिकेंशी का ? बोलत असता . गप्पा मारतात. यावरून संगीताला ज्वेलशी निर्माण होत . कारण कोणत्या ना कोणत्या कारणाने संजय शाळा सुटल्यानंतर प्राथमिक शाळेत असणाऱ्या शिक्षकांकडे गप्पा मारण्यासाठी जात असे. आणि या गप्पा इतक्या रंगत कि घरी जाण्यासाठी तासभर तरी उशीर होत असे. संगीताने प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले मुळे ती संशय घेऊ लागली. घेऊ लागली कारण ?यांच्या शाळे शेजारी प्राथमिक शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये नुकत्याच नवीन लागलेल्या शिक्षिका होत्या ! व त्यांचे लग्न झालेले नव्हते. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी जेव्हा संजीव थांबत असे . तेव्हा संजीवला आनंद मिळत होता . मात्र घरी गेल्यानंतर यामुळे आनंदावर विरजण पडत असे . आणि रोजच्या रोज असे घडत असल्यामुळे आनंदावर काहुर माजवले जात होते. संजूला दोन मुली आणि एक मुलगा . ' संसार मस्तपैकी चालत होता. संगीता ही संजू च्या मामाची मुलगी असल्यामुळे व एकाच गावांमध्ये दोघ बालपणापासून मोठी झाली .नं तर त्यांची लग्न झाली होती. त्यामुळे संगीताला संजीव विषयी असणारे खोडकर पणा वाह्यातपणा दुसऱ्यांविषयी असणारी विशेषतः स्त्रियांविषयी असणारी जवळीक व नवनवीन मुलींची ओळख करून त्यांच्याबरोबर फिरणे हा त्याचा कॉलेज जीवनापासून असणारा छंद तीला माहिती होता. त्यामुळे तिचा लग्नाला विरोध होता. मात्र आई वडिलांनी सांगितले होते की कॉलेज जीवनामध्ये तरुण मुले मुली त्यामध्ये थोडा फार आकर्षण असतं . गप्पा गोष्टी करतात . याचा अर्थ ते वाईट वागतात असा होत नाही . लग्न झाल्यानंतर आपोआप सुधारणा होईल .संगीता लग्नाला तयार झाली .आता जवळजवळ बारा वर्षे लग्नाला पूर्ण झाली होती. दोन मुली आणि एक मुलगा पैकी दोन्ही मुले शेजारच्या प्राथमिक शाळेमध्ये शिकत होत्या . त्यांना घेण्यासाठी सोडण्यासाठी या शाळेत जात असे मोकळेपणाने गप्पा मारणे याचा हातखंडा असल्यामुळे !तेथील असणाऱ्या सर्व शिक्षिकेंना मुली त्यांना 'बाई ' म्हणतात अर्थात सर्व 'बाई ' यांच्या ओळखीच्या झाल्या होत्या. असाच एक दिवस भांडण विकोपाला गेले. संजीव ने संगीतावर हात उचलला . भांडणं झाली . रागाने मुलींना घेऊन संगीता माहेरी निघून गेली . आज दोन महिने झाले तरी ते येण्याचं नाव घेत नव्हती .संजू ला मात्र तिच्या गर्विष्ठपणा मुळे तिला घेण्यास जायचे नाही असे ठरवले होते .आई वडील गरीब असल्यामुळे त्यांना परिस्थितीची जाणीव होती . संजयचे वडील दुसऱ्यांच्या शेतावर कामाला जात व गुजराण करत होते . आई धुणीभांडी करून संजूचे शिक्षण केले होते .आज संजीव चांगल्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लागला होता . चांगल्यापैकी पगार होता . भांडल्यामुळे संगीता माहेरी आली .

संगीताच्या आई-वडिलांना संगीता घरी आल्याचे वाईट वाटले .व त्यांनी अनेक प्रकारे समजवण्याचा प्रयत्न करून तिला परत जाण्याचा सल्ला देत होते. व परत समजून सांगितले कि तू इकडे आल्यामुळे त्यांना मोकळेपणा जास्त वाढेल व त्यांत अजून जवळीक निर्माण होईल . व तुमच्या दुरावा वाढत जाईल ! त्यामुळे दोन अडीच महिन्यांनी संगीताच्या वडिलांनी परत संगीताला आणून घातले तेव्हा मात्र संजूने त्यांच्याकडून कबुल करुन घेतले . की स्वतःच्या पायाने आली मी बोलवले नाही .आणि परत माझ्यावर संशय घ्यायचा असेल तर कृपया आत्ताच निघून जावे. किंवा मी आहे तसाच वागेन, तसाच राहील I प्रथम सासरेबुवा समोर स्पष्ट खुलासा केला. शेवटी मुलीचा संसार सुखाने व्हावा सर्वांनी परत समजूत घालून निघून गेले .वर्ष सहा महिन्यांमध्ये अचानक संगीताला त्रास होऊ लागला . दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले कि आतड्याचा कॅन्सर झाला आहे . संगीताला याची कल्पना न देता संजूला समजून सांगितले कि आजाराची दुसरी स्टेप असल्यामुळे आजार कव्हर होणे शक्य नाही . त्यामुळे सदर व्यक्ती काही दिवसांचीच सोबती आहे .त्रास होऊ नये म्हणून आपण फक्त गोळ्या औषधांवर काही दिवस जगवू शकतो . मात्र कोणता दिवस शेवटचा असेल हे त्यांचे नशीब ! म्हणून आपण योग्य पद्धतीने त्यांच्या आनंदात दिवस घालवावेत असा सल्ला दिला . वडिलांना मात्र अतिशय धक्का बसला . कारण एकुलत्या एक मुलाचा संसार अर्ध्यावर सोडून मुलांचा सांभाळ किंवा संगोपन कोण करेल ? याची चिंता लागून राहिली . आणि शेवटी नशिबाने दोन , तीन महिन्यानंतर ! पंधरा दिवस भरपूर प्रयत्न केला . घरामध्ये असले नसले सर्व प्रकारचे पैसे , दागिने , खर्च झाले . पण उपयोग झाला नाही . एक दिवस संगीता सोडून गेली. संजयच्या आईने मात्र त्या लहान मुलांचा अतिशय प्रेमाने सांभाळ केला . संजय चे वय मात्र तीस वर्षे असेल !आयुष्य काढायचे कसे ? आयुष्यबाकी असल्यामुळे व या मुलांचा सांभाळ करण्यासाठी एक वर्षानंतर दुसरे लग्न करण्यास सांगू लागले. संजू ला मात्र द्विधा मनस्थिती निर्माण झाली .कारण दोन्ही मुली आणि मुलगा संजूला अतिशय प्रिय होता. आणि बायको काय असते . भांडण काय असते . घरामध्ये वातावरण कशा पद्धतीने होऊ शकते. याची कल्पना व अनुभव असल्यामुळे दुसरे लग्न करण्यासाठी तो धजावत नव्हता. कारण दुसरी पत्नी केल्यानंतर ती या मुलांचे प्रेमाने संगोपन करेलच याची शक्यता नसेल . खात्री कोणीही देऊ शकणार नाही. आणि दुसरी स्त्री जी माझेशी लग्न करेल तिचे स्वतःच्या संसाराची काही स्वप्न तिने रंगवलेली असतील . व ती स्वतःची स्वप्न पूर्ण न झाल्यास काय करू शकते .याची कल्पना संजू ला येत होती. मात्र परिस्थिती व स्वतःच्या वयाचा विचार ,सतत डोळ्यासमोर फिरत होता. आई-वडिलांचे वय झालेले होते . त्यांची साथ व त्यानंतर आपल्याकडून मुलांचे संगोपन होईल का ? मुलींना आईचे ,वडिलांचे प्रेम मिळेल का ? मुलाचे खऱ्या पद्धतीने संगोपन करू शकू का याची शंका म्हणून मन खात होत . या मुळे शेवटी संजूने निर्णय घेतला. वर दुसरी एक मुलगी तयार झाली . संजीव , संगीता हे एका आदिवासी समाजातील व एका तालुक्यात डोंगराळ भागांमध्ये एका वस्थीवर असणारे आदिवासी कुटुंबातील .त्यामुळे तेथे शिक्षणाचा प्रसार या नव्हता त्यामुळे त्यांच्या समाजामध्ये रीती-रिवाज व परंपरागत आलेले संस्कार टिकविणे . व परंपरांचे पालन करणे .हा समाजाचा पगडा असल्यामुळे त्यांना लग्न करावे लागले . तो पर्यंत दोन्ही मुलींचे प्राथमिक शिक्षण संपले होते .

माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना संगीताच्या भावाकडे शिक्षणासाठी शहरांमध्ये पाठवले व मुलगा स्वतःजवळ ठेवला . कारण त्याचे वय लहान असल्यामुळे आजी शिवाय व वडिलांचे विना राहू शकत नव्हता. शेवटी नवीन लग्न करण्याचे ठरविल्यानंतर रिवाजाप्रमाणे आदिवासी समाज यानुसार गावाकडे लग्न पार पडले . तोपर्यंत संजीव ची बदली दुसऱ्या गावी झाली . तेथे भाड्याचे घर घेतले . लग्न करताना दुसरी पत्नी" रंजना" तिला सारी कल्पना दिली . तिच्याकडून व तिच्या आई-वडिलांकडून सारे अटी मान्य करून घेतल्या . की माझ्या पूर्वीच्या दोन मुली व मुलगा यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता सावत्रपणाची सावली सुद्धा त्यांच्यवर पडू नये अशा पद्धतीने वागण्याच्या अटीवर तिच्याशी लग्न केले. रंजना हीसुद्धा बारावीनंतर डि .एङ. पदवी मिळाली होती . व तिला ही शिक्षिकेची नोकरी करण्याचे स्वप्न बाळगून तिने पदवी मिळवली होती .आपण शिक्षक व्हावं आणि सुंदर संसाराची स्वप्न इतर मुलींप्रमाणे तिने बघितली होती. मात्र घरच्यांच्या आग्रहाखातर व नात्यातल्या संबंधामुळे तिने या लग्नाला परवानगी दिली होती .दोघांचा संसार आनंदात सुरू झाला .सध्या फक्त मुलगा आणि आई-वडील असल्यामुळे व नवीन गाव असल्यामुळे समाजामध्ये इतरांना पूर्व इतिहास ,वा पूर्वी घडलेल्या घटना ही संजूलाम नविन नव्हत . पूर्वीचे दिवस आठवले . पहिली पत्नी घेऊन घरात प्रवेश केला . त्याच दिवसाची आठवण .नवीन गावांमध्ये नवीन वसाहतीत एका भाड्याच्या घरामध्ये रंजनाला घेऊन गृह प्रवेश केला .माझे आई-वडील आणि त्याचा लहान मुलगा ! काही दिवसात हळूहळू सर्वानां जुळवून घेऊ लागल . घरात दुसरं कोणी नसल्यामुळे मोंटू चे आणि आई-वडिलांचे अतिशय प्रेमळ नाते जुळून आले. वाटले घडलेला भुतकाळ विसरुन नवीन संसाराला सुरुवात झाली होती .कारण संजीवचे दोन मित्र मित्रांची लग्न अजूनही झालेली नव्हती .व दुसऱ्या एका मित्राचे लग्न आणि संजीव चे दुसरे लग्न एकाच एकाच आठवड्यात पार पडले . तेव्हा ते मित्र त्याला म्हणाले किती संजू तू एक अनुभवि संसाराचे स्वप्न , उपभोगून परत भावी स्वप्न ! आमच्या बरोबर उपभोगत आहे . त्यामुळे मागचा भूतकाळ विसरून जा आणि "सेकंड इनिंग" ला सुरुवात कर . पूर्वी भूतकाळाचे कोणतेही पडसाद उमटू देऊ नकोस . असा त्यांनी सल्ला दिला. हळूहळू वर्ष सहा महिने गेल्यानंतर फिरायला जाणे . नवीन नवदांपत्य प्रमाणे नवीन जोडी ! सर्व आनंद उपभोगत होती . विविध क्षेत्रांना भेटी देणे. जीवनातील सर्व प्रकारचा आनंद जणू आपण दुसऱ्यांदा घेत आहे . असा संजूला नेहमी भास होत होता. संजू हा एका अनुभवी खेळाडू अनुभवी व्यक्ती होता . नवीन होणारी मुलगी आणि पूर्वी कोणत्याही प्रकारे संसारिक अनुभव नसणारी केवळ स्वप्न पाहणारी " रंजना" व्यक्ती होती . त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडे वैचारिकता निर्माण होत होती . हळूहळू निसर्ग निममाणे रंजना ला ही "दिवस" गेले. तेव्हा रंजनाचे घरची मंडळी नातेवाईक व रंजना या सगळ्यांना खूप आनंद झाला . तीचा डोहाळे चा कार्यक्रम हा मोठा करावा रंजनाचा आग्रह होता. मात्र संजूला काही वाटत नव्हते. व आपण सरकारी कर्मचारी असल्याने तीन अपत्य नको ! असल्यास कोणत्या प्रकारच्या सुविधा , सवलती , घेता येत नाही .आपण शासकीय नियमाच्या विरुद्ध वागत आहोत . असा ज्युनगंड निर्माण होतो . समाजाच्या व नियमाच्या विरुद्ध वाटत होते .मात्र पुढ पहिले संसारातील पहिले अपत्य ! रंजना चा पहिली असल्याने त्यांना होणारा आनंद .संजूला होणारा आनंद . दोघांमध्ये अतिशय तफावत दिसून येत होती .हळूहळू रंजना ला मुलगा झाला व संजूला दुसरा मुलगा त्याचे नाव ठेवले गजेंद्र. आता मात्र तीच प्रेम तिच्या बाळाच्या प्रती असणारी ममता , मोटुं ला मिळणारे प्रेम त्यामध्ये आंतर वाढू लागले .बाळाला सांभाळण्यासाठी मोंटूला थांबावे लागत होते .बाळाला काही दुखापत झाल्यास हि च रांजना मोंटू वर खूप रागवत . तेव्हा मात्र संजूला सावत्र पणाचा जागर सुरू झाला असे वाटू लागले . व त्यांना पूर्वीच्या भांडणाचे . संगीता ची आठवण होत . वर्षाच्या कालावधीनंतर घरामध्ये नवीन संसारामध्ये तशाच प्रकारचे मतभेद सुरू झाले . मात्र संगीता आहे ऐकूण घेणारी .ती मात्र नाही . न ऐकूण घेणा२ी ' .भारी व छोट्या गोष्टीचा बाऊ करून हा तिचा नेहमीचाच उपक्रम होऊन बसला . लहान गोष्टी झाली की अंगणामध्ये , चाळीमध्ये , वसाहतीमध्ये , वर्षभरात नवरा कशा पद्धतीने त्रास देतो त्या गोष्टीचा बाहू करून प्रपोगंडा करणे . हा तिचा हातचा मळ होता . आणि हे नेहमीच ओरडू लागले . परिसरातील सर्व लोक समजू लागले होते लागले. आणि तुझ्या मुळेच कदाचित पहिली पत्नी गेली असेल ! असा आरोप या वक्तव्यामुळे होवू लागले तीच्या वतीने तसा एक प्रकारचा प्रचार केल्यामुळे संजीव वेगळ्या प्रकारचे आरोप होऊ लागले . सर्व नातेवाईक मंडळींमध्ये मित्रमंडळी मध्ये संजयची बदनामी करण्याचा प्रयत्न रंजना करू लागली. आणि प्रत्येक वेळी सर्व नातेवाईकांना बदनामी करणे. कारण तिलाही हे लग्न मान्य नव्हते . मात्र तिने आई वडिलांचा मान राखून लग्न केले होते .डीएड ला असताना तिच्या मनामधला राजकुमार त्याच गावांमध्ये संजू च्या शाळेमध्ये आलेला होता . याची कल्पना संजूला नव्हती . मात्र यांच्या मध्ये असणारे प्रेम उफाळून आले व त्या चाळीमध्ये रंजना च्या पहिल्या प्रेमाच्या लीला घडू लागल्या . रंजनाचा मनातील प्रियकर ! त्याचे नाव होते . नरेंद्र '  त्याचे लग्न अजुन झालेले नव्हते .त्याचा रंजना वर डोळा होता . तारुण्य व मनातील राजकुमार तिचे नरेंद्र दडलेले प्रेम , त्यात जणू काही संजयची लग्न केल्यामुळे संजयचा अडथळा निर्माण झाला होता .आणि ही जवळीक हळूहळू वाढत गेली . आणि संजीव कुठे बाहेर गावी गेला कि रंजना ही नरेंद्रची जवळीक साधू लागली . हळूहळू या गोष्टी वाढल्या . नंतर संजू चा पारा अनावर झाला . आई - वडिल गावाला गेली होती . आणि संजीव एके दिवशी अचानक घरी आल्यानंतर घरामध्ये नरेंद्र व रंजना गप्पा मारताना , दिसल्या तेव्हा मात्र संजयचा शंका ती वाढत गेले . मात्र इकडे रंजना आणि नरेंद्र यांना संजयच्या अडथळा वाटू लागला आणि एक दिवस जेव्हा रात्री उशीरा आल्यानंतर त्याच्यात घरांमध्ये रंजना आणि नरेंद्र हे विचित्र अवस्थेमध्ये दिसल्यानंतर मात्र संजयचा संताप अनावर झाला . त्याने समोर असलेला लोखंडी रॉड उचलून नरेंद्रला मारण्याचा प्रयत्न केला . त्या दोघांनी संजूला ढकलले . संजू डोक्यावर खाली पडला मागे दगडाचा मार लागल्यामुळे त्या क्षणी संजु चा अंत झाला .क्रमशा........ पुढील भागात


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy