रूपांतर
रूपांतर
सुंदर हिरवी
गर्द झाडी
नयन सुखवी
हिच सृष्टी..
घरं वस्ती
झाडा फुलात
सदा राहती
वातावरणात
मानव स्वार्थान
रूप बदलले
घराचे परिवर्तन
इमारती केले..
उंच इमारती
जंगले तोडून
फ्लॅट बांधले
निसर्ग सोडून..
हसते खेळते
घराचे चित्र नाही
एकटे बंद ते
मुले बंद ही..
नैसर्गिक रूपाचा
पालट केला
आपल्या स्वतःचा
नाश ओढवला..
