रक्तापलीकडचं नातं
रक्तापलीकडचं नातं
साक्षी आणि वैदेही दोन मैत्रिणी असतात. शहरात राहायच्या एकाच बिल्डींगमध्ये. दोघीही दहा वर्षांच्या आणि एकाच क्लासमध्ये शिकत होत्या. या दोघींमुळे त्यांच्या आईवडीलांची ही ओळख होती. साक्षीचे आई बाबा मानस आणि नेहा आपल्या साक्षीवर खुप प्रेम करायचे. त्यांच लव्हमॅरेज होत. दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्यामुळे त्यांच्या लग्नाला घरून परमीशन नाही मिळाली. पण नेहा आणि मानसच एकमेकांवर जिवापाड प्रेम होत.
ते एकमेकांशिवाय अधुरे होते, पण दोघांच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमाला आणि लग्नाला विरोध होता. त्यामुळे नेहा आणि मानसने आपल्या घरचे नाही परंतु खुप माणस कमावली होती. आपल्या मित्र - मैत्रिणींच्या सपोर्टमुळे दोघेही विवाहबध्द झाले. मग घरच्यांनी त्यांना काढुन दिल. तैव्हापासुन मानस आणि नेहा शहरात राहत होते. नातेवाईकही त्यांना भेटत नव्हते. कुठल्याही कार्याला बोलवत नव्हते. नेहा कधी कधी खुप रडायची पण मानस तिला समजुन घ्यायचा. एवढा चांगला जीवनसाथी मिळाला म्हणूनच नेहा सुखात राहत होती त्याच्यासोबत. मानसने तिला कुठल्याही गोष्टींची कमी भासु दिली नाही. तो खुप प्रेम करायचा. दोघांनी एकमेकांना साथ द्यायच ठरवल.
त्यांच्या संसारवेलीवर एक फुल उमलल. ते म्हणजे साक्षी जी आता दहा वर्षांची होती. दोघेहि आईबाबा तिच्यावर खुप प्रेम करायचे. त्यांना एकच मुलगी होती. जिवापाड तिला जपायचे. तिला खुप मोठ कुरायच त्यांच दोघांच स्वप्न होत. दिवसभर ते जाॅबवर बिझी राहायचे. साक्षीला आता सगळ कळत होत. ती खुप समजदार होती. पण साक्षीची मैत्रिण वैदेहीच्या घरी तिच येण जाण असायच. दोघीहि सुट्टी असली की एकत्र अभ्यास आणि खेळ खेळायचे. अगदी बहीणीसारख्या राहायच्या. दोघींच्याही आईबाबांना त्यांना अस एकत्र बघून छान वाटायच. दोघींच
एकमेकींशिवाय पान हालत नसे. वैदेहीचे आई बाबा ही नोकरी करणारे होते. वैदेहिचे आजी बाबांमुळे साक्षीलाही आजी आजोबांच प्रेम मिळायच. तिला छान वाटायच. ते दोन्ही मुलींना जीव लावायचे. साक्षीलाही ते आपल्या
नातीसारख बघायचे. खुप छान फॅमिली होती.
नेहा आणि मानस आपल्या साक्षीसोबत खुप enjoy करायचे. सुट्टी असली की तिला बाहेर फिरायला न्यायचे. तिच्यासोबत छान वेळ घालवायचे. तिलाही आई बाबांसोबत खुप छान खेळायला, मज्जा करायला आवडायच. मानस तर मुलीला खुप जीव लावायचा. सगळ छान चालल होत. कोरोनाची पहीली लाट आली. साक्षी आणि वैदेहीचे ऑनलाईन क्लास चालु होते. अधुनमधुन अभ्यास झाल्यावर दोघी भेटायच्या, पण कधीतरी. कुणीही कुणाच्या
घरी कोरोनाच्या भितीने जात नव्हते. सगळ काही मोबाईलवरच चाललेल होत.
नेहा आणि मानसच ऑनलाईन काम सूरू असायच. दोघेही त्यात बिझी असायचे तसेच साक्षीलाही वेळ द्यायचे. कोरोना होऊ नये म्हणून साक्षीलाही खुप जपायचे ते दोघेही जास्त बाहेर जात नव्हते. फक्त मानस आपल
घरच जीवनावश्यक वस्तुंसाठी बाहेर पडत होता. नेहा आणि साक्षी घरीच असायच्या. मानसने एवढी काळजी घेऊनही त्याचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला. त्याला हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल. नेहाला तर काय कराव
कळत नव्हत. ती मानसला फक्त व्हीडीओ काॅलवरून बोलत होती. साक्षी तर रोजच विचारायची... " बाबा, हाॅस्पिटलमधुन बरे होऊन कधी येतील... " सांग ना म्हणुन ती रोजच नेहाच्या पाठीमागे लागे. पण तिला मानसशी बोलायच असायच अन् त्यालाही आपल्या लाडक्या लेकीला दिवसातुन एकदा तरी बघाव वाटायच. नेहा खचली होती. नातेवाईक असुनही नसल्यासारखे होते. मानसच्या घरच्यांना तिने कळवल होत. पण त्यांनी साधा फोन करून विचारलही नाही. त्यांना लव्हमॅरेज केल्याचा तेव्हाचा राग अजुनही होता. मानसची प्रकृती ठिक होत आली होती. पण अचानक काय झाल माहीती नाही. दोन दिवसांत त्याला जास्त त्रास झाला. ट्रिटमेंट सुरू होती. पण त्याची कोरोनाशी असलेली झुंज अखेर संपली. नेहाला मानसला शेवटच भेटताही नाही आल. याच खुप मोठ दुःख तिला होत. तिला मानस गेल्याच वृत्त समजताच ती खुप खुप रडत होती. साक्षिलाही सगळ कळत होत. नेहा आपल्या साक्षीला घेउन खुपच रडत होती. तिला सगळ संपल्यासारख वाटत होत. ती मानसशिवाय जगण्याची कल्पनाच करू शकत नाही. माझ आणि साक्षीच कस होणार याची चिंता तिला सतावत होती. मानस गेला त्याच दिवशी तिला हा धक्का सहन न झाल्याने तिनेही प्राण सोडला. साक्षीला काही कळेना काय झाल ? ती आपल्या शांत पडलेल्या आईच्या देहावर
पडून रडत होती. आईला हाका मारत होती. तिला उठवत होती. पण नेहा तिच्या मुलीचा आवाज ऐकायला राहीली नव्हती. ती गेली होती. साक्षीने वैदेहीला फोन करुन सांगीतल. आजुबाजुचे नाही आले पण साक्षीची मैत्रीणीची फॅमिली धावून आली. साक्षी खुप रडत होती. तिचे बाबाही गेले आणि आईही, साक्षीचा रडण ऐकून सर्वांचेच हृदय हेलावल आणि सर्वांच्याच डोळ्यांत अश्रु दाटले. अशी मन हेलावून टाकणारी साक्षीच्या नशिबाची कहानी.
कोरोनामुळे तिने आपल्या आईबाबा गमावल. तिला आधारच उरला नाही. ती पोरकी झाली होती. एवढीशी लहान मुलगी कुणाकडे राहणार ? पालकच नाही उरले. शेजारी वगैरेंनी तसेच साक्षीला वैदेहिच्या घरचे आपल्या घरी घेऊन आले. त्याअधी तिची कोरोना टेस्ट करण्यात आली ति निगेटीव्ह होती. म्हणुन चिंतेच आणि घाबरण्याच कारण नव्हत. वैदेही आपल्या मैत्रिणीला सोडून कुठेही जात नव्हती. साक्षीला वैदेहीच्या घरच्यांनी मायेचा आधार दिला. तिला आपल्या मुलीसारखच बघू लागले.
साक्षी वैदेहीसोबत राहू लागली. पण तिला आईबाबाची खुप आठवण यायची. वैदेहीचे आईने तिला जवळ घेतल. प्रेमाने समजावल. नेहा आणि मानसच्या घरच्यांना वैदेहिच्या बाबांनी फोन केला ते आले. त्यांचा मानस आणि नेहाच्या लग्नाला विरोध होता. तर समोरासमोर येऊन आपल्याच मुलाची आणि मुलीची ही मुलगी आहे तरी तिची जबाबदारी
स्वतः घ्यायला त्यांनी नकार दिला. त्यांनी वैदेहीच्या बाबांना सांगितल की " आम्ही या मुलीला अनाथाश्रमात तिची व्यवस्था करू " वैदेहिचे बाबा हे सगळ प्रकरण, दोघांच्या घरच्यांच नातेवाईकांच बोलण ऐकत होत.
त्यांना त्यांच मत पटल नाही. वैदेहीच्या बाबांनी त्यांना सांगितल की , " साक्षी तशही माझ्या मुलीची मैत्रिण आहे आणि मी नेहा आणि मानसला चांगल ओळखत होत. त्यांच दोघांच साक्षीला खुप शिकवायच, मोठ करायच स्वप्न होत अस ते गेल्यानंतर साक्षीला मी तरी अनाथाश्रमात नाही पाठवू शकत. तुम्हांला नको आहे ना, तर मी साक्षीची जबाबदारी घेईन, दत्तक घेण्याची प्रकिया पूर्ण करून मी तिला दत्तक घेईन.
" तुम्ही येऊ शकता. " वैदेहिचे बाबा अस म्हणताच दोघांच्याही घरचे निघून गेले.
वैदेहीच्या घरचे दोघींकडे बघत होते. वैदेही मुळे साक्षी हळूहळू यातुन सावरत होती. वैदेहीच्या बाबांनी साक्षीला दत्तक घेतल. तिची सगळी जबाबदारी त्यांनी घेतली. पालकत्व गमावलेल्या साक्षीला मायेचा आधार तर मिळाला. तिला नवीन घर मिळाल. वैदेहिचे आईबाबा सारखे काळजी, प्रेम करणारे पालकही मिळाले. दोघीही मैत्रिणी
पुन्हा एकत्रच बहीणीसारख्या आनंदाने राहू लागल्या.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत अशी अनेक मुले आहेत की ज्यांनी आपल्या दोन्ही पालक गमावले आहेत. सरकारने तर मदत जाहीर केली आहे. परंतु ज्यांना बाळ नाही त्या लोकांनी जर अश्या मुलांना दत्तक घेतल, या मुलांना
मदतीचा हात दिला तर एक मुल अनाथ होण्यापासून वाचेल... आणि त्यांची पण मुल नसल्याची कमी पूर्ण होऊ शकते.
