Ajay Nannar

Tragedy Inspirational

4.0  

Ajay Nannar

Tragedy Inspirational

PUBG

PUBG

3 mins
251


मी आणि विकास आम्ही दोघे भाऊ होतो. मी नोकरी करत होतो. विकास च अभ्यासात अजिबात मन लागत नव्हते . आई बाबांनी विकास च्या भविष्याची खूपच चिंता होती पन दुसरीकडे विकास ला काहीच देण घेण नव्हते. विकास गावात टवाळक्या करत हिंडायचा आणि सारखा मोबाईल मध्ये असायचा. मोबाईल शिक्षणासाठी पैसे खर्च करून घेऊन दिला होता.

मी विकास ला म्हणालो " विकास आई बाबांच तरी ऐक . आयुष्य एकदाच मिळते त्याच्या सदुपयोग कर. " विकास लक्ष न देता म्हणाला तुला काय करायच ते कर ....मी चाललो. असे म्हणत विकास तावातावाने घराबाहेर पडला आणि खिशातून मोबाईल काढला आणि PUBG गेम खेळू लागला. या गेम ची विकास ला पार सवय झाली होती. जणू नशाच चढली होती.


चीन ने PUBG गेम लाँच केल्यापासून भारतातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत या गेम चे शिकार झाले होते. लोक दिवसरात्र मोबाईल मध्ये फक्त PUBG गेमच खेळायचे. आणि जोरजोरात म्हणायचे " जय PUBG" .


आमचा विकास ही याच PUBG चा शिकार झाला होता. ज्या वयात मुलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षण घेऊन पाया मजबूत करायचा असतो त्या वयात PUBG ने सगळ्यांचे वाटोळे करून ठेवले होते. म्हणून आई बाबा विकासला सांगत " बाळा अरे गेम नको खेळूस " विकास ऐकल तर खर ना. विकास ने दुर्लक्ष केले व करायचे ते केलेच.


   एके रात्री आम्ही सगळे झोपलो असता मला अचानक जाग आली . मी पाहिले तर विकास रात्री झाडखाली बसून PUBG खेळत होता. मी विकास ला गेम खेळू नको म्हणून सांगितले पण विकास ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. मी झोपून घेतले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जे पाहिले त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता कारण विकास चे डोळे पांढरेफट्ट पडले होते आणि त्याला काहीच दिसत नव्हते. आम्ही सकाळी लगेचच विकासला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण दुर्दैवाने त्याचा आधीच मृत्यू झाला होता असे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टर म्हणाले की चेक करत असतात विकासच्या मेंदूतील डोळ्यांना सेन्स करणाऱ्या सगळ्या शिरा रात्री जास्तवेळ गेम खेळल्यामुळे जळून खाक झाल्या होत्या आणि त्या मुळेच त्याचा मृत्यू झाला होता.


    हे ऐकताच आई बाबांच्या डोळ्यांत पाणी आले आणि त्यांच्यावर दुखःचा जणू डोंगरच कोसळला होता. विकास आमच्यातुन दुर निघून गेला होता. काळ आला आणि तो त्याच्या कर्माने गेला. 


     आजही विकास ची कमी आमच्या कुटुंबाला जाणवत आहे. मी काहीच करू शकलो नाही पन आता " जो कोणी PUBG गेम खेळेल तो स्वतःच्या मृत्यूला स्वतः च आमंत्रण देत आहे ". 


आणि म्हणून मी आजही PUBG गेम खेळणाऱ्या मुलांना या गेम पासून दूर करण्यासाठी प्रयत्न करतोय कारण मला कोणाची अवस्था माझ्या भावासारखी झालेली पाहायची नाही आहे. 


   आज भारतात PUBG गेमला बंदी घालण्यात आली आहे. पण PUBG सारख्या खूप गेम आहेत त्यांवरही लवकरात लवकर बंदी यावी. PUBG गेम बंद झाला खरं पन PUBG च भूत जे मानगुटीवर बसले आहे ते घालवले पाहिजे. 


   हे कोणी एकासाठी नाही तर सगळ्यांसाठी आहे कारण विकास सारखे खूप मुले याला बळी पडतात आणि आपला जीव गमवतात.


आजही PUBG चा थरार चालूच आहे कारण यात जो अडकला तो कायमचा संपला.


......आपल्याला ही घटना काल्पनिक वाटेल पन ही एक सत्य कथा आहे......


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy