पत्र
पत्र
(भावा बहिणींच्या मधात काही गैरसमज होतो.नंतर भांडण होतं आणि नंतर त्यांच्यांतला दुरावा निर्माण झाला आणि ते एकमेकांपासून अबोला धरतात आणि त्यात दोघेही खूप खचून जातात आणि नंतर भाऊ रक्षाबंधनाला खच्चीकरण मनाचं करुन टाकलेल्या,भावावर रागवून बसलेल्या ताईंना पत्र लिहितो)
प्रिय.तायडे
(ताई साहेब)
सप्रेम नमस्कार
कशी हाय ग तु? अरे मी पण तुला वेड्या परी प्रश्नं करतोय. नालायक, बिनडोक सारखं!
तुला तर आता नै-याशेत जगण्याची सवय झालीय ना?
दुःखाची रेषा चेहऱ्यावर रेखाटून टाकली ना!
स्वतःच्या मनाला उदासीत जगायला शिकवलं ना.
वाह! किती छान अन् सरळ मार्ग,स्वतःला स्वतःच दुःख देण्याचं
हेच,असेच तोड काढायचं का? दुःखात जगण्याचं. पण थोडासाही प्रयत्न करायचं नाही यातून बाहेर पडण्याचा नवं जीवन जगण्याला
ताईसाहेब तो गुलाबाचं फुल टवटवीत फुलतो अन् गुलाबी थंडीत त्याच्या कळ्यांवर, तृणांवर दवबिंदू जसा नवरत्न हिरा वाटतो जणू ते फुलांच्या कळ्या त्या नवरत्नाच श्रृंगार करून, नटून-थटून सजलेल्या आहेत.बघायला अप्रतिमच,थेट काळजात तो दुश्य उतरून जातो.स्मरणीय होऊन जाते,पण ते क्षणभंगुर असते.जसं सूर्य डोक्यावर आला की ते कुरूप दिसते.अन् त्याला कुणी बघत नाही.पण मात्र त्या फुलांच हात त्याचं जीवनाचा तोल धरून ठेवणार झाडाचं असते.तेच त्याला जगवत असते, त्याच पालनपोषण करत असते एका आई सारखं!
ताई गुलाबाचे फूल ताजेतवाने दिसले की प्रत्येकाला तो हवा हवासा वाटतो.सुगंध घ्यायला,कार्यक्रमाची शोभा वाढवायला,केश्यात सजवायला,तर कुणाचं सत्कार करायला, तर कूठे तो फुल पायाखालून वावरत असते,लाचारासारखा.अन् बघते स्वतःचे तुकडे तुकडे.ताई त्या फुलाची ईच्छा नसतानाही त्याला त्याच्या हिरव्या शालूच्या भूगर्भातून वेगळं केलं जाते. अन् ते झाड काही करू शकत नाही.त्याला टोकदार काटे असतांनाही! झाडाला आधीच माहीत असते की एक ना दिवस माझ्यापासून दूर निघून जाणार आहेत हे फुल.जे आज माझी शोभा आहेत.तसच जे उन्हातान्हन मला वाचवणारे माझं संरक्षण करणारे तृण. तरी झाड खंभीर पणे जगतो.आज हे सर्व गळले तरी चालेल, उद्या नवी पालवी फुटेल.नव्याने फुल टवटवीत बहारून येतील.आणखी नव्याने अंगावर श्रृंगार चढेल नवरत्नांच.
असं नेहमी positively विचार करतो. "जिद्दीने लढतो".
"स्व बळावर जगतो" मानवा सारखं नाही, निराशेत जगत.
ताई तुझ आयुष्याचा प्रवास हा आजही वेदनेच्या गावकडेच चाललंय ना? चांगलचं मजबूत घर असेल ना दुःखाने जोडलेलं.त्याला वरून अश्रुपाणी घट्ट टिकावू.त्यात तू एकटी,खचलेले मन पडून राहते.करमत असेल ना? एकटेपणात! लुप्त केलं का ग अतिथ स्वतःचं,हसऱ्या चेहऱ्या मागचं.बंद केलंय का नयन वाहेन अविरत! का एकटेपणात आताही पांढऱ्या शुभ्र आकाशातून मोती गळत असतात. की आभाळच कोसळतो, आणखी दुःखाची पालवी फुटत असेल मनी.गेलेले काळ पुन्हा चाळायला मिळत असेल. पुन्हा जन्म घेत असेल! तुला तोडत असेल. तोडतय ना? त्यात तुझ रडणं, हुंदकांचा आवाज लपवत, अश्रु न गळता. स्तब्ध होणे, स्वतःला स्वतःच नको नकोसा वाटणे, वाटतें ना?
"पेटवावी का देहाची होळी" असे प्रश्न अनेकदा मनी आलेली असतील.आताही येतय ना? मग करायचं जेवण्याकडे दुर्लक्ष, राहायचं उपाशी. जीवाचे बेहाल होतं पर्यंत! कधी डोळ्या समोर शेवट दिसत असेल.एकच प्रश्न उरत असेल "समोरं जगावं की स्वतःला संपावाव" पण या प्रश्नाचं उत्तर देताच आलं नाही ना तुला!
जगणे जसे मेल्यासारखे
मरणे कसे जगण्यासारखे
रडणे सारे हसण्यासारखे
नि हसणे ही रडण्यासारखे
भेटते दुःख आनंदासारखे
आनंद वाटे दुःखासारखे
आप्त सारे परक्यासारखे
नि परकेच आपल्यासारखे
असे वाटते ना,अशी भावना नक्कीच तूझ्या मनात येतय ना? पण ताई तु स्वतःला कधी संपवू शकत नाही. तुझ्यात खुप सहनशक्ती आहे.तू अशा परिस्तिथींना तू तोंड देऊ शकते. तुला माहित आहे कश्या प्रकारे लढायच विशेष म्हणजे तू लढत आहे. दुखाच विष प्राशन कळलं असेलच की फक्त सोबतीला लढण्याचं धाडस केलं की धैर्य बळ आपोआप येतात.मनोबल चांगल असलं की आपण विषालाही पचवू शकतो. तीळ तीळ कीतीही कोणी तोडले तरी आपण निरनिराळे स्वप्न पाहून,आशांना एकत्र करून दुःखावर मात करू शकतो. ताई "जीवन हाच रणांगण. हाच संघर्ष" आहे तुम्ही फक्तं संकटावर मात करा,विजयी व्हा. तावूसुलाखून पुन्हा आनंदाच्या उकळ्या फुटू द्या, बघा तुमचं संपान लवकरच पुर्ण होईल. हीच माझी सदिच्छा!
ताई,मला माहित आहे ग चांगलचं. माझ्याशी न बोलण्याच कारण.अबोलकी होणे स्वतः स्वतःची इच्छा नसतांनाही आहे.मनाला मारून जगते.मला त्रास नको व्हायला पाहिजे म्हणून.तरी तू माझ्याशी बोलायला तुझ्यात तळमळ सुटते.पण स्वतःला तू वचन बद्ध करून ठेवलंस की मला त्याच्याशी बोलायचय नाही.ताई तू जेव्हा पासून माझ्यावर रागावली आणि माझ्याशी बोलू नको म्हटलं तेव्हा पासून मी बोलल नाही तुझ्याशी. मी शब्दशः तुझ शब्द मी पाळतो आहे" आपलं बोलण बंद होऊ शकते,पण मात्र नांत संपणार नाही" असे ताई तुम्हीं म्हटलेले होते,ताई हे वाक्य मला नवं जगातला बळ देते.कधी ना कधी ताई परतून येईल याची वेळोवेळी जाणीव करून देत, तर कधी तू नसल्याचा निर्वाळा सतत असते. जगण्याला निरनिराळे सपांन दाखवतात. तर मला कधी एकटेपणाचा भास करून देतात. स्तब्ध करतात, तुझ्या आशेत जगवतात.तू आज बोलशील,उद्या बोलशील "केंव्हा तरी बोलशील" स्व ईच्छा ने,अशा एकतरी दिवस येईलच असे स्वप्न सांगुन जातात.पण ते दिवस येतच नाही.त्या दिवसाची मला आतुरतेने वाट आहे.पण ते शक्य होईल का नाही.माहीत नाही! सगळ ताई आता तूझ्या वर आहे अवलंबून,तूझ्या विचारांवर!
ताई तू आजही गैरसमज तुमचं दूर झालेले नाही! ताईसाहेब तुमचं रागवणं अनिवार्य आहे.अन् ते तुज हक्क, अधिकार आहे. ताई लहान भावाची चुक झाली तर ते शिक्षा देणे गरजेचे आहे.तर त्या पलीकडे" त्याला त्याच्या चुक कळून देणे, ते चुक दुरुस्त करणे" हे तुमचे मोठ्या ताईच्या नात्याने कर्तव्य आहे. ताई, चुका तर माणसा कडूनच होतात,तेही नकळत. ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्या केलेल्या चुकांवर मार्गदर्शन केले पाहिजे.असं केलं की ती चूक दुरुस्त करता येते आणि समोरच्या व्यक्तीला त्यांची चुक कळते.आणि तो तशी कधीच जीवनात चुक पुनः करत नाही..! तो स्वतःला बदलवण्याचा प्रयत्न करतो ..अन् त्या वेळी पासून नव्याने जगायला सुरुवात करतो ..नाही तर त्याला त्यांची चुक कळणारच नाही तर तो ते आयुष्यभर तेच पिंजत राहील. अन् एकाकडे तो आपल्या खठ्यत टाकू शकतो, स्वतःला उध्वस्त करतो.आपण कुठे चुकलो हेच भूतकाळातील आयुष्याचे पांने चाळत बसतो, अन् एक ताण निर्माण होते आणि ते सतत काळजात सतत सल सलकते. तो चुकाचा भार,ताणतणाव मनावर होत असते.तो पूर्ण पणे मनोबळ खचवून जाते. जेणे करून त्याची विचार करण्याची समजण्याची टाकत लुप्त पावते, मग तो निगेटिव्ह विचार करायला लागलो.
ताई चुका प्रत्येकाकडून होत असते. कोणाकडून लहान तर कोणाकडून मोठी. तेही नकळत कळत होत असतात.तुम्ही आता मला क्षमा करायचं की नाही आता तुम्हीच ठरवा की, इथंच तूझ्या झालेल्या एका गैरसमज मुळे पूर्णविराम द्यायचं का नात्याला.आता तूच ठरव.इथ सारं भूतकाळ विसरू. समोर चालायचं का नाहीकी सारं संपवून टाकायचं.माझ्या वाटेला तू नाही.अन् तूझ्या वाटेला मी नाही!
लिहायला खुप काही आहे पण आता लेखणी थांबवतो,चला निरोप घेतो! भांडणं आमच्यात कायम येथे प्रेम आमचं अफाट आहे.जीवाच्या पल्याड जपते मलेअशी आमची डुचकी तायडी आहे
तुझाच नालायक भाऊ.
