माझ्या आठवणीतला पाऊस
माझ्या आठवणीतला पाऊस
मी नेहमी प्रमाणे सकाळी सकाळी कोकिळेच्या गोड आवाजने जागा व्हायचो. चहुदिशेत पक्ष्यांचा किलबिलाट सुरूच राहायच. सकाळी उठलंकी रानोमाळात भटकंती व्हायची. केशरी किरणे नभात पसरलेली असायची, झुडझुडणारा वारा कयेला शिवून जायच. मन हे वेडे झालेले, उधाण वाऱ्याचे गूज अंतरीचे धावायचे; नवनवीन विचार जन्म घ्यायचे. रामोमाळ सर्व फिरून, घरी आल्यावर ट्युशन क्लासेसला जायची तयारी.... त्या दिवशी सकाळी मान्सूनचे आगमन झाले होते. सगळीकडे काळे मेघ सर्वत्र विखुरलेले....तरी मी रानोमाळात भटकंती करून ट्युशन क्लासेसला जाण्याची तयारी केली. जायला निघालो अन् माझ्या मित्रांना विचारलं, "आज क्लासेसला येताय का?" त्यांनी येण्यास नकार दिला. पाण्याचं खुप उमाव आहे म्हणून. मग मी एकटाच निघालो. ट्युशन क्लासेसची सोय गावात नसल्यामुळे बाहेर गावी जावं लागायचं. गावावरून ट्युशन क्लासेस गावापासून हे सहा कि. मी. अंतरावर होते. मी एकटाच......
वाटेत रिमझिम पाऊस सुरू झाला. अंगावर पडणारा पावसाचा थेंब भिती दाखवायचा. नितेश जोरात सायकल चालाव. नाहीतर तुला मुसळधार पाऊस मिठीत घेईल. अन् तुला अर्ध्या वाटेतूनच घरी परतावं लागेल. मी जोर जोरात सायकल चालवू लागलो. चालवू कसलं उडवतच चाललो. वाटेतील खड्डे चिखलाने माखलेले माझे स्वागत करायला वाटते तयारच होते. सकाळचे साडे सात वाजलेले वाटेतच, आठ वाजे पर्यंत पोहचायचे होते. आणखी तीन कि. मी. मला गाठायचं होतं. रिमझिम पावसातही मी घामाने ओलाचिंब भिजलेलो. डोळे, कपाळावरून थेंब थेंब घाम गळत होतं. तरी ती वात तुडवत मी क्लासेसला पोहचलो. तेही अगदी वेळेवर! क्लासेस एक तासाचे होते. क्लास संपवून मला घरी परत यायचं होतं.
पावसाची संततधार सुरूच होती. पाऊस चांगलाच मुसळासारखा धो धो कोसळत होता. घरी कसं जायचं? जायचं की नाही? या विवंचनेतच मी होतो. मला काहीच कळत नव्हतं. क्लासेसच्या बाहेर मी उभा होतो. सोबत क्लासेसला आलेल्या शेजारच्या गावातील मैत्रीणीही होत्या. माझ्यासारखंच त्यांना पण तेच प्रश्न पडलेले असावेत. आम्ही एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघू लागलो. एकमेकांना आता कसं करायचं असं विचारू लागलो. मी त्यांच्याकडे बघत विचारलं, हळूवार त्यांच्याजवळ जाऊन. "काय झालं ?" त्यातली एक म्हणाली, "इतक्या जोराच्या पावसात घरी कसं जायचं? वरून विजांचा कडकडाट सुरू आहे. खूप भिती वाटते. कॉलेजलापण जायचं आहे. टेस्ट सुरूआहेत." तिने लहानसं तोंड करून सांगितलं, निरागस पने.! आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात नमी होती.
मी म्हटलं, "बघू या. समोरच समोर जे होईल ते होईल. चला निघूया इथून." आणि निघालो घराकडे. " तेथून निघण्या पेक्षा आमच्या कडे दुसरं उपाय उरलेल नव्हत." पावसात आम्ही चिंब भिजून गेलो. कपड्यांवर चिखल उडत होता. पाऊसाचा मारा सुरुच होता.
त्या दोघी मैत्रीणी माझ्यावर विश्वास ठेवून निघाल्या. हळुवार सायकल चालवत.
एकमेकांच्या सहकार्याने, एकमेक्यांची हिंमत वाढवत.! पावसाच्या सरींचा मारा झेलत. एकीकडे मनात भिती दाटली होती. भर पावसात आम्ही तिघेच आणि घर गाठायचं बाकीचं होतं. तिघेही एकमेकांना धिर देत मोठ्या मनाने चाललो होतो. मुसळधार पावसाने नदीला नाल्याला पूर आला होता. थंड बोचरा वारा मनाला थिजून जात होता. आम्ही अर्ध्या वाटेत पोहचलो असेल, माझ्या कानावर "थांब" अशी मैत्रीणीची हाक आली. तसे आम्ही तिघेही थांबलो.
आम्ही का थांबलो हे मला काहीच कळेना. कदाचीत पावसाचा आनंद घ्यायचा असेल त्यांना! त्या तसं काही बोलल्या नाहीत पण त्यांच्या चेहर्यावरून मला तसंच वाटत होतं. जवळच बायपास रस्ता होता. त्यावरून साधारण फूटभर पाणी वाहत होते. त्या दोघींनी त्या वाहत्या पान्यात सायकली उभ्या केल्या. आणि गरागरा पायंडल फिरवू लागल्या. त्यामुळे पाणी वर उडू लागले. सर्वांनी आपापल्या सायकली धुतल्या. त्यांच्यासोबत मीही धुतली. एकमेकांची थट्टा मस्करी करत, सायकलला स्टॅंडवर लावून पाणी उडवत मजा करू लागलो. नाचूही लागलो. मनसोक्त आनंद घेतला.!
या थट्टा मस्करीच्या नादात आम्ही सगळेच घरी जायचे वासरून गेलो. त्यातच मी म्हटलं, "झालं नाही का अजून तुमचं पाणी खेळून.पाण्यात भिजून. घरी चला. चला लवकर नाहीतर काका अन् काकुजी तुमची चांगलीच वरात काढतील. आतपर्यंत कुठे होता म्हणून." लगेच आम्ही तिघेही सायकली घेवून तिथून निघालो. या मज्जा मस्तीने त्या दोघींचे चेहरे गुलाबाच्या कळी सारखे टवटवीत फुलले होते.त्यांच्या गुलाबी चेहऱ्यावर हसू, आनंद ओसंडून वाहत होता. तेव्हाच त्यांचे ते चेहरे मी थेट माझ्या मनात कोरले. मलाही त्यांना बघून गंगणात न मावनारा आनंद झाला. आम्ही पुन्हा निघालो घराकडे. वाटेत गप्पा मारत. त्यांच्याशी हसून, बोलून माझ्याही मनाला खुप छान वाटले. त्यांना ही बरं वाटल असेल माझ्याबरोबर बोलून. नंतर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि निघालो आप आपल्या घराकडे.
त्याचक्षणी त्यांचा आनंद पाहून मला स्वतःचा थोडा हेवा वाटला. कारण मी त्यांना चला म्हटले नसते तर कदाचित त्या या पावसाच्या आनंदाला मुकल्या असत्या. पावसात भिजून, खेळण्याचे अनुभव मिळाला नसता. मी चल म्हटल्यामुळे आणि त्यांनी माझ्यावर विश्वास टाकल्यामुळे हे शक्य झाले. आज ही तो दिवस स्मरणीय सर्वदा आहे.
त्यांचे ते गुलाबी चेहरे,
थेट काळजात कोरले.
त्यांचे नयन इवलेसे
खूप काही सांगून गेले.
मनाची भीती मोडून
आम्ही आज निघालो,
सहकार्य एकमेकांचा
घेत मार्ग आम्ही गाठले.
कधी बघितले नव्हते ते
क्षण आज अनुभवले.
