Sonam Thakur

Romance

2  

Sonam Thakur

Romance

पत्र लेखन

पत्र लेखन

2 mins
125


नमस्कार कारभारी


ते पोस्टमन काका पत्र टाकून गेले आहेत घराबाहेरच्या लेटर बॉक्समध्ये आज दोन दिवस झाले जरा लेटरबॉक्स उघडून वाचायला घे. लाईट बिल आणि बाकीची पत्र नंतर बघ आधी माझं पत्र वाच, घेतलंस का वाचायला बरं सुरवात करते, कसा आहेस हे विचारणार नाही कारण तो खूप ऑब्व्हियस प्रश्न झाला, माझी आठवण येते का? हे ही नाही विचारणार कारण जरी दूर असले तरी कायम तुझ्यासोबतच आहे, बरं कोणाशी फ्लर्ट करतोस का माझ्या अनुपस्थितीत? तर शक्यच नाही त्या बद्दल शंभर टक्के विश्वास आहे.


किती महिने झाले ना विरहाचे, हा कोरोना काळ आणि लॉकडाऊन कधी संपणार देव जाणे, खूप काही बोलायचं आहे मला आज प्लीज वाचायला कंटाळू नकोस. हे सगळं तुला मी व्हॉईस/व्हिडिओ कॉल वर सांगू शकले असते पण पत्राची मज्जा वेगळीच असते अर्थात मला स्वतःला पत्र लिहायला आणि वाचायला खूप आवडतात पण या तंत्रज्ञानाच्या जगात ही पत्र आणि पोस्टमन काका लुप्त झाले आहेत बरं ते जाऊदे तो वेगळा विषय आहे नंतर केव्हातरी निवांत बोलू. महत्वाचं म्हणजे वेळेत जेवतोस ना? बाहेरचं जास्तं खाऊ नकोस, रात्री झोपताना मोबाईल डोक्यापाशी ठेऊ नको. मी येतेच आहे लवकर तेव्हा घरात पसारा करून ठेऊ नको इतकंच सांगायचं होतं. तू म्हणशील आता बस कर गं बाई पत्रात ही का मला आदेश देशील, म्हणून थांबवते


खरं सांगू का हे बोलणं सोप्पं आहे "हम दूर सही पर तुम्हारे दिल के करीब हे" actually ही मनाची समजूत आहे. मी खूप miss करते रे तुला, खूप आठवण येते कधी एकदा हा विरह सरेल असं झालं आहे. तुझ्याशिवाय जगणं निरर्थक वाटतं कितीही समजवलं स्वतःला तरी पुन्हा तुझ्या आठवणीत रडतं, समर्थकृपेने आपण भेटलो पण या long distance love story चा आता कंटाळा आला आहे बरं बरं जास्तं sentimental होत नाही कारण मला माहिती आहे तू तिथे विचार करत बसशील. ऐक ना रे, तू लिह ना मला एखादं पत्र माहीत आहे लिहण्याचा कंटाळा आहे तरी पण माझ्यासाठी इतकं तर तू करूच शकतो आणि चांगलं लिही कुचक्यासारखं चार ओळींचं नको. तुला तर चांगलंच माहीत आहे या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या आणि अनमोल आहेत माझ्यासाठी.


आता आणखी लिहीत बसत नाही नाहीतर वाचता वाचता झोपशील. चल काळजी घे येतेच लवकर तुला त्रास द्यायला तोपर्यंत मला miss करत राहा, बाय भेटू या लवकर.


तुझी अर्धांगिनी,

सोनम


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance