End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Sonam Thakur

Romance


3  

Sonam Thakur

Romance


अलौकिक प्रेम

अलौकिक प्रेम

3 mins 380 3 mins 380

मी बारावीत शिकत होते कॉलेज लाईफ अगदी छान सुरू होतं. आधीपासूनच मला काहीतरी वेगळं करायची इच्छा होती माझे अॅम्बिशन. हे सतत बारावीची परीक्षा होई पर्यंत बदलत रहीचे पण जशी बारावीची परीक्षा आटपली मी इंटरनेट वरून नवीन प्रोफेशनल कोर्सेसची माहिती काढली त्यात मला अॅनिमेशन थोडं नवीन आणि वेगळं वाटलं दुसऱ्या दिवशी मुंबईतील बेस्ट अॅनिमेशन सेंटर्स ची माहिती काढली आणि नंतर घरी सांगितलं 


अॅनिमेशन हे त्यावेळी माझ्या घरच्यांसाठी नवीन होतं आणि तो फक्त डिप्लोमा होता म्हणून आधी घरून विरोध झाला पण नंतर एका अटी वर मला परवानगी मिळाली ती म्हणजे रेग्युलर डिग्री कॉलेज करून अॅनिमेशन करायचं होतं मी कुठलाही विचार न करता हो म्हंटलं आणि मग मात्र सुरू झाली माझी खरी परीक्षा सकाळी डिग्री कॉलेज अटेंड करून दुपारी वसई वरून अंधेरी ला असलेल्या अरेना अॅनिमेशन सेंटरमध्ये धाव घ्याची तरी मला छान वाटत होतं. अंधेरी ला शिकत असताना माझी मनू शी ओळख झाली. होय मी त्याला मनू म्हणते वयाने माझ्यापेक्षा खूप मोठा होता तो त्या वेळी अंधेरीला जॉब करायचा आणि आमचा फॅमिली फ्रेंड होता त्यामुळे तसा तो परिचयतला होता त्याचं ऑफिस आणि माझा क्लास एकत्र सुटायचं मग हळूहळू आमच्यात बोलणं वाढलं आणि नकळत आम्ही प्रेमात पडलो. 


खूप मोठं आव्हान आमच्यापुढे होतं घरी कसं सांगायचं तसं पाहिला गेलं तर घरचे चांगले ओळखत होते पण आमच्यात वयाचा अंतर खूप होता. पण आम्ही दोघे आमच्या मतावर ठाम होतो आम्हाला लग्न करायचंच होतं काहीही झालं तरी. मनू ने त्याच्या घरी सांगून ठेवलं होतं त्याच्या घरातून विरोध नव्हता पण प्रश्न माझ्या घरच्यांचा होता त्यात माझं करीयर ही सुरू होतं आम्ही दोघांनी ठरवलं की मला नोकरी लागे पर्यंत घरी काही सांगायचं नाही. माझं ग्रॅज्युएशन आणि अॅनिमेशन सोबतच झालं आणि अॅनीमेटर्सची त्या वेळी खूप डिमांड होती मला जॉब ही लवकर मिळाला आता खरी परीक्षा होती मनू आणि मला माझ्या घरच्यांना सामोरं जायचं होतं आणि अखेर तो दिवस आला ठरल्या प्रमाणे एक दिवस मनू घरी आला घरी सगळं काही सांगितलं सगळं ऐकून झाल्यावर एक निरव शांतता पसरली. आईने माझ्याकडे कटाक्ष टाकून विचारलं हे सगळं खरं आहे का मी हो म्हंटलं आणि पुढे काही बोलायच्या आताच आईने माझ्या कानाखाली मारला आणि त्यानंतर उद्वेग करत म्हणाली हे मला मंजूर नाही खूप तमाशा झाला आम्ही दोघेही विनवणी करत होतो पण आमचं कोणीही ऐकून नाही घेतलं शेवटी आम्हाला दूर ठेवण्यासाठी मला जबरदस्ती माझ्या काकांच्या घरी पाठवण्यात आलं


आमचं प्रेम खरं होतं आणि घट्ट ही होतं खूप अडचणी आल्या आम्हाला संपर्क करताही नाही आला पण अखेरीस एक दिवस काकांच्या घरी कोणी नव्हते आणि मी मनूला फोन केला माझा आवाज ऐकताच तो रडू लागला त्या दिवशी आम्ही काय बोललो हे आठवत नाही पण एक वाक्य आठवतं मी त्याला म्हंटलं होता "मनू मला इथून प्लीज पळवून ने मी नाही राहू शकत त्यावर तो म्हणाला मी ही नाही राहू शकत आपण लवकरच भेटू. कधी कधी फोन वर बोलणं व्हायचं पण २ महिन्यानंतर घरच्यांना वाटलं सगळं काही शांत झालं आहे मी पुन्हा माझ्या घरी गेले आता मात्र आम्ही ठरवलं होतं की घरी विचारायचं नाही 


आम्ही फोनवर सगळं काही प्लॅन करून ठेवलं होतं मी माझे थोडे थोडे कपडे मनू च्या बहिणीच्या घरी ठेवायची मुहूर्त ठरला आम्ही देवळात लग्न लावायचं ठरवलं आधी आणि मग कोर्ट मॅरेज. घरचे सर्व आप आपल्या कामावर निघून गेल्यावर मी मनूला फोन केला आणि त्यानंतर आम्ही पळून जाऊन लग्न केलं. माझ्या घरच्यांचा आजही विरोध आहे पण आम्ही मात्र आमच्या पहिल्या भेटीत घट्ट धरलेला हात अजूनही सोडला नाही आणि कुठल्याही जन्मात तो सोडणार नाही. तर अशी आहे आमची प्रेमकथा.


Rate this content
Log in

More marathi story from Sonam Thakur

Similar marathi story from Romance