Sonam Thakur

Others

2  

Sonam Thakur

Others

पत्र लेखन

पत्र लेखन

2 mins
148


आदरणीय बाबा 


कसे आहात तुम्ही? आपण दोघे कधी मनमोकळं बोललोच नाही म्हणून माझ्या भावना आज पत्राद्वारे कळवते, बाबा तुम्हाला आठवतं माझा जन्म झाला आणि माझी मुलगी धनाची पेटी असे म्हणून तुम्ही किती खुश होता. लहानपणी माझे किती लाड पुरवले, शाळेत असताना मी किती water bottle आणि पेन्सिल हरवल्या तरी तुम्ही मला नवीन आणून द्यायचे, कामाच्या धावपळीत तुम्ही आणि मम्मी मला फक्त संध्याकाळी भेटायचे त्या कोवळ्या वयात मी आजी आजोबांच्या छत्र छायेत वाढले, थोडं मोठे झाल्यावर कळले की हे सगळं तुम्ही आमच्यासाठी करत होतात. आम्हा दोघींनाही तुम्ही मुलासारखं वाढवलं, उच्च शिक्षण दिलंत थोरामोठ्यांचा आदर, सगळ्यांना समान वागणूक, विनम्रता आपला स्वाभिमान सर्वतोपरी ठेवा अशी संस्कारिक शिकवण देऊन उत्तम घडवलं, तुम्ही आम्हाला देशी-विदेशी सर्वत्र फिरवलं, आम्हाला स्वतंत्र rooms, computer, laptop सगळं सगळं पुरवलं आणि त्याची जाणीव ठेवा हे ही समजावून सांगितलं. किती कष्ट केले तुम्ही दोघांनी आमच्यासाठी. बाबा तुमच्यातले अर्धे गुण जरी माझ्यात आले ना तर माझा जन्म मी सफल समजेल, तुमच्याइतका संयम नाही हो माझ्याकडे आता आता तो शिकत आहे.


लहान असताना आपण किती धमाल करायचो, किती जवळ होतो आपण एकमेकांच्या तसे आजही आहोत पण मोठी मुलगी असल्याकारणाने आदर म्हणून नंतर नंतर आपल्यात communication gap निर्माण झाला, खूप काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या बाबा. खरं तर हे वय तुमचं आराम करण्याचं आहे पण तुमची सेवा या ही वयात अविरत सुरू आहे. खंत वाटते बाबा इतक्या लांब आहे मी आज तुमच्यापासून की कितीही वाटलं तरी काही करू शकत नाही. बाबा मला तुमच्यासारखं बनायचं आहे, समर्थांकडे एकच प्रार्थना आहे की असा एक दिवस येवो आणि तुम्हाला माझ्या बाबतीत खूप proud वाटो तुमच्याकडून शाबासकीची थाप मिळावी यासाठी आतुरतेनं वाट पाहते.


आईपेक्षाही बाबा तुम्ही प्रिय आहात मला तुमचा खूप अभिमान आणि हेवा वाटतो, तुम्ही आजवर इतरांसाठी झटत आलात, थोरला मुलगा, बंधू,पती,पिता,मित्र आणि माणूस म्हणून आताही खूप धडपड करता. आयुष्यात मला कधीच कसलीच कमी पडू दिली नाहीत. फक्त एकच कायम वाटत राहतं बाबा इतकं मोठं करून मला दुसऱ्याच्या घरी का पाठवलं? माझं अस्तित्व हे तुमच्यापासून आहे आजही सोनम जयंत ठाकूर हे नाव अभिमानाने लावते कारण ती ओळख मला तुम्ही दिली. असं का असतं बाबा फक्त मुलींनीच का आपलं घर सोडून परक्या घरी कायमचं निघून जायचं? का स्वतःची संपूर्ण ओळख बदलायची? आई-बाबांपेक्षा समाज कधीपासून मोठा झाला बाबा?

बाबा शेवटी एकच सांगेल तुमच्या इतकी मी स्ट्रॉंग नाही आहे तेव्हा देवाकडे एकच प्रार्थना आहे तुम्हाला काही होण्याआधी माझे डोळे कायमचे बंद कर, खूप miss करते तुम्हाला बाबा!


तुमची

सोनम


Rate this content
Log in