Sonam Thakur

Romance

3  

Sonam Thakur

Romance

चाहूल - भाग १

चाहूल - भाग १

3 mins
273


चला चला आटपा लवकर अजून पुष्कळ कामं आहेत, पोरांनो तुम्ही जेवणाच्या मंडपाचे काम पहा मी जरा फुलवाल्याकडे जाऊन येतो असे म्हणत पांढुरंग काका त्यांच्या मोटोरसायकल वर बसून निघाले. राव कुटुंबात लग्नाची घाई गडबड सुरू होती जो तो आपआपल्या कामात व्यस्त होता. राव कुटूंब अगदी प्रशस्त होतं. जुन्या वाड्यात सुना आणि सासुरकरणी लग्ना आधीच्या विधी सोहळ्यात गुंतल्या होत्या, सर्व आज्या बाकावर बसून पारंपरिक लग्नाची गाणी म्हणत होत्या, घरातील पुरुष मंडळी मंडप व येणाऱ्या पाहुण्यांच्या मानपानाच्या गोष्टी पाहत होते तर घरातल्या मुली मोठ्यांना कामात मदत करत होत्या. 


त्या काळी विवाह सोहळे हे आठवडाभर चालत, आता मात्र विवाह सोहळे हे चार दिवसात आटपतात पण तरीही त्याची पूर्व तय्यारी ही सहा महिन्या आधीपासूनच सुरू होते. आणि त्यात राव कुटुंब अतिउत्साही. एकीकडे लग्नाची गडबड सुरू होती तर दुसरीकडे मल्हारच्या मनात वीणासाठी प्रेमाचे बीज अंकुरत होते. त्याला तिला मनातलं सारं सांगायचं होतं पण कुठेतरी भीतीही वाटत होती, जर तर चे भरपूर प्रश्न होते. वीणाच्या आजोबांची आणि मल्हारच्या बाबांची जुनी मैत्री त्यांचे जिवाभावाचे जुने घरगुती संबंध असल्याकारणाने घरी येणं जाणं एकाद्या नातेवाईकांसारखच होतं. मल्हार आणि विणाच्या प्रेमाला जर घरातून सहमती मिळाली नाही तर संबंध तुटू शकतात याची चिंता त्याच्या मनात होती. पण विणावर त्याचं जीवापाड प्रेम होतं, काहीही झालं तरी तिला मनातलं सारं या खेपेला सांगायचंच पुढे जे होईल ते पाहू असा ठाम निश्चय मल्हार घरूनच करून निघाला होता. तो वाट पाहत होता फक्त एका संधीची आणि ती संधी त्याला लवकरच मिळाली. सामानाची यादी घेऊन वीणा ओसरीत आली आणि मल्हारला म्हणाली "प्लिज जरा बाजारात जाशील का मोठ्या काकींनी ही सामानाची यादी दिली आहे. मीच गेले असते पण मला दुसरी कामं आहेत. 


मल्हार: अगं इतकी मोठी यादी आहे, मी एकटा कसा काय आणणार, तू पण चल सोबत 


वीणा: आले असते रे पण इथे ही खूप कामं आहेत, आत्या सोबत पापड लाटायला बसायचा आहे, तिला तसं सांगितलं आहे आता मधेच गेले तर ती ओरडले 


मल्हार: अगं ते नंतर करशीलच चल जाऊन येऊ पटकन, तू असलीस की सामान घेताना माझा गोंधळ पण नाही होणार, आत्याला मी सांगतो तू टेंशन घेऊ नको 


वीणा: ठीक आहे, तसं सांगून ये तिला नंतर बोलणी नाही खायची, ती सगळ्यांसमोर उगीच बोलायला नको 


मल्हार: बरं ठीक आहे 


असे म्हणून मल्हार आत माजघरात गेला आणि लगेच दोन मिनिटांनी परत बाहेर येऊन गाडीत बसला आणि विणाला हाक मारून म्हणाला चल बस लवकर मी बोललो आहे आत्या सोबत. ठीक आहे असं म्हणत वीणा फ्रंट सीट वर मल्हारच्या शेजारी बसली. मल्हारचं त्या क्षणी बुद्धी आणि मनाचं युद्ध सुरू होतं. तो ज्या संधीची वाट पाहत होता ती त्याला मिळाली होती, तो मोकळेपणानं तिला त्याच्या भावना सांगू शकत होता पण तिला कसं सांगावं हे त्याला कळत नव्हतं, पाच मिनिटांच्या शांतते नंतर मल्हारने वीणाला विचारलं. 


मल्हार: काय मग दहावी झाली आता कॉलेज कसं वाटतंय, आता तू कॉलेज कुमारी होणार. 


वीणा: हो रे पण परीक्षेचा निकाल तर जाहीर होऊ दे मॅट्रिकची परीक्षा म्हंटलं की जरा टेंशन असतंच ना, चांगले मार्क मिळाले तरचं मनासारखी स्ट्रीम आणि मनासारखं कॉलेज मिळेल. 


मल्हार: तुला चांगले मार्क पडतील तथास्तु 


मल्हारचं हे वाक्य ऐकून वीणा हसून त्याला थँक्स म्हणाली. तेवढ्यात मल्हारने पुन्हा दुसरा प्रश्न विचारला, काय मग शाळेत कोणी स्पेशल होतं का मुलांपैकी कोणी किंवा एखादं क्रश, मला तू सांगू शकते बिनधास्त 


वीणा: छे क्रश असायला मला काय घरतल्यांकडून स्वतःला क्रश करून घ्यायचं आहे आणि तसं ही राव घराण्यातील मुलींना सहजासहजी कोणी प्रपोज नाही करत त्यांना काय मार खायचाय. माझं असं काहीचं नाही 


मल्हार: हो ग पण जर एखाद्याला तू अगदी मनापासून आवडत असशील आणि त्याने तुला विचारलं तर तू त्याला काय उत्तर देशील 


वीणा: असं मला आजपर्यंत कोणी विचारलं नाही पुढचं पुढे पाहू, मी इतका पुढचा विचार नाही करत. 


बोलता बोलता गाडी बाजारपेठत येऊन थांबली, गाडी पार्क करून ते दोघे उतरले आणि यादी हाती घेऊन एक एक वस्तू घेऊ लागले. बाजारात प्रचंड गर्दी होती मल्हार त्या गर्दीत वीणाचा हात घट्ट धरून पुढची वाट तिच्यासाठी मोकळी करत होता. सर्व सामान गाडीत ठेऊन मल्हार वीणाला म्हणाला खूप उष्ण आहे वातावरण बाहेर आलोच आहोत तर समोरच्या रेस्टॉरंट मध्ये बसून कोल्ड ड्रिंक पिऊन मग घरी जाऊ त्यात काय जास्तं वेळ जाणार नाही.

ठीक आहे, वीणा म्हणाली 


( रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर दिल्यानंतर मल्हारने दीर्घ श्वास घेऊन अखेरीस विणाला मनातल्या तिच्यासाठी असणाऱ्या भावना व्यक्त केल्या) 

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance