STORYMIRROR

शब्दसखी सुनिता

Romance Fantasy Others

2  

शब्दसखी सुनिता

Romance Fantasy Others

प्रिय चहा आज तुझ्याविषयी

प्रिय चहा आज तुझ्याविषयी

2 mins
81

चहा हा सर्वांच्याच आवडतीच पेय. चहाप्रेमींच पहील प्रेम म्हणजे चहा... ☕चहा मलाच काय सर्वांना आवडतो. आपल्या सर्व भारतीय लोकांपासून ते जगातील सर्वच लोकांची सकाळ वाफळत्या चहापासून सुरू होते. चहा घेतल्याशिवाय सकाळ गोड होतनाही... 😊 चहा प्रेमींची. चहाने आळस,कंटाळा निघून जाउन नवीन उर्मी संचारते.पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलेजाणारे एकमेव पेय म्हणजे चहा.. ☕तशी माझी सकाळ ही घरातील सर्वांसोबत चहा घेण्याने होते तर संध्याकाळीही चहा लागतोच. जास्त चहा पिणे हे व्यसन आहे,पण संध्याकाळी दमल्याने चहा घेतल्याने सगळाथकवा दुर होतो. संध्याकाळचा चहामैत्रिणींसोबत घेतला ना सगळ थकवा दूर होतो.


चहामुळेच मैत्रीची सुरूवात झाली.या चहामुळेच भेटीगाठी होतात. छान गप्पांची मैफील रंगते... त्याचा साक्षीदार हा चहा...आपण कितीही दुर असलो तरीहा चहा घेताना आठवण येतेच. नवीन मित्र - मैत्रिणी बनतात आणि यामुळे जुनी मैत्रिणीआणखी घट्ट होते. प्रेम टिकवून ठेवणारीएकमेव गोष्ट म्हणजे चहा... चहाला वेळ नसतोपण वेळेला चहा हवाच... घरीही कितीही कामातअसलो तरी चहाच्या वेळेला प्रत्येकाला चहाहवा असतो. आपण दिवसभर काम करून दमलो तर चहा हा सवयीनुसार लागतोच.पुन्हा काम करायला उर्मी मिळते. लहानांपासुनमोठ्यांपर्यंत बर्‍याच लोकांना चहा हवा असतो.कधी कधी आपल्या घरी पाहुणे आले तरचहाच सर्वांसोबत घेतला जातो. आपली जुनीमैत्रिण आली तर मग तर हमखास तिलाहीचहा आवडत असेल तर चहाचा आस्वाद घेताघेता छान गप्पाही मारता येतात. 


खरंतर मैत्रीची आणि प्रेमाची सुरूवात चहानेचहोते. पाहुण्यांच्या स्वागतासाठी भारतीयांच्याआवडतीच पेय म्हणजे चहा... हा हमखास घेतला जातो. चहाचे हल्ली खुप प्रकार उपलब्ध आहेत. कडक, स्पेशल, इराणी, येवले चहा असे अनेक प्रकारचा चहा चहाप्रेमी घेतात.स्नॅकनंतर तर चहा मस्ट झाला आहे. चहा म्हटला की आपल्या खुप आठवणी आणिमाणसांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. खूप आठवणी अश्या या चहाशी जोडलेल्या असतात. पावसाळा किंवा हिवाळ्यातही आपणकधी कुणी मित्र कींवा मैत्रिण म्हटली तर हमखास टपरीवरचा चहा घेतला जातो. कधीऑफिस तर काॅलेजच्या फ्रैंन्ड्स सोबत चहाघेताना खुप मज्जा यायची. चहा तर असायचापण गप्पा रंगायच्या त्या वेगळ्याच, प्रत्येक गोष्टीवरसोल्युशन मिळायच ते या चहामुळे. सगळे एकत्रयायचे... असा हा चहा... सगळा थकवाच दुर पळून जायचा. कितीही थकलो असलो तरी चहा घेतला की तरतरी येते. सोबत एकवेळ तो नसला तरी चालेल पण हा चहा... आणि सोबत मैत्रिणी किंवा आपली जवळची माणस असल्यावर अजुन काय हव ! 


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance