प्रिहुल - १
प्रिहुल - १


प्रत्येक स्त्री ही शुन्यच असते असं मला वाटतं! लग्नाआधी तिची ओंजळ माहेरी भरून येते पण, तिच्या हाती काहीच राहत नाही, किंमत शून्य! सासरी, ज्या नवऱ्यासाठी ती सारं काही सोडून येते त्याच्या पुढयातही तिची किंमत आयुष्यभर शून्यच राहते! ती देत राहते, निरपेक्षपणे प्रेम वाटतं राहते,प्रेमापोटी काही घ्यायला जाते आणि पुन्हा शून्यात लुप्त होते! नवऱ्याला तिची किंमत शून्य जरी वाटतं असली तरी, ज्या आत्मविश्वासाने तो मान ताठ करून जगतो त्या मागे त्याच्या बायकोचे शून्यच जोडलेले असतात हे मात्र नक्की! ज्या नवरा नावाच्या प्राण्याला हे उमगलं त्याच्या इतकं सुखी साक्षात इंद्रही नाही!