"पिशाचनी" 1
"पिशाचनी" 1
गावाच्या सीमेवर एका गरीब शेतकर्याची झोपडी होती. त्या कुटुंबात एकूण तीन लोक राहत होते. एक मुलगा मोहन आणि त्याचे आई वडील त्यांच कुटुंब शेती करून येणाऱ्या मोबदल्यात घर खर्च भागवत असत. सगळ सुरळीत चालू होत.
काही दिवसांनी मोहनच लग्न झाले. आता कुटुंबात चार लोक झाली मोहन च्या बायकोच नाव सुशीला ठेवले. काही दिवस खूप चांगले गेले.
एके दिवस अचानक घराच्या बाजूने एक जोडपे जात होते पण खूप रात्र झाली होती म्हणुन विश्रांती साठी जागा भेटेल का हे विचारायला त्यांच्या झोपडी जवळ आले. सुशिलाने दार उघडले अणि त्यांना एका रात्री विश्रांती साठी राहायला दिले.
त्या जोडप्याला एका खोली मध्ये रहायची सुविधा केली. त्या जोडप्याने झोपण्यापूर्वी त्यांनी घातलेले दागिने आपल्या पेटी मध्ये कडून ठेवताना सुशीला ने
पाहिले तेव्हा ती त्यांच्यासाठी दूध घेऊन येते.
ते जोडपे झोपी जाते. सुशीला मध्य रात्री त्यांच्या खोलीमध्ये येते तिची नजर त्या दागिन्यांनी भरलेल्या पेटीवर असते ती विचार करते त्या दागिन्यांनी भरलेली पेटी आपल्याला कशी मिळवता येईल. गरीब परिस्थिती असल्यामुळे मानत लो भाची
भावना येते. सुशीला तिथून निघून जाते.
"ती बाहेरच्यां खोलीत खिडकीतून बाहेर बघत दागिन्यांचा विचार करत असताना तिथे अचानक एक बेडकी येते ती वेगळ्या रंगाची असते.
बेडकी ओरडत असताना सुशीला तिच्या पुढ्यात दुधाची वाटी ठेवत बेडकी त्या दुधात आपली जीभ टाकते त्या दुधाचा रंग हिरवा होतो नंतर परत सफेद दुधाचा रंग होतो, सुशीला हे पाहते सुशीला समजून जाते ते विषारी झाले आहे. "
सकाळी लवकरच ते जोडपे निघण्याची तयारी करत असतात. तेव्हा सुशीला त्यांना ते रात्री बेडकी ने विषारी केलेल दूध गरम करून देते.
" ते जोडपे ते दूध पिऊन घेतात...
थोड्या वेळात त्यांचा मृत्यू होतो...
(क्रमशः)

