STORYMIRROR

Nikita Agare

Drama Romance Inspirational

4  

Nikita Agare

Drama Romance Inspirational

शेवटचा पाऊस

शेवटचा पाऊस

2 mins
322

       आपल्या काही महिन्याच्या पाऊसातला हा शेवटचा पाऊस होता. त्यानंतर आपण कधी भेटणार हे माहीत नव्हते. कारण त्यानंतर मी आर्मी (army) मध्ये युद्धपातळीवर जाणार आहे. असा विचार करत असताना.....

   तु आलीस तिला पाहुन मी तिला घट्ट मिठी मारली. त्या पाऊसात तुझे अश्रू दिसत नव्हते, पण माझ्या मनाला तुझ्या स्पर्शाने तुझ्या रडण्याचे हुंदके जाणवत होते.

    काही काळ घट्ट मिठी मध्ये असताना आपल्या प्रेमाच्या आठवणी, भेटी सर्व काही अश्रू मधून पावसाच्या सरित वाहून जात होते. त्यानंतर तिला मिठीतून सोडताच मी तिच्याकडे काही वेळ शांत पाहातच राहिलो.

     आता आमच्या भेटीची वेळ संपत आली होती. कारण माझ्या रेल्वेची सुटण्याची वेळ जवळ येत होती. तितक्यात....

  कविता : सचिन मी तुझ्यावर जिवापाड प्रेम करते मी तुझी वाट पाहिन.

   '' सचिन भरवून गेला,'' 

सचिन :मी पण तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी युद्धपातळीवरुण आल्यावर आपण आपल्या नवीन जीवनाचा प्रवास करू. तेव्हा तु माझी पत्नी असशील. तुझी काळजी घे. एवढच बोलुन तो निघून गेला. 

     सचिन तिला अधून मधून फोन करत असे नंतर पाच दिवस फोन येत नाही कविताला चिंता वाटू लागते. सहाव्या दिवशी सकाळी amry मधून सचिन चा मित्र फोन करतो . युद्ध दरम्यान सचिनचा एक पाय अधू झाला आहे. सचिन आता ठीक आहे तो स्वतःच्या घरी दोन दिवसानंतर येईल. हे ऐकल्यावर कविता घाबरते. 

     दोन दिवसानंतर कविता सचिनच्या घरी जाते.  

सचिन अणि कविता दोघ एकमेकाला थोडा वेळ बघत राहतात. 

कविता : सचिन कसा आहेस तु खूप अजून कुटे लागला आहे का? अस, तितक्यात..... 

सचिन : अगं मी शांत हो मी ठिक आहे.  

     

    सचिन तिच्या मनातील कुजबुज समजत होता. पण तो काही बोलला नाही. कविता थोडा वेळ बसते 

त्यानंतर जाताना.. 

कविता: मी रोज येइन तु काळजी घे. 

 सचिन :ठीक आहे. Bye 

   कविता त्याला पहायला रोज येते पण अचानक एक दिवस येत नाही. अचानक दुसर्‍या दिवशी आल्यावर समजत कि., सचिन ने आत्महत्या केली. 

सचिनची आई कविताला सांगते.. कविता रडायला लागते अणि दोघांच्या आठवणीचा भर डोळ्यासमोर जात असतो.. कविता पूर्ण तुटून जाते.. 

      


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama