Sanjay Ronghe

Fantasy Thriller

3  

Sanjay Ronghe

Fantasy Thriller

पिकनिक - भाग चार

पिकनिक - भाग चार

7 mins
100


आज नाईकांना यायला थोडा उशीरच झाला. सोबत ते भाजी किराणा घेऊन आले होते. राणी दारात बसून नाईकांचीच वाट बघत होती. नाईकांना बघून ती पुढे झाली नाईकांनी तिच्या हातात भाजी ची पिशवी दिली आणि त्यांनी किराण्याची पिशवी स्वतः घेऊन ते घरात आले. राणीने भाजी किराणा व्यवस्थित भरून ठेवला. आज नाईक थोडे उत्साहात दिसत होते. राणीची आणि त्यांची नजरानजर झाली. नि राणीला कळले की नाईकांना काहीतरी सांगायचे आहे. अजूनही त्या दोघांमध्ये फारसा संवाद होत नव्हता. नाईक राणी पासून थोडे दूर दूरच राहायचे. राणीनेही कधी नाईकांच्या जवळ जाण्याचा कधी प्रयत्नही केला नव्हता . मात्र ती मुलांमध्ये खूप मिक्स झाली होती. मुले नसली की तिला करमत नसे. तिला एकटे एकटे वाटायचे. मात्र मुलं घरात असली की ती खूप आनंदी असायची. मुलं सारखी आई हे दे , आई ते दे असे काही तरी चालू असायचे. त्यात राणी नेहमीच व्यस्त असायची. तिला त्यात खूप आनंद मिळायचा. मुलं अभ्यासात असली की राणीही त्यांच्या रूममध्ये जाऊन बसायची. मुलांचेच पुस्तक घेऊन वाचत बसायची. मग कधी मुलांना अडचण आली की त्यांना ते समजावून सांगायची. हळू हळू राणीचेही ज्ञान वाढत होते. एकदा नजीकच तिला म्हणाले तुला पण शिकायची इच्छा असेल तर आपण तुझी ऍडमिशन मुक्त विद्यापीठाला करू शकू. पण तुला अगोदर दहावी आणि बारावीची परीक्षा द्यावी लागेल. तुला इच्छा असेल तर तसे सांग. राणीनेही ठरवले होते की परीक्षा द्यायची आणि जितके शिकता येईल तितके शिकायचे. नाईक या वेळी तिचा दहावीच्या परीक्षेचा फॉर्म भरणार होते. आणि सगळी पुस्तके पण राणीला आणून देनार होते. पण तिने ठरवले होते की आपल्यामुळे मुलांचे नुकसान मात्र होऊ द्यायचे नाही. तिने तशी तयारीही सुरू केली होती. आता फक्त पुस्तकांची ती वाट बघत होती. 


आज नाईकांना काय सांगायचे असेल याचा राणी विचारच करत होती. तसे नाईक बोलले. यावेळी मला लागून तीन दिवस सुट्ट्या येत आहेत. मला वाटते आपण कुठे तरी पिकनिकला जावे. मुलांना पण थोडा चेंज होईल . आणि त्यांना आनंद वाटेल. मी करतो प्लान पक्का. तू बाकी काय काय लागेल त्याची तयारी कर. तसे जास्त काही लागणार नाही. जेवण राहणे आपण हॉटेललाच ठरवू. फक्त मध्ये मुलांना फराळ नास्ता आणि कपडे प्याकिंग एवढंच करावं लागेल. शुक्रवारी सकाळी आपण घरून निघायचे रविवारी सायंकाळ पर्यंत परत वापस यायचे. म्हणजे जास्त त्रासही होणार नाही. जवळचाच एखादा स्पॉट मी शोधतो. राणीलाही नाईकांचा पिकनिक चा बेत खूप आवडला. तिने ते मुलांना सांगितले. मुले तर खुपच खुश झाली. आजचा मंगळवार होता. म्हणजे दोन दिवस बाकी होते. तीही आनंदात तयारीला लागली. तिने थोडे फराळाचे तयार केले . मुलांचे नाईकांचे आणि स्वतःचे कपडे , नाईट ड्रेस काढून प्याक केले. टॉवेल, सॉक्स, चपला, टूथ ब्रश, पेस्ट, तेल, कंगवा, आरसा, थोडी औषधं, सगळं बाजूला काढलं. ब्यागा भरून तयार झाल्या. पाण्याची वॉटर ब्याग आणि इतर सगळे समान आठवून आठवून काढले. 


शेवटी शुक्रवार ची पहाट उजाडली. सगळे पहाटेच अंघोळी करून तयार झाले. गाडीही दारापुढे हजर झाली. नाईकांनी चिखलदरा मेळघाट चा बेत आखला होता. हॉटेलचे बुकिंग पण झाले होते. नागपूर पासून चखलदरा फार लांब नव्हते. पाच ते सहा तासात ते पोचणार होते. देवाची पूजा करून सगळे गाडीत बसले. आणि गाडी सुरू झाली. मुलं खूपच आनंदात होती. त्यांची सारखी टकळी सुरू होती. नितु म्हणत होता पप्पा आपल्याला तिकडे वाघ बघायला मिळेल का हो. तिकडे खूप दाट जंगल आहे ना. किती मजा येईल. तशी मीतू म्हणाली नाही पप्पा आपण जास्त आत जायचे नाही. वाघांनी आपल्याला पकडले तर. आपण गाडीच्या बाहेरच नाही निघायचे. गाडीतूनच सगळं बघू या. तसा नितु बोलला येहे घाबरट बाई , इतकं काय भ्यायचं. मी आहे ना सोबत. मी पकडलील वाघाला. आणि देईल हाकलून. मला बघून तो आपल्या जवळच येणार नाही. अशीच मुलांची सारखी बडबड सुरू होती.

तशातच अमरावती आले. रस्त्यात एक धाबा बघून नाईकांनी गाडी थांबवली. त्यांनी राणी आणि स्वतः साठी चहा मागवला. राणीने मुलांना सोबत आणलेला नास्ता आणि फ्रुट दिले. सगळे खाणे पिणे करून परत गाडीत बसले. आणि गाडी पुढे निघाली. मध्ये जंगल, टेकड्या, छोटे छोटे गाव लागले. मुलांना खूप आनंद होत होता. 


मग मुलांनी गाडीतच अंताक्षरी सुरू केली. नितु आणि नाईक एका बाजूला आणि मीतू आणि राणी दुसऱ्या बाजूला झाले. नाईकांना खुप जुणे गाणे पाठ होते. तर राणी लाही काही गाणे येत होते. नाईकांचा आवाज जसा चांगला होता तसाच राणीचाही आवाज गोड होता. हसत खेळत गाडी पुढे जात होती. आता घाट सुरू झाला होता. तशी मुलं घाट दऱ्या आणि जंगल बघण्यात दंग झाली. 


मध्ये काही प्राणी पण दिसत होते. अशातच गाडी चिखलदऱ्याला पोचली. हॉटेल जवळच होते. तेही खूप मस्त लोकेशन ला होते. ते टेकडीच्या मध्ये असल्यासारखे वाटत होते. आजूबाजूला दाट जंगल होते. दुपार असूनही खूप थंड वाटत होते. सगळे गाडीतून उतरले. नाईक हॉटेलमध्ये आत जाऊन रूम बुक असल्याची खात्री करून आले. मग सामान काढून रुम मध्ये गेले. रूम पण खूप छान सजवलेली होती . बाथ पण खूप स्वच्छ आणि सुंदर सजवलेला होता. 


नाईक रूम बघून खूप खुश झाले. रुम मधेच छोटासा फ्रीज होता. त्यात कोल्ड ड्रिंक आणि फ्रुटस, काही ड्राय फ्रुटस, चॉकलेट्स ठेवलेले होते. मुलं तर ते बघून खूपच खुश झाले. रूमच्या मागच्या बाजूने टेरेस होता. टेरेसमध्ये टेबल चेअर्स लावलेले होते. टेरेस मधून सुंदर टेकडी, पलीकडे झुळझुळ वाहणारी नदी आणि मोठमोठी झाडे दिसत होती. ते दृश्य फारच मनमोहक होते. रुम बघून सगळेच खूप खुश झाले होते. थोड्याच वेळात दरावर गॉड रिंग वाजली. दार उघडून बघितले तर दारात आकर्षक पोशाखात वेटर सर्व्हर ट्रॉली घेऊन उभा होता. त्याने नाईकांना चहा, कॉफी विचारली. नाईकांनी कॉफी सांगितली . वेटरने राणी आणि नाईकना कॉफी दिली. मुलांना दूध आणि बिस्कीट दिले. आणि जेवण केव्हा घ्याल विचारून गेला. कॉफी दूध घेऊन सगळे फ्रेश झाले. थोड्याच वेळात जेवण आले. टेरेस मध्ये टेबलवर सगळे जेवायला बसले. जेवण ही खूप टेस्टी होते. सगळे जेवण करून आरामात कॉट वर थोडे लोटले. सायंकाळी सनसेट पॉईंट बघायला जायचे होते. मुले ते सगळं बघून खूपच खुश झाले होते. सायंकाळी तयार होऊन सगळे सनसेट बघायला गेलं. ते दृश्य तर अप्रतिम सुंदर होते. नाईकांनी तिथे बरेच फोटोज आणि सेल्फी काढल्या. राणी नाईक आणि मूल यांचे ग्रुप फोटो दुसर्याकडून काढून घेतले. सगळेच खूप खुश होते. आता अंधार पडू लागला होता. सगळे परत हॉटेल ला जायला परत निघाले. मग थोडा मार्केट चा फेरफटका मारून सगळे हॉटेल ला परत आले. तोवर रात्रीच्या जेवणाची वेळ झाली. वेटर परत रात्रीचे जेवण घेऊन आला. सगळ्यांनी मस्त हसत खेळत गप्पा करत जेवण संपवले. उद्याचा प्लान पूर्ण पणे रेडी होता. तिथले प्रसिद्ध पॉईंट्स बघून मेळघाट व्याघ्र प्रकल्प बघायला जंगलात आत जायचे होते. दुपारचे जेवण तिकडेच जंगलात ठरलेले होते. मुले वाघाची स्वप्ने बघत झोपी गेली.


सकाळी पहाटेच उठून सगळे तयार झाले आणि पॉईंट्स बघायला निघाले. भीमकुंड, गाविलगड किल्ला, देवी पॉईंट तिथला धबधबा, मोझरी पॉईंट हरिकेत पॉईंट बघून आणि रुचकर स्वादिष्ट जेवनाचा आस्वाद घेऊन ते मग ते मेळघाट व्याघ्र प्रकल्प बघायला रवाना झाले.मेळघाट पट्टेदार वाघांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. तिथे अनेक जंगली जनावरे पाहायला मिळतात त्यात हरीण अस्वल, कोल्हा, लांडगा, नीलगाय, हरीण, सांबर, ससे, मोर, माकड व खूप सारे पक्षी बघायला मिळतात. आज नाईक परिवाराचे भाग्य खूपच जोरात होते. आतमध्ये प्रवेश करताच दोन किलोमीटर पुढे जात नाही तो त्यांची गाडी थांबली. समोरून रस्ता क्रॉस करून एक पट्टेदार वाघ जात होता. सगळ्यांच्या मनात एकदम धस्स झाले. राणीने एका हाताने मुलांना धरले आणि दुसऱ्या हाताने नाईकांना धरले. तिचे भानच हरपले होते. ड्रायव्हर ने सगळ्यांना शांत पणे बसून राहायचे सांगितले. नाईकांनी ताबडतोब मोबाईल काढून वाघाचे फोटो घेतले. मुलं तर एकदम स्तंभित होऊन वाघाकडे बघतच राहिले. त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. रोडवरून वाघ बाजूला जंगलात अदृश्य झाला. 


त्यानंतर गाडी पुढे निघाली. पुढे हरीण, माकड , नीलगाय, ससे, मोर ही बघायला मिळाले. सगळेच खूप खुश झाले होते. वाघाचे दर्शन घेऊन नाईकांची पिकनिक आनंदमय झाली होती. रात्र होता होता नाईक परिवार परत हॉटेल ला पोचला. आता मात्र मुलांना जोश आला होता. वाघ कसा चालत होता. तो कसा बघत होता. त्याचा रंग कसा होता त्याचे पट्टे किती सुंदर दिसत होते. यावर चर्चा करत होते. राणी ही खूप खुश झाली होती. आज ती नाईकांना टेकून बसली होती. मध्ये मध्ये गाडी हल्ल्यामुळे दोघांचाही एकमेकास स्पर्श होत होता. राणी त्या स्पर्शात खूप सुखावत होती. नाईकांनाही राणीचा तो स्पर्श हवाहवासा वाटत होता. आज पहिल्यांदाच दोघेही तो स्पर्श अनुभवत होते. 


रात्रीचे जेवण करून सगळे आरामात झोपी गेले. सकाळी परत निघायचे होते. रस्त्यातच ते मुक्तगिरी आणि बहिरम चे दर्शन करायला जाणार होते. अमरावतीला देवीचे दर्शन ही घ्यायचे होते. आणि नंतर नागपूरला परतायचे होते. आज पिकनिकचा तिसरा परतीचा दिवस होता. सगळे सकाळी उठून तयार झाले. नास्ता करून परतीचा प्रवास सुरु झाला. मुक्तगिरी जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र आहे. संगमवरी दगडांनी बांधलेले मंदिर खूप प्रसिद्ध आहे तिथे जायला पायऱ्या चढाव्या लागतात. पण कुणालाही थकवा जाणवला नाही. मुलं तर अगदी जोशात होती. दर्शन करून त्यांनी तिथेच जेवण घेतले. जेवण अगदी साधे होते पण खूपच स्वादिष्ट होते. 


तिथून ते बहिरमला गेले तिथे ही टेकडी चढून मंदिरात जावे लागते. दर्शन करून सगळे आता अमरावतीला निघाले. अमरावतीला अंबा देवीचे दर्शन करून थोडा वेळ मंदिरातच आराम करून गाडी आता नागपूर कडे निघाली. पिकनिक खूपच छान झाली होती. घरी पोचता पोचता रात्र झाली होती. आता मात्र सगळे थकले होते. थोडे जेवण करून सगळे पिकनिकची चर्चा करत झोपी गेले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy