पैसे
पैसे
"तू पैसा पैसा करती है "हे गाणं टीव्ही वर चालू होत सोहम हि ते गाणं गुणगुणत होता तेव्हड्यात तिथे शमा आली तिला पाहून तर सोहम ने अधिकच सूर लावला हे पाहून शमा ने टीव्ही बंद केला त्यावर सोहम चिडला "काय शमा का बंद केला टीव्ही मी पाहत होतो ना "
"हो तू पाहत होतास पण गाण्याचे बोल मला उद्देशून म्हणत होतास "
"म्हणजे "?
"तू एव्हडा भोळा नाही आहेस मी नेहमी पैसे पैसे साठवून ठेव सांगते ना म्हणून तू आज ह्या गाण्याच्या आवाज मोठा ठेवला "
"झालं तूच परत पैशावर आलीस काय ते पैसे पैसे शांत बसू पण देत नाही "
"शांत बस आणि काही करू नकोस चांगली नोकरी सोडून घरात बसलास मी कमावते म्हणून घर चालते "
"चांगली नोकरी तुला काय सांगायला किती त्रास होत होता कामाचा आणि तू कमावते म्हणून सगळ्यांना सांगत फिर म्हणजे माझी काडीची हि किंमत उरणार नाही ""
"त्रास कुठल्या कामात त्रास नसतो त्रास घेतल्याशिवाय कोणीही फुकट पगार नाही देणार आणि ३ महिने झाले तू असाच घरात लोळत पडतोस परदेशी नोकरीच्या आशेवर काय फायदा कोणी तुला सांगितले आणि तू ऐकले परदेशी नोकरीचे अरे विचार कर सध्या आपल्याला पैशाची चणचण आहे तरी बरे आपण दोघे च आहोत जर मुलं असत तर काय केलं असत तू "
"हे बघ तू चिंता करू नकोस मला परदेशी नोकरी मिळाली कि बघ आपले आयुष्य कसे पलटेल "
"चिंता करू नकोस म्हणजे भविष्याची चिंता नसणार का मला माझ्या पगारात घर चालवलेत तर सेविंग काय करणार आणि आयुष्य पलटेल वैगेरे हि स्वप्नातल्या गोष्टी झाल्या मेहनत केल्या शिवाय कोणी पैसे नाही देणार "
"म्हणजे तुला माझ्यापेक्षा पैसे प्रिय आहे तर "?
"सोहम बोलताना जरा विचार करू बोल तू प्रिय नसता तर तुच्या बरोबर संसार केला असता का? आणि पैसे मला प्रिय नाही गरज आहे आणि मी पैसे पैसे ह्या साठी करते जेणे करून आपले भविष्य चांगले असावे आज आपण मेहनत केली तरच आपले भविष्य उज्ज्वल होऊ शकते पुढे आपल्या मुलासाठी आपल्याला काहीतरी सेविंग ठेव्याला नको त्याचे शिक्षण पण चांगले व्हायला नको मी असं नाही म्हणत कि तू फक्त पैसे कमव तर आयुष्यच आनंद घेता घेता भविष्याची पण चिंता असावी आणि संकटात कोणी मदत करेल ही अपॆक्षा तर नसावी कारण सुखात मिसळणारे खूप असतात मात्र दुःखात हिम्मत देणारे कमी माझ्यासाठी पैसे हे भविष्य आहे पण तुच्या साथीची पण तेव्हडीच गरज आहे "
शमा च्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि सोहम तिला पाहत होता तो ही निरुत्तर
