Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

ऑफिस मधली दिवाळी ची तयारी

ऑफिस मधली दिवाळी ची तयारी

3 mins 16.2K 3 mins 16.2K

ऑफिस ,,,, दिवसातले सगळ्यात जास्त वेळ जिथे आपण असतो ती जागा , सेकंड होम च कि

आणि अश्या ह्या सेकंड होम मध्ये जेव्हा दिवाळी येते .... काय मज्जा असते

माझ्या ऑफिस ची तर तऱ्हा निराळी .... एकाच बिल्डिंग मध्ये दोन फ्लोअर मध्ये आहे माझं ऑफिस फर्स्ट फ्लोअर आणि ग्राउंड . फर्स्ट फ्लोअर म्हणजे सगळे MD , HR , Account अशी महत्वाची डिपार्टमेंट्स

तर ग्रॉउंट फ्लोअर म्हणजे रिपेरिंग , स्टॉक , सर्विस, सेल्स अशी उद्योगी आणि उपद्व्यापी खाती .

दिवाळीच्या दिवसात ह्या दोन ठिकाणी मोठी कमालीची गंमत असते , दिवाळी दोन्ही कडे जोरात येते , अगदी जोरशोर से म्हणतात ना अगदी तशी . फक्त फरक एवढा कि वर ची दिवाळी हि विशीं च्या तरुणी सारखी तर खालची चाळीशीचा संसार सारखी विशीतील तरुणी नाही का तीच आपलं १०-१५ दिवस आधी पासूनच प्लांनिंग सुरु असत , parlor कधी जायचं , तिथे काय करून घ्यायच , hair cut कोणता करायचा , त्याला सूट होईल असे ड्रेससेस online search करायचे , ते कोणा सोबत कोणता घ्यायला जायचं हे सगळं परफेक्ट planning असत तसच वर च्या फ्लोअर वर दिवाळीच्या दहा दिवस अगोदर पासून साफ सफाई , मागच्या वेळच काही दिवाळीच उरलं आहे का म्हणजे रांगोळीचे रंग पासून कंदील , पणत्या किंवा ऑफिस बॉय ने आणलेल्या त्या मेणाच्या छोटा दिवा सुद्धा ,,,, पण दर वेळी प्रमाणे ते सापडत नाही ते नाहीच . मग नवीन आणायचं, त्यासाठी advance घेऊन मागवून घेतलं जात

आणि तेच खाली ,चाळीशी पंचेचाळीस ची संसारी स्त्री नाही का भाजणी करायला घेते , त्यात मधूनच कोणी तरी जेवायला मागत, कुणी तरी चहा ची फर्माईश करत, अस करत करत ती चकली कर, चिवडा कर, लाडू बनव असं सुरु असत आणि हे सगळं तिला दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या आत पूर्ण बनवून डब्यात भरून ठेवायचं असत, अगदी अशीच धावपळ खालची दिवाळीला १० दिवस राहिलेले ... ह्यावेळेला दिवाळी महिन्याचा सुरुवातीलाच म्हणजे मागच्या महिन्याचं टारगेट नीट झालं तर दिवाळी चांगली जाईल ह्या उद्देशाने धावा धाव .

commitments ,dispatch ची घाई चालेल .एकूणच दिवाळी दोन्ही ठिकाणी जोरात उंबऱ्यात येऊन पोहोचलेली ,

आता दिवाळी ला ४ च दिवस राहिलेले वरती जवळ जवळ सगळी खरेदी झालेली , मावशी नि सगळं ऑफिस धुऊन पुसून एकदम चकाचक केलेलं , आता फक्त माळा लावाच्या , आणि खाली ..... खालची धावपळ म्हणजे टारगेट ला फक्त २ दिवस धावपळ , फोनाफोनि अशी धूम वरचा फ्लोअर दिवाळीच्या २ दिवस आधी सजून एकदम तय्यार , आणि खाली आत्ता कुठे लक्षात आलेलं कि…. अरे….. कंदील नाही लावलेले , वरचे उरलेत का काही……., मागच्या वेळेला एक लाइट ची माळ आणली होती तिचे सगळे लाइट सुरु आहे का , साल….. वरच्यानी नको का खाली लक्ष द्यायला……… वरती किती छान सजवलंय ..... आपण काय ***** मुलं का .... एकाच कंपनी मध्ये काम करतो ना .... अशी संभाषण

आणि ह्या खदखदीचा थोडासा सुगावा जेव्हा वरच्या मंडळा ला लागतो तेव्हा urgent बेसिस वर एक छोटा designer आणि ऑफिसबॉय खाली पाठवून थोडे आकाश दिवे , थोडं लाइटिंग करून ऑफिसबॉय पळून जातो , खाली पण एक फुलांचं मोठ्ठ तोरण लावल जात , एक संस्कार भारतीची छानशी रांगोळी काढली जाते , दोन चार पणत्या (मेणाच्या ) पेटवून धनत्रयदिवस साजरा होतो. आणि दिवाळीची ४ दिवसाची हक्काची सुट्टी सुरु होते.


Rate this content
Log in

More marathi story from Gauri Ekbote

Similar marathi story from Inspirational