Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Lata Rathi

Tragedy Others


5.0  

Lata Rathi

Tragedy Others


#ओळख माझी नव्याने#

#ओळख माझी नव्याने#

5 mins 818 5 mins 818

रात्रीचे बारा वाजले.....

भिंतीवरच्या घड्याळाने बारा ठोके दिले... टन...टन..टन...

सरू खडबडून जागी झाली, कळलंच नाही तिला कधी झोप लागली ते.

डायनिंग टेबलवर तिने सर्व सजवून ठेवलं होतं. आज तिने सर्व त्याच्या आवडीचं (मुलगा) बनवलं होतं. अजून एक तास बाकी होता सागरला यायला. 

त्याच्या आठवणीत ती भूतकाळात शिरली. 


   "सागर" तिचा मुलगा. सागरचे बाबा त्यांना सोडुन गेल्यानंतर तिनेच त्याला मोठं केल. सागर फक्त तीन वर्षाचा होता, त्याचवेळेस त्याचे बाबा "सुरेश" त्याचं नाव.... त्यांना सोडून गेले. लग्नाच्या आधीपासूनच सुरेशचं दुसऱ्या कुण्या बाईसोबत लफडं चालु होत. 

  सुरेश चे बाबा हार्ट पेशंट. म्हणून सुरेश घरी काहीं बोलला नाही.... "सरू" ही सुरेशच्या बाबांच्या मित्रांची मुलगी. खूप प्रेमळ, समजुतदार, आणि विशेष म्हणजे नुकतंच तीच post graduation with B. Ed झालं होतं.

बाबाच्या तब्येतीकडे पाहुन सुरेशने लग्नासाठी होकार दिला. लग्नानंतर दीड वर्षातच सागर चा जन्म झाला. एक दीड वर्ष नातवासोबत खेळुन सुरेशच्या बाबाच हार्ट attack ने निधन झालं. 

  नंतर मात्र काही दिवसातच सुरेश ने आपला रंग दाखविण्यास सुरवात केली.

आता सागर तीन वर्षांचा झाला होता. त्याच्या बाबांना समजण्याइतपत तो मोठा नव्हता. सुरेशच्या आईने त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. सरू मात्र खूप शांत राहायची...तिला सुरेशकडून सार कळलं होतंच, पण एक मुलं झाल्यानंतर सर्व ठीक होईल ही तिची वेडी आशा....

   पण सुरेश ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पुत्र प्रेमापेक्षा त्याला "तीच" प्रेम जास्त महत्वाचं वाटलं...

 वेडाच झाला होता तो तिच्या प्रेमात....

   जास्त वाद घालण्यापेक्षा सरू ने संमती दिली," हो, तुम्ही जाऊ शकता "तिच्यापाशी" ...

पण माझी एक अट आहे, माझा सागर मात्र माझ्यापाशी राहील... " 

सुरेश- अग, हो...तूच ठेव सागरला तुझ्यापाशी....(खरं तर त्याला सागरच्या पितृत्वाची जबाबदारी नकोच होती)

   शेवटी पत्नी, मुलगा,आणि जन्मदात्री आई या सर्वांना सोडुन तो गेला तिच्यापाशी.

 खरंच "प्रेम कीती आंधळं असतं ना".....

ज्या आईने जन्म दिला...आणि जिच्या उदरातून त्याचा वंश जन्माला आला......त्यांची सुद्धा काळजी नाही....

वारे!!वा!!! 


  सरूला ह्या सर्वातून सावरायला थोडा वेळ लागला. 

पण सागर आणि सासुतुल्य आईकडे बघून ती लवकरच सावरली. 

तिच्या सासुबाई तिला खूपदा म्हणायच्या, खूप दुःख होत ग मला, तुला असं बघुन.... तुझ्या सासर्यानी किती हौसेने तुला सून म्हणून या घरात आणलं होतं... पण नशिबाने खूप थट्टा केली गं तुझी....

पण....

 आता बस....!

तू ना, दुसरं लग्न कर....आणि सुखी हो. 

मी काय गं! पिकलं पान... 

आज आहे उद्या नाहीं?

तू तरनिकाठी पोर....,कस करणार मी नसल्यावर.

सरू- आई, नका हो असं म्हणू?

निदान तुम्ही तरी मला दूर नका करू हो.... मला मुलगी मानता ना तुम्ही....मग मुलगी या नात्याने मी आज शपथ घेते

"मी तुम्हाला सोडून मुळीच जाणार नाही" ....

आईच्या डोळ्यातून पाणी आलं, ज्याला मी नऊ महिने पोटात वाढवलं, तो माझा मूलगा......मला सोडून गेला, पण ही दुसऱ्या घरून आलेली पोरं.... किती माया लावलीय हीन मला....

त्यांनी तिला मिठीत घेतलं, "कोणतं पुण्य केलं ग मी, ज्याकरीता तुझ्यासारखी सून मिळाली..."

असं हे सासू-सुनेच नजर लागावं असं प्रेम.....


    आता तिने नोकरीसाठी अर्ज करणं सुरू केलं. तिच्यातील कर्तुत्वाने तिला एक शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. तिच्यातले उत्तम संस्कार मुलांना सस्कारित करीत होते. खूप आवडीची शिक्षिका होती ती सर्वाची. 

अश्यातच तिची "आदर्श शिक्षिका" म्हणून निवड झाली....

सागर कडे आई लक्ष द्यायच्या....

आईचे आणि आजीचे खूप चांगले संस्कार घडले त्याच्यावर.


   आता सागर मोठा झाला, बारावी खूप चांगल्या मार्कानी उत्तीर्ण झाला. पुढील शिक्षणासाठी मुंबई येथे गेला, आयआयटी मधून graduation करून तो MS करण्यासाठी अमेरिकेला गेला.

--------------------------------------

टन.... घड्याळात एक चा ठोका वाजला ....बापरे !एक वाजत आलाय....आता एवढ्यात सागर येईलच...म्हणून ती आरतीच ताट घेऊन तयारच होती...एवढ्यात टॅक्सी आली, सागर गाडीतून उतरला, आईने त्याच औक्षवन केलं...तो आई आणि आजीच्या पाया पडला.

जेवणं झाली....खूप उशीर झाला म्हणून सागर झोपायला गेला....

दुसऱ्या दिवशी सागर फ्रेश होऊन लवकरच उठला, आई, अग ऐक ना...

आई-बोल ना बेटा... ऐकतेय मी..

सागर- आई मला परत अमेरिकेला जावं लागणार, तिथलं ऑफर लेटर आलंय मला... 

आईला मिठी मारून," पण आई माझी एक अट आहे, ऐकशील ना....!

तुम्ही दोघीही माझ्यासोबत येणार असाल तरच मी जाईन... आता मी तुम्हा दोघींना सोडून नाही जाणार...

याल ना तुम्ही दोघी...

आई- बाळा, कसं शक्य आहे रे हे...

तुला माहिती आहे, आता माझं retirment जवळ आलंय...

पण...

माझं एक स्वप्न आहे, ते पुर्ण करायचंय मला..तू उच्च शिक्षण घ्यावस हे माझं स्वप्न तू पूर्ण केलंस... आता दुसरं स्वप्न..

आपल्या समाजात कितीतरी महिला निराधार आहेत, त्यांना कुणीच नाही,छोटी-छोटी मुलं पदरात टाकून कुणाला नवऱ्याने टाकून दिलय, तर कोणि अनाथ आहेत... अश्या महिला आणि त्यांच्या मुलांसाठी मला काहीतरी करायचं आहे रे...

आपण सोबत नक्कीच राहू रे .

सागर-ठीक आहे आई," खूप अभिमान वाटतो मला तुझा, मी मी तुझा मुलगा आहे म्हणून" .

सरू- बेटा, अश्या महिलांना रोजगार मिळावा म्हणून मी एक संस्था चालवणार आहे. आणि त्यात त्यांच्या आवडीनुसार प्रशिक्षण देऊन त्यांना आपल्या पायावर उभं करण्याचा माझा मानस आहे. 

सागर- आई, तू तुझं स्वप्न पूर्ण कर... पण आई मला निदान एक वर्ष तरी तिथे जॉब करावाच लागेल...पण त्यानंतर

Promise.... मी परत येईन ,आणि तुम्हासोबत राहीन.

--------------------------------------

  आज सरू ची "दया-क्षमा-शांती" नावाची मोठी संस्था आहे. आई अजूनही तिथे काम पाहतात. 

सुरेश त्यांना सोडून गेल्यानंतर त्या दोघीत माय-लेकीचं नातं निर्माण झालं.


   आज संस्था उघडून पाच वर्षे झालीत. सागर परत आला, त्याचं सुद्धा लग्न झालं," सिया ' सागर ची पत्नी पेशाने डॉक्टर आहे. ती पण सरूसारखीच खूप प्रेमळ, समजुतदार आहे. आपली नोकरी सोडून ती आता गावातच प्रॅक्टिस करते.

सरू आता आजी झालीय, आणि सासुबाई पणजी झाल्यात...तीन पिढया आता संस्थेत एकत्र काम करतायत. आता संस्था पण खूप भरीस आलीय.

एक प्रशस्त इमारत तयार झाली. मोठे मैदान, विविध प्रकारचे गेम्स, खेळणी यांची सुविधा आहे. सर्व सण, उत्सव तिथेच आनंदात साजरे होतात, आपसुकच मुलांवर चांगले संस्कार घडत जावे हाच उद्देश......


  आज सकाळी सकाळी एक महिला अतिशय दयनीय अवस्थेत त्याच्या आश्रम रुपी संस्थेत आली, " मॅडम मला काहीतरी काम द्या, काहीही काम करीन, भांडी घासीन, झाडलोट करीन, फरशी पुसीन....तुम्ही सांगाल ते काम करीन! पण मला काम द्या हो....

 सरूला तिचा चेहरा थोडा ओळखीचा वाटला.....

तिने तिला विचारलं,' 

कोण तू? 

नाव काय तुझं? 

ती- मॅडम....मी....

मी...

(हाथजोडून) सुरेशची पत्नी....

प्लीज! मला माफ करा!!

सुरेशचं लग्न झालं असूनही मी त्याला तुमच्या आयुश्यातून

नेलं.... खूप मोठी अपराधी आहे मी तुमची....

त्याची शिक्षा देवाने दिलीय आम्हाला....

मला माफ करा.

पाया पडते तुमच्या....

सरू- अग , उठ...

ती- एक वर्ष झालय.....सुरेश ला कॅन्सर झाला होता, मी त्याला वाचवायचा खूप प्रयत्न केला, होता नव्हता तो सर्व पैसा लावला.....पण....नाही वाचला तो....

त्याची शेवटची इच्छा होती तुम्हा सर्वांस भेटण्याची....पण मी कुठल्या तोंडाने जाऊ गं....

म्हणत आयुष्याचा शेवट त्याने रडत रडत केला....

सरूच्या डोळ्यात पाणी आलं...

तिचा हात नकळंतच आपल्या कुंकवावर गेला....पण तिने झटक्यात तो हात काढला....

नाही??? तो माझा नव्हताच!.

मग???का??? का ..मी अशी वागतेय....

तिने स्वतः ला सावरलं.

ये, ये...आत ये..

आई- अग, ती कोण? माहितेय ना तुला... तरीपण तू तिला घरात घेत आहेस...

सरू, तू चुकते आहेस??

कधी नव्हे त्या, आई आज ओरडल्या सरुवर....

सरू- अहो, आई, शांत व्हा...

मागचा भूतकाळ मी कधीच विसरले हो...

ही कोण???

कुणाची बायको?

याच्याशी मला काय करायचं

ती आपल्या संस्थेत आलीय....तीच मुळी आधार मिळेल म्हनून...

मग आपण तिची निराशा नाहीं करायची.

ती इथे राहील... पण आपला भूतकाळ विसरून. जश्या इथे सर्व राहतात तशीच.

सरू ने तिला आधार दिला.

   अश्याप्रकारे सरू ने विपरित परिस्थितीतून स्वतःला सावरत स्वतःची एक नवीन ओळख बनवली...

आणि मला आठवल्या...

तुकोबांच्या दोन ओळी

" दया, क्षमा, शांती

तेथे देवाची वसतिRate this content
Log in

More marathi story from Lata Rathi

Similar marathi story from Tragedy