नजरकैद
नजरकैद
जीवन प्रवास छान चालुूहोता कामावरून घरि आलो कि माझी दोन मुले अंगाला बिलगली कि अत्यांनद होत सारा थकवा , विचार '. निघुन जात येतांना लोकलमधून भेटणारी मित्र . बसण्याच्या जागा सारे काही सवयीप्रमाणे स्टेशनवरून दोन चॉकलेट घेणे . सोसायटीत येतांना दुकान दारांनी केलेले स्मित हास्य . शेजारी काकूंनी खिडकत डोकावून पहाणे .वॉचमन ने केलेला रामराम सारे काही स्वछंदी जीवन घरात बायकोचे हास्य व गोड चहा जणू स्वर्ग वाटावा .कणाची नजर लागली आज मी डॉक्टरच्या सल्ल्याने एका अंधार कोठडीत बंद आहे कारण माझ्या शरीरावर पडणारा प्रकाश माझ्या आयुष्याचा अंधार होईल या भितीने डॉक्टर यांनी सांगितले कि निदान १ वर्ष प्रकाश न मिळाला तरच ते पुढील आयुष्य जगु शकतील व इतंराच्या संपर्कात आले कि त्यांचेही जिवन अंधारमय होईल ? या भितीने मी ना दिवस वा रात्र कळते .
रात्रीचे बारा वाजतात कि दिवसाचबारा कि आयुष्याचे बारा वाजतात तेच कळत नाही कारण यावरूनही मी माझे जीवन प्रकाश मय जगन वा नाही तेही दैवावर सोडले काळरात्र , भयान रात्र. काळया पाण्याची शिक्षा काय असते ते "शब्द" आणि त्यांचा अर्थ तेंव्हाच कळतो " जावे त्यांच्या वंशा " माझा जीवनाचा चित्रपट अचानक फिल्मचा रोल तुटल्याप्रमाणे झाला तो जोडला तरी काही खराब फिल्म कापून चिकटवल्या जातात तशाच माझ्या जीवनाच्या "३६५ " फिल्म खराब होत होत्या . दैवयोगाने पुढील प्रकाशमय जीवन मिळेल या आशेने , मीही सर्व जीवांप्रमाणे "माझे आयुष्य" मीपणा.. ? पैशाने सर्व काही विकत घेवू शकतो हा मानवीगैरसमज व संपतीचा गर्व , सारे काही क्षुद्र आहे याची कल्पना व त्या शब्दांचा अर्थ मला आज कळतो . मीही त्याच स्वार्थी मानवी बाजारात तसाच वागत होतो . लाथ मारीन तेथे पाणी काढीन ,स्वतः बना स्वतःचे स्वप्नांचे शिल्पकार ?
निर्सगातील सर्वात बुद्धिमान मानव प्राणी आहे हा सर्व मानवजातीचा झालेला गैरसमज केवळ एक सूक्ष्म विषाणू (व्हायरस) वाट लावू शकतो तेंव्हा त्याच्या ' मर्यादा ' हतबलता ' आणि बुद्धिची निर्सगालाच किव येते व पर्याय उपाय ही तोच करतो तेंव्हा या पाणी देहाला कळते विक आपण म्हणजे "पंचतत्व " वहि देह म्हणजे " पंचमहाभूते " मी ही एक जिवंत भूत आज या काळ कोठडीत केवळ नशीब ' दैव " आशा .. यावर निष्ठा ठेवून एक जिवंत मृतदेह म्हणून जगत आहे का ? आणि कशासाठी याचे उतर मला तुमच्या कडून पाहिजे मी कुणाच्या नजर कैदेत आहे . व कुणाच्यासाठी जगत आहे व जगत होतो हे मेल्यावर कळेल इतरांना मात्र मला केंव्हा कळेल मी खऱ्या कोणत्या कैदेत आहे.
