नजाणत्याप्रेमाचीजाणीवकाकरुनदिल
नजाणत्याप्रेमाचीजाणीवकाकरुनदिल


ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी कॉलेज मध्ये होतो.माझे कॉलेज हे घरापासून 45 किलोमिटर दूर होते.जाण्या येण्यासाठी रेल्वे असल्याने प्रवासाचा कंटाळा येत नसे आणि त्यात पण कॉलेज हे शहरात असल्याने तर अजिबात कंटाळा येत नसे. मी तसा या आधी देखील शहरात राहिलेलो होतो.म्हणजे मला शहरातील सर्व चांगल्या वाईट गोष्टी आणि तेथील राहणीमान एकंदरीत मी नागरी संस्कृतीशी परिचित होतो. परंतु फक्त थोड्या प्रमाणात पण आता मी शहरात कॉलेज ला शिकायला आलो आणि ते पण शहरातील सगळ्यात मोठ्या आणि नावाजलेल्या कॉलेज मध्ये मी शिक्षण घेणार होतो.मी कॉलेज ला जाण्यासाठी सकाळी उठून सहा वाजता रेल्वे पकडायचो आणि मंग ठीक एक तासात मी कॉलेज मध्ये असायचो. माझ्या स्टेशन वरून कॉलेज पर्यंत चार रेल्वे स्थानक लागत असत.असाच मी माझ्या रोजच्या जीवनात व्यस्त असायचो.
असच एकदा मित्राकडून कळले की आपल्या कॉलेज मध्ये काव्यवाचन स्पर्धा होणार आहे .मला तसा कविता सादर करण्यात आनंद मिळायचा मंग मी पण कॉलेज मध्ये कविता सादर केली आणि तेथूनच मी सगळ्यांच्या नजरेत आलो तसेही आधी बऱ्याच संमेलनात मी सहभागी झालो होतो पण हे संमेलन मला चिरकाळ लक्षात राहील या संमेलनात मला सगळ्यात जास्त प्रतिसात मिळाला आणि भरपूर मित्र मैत्रिणी भेटल्या त्यांनी माझा नंबर घेतला.
कॉलेज मध्ये माझी एक कवी विशेष म्हणजे प्रेम कवी म्हणून ओळख निर्माण झाली.कार्यक्रम सम्पल्यानंतर मी वाचनालयात जात असताना मला मागून कुणी तरी आवाज दिला.बघितल तर ती एक मुलगी होती आणि तिला मी बऱ्याचदा या आधी बघितले होते ती जवळ आल्यावर म्हणाली. तू खूप छान कविता सादर केलीस मी तिला धन्यवाद म्हणालो. तितक्यात तिने मला एक प्रश्न विचारला तू ही कविता कुणासाठी लिहिली आहे.मी म्हणालो नाही तस काही नाही .तिने परत विचारलं तुला gf आहे का ? मी नाही म्हणालो आणि त्या दिवशी तिने माझा नंबर घेतला आणि विशेष म्हणजे ती मुलगी देखील रोज रेल्वे ने प्रवास करत असे माझ्या पुढच्या दुसऱ्या स्टेशन वरून ती बसत असे.तसे तर ती रोज 8 वाजता जी गाडी जाते तिने जात असे पण माहीत नाही तीला जेव्हा कळले मी पहिल्या गाडीने जातो. तेव्हापासून तीने पण त्याच गाडीने येणे सुरू केले. ती गाडी तशी पूर्ण रिकामी असायची मी कधी कधी ज्या डब्यात बसायचो तर एकटाच प्रवासी असायचो.पण आता ती रोजची सोबतीनं झाली होती.मी 4 नम्बरच्या डब्यात बसायचो कारण तो माझा आवडता अंक आहे .ती जाताना पूर्ण अर्धा तास सारखी गप्पा मारायची.ती माझ्यापेक्षा 1 वर्षाने लहान होती पण बोलताना अस वाटायचं की ही खूपच मोठी आणि अनुभवी असावी. तशी ती मनाने खूप छान होती.आमची मैत्री काही दिवसातच खूप घट्ट झाली होती. चुकून जरी एखाद्या दिवशी मी घरी राहिलो की दिवसातून दहा बारा कॉल सहज करायची.आम्हाला एकमेकांशिवाय एक दिवसही करमत नसे.
आमच्यात एक फरक होता तो म्हणजे तिचा आवडता विषय गणित व मला त्या विषयाची सगळ्यात जास्त चीड यायची.कारण माझा आवडता विषय होता इतिहास आम्ही कॉलेज मध्ये लेक्चर झाल्यावर नेहमी सोबत असायचो.सकाळी 6.35 मिनीतापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत आम्हाला घरी परतण्यासाठी रात्री 8 वाजयचे. तो पर्यंत सोबत असायचो पण कधीही माझ्या मनात तिच्या बद्दल वाईट विचार आला नाही. कारण मी तिला फक्त माझी एक जवळची मैत्रीण समजत होतो. पण मी तिच्या मनातील भावना कधी समजूच शकलो नाही आणि तिनेही कधी स्वतःहून मला तसे काही सांगितले नव्हते.परंतु आज अचानक तिला काय झालं माहीत नाही पण एके दिवशी सकाळी भेटली आणि तिने आधी थोडं भीत भीत आणि नंतर पाणावल्या डोळ्यांनी तिने तिचे मन रिते केले. तेव्हा कुठे मला कळले की तिला मी पहिल्यापासून खूप आवडतं होतो .परंतु तिच्या मनातील मी ऐनवेळी जाणू शकलो नाही आणि तीही त्या वेळी तिच्या मनातील प्रेम ओठांवरती आणू शकली नाही .का आणू शकली नसेल ती मनातील प्रेम ओठाणवर ? का जाणू शकलो नाही मी तिच्या मनातील माझ्या विषयी असलेले प्रेम ?
त्या दिवशी सकाळी जे ती भरभरून बरसून गेली ते परत कधी बरसलीच नाही. तरी देखील मला कळल्यापासून ती मला आवडायला लागली पण ती तेव्हा नेमकी दूर गेली. कुठे गेली ? का गेली ? काहीच माहीत नाही पण जाता जाता ती माझ्या मनात जे प्रेम निर्माण करून गेली ते मला आयुष्यभर पुरेल इतकं प्रेम ती शेवटच्या भेटीत देऊन गेली आणि माझ्यासमोर एक मोठा प्रश देखील . तो असा की जर सोडूनच जायचं होतं तर मी न जाणत्या प्रेमाची का जाणीव करुन गेली
मी न जाणत्या प्रेमाची जाणीव तिने मला का करून दिली....