Jalindar Barbade

Others

2.1  

Jalindar Barbade

Others

बहिन भावचे नाते

बहिन भावचे नाते

3 mins
3.0K


रक्षाबंधन म्हणजेच बहीण भावाचा असलेला सण. या सणाला बहीण आपल्या भाऊरायाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. असे म्हंटल्या जाते मंग ती बहीण रक्ताची असो वा नसो पण ज्याला बहीण नाही अशा भावाची काय अवस्था होत असेल .या रक्षाबंधनाच्या सणाला त्या भावाच्या असलेल्या मनातील भावना नक्की काय असतात हेच आपणास या कथेत कळणार आहे.

    माझे नाव जालिंदर पण माझ्या घरचे, नातेवाईक, शेजारचे लोक सर्वच मला भैया या नावाने बोलवत असत जसे जसे कळू लागले तसे तसे नक्की भैया नावाचा अर्थ मला कळू लागला मी इतका दुर्दैवी आहे की मला सगळे भैया जरी म्हणत असले तरी देखील मला ती कधीच भैया म्हणाली नाही जीचा हा हक्क आहे ती म्हणजे बहीण.मी माझ्या आई वडिलांचे दुसरे अपत्य माझ्या जन्मांन्तर त्यांना मुली झाल्या दोन जुळ्या पण त्या माझ्या आईच्या गर्भातच मृत्यू पावल्या होत्या. त्यामुळे मला आपण जीला सक्की किंवा रक्ताची बहीण नव्हती.

            जस जस मी मोठा होत गेलो तस तस मला बहिणीची कमतरता भासू लागली. रक्षाबंधन आलं की मी उदास होत असे. कारण त्या दिवशी माझ्या सगळ्या मित्रांच्या हातात राखी असायची मात्र माझा हात तसाच रिकामा असायचा. शाळेत गेल्यावर मित्र चिडवायचे हातात राखी नाही म्हणून मग मी वर्गात दुसऱ्या दिवशी आईच्याच हाताने राखी बांधून शाळेत जात असे आणि मित्रांना सांगत असे की बग माझ्या हातात पण राखी आहे .मला तशी चुलत बहीण देखील आहे आणि मावस बहीण देखील आहे पण एका म्हणी प्रमाणे " दांडाचं पाणी दांडालाच जातं "अशाच पद्धतीने असतात हे नाते. आपण त्यांना कितीही आपलं केलं तरी शेवटी आपलं ते आपलंच असतं असंच मला वाटायचं. असेच दिवसामागून दिवस जात होते. तसेच मीही मोठा होत गेलो आणि अनुभवातून म्हणा की वाचनातून म्हणा पण मला हे तर नक्की कळालं होत नातं जर टिकवायचा असेल तर ते मनापासून जोडलेलं असलं पाहिजे कारण रक्ताचे नाते हे जर मनाने जोडले गेले नसेल तर ते लवकर तुटतात.

            मी देखील असच केलं मला कुणी भैया किंवा मामा म्हणावे त्यासाठी नाते रक्ताचेच असले पाहिजे अस तर नाही ना.देवाच्या आशीर्वादाने म्हणा किंवा माझ्या मानसिकतेच्या बळावर म्हणा माझ्या शेजारीच राहत असलेल्या दोन गोडस आणि निर्मळ मनाच्या मुलींचा मी भाऊ झालो. मला त्यांच्या रुपात जणू देवाने पूर्वी रक्ताच्या नात्यातून ज्या हिसकावून घेतल्या होत्या त्याच परत दिल्या की काय असं वाटतं.त्यांचे नाव उज्जवला व सलोनी. त्यांना जेव्हा ओवाळायच ताट देखील पकडता येत नसे तेव्हापासून तर आजवर त्या न चुकता मला मला ओवाळायला रक्षाबंधनसाठी व दिवाळीला येतात त्या दोघी देखील मला जालिंदर दादाच म्हणतात.माझी चुलत आणि मावस बहीण देखील आता दिवाळीच्या सणाला येतात.आधी कुणाचा भाऊ नसलेला मुलगा आज 4 मुलींचा भाऊ व 4 मुलींचा मामा झालो आहे ते फक्त एकाच कारणाने ते म्हणजे नातं. हे मनाने जोडल्या कारणाने कारण की रक्ताचे नाते तरी कुठे आयुष्यभर टिकतात पण मनापासून आणि माणुसकीने जोडलेल नातं हे नक्कीच दीर्घकाळ टिकते .

     जसे की लोक म्हणतात की आई ही आपली पहिली गुरू असते. तसेच हे ही सत्य आहे की बहीण ही आपली सगळ्यात पहिली मैत्रीण असते 

कविता ,कोमल,रुपाली,उज्जवला, सलोनी तनुजा आणि हर्षु हा अनुभव मला माझ्या बहीण आणि भाची कडून आलेला आहे. खरंच बहीण भावाचं नातं हे एका धाग्याने किंवा रक्ताने नाही तर ते ह्रदयाने जोडले जाते आणि आज समाजात बघता आपल्याला बहीण भावाची नाती ही स्वार्थासाठी जोडलेली दिसतात.    

        माझ्या अनुभवातून मला जाणवले की लग्न झाल्यावर बहीण भावाच्या नात्यात दुरावा निर्माण होण्यास सुरुवात होते याच नेमकं कारण काय हे आजवर कळू शकले नाही .बहीण ही फक्त बहीण असते तुमची असो माझी असो ती बहीण असते रक्ताची असो किंवा ह्र्दयची जोडलेली असो बहीण बहीण असते .फक्त तिला गर्भात मारू नका नाहीतर उद्या प्रत्येक भाऊ म्हणेल जर एक बहीण मलाही असती.

रक्षाबंधनाच्या सगळ्या बहीण भावना हार्दिक शुभेच्छा...


Rate this content
Log in