निर्णय
निर्णय
जेव्हा केव्हाही आपण काहीतरी चांगलं करायला जातो तेव्हा आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न ही हेच लोक करतात आणि जेव्हा आपण काहीतरी चांगलं करून दाखवतो तेव्हा श्रेय घ्यायला देखील हेच लोक पुढे येतात. आयुष्यात हे लोक नेहमीच आपल्या सोबत असतील काही वेळेस आपल्याला पुढे ढकलून रिकामे होतील तर काही वेळेस मागे खेचण्याचा प्रयत्न करतील.
आपल्याला ठरवायचं आहे, आपल्या जीवनात आपल्याबद्दल किती निर्णय लोकांना घेऊ द्यायचे आहेत. या जगात जितके चांगले लोक आहेत त्यांच्या कितीतरी पटीने वाईटही लोक आहेत. आपण जर चांगल्या लोकांच्या संगतीत राहण्याच ठरवलं तर आपल्याला चांगलेच लोक भेटतील. आपला लोकांकडे पाहण्याचा जसा दृष्टीकोन असेल तसेच लोक आपल्याला दिसतील. कितीही काहीही लोकांनी सांगितलं तरी शेवटी निर्णय हा आपल्यालाच घ्यायचा असतो, तो मात्र विचार करूनच घेतला पाहिजे.