Daivashala Puri

Romance Others

4.4  

Daivashala Puri

Romance Others

!! निःशब्द !!

!! निःशब्द !!

7 mins
1.3K


  थंडीचेे दिवस होते वातावरणात छान गारवा होता. मुक्ता  संध्याकाळी सातच्या सुमारास ऑफिसहून आली. फ्रेश झाली तो पर्यंत सुरेखा मावशीनी (कामवाल्या मावशी त्या सरव्हंट रूम मधे तिथेच रहातात ) मस्त गरम गरम काॅफीचा प्याला आणला व मुक्ताच्या समोर ठेवंत म्हणाली," घे बेटा काॅफी..."आणि आपणही तिथेच खाली बसली. मुक्ताने बॅगेतील लॅपटॉप काढुन टेबलवर ठेवला व उघडून चालू करायला लागली. तेवढ्यात सुरेखा मावशी बोलली,"आधी काॅफी घे बर बेटा ...थंडगार झाली असेल.. " आणि मुक्ताच्या हातात काॅफीचा प्याला दिला . 

मुक्ता काॅफीचा प्याला हातात घेत म्हणाली ," तु का घेत नाहीस .." त्यावर सुरेखा मावशी म्हणाली," ठेवलाय माझा चहा. झाला की आणते " (सुरेखा मावशीला काॅफी आवडायची नाही) "घेऊन ये तुझा चहा...दोघी सोबत घेऊ ना आपण..  तूच तर माझी माय, मावशी सारे कांही आहेस.. आणि मी तुझी ." मुक्ता म्हणाली. दोघींनाही एकमेकींचा खूप लळा होता. 


मुक्ता सोज्वळ, सुस्वभावी मुलगी आहे. ( मुक्ताचे आई बाबा गेले (मृत्यू पावले) आणि मुक्ता शुद्धीवर येऊन घरी आली तेंव्हा डाॅक्टर काकानेच मुक्ताच्या घरचे काम करण्यासाठी  सुरेखा मावशीला पाठविलेले होते.... आणि मागील पांच वर्षापासून त्या मुक्ताच्या सोबतीला तिच्या मोठ्या बंगल्यात सरव्हंट रूममध्ये रहात होत्या. त्या स्वभावाने फार प्रेमळ होत्या ... अगदी स्वतःच्या मुली सारखा जीव लावायच्या मुक्ताला.)

       सुरेखा मावशीही चहा घेऊन आली व दोघींनी गप्पा मारत मारत चहा काॅफीचा आस्वाद घेतला. 

   कप उचलून घेऊन आत जाता जाता सुरेखा मावशी म्हणाली," आता तू आराम कर मी स्वयंपाकाचे बघते. " आणि स्वयंपाक घरात निघुन गेली.  

    मुक्तानेआपला लॅपटॉप ओपन केला आणि ऑफिसचे कांहीतरी काम करीत बसली. काम करता करता ..खूप वेळ झाला होता. 

तेवढ्यात सुरेखा मावशीनी आवाज दिला,"जेवायला चल मुक्ता , साडेनऊ वाजले आहेत. "

 लॅपटॉप तसाच चालू ठेवला आणि डायनिंग टेबलवर मुक्ता जेवायला आली . मुक्ताचा म्हणजे तिच्या वडिलांचा हा  बंगला खूप मोठा होता. एवढ्या मोठ्या बंगल्यात फक्त 

ती एकटीच आणि तिच्या सोबतीला आता सुरेखा मावशी होत्या.

   त्यांना ही कोणंच नव्हते...त्यांचे पती तीन - चार वर्षापुर्वीच निधन पावले होते.... मुलबाळ काही झालेच नव्हते त्यांना. ४९-५० वर्षे वय असेल त्यांचे .

  मुक्ता आणि मावशी दोघींनीही जेवण केले व मुक्ताने पुन्हा लॅपटॉपवर काम सुरू केले....

सुरेखा मावशीनी स्वयंपाकघर आटोपून मुक्ताला म्हणाली," मुक्ता मी आता झोपायला जाते गं sss तू पण झोप बरं आता खूप वेळ झाला आहे " असे म्हणून सुरेखा मावशी निघाली ...  

     मुक्ताने टाइम पाहिला रात्रीचे ११ वाजले होते... तिनेही लॅपटॉप बंद करायला घेतला... 

बंद करता करता चला जरा मैत्रीणींशी चाटींग करूया म्हणून तिने फेस बुक उघडले तर एक फ्रेंड रिक्वेस्ट आलेली होती ...

मुक्ताचे अगदी बोटावर मोजण्या इतके कमी मित्र मैत्रिणी होते ....


   तिने नेहमी प्रमाणे दुर्लक्ष केले.... आणि बेडवर जाऊन झोपली....

दुसरे दिवशी उठून पुन्हा रोजचाच दिनक्रम ....

असे दिवसांमागून दिवसं जात होते ....


  मुक्ता रोजच्या प्रमाणे ऑफिसला निघाली पण आज तिला ऑफिसला जायला जरा उशीरच झाला होता.

ऑफीसला पोहोचल्यावर ..तिने पर्स टेबलवर ठेवली तेवढ्यात बाॅसचा शिपाई आला आणि म्हणाला," मॅडम, तुम्हाला सरांनी बोलावले आहे. आगोदर पण मी एकदा येवुन गेलो... मॅडम ." 

मुक्ताने हातातील घड्याळात पाहिले... बराच उशीर झालेला होता... 

मुक्ताला वाटलं आता बोलणे मिळणार बाॅसचे... ती जरा घाबरतच बाॅसच्या केबीनमधे गेली आणि म्हणाली," Good morning Sir " बाॅस म्हणाले," गुड माँर्निग, या या मॅडम... बसा... मी मुंगेला पाठवले होते..." ( मुंगे म्हणजे बाॅसचा शिपाई) मुक्ता मनात घाबरली होती...," म्हणाली साॅरी सर, मला जरा उशीर झाला ऑफिसला यायला...." 

त्यावर कांहीच न बोलता बाॅसनी एक पाॅकेट तिच्या समोर ठेवले आणि म्हणाले," मॅडम, उघडून वाचा ते " 

  मुक्ताला मनात खूप टेन्शन आले होते. थरथरत्या हाताने तिने ते पाॅकेट उघडले आणि आतला पेपर काढून वाचायला घेतला. वाचताना तिच्या चेह-यावरचे भाव आपोआप बदलत होते..

भीतीच्या जागी आता तिच्या चेह-यावर आनंद झळकू लागला..तिला खूप आनंद झाला. "खूप खूप थँक्यू सर " मुक्ता  बाॅसला म्हणाली. बाॅस नी उठून तिच्या हातात हात मिळवत, "congratulations madam" म्हणून पुष्पगुच्छ मुक्ताला दिला...आणि बेल वाजवली तसे बाॅसच्या बेलची वाटपहात अगोदरच दाराबाहेर थांबेलेलेऑफिस मधील सर्वच्या सर्व कर्मचारीवृंद बाॅसच्या केबीनमधे घोळक्याने घुसले व मुक्तावर अभिनंदनाचा जसा वर्षावच सुरू झाला. 

       सर्वांनी मुक्ताचे अभिनंदन केले. शुभेच्छा दिल्या. सर्वांनी मिळून मुक्ताला नवीन केबीनकडे नेले. केबीन भरपुर मोठी होती... बसायला मोठीच्या मोठी खुर्ची होती. खूप मोठा चकचकीत टेबल- भेटायला येणा-यासाठी  टेबल समोर सहा सात  खुर्च्या. फार सुंदर आणि मोठी केबीन होती.

     मुक्ताला खुर्चीवर स्थानापन्न करून सर्वजण पापापल्या जागेवर जाऊन बसले..

मग मुक्तानेही पार्टी लवकरच देईन या हमीवर सर्वांसाठी छानसा नास्टा ऑर्डर केला.

      आजचा दिवस मुक्ता साठी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा होता..दिवस छान संपला. मुक्ता खूप आनंदात घरी निघाली... जाताना घरी पेढे घेऊन गेली.  

  मुक्ता आज खूपच आनंदी होती. तिने बाहेरून मावशीला हाक मारली. सुरेखा मावशी लगबगीने बाहेर आली ," काय झालं बेटा मुक्ता ?" तशी मुक्ता हसंत मावशीच्या गळ्यात पडली. मुक्ताचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता. "आज खूप खुश दिसतेस बेटा काय विशेष आहे " मावशी म्हणाली. तेंव्हा आनंदुन मुक्तानेे मावशीच्या हातात प्रमोशन ऑर्डरचा लिफाफा ठेवला आणि  म्हणाली,"मावशी तुला माहिती आहे का यात काय आहे ते..बघ बघ जरा " (मावशी सातवी पर्यंत शिकलेली होती) मावशी तो लिफाफा उघडत म्हणाली,"मला बापडीला यातलं काय कळंत. हे तर इंग्रजीत आहे " मुक्ता म्हणाली," मावशी माझे प्रमोशन झाले आहे.... खूप मोठे पद मिळाले आहे. आणि सोबत जिम्मेदारी देखील"असे म्हणून पेढ्यांचा बाॅक्स मावशीच्या हाती ठेवला. मावशीने देवाजवळ पेढा ठेवला आणि दोन्ही हाताने नमस्कार करीत  म्हणाली," देवा, असेच नेहमी आनंदी ठेव माझ्या मुक्ताला "


  दुसरा पेढा घेऊन मुक्ताला भरवला. तिलाही खूप आनंद झाला होता. 

मुक्तानेे ही मावशीला पेढा भरवला. मग नेहमी प्रमाणे मावशी मुक्ता साठी काॅफी आणि स्वतः करता चहा घेऊन आली. दोघींनी चहा काॅफीचा आस्वाद घेत खूप खूप गप्पा मारल्या. मग सुरेखा मावशी स्वयंपाक घराकडे निघता निघता म्हणाल्या," आज तुझ्या आवडीची खीर - छोले - पुरी बनवते मस्त...आटोप आता फ्रेश हो "

 "अरे हो गडे. फ्रेश व्हायला तर विसरूनच गेले ना आनंदाच्या भरात " असे म्हणून मुक्ता फ्रेश व्हायला गेली. फ्रेश होऊन गोड आवाजात काही तरी गुणगुणत बाहेर आली. आणि लॅपटॉप उघडला आणि तिच्या प्रमोशन विषयीची पोस्ट तिने फेस बुकवर टाकली.  

    क्षणभर विचार केला व मनातच बोलली,"चला आज आपल्या मित्रमैत्रिणींशी मस्त गप्पा मारूया ." तेंव्हा तिने पाहिले तर फ्रेंडरिक्वेस्ट दिसली.... त्या दिवशीची. मुक्ता आज खूपच खुश होती त्या खुशीतच तिने ती फ्रेंडरिक्वेस्ट मान्य केली. त्याचे नांव मानव असे होते. आणि आपल्या मैत्रीणींशी बोलू लागली. तेवढ्यात मानव कडून मेसेज आला ," हाय,मी मानव. खूप खूप अभिनंदन प्रमोशन बद्दल "


मुक्तानेे तो मेसेज वाचला. तिच्या मनात विचार आला , याला कसे माहिती माझे प्रमोशन... तरीही नकळत तिने ही त्याला उत्तर दिले...मग एकमेकांविषयीची प्राथमिक माहिती दोघानींही एकमेकांना दिली. मावशी तिचे जेवण वगैरे झाल्यावर  झोपायला गेली...

     दुसरे दिवशी रोजच्या प्रमाणे नित्यक्रम होता. पटापट आटोपून मुक्ता ऑफिसला गेली. त्या नवीन भव्य केबीनमधे बसताना ती खूप खुश होती....

   त्याच आनंदात आज तिचा दिवस संपला होता .घरी येऊन नेहमी प्रमाणे आटोपून मुक्ताने लॅपटॉप उघडला.... मानवचा मेसेज आला होता. "कसा गेला आजचा दिवस" वगैरे चौकशी केली होती. का कोण जाणे मानवचा मेसेज वाचुन मुक्ताला खूप बरे वाटले.... मुक्तानेही मेसेजचे उत्तर दिले. 

   असेच दिवसं निघुन जात होते. मुक्ता आणि मानव यांच्यात आता सतत मेसेजेची देवाण घेवाण होत होती.. फेस बुकवर का होत नाही पण आता त्यांची चांगलीच घट्ट मैत्री झाली होती.

   ब-याचदा बोलण्यातून मानव तिला भेटण्याची इच्छा व्यक्त करायचा पण कधीही त्याने मुक्ताकडे फोटो वगैरे ची मागणी केली नव्हती ..की नात्यागोत्याची विचारना ही केली नव्हती ...

       पण मुक्ता प्रत्येकवेळी कांही ना कांही कारण देऊन भेटण्याचे टाळत असे.. 

     मुक्तानेही त्याला कधी पाहिले नव्हते तरी ही मुक्ताला आता मानव खूपआवडायला लागला होता. ती नकळत त्याच्यावर मनातून प्रेम करायला लागली होती.... पण तिला मानवची मैत्री कायम हवी होती म्हणून मुक्ता त्याला भेटायचे टाळत होती... 

       असाच खूप कालावधी निघून गेला...

त्यादिवशी मुक्ताचा वाढदिवस होता... शुभेच्छाचा सर्वांत पहिला मेसेज मानवचा आला होता. मुक्ताला खूप आंनद झाला.. आटोपून मुक्ता ऑफिसला गेली .दुपारी लंच टाईम होता तेवढ्यात मोबाईल वाजला...मानवचा फोन होता... मुक्ताने फोन घेतला मानव तिकडून बोलू लागला," हॅलो माय स्वीट फ्रेंड, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, आज ऑफिस सुटले की आपण भेटणार आहोत कोणतेही कारण आज चालणार नाही त्यामुळे मी तुला येण्याबद्दल विचारलेले नाही तर मी तुला हक्काने सांगीतलेले आहे. कुठे यायचे तेवढे सांग" मानव अगदी हक्काने बोलत होता. 

   मुक्ता मनात खूप सुखावली परंतु आता कसे भेटावे त्याला हा तिच्यापुढे मोठा यक्ष प्रश्न होता..

    ऑफिस सुटण्यापुर्वी अर्धा तास अगोदर बरोबर मानवचा फोनआला.तो म्हणाला , "मुक्ता तू अद्याप सांगीतले नाही कुठे यायचे ते. तुझ्या ऑफिसला येऊ का?"

ती लगेच बोलली," चालेल "

     १५ मिनिटांतच मानव पोहोचला. तिची केबीन शोधत आला तिच्या केबीन कडे आणि डायरेक्ट मुक्ताच्या समोर येऊन उभा राहिला.. 

मुक्ता बघतच राहिली त्याच्याकडे..

एक एकदम हँडसम अंदाजे ३०-३५ वर्षांची व्यक्ती हातात सुंदर फुलांचा गुच्छ अंगात हलकासा निळसर शर्ट, काळी पॅन्ट असे फाॅर्मल कपडे 

घातलेले तिच्या समोर उभी होती.....

मुक्ता स्तभ होऊन बघतच राहिली त्याच्याकडे... 


मानव म्हणाला," अरे हॅलो , मुक्ता, मी मानव ... " हे ऐकून मुक्ता स्वप्नातून खाडकन जागी झाल्यासारखी भानावर आली आणि त्याला म्हणाली," ये ये बैस ना.. साॅरी मी जरा माझ्या...."तेवढ्यात मानवने तिचे बोलणे मधेच थांबवत तिच्या हातात पुष्पगुच्छ देऊ लागला...पुष्पगुच्छ घेण्यासाठी मुक्ता धडपडली..काय करावे कसे उठावे तिला कळेना... उठण्याच्या प्रयत्नात होती ती.... लगेच मानव म्हणाला,"असुदे कांही हरकत नाही. जागेवर बसुनच घे.." 

तिच्या हातात पुष्पगुच्छ देत म्हणाला," मुक्ता, वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा तुला "आणि तिच्या समोरच्या खुर्चीत बसला.. आणि पुन्हा म्हणाला," चल आटोप आता लवकर लवकर निघुया आपण ." 

   आता मात्र मुक्ताची खूप तारांबळ उडाली.. अखेर तो क्षण आलाच होता ज्या क्षणाची तिला भीती होती. त्याच्या भेटीचा... 

    तिला खूप टेन्शन आले होते की, " मला भेटून हा किती आनंदात दिसतो आहे पण हा त्याचा आनंद क्षणभंगुर तर नसेल ना? मला असे पाहून त्याची काय अवस्था होइल" हा विचार करून क्षणोक्षणी तिचे टेन्शन वाढत होते. आता निघायचे होते. आता तो क्षण आला होता. मुक्ता आपल्या टेबलच्या ड्रावरमधे ठेवलेल्या दोन्ही कुबड्या खाली वाकून काढणार तेवढ्यात मानव तिच्या जवळ गेला आणि तिच्यापुढे हात करीत म्हणाला," उठ मुक्ता, राहुदे त्या कुबड्या.. माझ्या हातात हात दे बघू तुझा " 

    काय करावे हेच कळेना मुक्ताला... तिनेही कांहीच न बोलता मानवच्या हातात हात दिला.

मानव तिची पर्स एका हातात घेत दुस-या हाताने तिला आधार देत  म्हणाला," चलायचं ? "

मुक्ताने फक्त मान डोलावली.

मानव तिला धरून चालत होता. चालता चालताच तिला म्हणाला," 

मुक्ता तू माझ्या जीवनातील माझी कायमची सहप्रवाशी होशील का? माझ्याशी लग्न करशील का?" 


   मुक्ता पूर्ती गांगरून गेली. 

अचानक हे अनपेक्षित सर्व घडले होते...ती कांहीही न बोलता त्याच्या सोबत चालंत होती. 

  मुक्ताच्या डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रू येत होते.. तिनेही त्या अश्रू ना अडवले नाही ...आनंद तिच्या डोळ्यातून ओसंडून वहात होता... तिने ही वाहूदिले त्याला मनसोक्त ....

  मानव सोबत मुक्ता पुढे पुढे चालत होती... अगदी निःशब्द होऊन.. एकमेकांच्या सोबत ते चालतं होते...एकमेकांना कायमची साथ देण्यासाठी.....Rate this content
Log in

Similar marathi story from Romance