Daivashala Puri

Others

3  

Daivashala Puri

Others

शब्द प्ले लेखन स्पर्धा

शब्द प्ले लेखन स्पर्धा

2 mins
1.4K



      घरात मुलांना आभ्यासाचे वातावरण करून द्यायला हवे .... मुलांना वाटायला हवे की आपल्यासोबत आपल्या घरचे आहेत....वेळोवेळी प्रेमाणे अभ्यासाबाबत विचारपुस करणे...त्याला प्रेशर न देता प्रोत्साहन देत रहाणे त्यामुळे मुलांना अभ्यासाची प्रेरणा मिळते त्यांचे मन प्रसन्न रहायला मदत होते व अभ्यास करायला त्यांना उत्साह येतो..  

        तसे न होता मुलांच्या अभ्यासाच्या वेळेला देखील घरातील मंडळी त्यांच्या आवडीचे कार्यक्रम टीव्ही वर पहात बसतात ..तर मोठ्या मोठ्या आवाजात फोनवर गप्पा करतात..

त्यामुळे अभ्यासात व्यत्यय येऊ शकतो...

   प्रत्येकाची बुद्धीमता एकसारखी नसते याचा विचार न करता ...मुलावंर दडपण आणले जाते मार्क्स मिळवण्यासाठी..

      केंव्हा केंव्हा मुलांनी खूप अभ्यास केलेला असुनही पेपर लिहीताना कांहीच आठवत नाही....

   कधी कधी मुलांना न आवडणा-या व्यक्ती घरी पाहुणे म्हणून येतात तेंव्हा ही मुले खूप डिस्टर्ब होतात...

याचे उदाहरण माझ्या अगदी जवळच्या नात्यातील मुलीच्या बाबतीत 2018 ला घडले...

मुलगी अतिशय हुशार 90% वगैरे परसेंटेज मिळवणारी आहे ...2018 ला ती बारावीला होती पण त्याच वर्षी  तिची चुलत बहिण त्यांच्याकडे राहायला आली शिक्षण घेण्यासाठी...तर तीने फक्त आलेल्या मुलींशी भांडण करण्यातच वेळ घालवला परिणामी तिला फक्त 58%मार्क्स पडले... 

    अपयश आल्यास मुलांना बिलकुल रागवू नये...त्यांना फक्त वेळेचे महत्व सांगावे...

आता अपयश मिळाले हरकत नाही पुढे खूप चांगला अभ्यास करा यश नक्की तुमचेच असेल हे त्यांना पटवून द्दा...मिळालेल्या अपयशा बद्दल त्यांना दोष देऊन टोकंत बसुनये ....

  आजची शिक्षण प्रणाली ही याला भरपुर जबाबदार आहे... आज विद्यार्थी नाही तर फक्त परीक्षार्थीं तयार होतात...जातीत जास्त मार्क्स मिळविले म्हणजे हुशार अशा प्रकारे बुद्धी मापण होते..प्रत्येकाला डाॅक्टर इंजिनिअर व्हायचे असते..परंतु अडमाप खर्च असल्यामुळे गरीब मुलांना संधी मिळत नाही...

योग्यता असुनही निव्वळ शिक्षणासाठी लागणा-या खर्चामुळे ते पुढे जावू शकत नाहीत त्यामुळे परिणामी मुलांच्या मनात उदाशिनता येते यामुळे बेकारी वाढते आणि याला सर्वस्वी आजची शिक्षण पद्धतीच जीम्मेदार आहे...

सर्वांना कमी पैशात शिक्षण घेतायेईल पैशामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांला शिक्षणापासुन वंचित रहावे लागुनये अशी शिक्षणपद्धती हवी..

व्यवसायाभिमुख शिक्षण असायला हवे..


       मुलांच्या उज्वल भविष्यासाठी मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन , त्याचा कल लक्षात घेवुन मुलांना शिक्षण द्यायला हवे...

आपल्या हट्टासाठी मुलांचे भवितव्य खराब करूनये ... तसेच डाॅक्टर इंजिनिअर हेच पर्याय नसुन इतरही खूप चांगले पर्याय उपलब्ध आहेत त्या पर्यायांना देखील तेवढेच महत्व द्यावे...आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इतरांशी आपल्या पाल्याची तुलना करू नये...त्यामुळे मुले स्वतः ला इतरापेक्षा कमी समजायला लागतात. त्यांचा काॅन्फीडंस जातो. मुलांच्या मनात पालकांबद्दल राग निर्माण होतो..

    आपल्या मुलांना अपयश पचवण्याचे शिकवायला हवे खंबीरपणे पुन्हा दुप्पट ताकतीने पुढे जाऊन यश काबीज करायला शिकवायला हवे .

हल्लीच्या मुलांमधे सहनशीलता खूपच कमी असते लगेच राग येतो व टोकाचे पाऊलही उचलायला ते मागे पुढे पहात नाहीत...

   त्यामुळे आपल्या मुलाचे आई बापंच न राहाता आपण त्यांचे अच्छे दोस्त बना, त्याला समजुन घ्या, त्याला मायेचा आधार द्या...

या सर्व गोष्टींची मुलांना खूप गरज असते...

जीवन अमुल्य आहे....

पुन्हा मिळणार नाही...

आणि अपयशा पेक्षा जीवन खूप महत्वाचे आहे...जीवन असेल तर आपण अनेक अपयशाला पचवुन यशाचे शिखर गाठू शकतो हे मुलांच्या मनात खोलवर रूजवा...

पहा मग भविष्य उज्वल आहे आणि जा पुढे पुढे आपल्या पाल्यांसोबत...


Rate this content
Log in