कोरोना
कोरोना


आपणच आपल्या सुरक्षेची हमी घेऊ आणि देऊ ......
नमस्कार,
मी आपल्यातीलच एक आहे.....
कोरोना या महाभयंकर विषाणूने सर्व जगात थैमान घातले आहे .... आपल्या देशातही कोरोनाच्या महाभयंकर विषाणूने शिरकाव केला आहे.... परदेशातून आपल्या देशात आलेल्या या महामारीला आपण सर्वांनी मिळून हारवायचे आहे. पिटाळून लावायचे आहे.... या महामारीचा मुकाबला करण्यासाठी शासनाला सामान्य जनतेची साथ मिळणे, सहकार्य मिळणे खूप गरजेचे आहे.
दिवसेंदिवस ऋग्णांची संख्या वाढत चालली आहे.....त्यामुळे
चला तर मग आपण सर्व या देशाचे सामान्य नागरिक म्हणून या संकटकाला तोंड देण्यासाठी पुढील काही दिवस आपापल्या घरात राहून या विषाणूच्या संसर्गा पासुन स्वतः ला वाचवू व संसर्ग बाधित असल्यास इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेऊ.... आपले सुज्ञ नागरिकाचे कर्तव्य पार पाडू... ....
शासना कडून वेळोवेळी येणा-या सुचनांचे पालन करू.... आणि आपणच आपल्या सुरक्षेची हमी घेऊ आणि देऊ...
तसे म्हणाल तर या संकटाच्या काळात देखील एक पाॅझीटीव्ह गोष्ट घडते आहे..
आपण चाकरमान्यांना सदा न कदा घड्याळाच्या काट्यावर धावनेच नशीबी असते.... निवांत म्हणून वेळच नसतो आपल्याकडे ....परंतू या कोरोनाच्या महाभयंकर महामारीला हारवायचे असेल तर नाईलाजाने का होईना पुढील काही दिवस आपल्याला आपल्या घरी थांबणे खूप गरजेचे आहे . त्यामुळे आपल्याला आपल्या कुटूंबा सोबत...मुलांसोबत, आपल्या वयोवृद्ध आई-वडील आजी आजोबां सोबत मनसोक्त वेळ घालवण्यासाठी ही ऐती संधी चालून आली आहे....
मुंबईतील अनेक चाकरमान्यांचे कामाचे ठीकाण घरापासुन खूप दूर असते (उदा.अंबरनाथ ते चर्चगेट) वगैरे ... ते जेंव्हा एकदम सकाळी कामावर जाण्यासाठी निघतात त्यावेळी मुले झोपेत असतात व संध्याकाळी जेंव्हा उशीरा घरी पोहोचतात तेंव्हा मुले झोपून गेलेली असतात त्यांना आपल्या लहान सानुल्यां सोबत खेळायचे, त्यांच्याशी बोलायचे तर रविवार किंवा सुट्टीची वाट पहावी लागते ....
आता आपल्या मुलांसोबत खूप बोला त्यांच्याशी संवाद साधा.
कॅरम ,बुद्धीबळ, सापशिडी, अंताक्षरी,गावाच्या भेंड्या यों ना त्यों सगळे सगळे खेळ खेळा... मुलांच्या पुस्तकातील कविता वाचा..लहान मुलांना गोष्टी सांगा... पुरूष असेल तर बायकोच्या संयपाकात उगीच लुडूबुडू करा ती राग दाखवेल पण मनातल्या मनात आनंदी झालेली असेल....
घरात ठेवलेले फोटोंचे आलबम काढून सर्वांसोबत जुन्या आठवणींना उजाळा द्या.... रोजच्या रूटीन मधे घडलेल्या गमती जमती घरातल्याशी शेअर करा.... ऊशीरा झोपेतून उठून दररोजच्या अपु-या झोपेची कमी भरून काढा...
सोबतच स्वच्छतेचे भान असावे ...वारंवार साबणाने हात स्वच्छ धुने, तोंडाला रुमाल लावून खोकलने,शिंक आल्यास तोंडाला रूमाल लावणे ही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे..
मस्त खा स्वस्थ रहा