URMILA DEVEN

Romance

3  

URMILA DEVEN

Romance

नातं तर सारखंच आहे ना !!

नातं तर सारखंच आहे ना !!

5 mins
1.9K


"'या मग लग्नाला" असं म्हणून अमितचे चुलत काका, घरून निघाले.

आणि अमित म्हणाला, "रागिणी सर्वानसाठी आहेर आणि, मोठसं गिफ्ट पण घ्यावं लागेल ग, आम्ही दोघेही सोबतच मोठे झालो, सानूच्या लग्नात परत एकदा मज्जा येणार, तुही सुट्या काढ. आपण सर्वच जावूया"

रागिणी, "अहो, पण तुमची तर ट्रेनिंग आहे ना त्या दिवसांमध्यें आणि खूप प्रयत्न करून तुम्हाला हा चान्स भेटला ना."

अमित, "अरे हो, असूदेत.. करतो मी काहीतरी मॅनेज .. लग्न काय परत परत होणार आहे .. आणि नाही गेलं तर आयुष्यभराचं बोल लागून राहतो."

दोघेही मुलांसोबत लग्नाला हजर, खूप मज्जा आणि आनंदात लग्न आटोपलं.. रागिणीने सून म्हणूं कुठलीच कसर ठेवली नाही अगदीच सानूच्या पाठ्वणीपर्यंत ती तिच्या सोबत होती. चार दिवस मस्तीत घालवून सगळेच घरी पोहचले आणि मग आपापल्या कामाला लागले.

लागल्याचं काही दिवसांनी अमित, "हॅलो रागिणी, अग, जरा आईला फोन कर बरं, तिला बरं नाही म्हणते, आणि हा... त्या शेजारच्या साने काकूला हि करशील, अग त्या बंडायलाही सांग, तो घेऊन जातो ना आईला दवाखान्यात, मी मिटिंग मध्ये आहे, नंतर तुला फोन करतो", आणि रागिणीचं ऐकूनही न घेता त्याने फोन ठेवला.

रागिणीने त्या दिवशी मुलाला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी सुट्टी घेतली होती आणि ती ऑटोत होती. तिलाही रागच आला तरीही मग तिने आधी सासूला फोन लावला पण लागला नाही. मग शेजारी काकूला लावला, त्या बोलल्या, "काय? आताच तर भाजी घेत होतो आम्ही बाहेर ठेलेवाल्या जवळून, मी बघते."

रागिणीने मुलाला डॉक्टरला दाखवलं आणि मग बंड्याला फोन लावला, "कुठे आहेस रे"

बंड्या, "हा काय दवाखाण्याच्या बाहेर. काय ताई? काय नाय? आईला सर्दी झाली आहे आणि जरा बी पी कमी आहे म्हणतो डॉक्टर, इकडे जरा भर उहाळ्यात पाऊस पडला, माझाही घसा खरखर करतोय, हा काय दवाखाण्यातच आहे मी." रागिणीने चौकशी केली आणि नंतर फोन करते म्हणून फोन ठेवला.

फोन ठेवतोच तर अमितचा फोन रागिणीला आला, "अंग रागिणी, बंड्या, आईला घेऊन दवाखान्यात आहे म्हणे मी आत्ताच आईशी बोललो" रागिणी, "हो मी बोलले बंड्याशी, अहो डॉक्टर म्हटले बाळाला एकदा परत दाखवा लागेल .. "

अमित, "असं असं .. घरी आलो कि बोलू आपण .. आणि हा तू आठवणीने आईला फोन कर, काय आहे ना, ती एकटीच असते तिकडे, ह्या वयात प्रेमाचे आणि काळजीचे दोन शब्द ऐकले ना तर आजारपण असच पळून जात, आणि आपण दूर राहून एवढं तर करूच शकतो "आणि अमित ने फोन परत ठेवला.

संध्यकाळी रागिणीने रीतसर सासूची चौकशी केली आणि कामाला लागली, अमित नेहमीप्रमाणे घरी उशिरा आला आणि आल्या आल्या, "रागिणी आईला फोन केला होता, कशी आहे तिची तब्येत आता."

रागिणी अगदीच सर्दीने लाल झालेलं नाक पुसत, "अहो एवढं काय, साधा सर्दी खोकला तर झालाय ...."

अमित, "असं काय बोलतेस तू.आई आहे ती माझी .."

रागिणीने परत तोच एपिसोड लांबू नये म्हणून त्या विषयावर बोलणं बंद केलं आणि स्वयंपाकाला लागली. इकडे अमित मुलांशी खेळत आईशी फोन वर बोलत होता. दुसऱ्या दिवशी परत ऑफीसला जाताना रागिणीला सांगून गेला, "आईला लंच ब्रेक मध्ये फोन कर, काही लागलं तर विचार आपण तस बंड्याला फोन करू मग."

आठवड्या भराने रागिणीचा मामा, त्याच्या मुलीची पत्रिका घेवून घरी आला, आणि रीतसर लग्नाचं आमंत्रण जावयाला दिल, तो जाताच अमित रागिणीला म्हणाला, "काय हे? जरा आधी कळवायचं ना, आता सुट्या कश्या काढणार.. माझं तर काही जमणार नाही .. लग्न तर होतच राहतात ..लग्नानंतर बोलवून घेशील त्यांना आपल्याकडे जेवायला .. माझं मार्च एंडिंग आहे, तू आणि मुलं बघा जमतंय का ?.. आणि माझं जमलंय तरी अक्षदा टाकायला येईल मी .. बाकीचं काही जमणार नाही"

रागिणीला आता मनात राग आला होता पण अजूनतरी तो ती व्यक्त करत नव्हती, तिला वाटलं अजून वेळ आहे लग्नाला .. वळवू अमितच मन .. जेमतेम दहा दिवस झाले असतील, रागिणी मुलांना झोपवून अमितची वाट बघत दिवाणखान्यात विचार करत बसली होती. नेहमीच्या सवयी प्रमाणे अमित ने आल्या आल्या सर्वात आधी विचारलं आईला फोन केला होता.. आणि त्याची तीच कॅसेट सुरु झाली कि आई एकटी असते गावी .. वगैरे ..

रागिणी मात्र गुमान गप्प होती, नंतर म्हणाली, "आईला हॉस्पिटल मध्ये भरती केलंय, पायचा त्रास खूपच वाढलाय म्हणे. कदाचित ऑपेरेशन करावं लागेल अस दादा म्हणत होता. अमित स्वतःच आवरतच म्हणाला, "हमम .. पण आपण काय करू शकतो त्यात .. वयानुसार आता हे होणारच,चल जेवायला घे .. तुझा भाऊ आहेच कि तुझ्या आईला सांभाळायला" रागिणीनेही विषय तिथेच थांबवला. हळूहळू वीस दिवस झालीत पण रागिणीच्या आईला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झालंच नव्हता. रागिणी एकदा भेटून आली होती आणि फोनवर ती बोलत असायची. आता मामाच्या मुलींचं लग्नही जवळ होत. नेहमीप्रमाणे अमित त्या दिवशी घरी उशिराच आला .. आणि परत रागिणीला म्हणाला, "आईला फोन केला होता.... "

आता मात्र त्याचा तोच टेप वाजण्याधी रागिणी जोरातच म्हणाली, "नाही.. नाही केला तुमच्या आईला फोन." तुमची आई हा शब्द ऐकताच अमित टीशर्ट अंगात घालतच पुढे आला. तर रागिणी धसकन बोलली, "हो तुमच्या आईला, साधी सर्दी झाली तरी, दिवसातून तीन वेळा फोन करायला सांगता मला, उलट घरात पाय ठेवत नाही तर त्यान्ची चौकशी असते, तुमची ती आई .. जन्म तिनेच दिलाय ना .. मी तर आकाशातून अशीच पडली .. माझ्या आईला तुमच्या कडून अपेक्षा नसावी तेही तिची तब्यते खराब असल्यावरही. तुम्ही साधी चौकशीही स्वतःहून करत नाही, तुमच्या आईशी जे तुमचं नातं आहे तेच माझ्या आईशी माझं आहे ना .. हो ना...नातं तर दोन्ही बाजूने सारखंच आहे... मग ..

दोन महिन्याधी ट्रेनिंग मधूनहि तुमच्या चुलत बहिणीच्या लग्नाला जायला तुम्हाला वेळ मिळाला आणि आता माझ्या मामे बहिणीच्या लग्नाच्या वेळेस मार्च एंडिंग. नातं तर दोन्ही कडून सारखंच मग मीच का निभवायचं .. उद्या पासून मी तुमच्या आईला फोन करणारच नाही.. मग बघा तुमचं तुम्ही काय उत्तर द्यायचं ते... मी तर तेच करते आहे ना आतापर्यंत .. सांगा तुमच्या लोकांना कि मला वेळ मिळत नाही असं बीस .. बघू नातं कस निभवता ते.. असं म्हणनून रागिणी मोबाईल हातात घेऊन खोलीतून बाहेर निघाली आणि मुलांच्या खॊलीत शिरली. तासाभराने शांत झाली आणि तिने आईची चौकशी करण्यासाठी दादाला फोन लावला तर कळलं कि अमितचा आत्ताच फोन येवून गेला आणि तो आईशीही बोलला. तिने फोन ठेवला आणि तिच्या खोलीत गेली तर अमित त्याच्या बॉसशी सुट्यांबद्दल बोलत होता.

रागिणीची चाहूल लागताच त्याने फोन बंद केला आणि म्हणाला, "रागिणी हो नातं तर दोन्हीकडून सारखंच आहे .. आणि ते मीपण निभवणार, आमच्या मेहुण्याला सांगा काही मदत लागली तर निसंकोच सांगायला आणि मी लग्नासाठी तीन दिवसाच्या सुट्या टाकल्यात .. लग्नाला जातानाच आईला भेटूनही येवू ...सुट्या मी त्याच्यापेक्षा जास्त नाही घेवू शकत .. मार्च एंडिंग आहे."

मग, असतं ना नातं दोन्हीकडून सारखच पण का मग बायकोनेच निभवायचं .. नवऱ्यानेही ते तेवढंच निभवायला हवं .. स्वतःच नातं जपायचं असेल तर ..

मित्र मैत्रिणींनो पटलं असेल ना तर नातं दोन्हीकडून निभवा .. नातं कधीच एकीकडून निभावल्या जावू नये कारण त्या सर्व नात्यांना निभवतांना आपण आपलं नवरा बायकोच नातंही मनातून निभवत असतो ... स्वतःच्या नात्याची एक गाठ घट्ट करण्यासाठी.. अशा लहान सहन नात्याच्या गाठी बांधाव्या लागतात .. कारण नातं तर दोन्ही कडून सारखंच असता ना !!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance