URMILA DEVEN

Others

3  

URMILA DEVEN

Others

माझं स्वांतत्र्य

माझं स्वांतत्र्य

5 mins
1.3K


लतिका पार्टीसाठी तयार होत होती आणि ललितने तिला बजावलं "मेकअप जरा नीट कर, ते डोक्यावर डाग दिसायला नकोत, आणि केस जरा मोकळे ठेव, पाठीवरचे वर दिसत आहेत." आणि मग लतिकाने केस मोकळे करताच ललित तिच्या जवळ आला आणि त्याने अगदीच मोठासा हार तिच्या सेटच्या कलेकशन मधून हातात घेत तिला अगदीच घालून दिला आणि म्हणाला, "काय मस्त दिसतेस गं तू.... लतिका.... खरच खूप सुंदर दिसतेस गं तू ... आज सगळे तुलाच बघतील" आणि तो हसतच खोलीतून बाहेर निघून गेला... लतिका नंतर तयार झाली. आज त्यान्च्या लग्नाचा दहावा वाढदिवस होता. सर्वच जवळचे मित्र मैत्रिणी, नातेवाईक आमंत्रित होते, म्हटलं तर घरी छोटीशी पार्टी होती. जवळपास सर्वांचं आगमन झालं होत आणि सगळ्यांचं लक्ष दोंघाच्या एंट्रीवर होत.... सासू सासरे सर्वांचं स्वागत करत होते. लतिकाचे माहेरचेही हजर होतेच. आणि मग सुंदर फिल्मी स्टाईल मध्ये दोघान्ची हातात हात घालून जिन्यावरून खालच्या मोठया हॉल मध्ये एंट्री झाली.. दागिन्यांनी आणि भारी वजनदार लेहेंग्यात लतिका आणि अति महागड्या शेरवाणीत ललित अतिशय मोहक वाटत होते. ते येताच केक कट्टिन्ग आणि रिंग एक्ससेन्ज सिरेमनी करण्यात आली आणि मग जेवणाला सुरुवात झाली. त्या सगळ्या थाटात लतिका स्वतःला सावरत सर्वांचं हसून स्वागत करत होतीच. तिची वर्ग मैत्रीण त्याच शहरात होती मग आमंत्रित होतीच. ललित कुणासोबत बोलतानाही लतिकाला एकटं सोडत नव्हताच, कधी तिची सासू सोबत असायची तर कधी ललित. लतिका तिची मैत्रीण अदितीला भेटायला आली, अदिती आणि अमित दोघेही दोन दिवसाआधी लतिका आणि ललितला अचानक मॉल मध्ये भेटले होते. अदिती लतिकाच्या अचानक समोर आली होती तिच्या मुलाला एक्सिलेटर वरून पळतांना वाचवतांना आणि ललितने त्या दोघांनाही आजच्या पार्टीचं आमंत्रण दिल होत.

अदिती, "ये लतु, किती गोड दिसते आहेस, आणि काय ग तुला तर असले भारी कपडे मुळीच आवडत नव्हते ना"

तेवढ्यात सासू म्हणाली, "अग तो लाचा मी खास करवून घेतला आहे माझ्या मेत्रीणींच्या बुटीक मधून"आणि मग अदितीने गोड स्माईल दिली आणि लतिकाच्या गळ्यातल्या हाराला हात लावत म्हणाली, "किती सुंदर डिझाईन आहे ग ह्याची, महाग वाटतो.." मग मागून ललितने एंट्री करत म्हटलं, "अरे, माझ्या पत्नीसाठी ह्याच्यापेक्षा सुंदर दुसरं काय असू शकते" आणि त्याने अदितीच्या नवऱ्याला हात धरून सोबत त्याच्या मित्रांकडे नेलं. आता फक्त अदिती आणि लतिका एकमेकांसमोर होत्या आणि लतिकाने विचारलं, "तू कशी आहेस, काल कार्यक्रमाच्या नादात झोप झाली नाही का तुझी.. खुश आहेस ना .. शेवटी तुझा प्रिन्स भेटला तुला ... थाट आहेत ना तुझे .. लतिकाने तिच्या लहान मुलाला कळेवर घेतलं काही बोलणारच होती तर तिच्या मुलाचं खेळणं खाली पडलं .. ती जशी ते घेण्यासाठी वाकली तिचे मोकळे केस पाठीवरून समोर आले आणि अदितीने पाठीवरच्या काही लालसर जखमा बघितल्या. तेवढ्यात नातवाला जवळ घेण्यासाठी सासू आल्या आणि मग अदितीला बघत म्हणाल्या, "लग्न झालं तरी तू अशी साधी का राहतेस, एखादा मोठा दागिना घालायचा ना, कि घाईत लॉकर मधून काढणं विसरलीस..." अदितीने गोष्ट सांभाळून हो हो .. लक्षातच नव्हतं माझ्या .. आणि दोन दिवस सुट्या होत्या ना .. असं म्हणत गोष्ट बदलली... मग त्या म्हणाल्या, "बर जेवून घ्या .. तुमच्या गप्पा झाल्या असतील तर ..." अदितीने लतिकाचा हात धरला आणि तिला परत म्हणाली, "लतु, नक्की तू खूप खुश आहेस ना .. तुझ्या मनासारखं स्वातंत्र्य आहे ना तुला .. मला नंतर फोन कर .. जाऊदे .. तू फक्त मला एक मॅसेज टाक ..मी तुला भेटायला येईल .. " लतिका तिला म्हणाली, "अग, तू बघते आहेस ना सर्व.. सगळं माझ्या मनासारखंच आहे. तू उगाच काळजी करतेस .. " आणि तिच्या डोळ्यातल्या अलगत पाण्याला तिने हातानेच पुसलं 

अदिती घरी परतली पण मनाने खूप समाधानी होती. स्वतःच एकपदरी मंगळसूत्र काढून कपाटात नीट ठेवत होती. अमित तिला म्हणाला, "तुझ्या मैत्रिणीचा हार खूप छान होता. मस्त वाटली मला मंडळी, एकदम जबरदस्त. शाही थाट होता तुझ्या मैत्रिणीचा.. नाही ... आणि आपण किती वर्षांपासून प्रत्येक बोनस वर विचार करतो कि तुझ्या मुगळसूत्रात आणखीन एक पदर जोडू म्हणून, पण जमतच नाही. मलाही माझ्या राणीला सोन्यानी माळवावीशी वाटते" अदिती अमितचा हात हातात घेत म्हणाली, "मला तशीही दागिन्यांची आवड नाहीच आणि तुमच्याशी लग्न झाल्यानंतर तुम्ही जो मला दागिना दिलात तोच तर खूप मोठा आणि मौल्यवान दागिना आहे माझ्यासाठी. माझं स्वातंत्र जे मला वडिलांच्या घरीही नाही मिळालं. तुम्ही मला माझं व्यक्ती स्वतंत्र दिलंत, लग्नानंतरही मला शिक्षण पूर्ण करू दिलंत, मला माझ्या आवडीचे कुकिंग आणि पेंटिंग क्लास करण्यास प्रोसाहन दिल. मी काय घालावं आणि काय नाही ह्यावर तुमचा कधीच आपेक्ष नव्हता. मला माझ्या माहेरी जाण्यासाठीच्या परवानगी साठी कुणाच्या मागे लागावं लागत नाही. माझं घर मी मनासारख सजवते आणि माझ्या मनात येईल तसं मी वागते. मला तुमच्या सोबत भांडण्याचंही स्वतंत्र आहे आणि रुसण्याचंही. मला कुठल्याच दागिण्याची गरज नाही माझं स्वांतत्र्यच मला लाख मौलाच आहे आणि मी अशीच सुंदर दिसते, हो ना ..."

अमित तिच्याकडे बघतच राहिला आणि म्हणाला, "काय ग, मग लतिकाच्या सासूला का सांगितलं कि तुझे दागिने लॉकर मध्ये आहेत म्हणून.." अदिती हसत म्हणाली, "माझ्या मनमोकळ्या सौंदर्यच गुपित त्यांना कुठे माहित होत. मग मीही त्यांच्याच शब्दांना दुजोरा दिला. माझं लाख मौलाच स्वातंत्र नाहीना कुठल्या तिजोरीत राहू शकत.. बघितलं का तुम्ही लतिका कशी शोभेची बाहुली बनून फिरत होती. अंगभर दागिन्यांतही तिच्या मनातलं स्वातंत्र कैदेत होत .. तिच्या चेहऱ्यावर नाही पण तिच्या डोळ्यात जाणवली मला तिची कैद .. तिला मनासारखं सासर भेटलय पण मनासारखं स्वतंत्र देणारा नवरा नाहीच....कदाचित .. ती प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्याची नाहीतर सासूची परवानगी घेत होती, स्वतःच्या विचाराने काहीच करत नव्हती... बोलेल तिच्याशी कधीतरी पण आत्ता मला माझ्या नवऱ्यावर प्रेम येतेय .. तुम्ही मला मुल्यवान दागिना दिलाय स्वतंत्र .. विचार करण्याचं आणि माझे विचार जगण्याचंही ... म्हणूनच मला ते एकपदरी मंगळसूत्र घालण्यात खूप आनंद आहे ...

मध्येच त्याच्या मुलीचं झोपेत रडणं सुरु झालं आणि दोघेही तिला सांभाळण्यात गुंगु झाले...

स्त्री कुठल्याच भारी भक्कम दागिण्याची गरज नाही जेव्हा ती मनाने स्वतंत्र असते .. नवऱ्यासोबत ... आणि तोच सर्वात महागडा दागिना आहे ज्या नवऱ्याने तो दिला त्याची बायको जगातली सगळ्यात सुंदर बायको दिसते कुठल्याही दागिन्याशिवाय ..  



Rate this content
Log in